Back
हिंगोलीत मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा धोका!
GDGAJANAN DESHMUKH
Aug 18, 2025 04:45:12
Parbhani, Maharashtra
अँकर- हिंगोली जिल्ह्यात भल्या पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून या पावसामुळे नागरिकांची नियमित कामे खोळंबळी असून शेतकऱ्यांना दुग्ध पुरवठा करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे,ओढे नदी नाल्याला आलेल्या पुरामुळे अडचणीचा सामना करावा लागत आहे. सकाळीच पाऊस सुरू झाल्याने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेला दांडी मारावी लागलीय. त्यामुळे सगळीकडे निरव शांतता पसरली आहे...
बाईट- शेतकरी
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowAug 18, 2025 06:47:35Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1808ZT_CHP_WARDHA_BRIDGE
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर- हैदराबाद मार्ग झाला बंद, चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहराजवळच्या वर्धा नदीवरील पुलावर पुराचे पाणी, चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस नसला तरी अमरावती -यवतमाळ जिल्ह्यातून पैनगंगा नदी मार्गे वर्धा नदीत येणारी पाणी ठरले कारण
अँकर:-- चंद्रपूर- हैदराबाद मार्ग बंद झालाय. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहराजवळच्या वर्धा नदीवरील पुलावर पुराचे पाणी आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस नसला तरी अमरावती -यवतमाळ जिल्ह्यातून पैनगंगा नदी मार्गे वर्धा नदीत येणारे पाणी यासाठी कारण ठरले आहे. पुराचे पाणी पुलाला टेकल्याने पोलिसांनी बॅरिकेड्स लावून वाहतूक बंद केली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पाऊस नसल्याने आगामी काही तासात पाणी ओसरण्याची शक्यता आहे. सध्या मात्र वाहतूक बंद झाल्याने दोन्हीकडील वाहनांची कोंडी झाली आहे.
बाईट १) विपीन इंगळे, पोलिस निरीक्षक, बल्लारपूर पोलीस ठाणे
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 18, 2025 06:47:22Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्ताने ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात भक्तांची अलोट गर्दी ( WKT )
- शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्ताने ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात भक्तांची अलोट गर्दी
- श्री. सिद्धेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये साकारण्यात आली ऑपरेशन सिंदूरची रांगोळी
- पावसाच्या सरी सुरू असताना देखील भक्तांचा दर्शनासाठी ओघ सुरूच
- शिवयोगी सिद्धेश्वरांच्या योग समाधीला 800 किलो फुलांची सजावट
याचविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी... ( WKT )
0
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 18, 2025 06:33:55Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1808ZT_NANDED_RATHOD_BYTE(2 FILE)
नांदेड :ब्रेकिंग
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील 3 गावात 100 हुन अधिक लोक पाण्यात अडकले
SDRF, NDRF च्या टिमकडून बचावकार्य सुरू
सततच्या पावसामुळे बचावकार्यात अडथळा
सैन्यदलाच्या तुकडीलाही केले पाचारण
हसनाळ गावातून 3 ते 4 नागरीक बेपत्ता
मुखेडचे आमदार तुषार राठोड यांची माहिती
अँकर :नांदेड जिल्ह्यातील मुखेड मधील तिन गावात शंभराहून अधिक लोक पाण्यात अडकल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे या नागरिकांना पाण्याबाहेर काढण्यासाठी सैन्य दलाला पाचारण करण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे.छत्रपती संभाजीनगरहून सैन्य दलाची तुकडी निघाल्याची प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आह। पावसाचा अँलर्ट असल्याने परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता असल्याने खबरदारी म्हणुन सैन्य दलाला पाचारण करण्यात आलं आहे.मुखेड तालुक्यातील हसनाळ , रावणगाव,भासवाडी येथे लोकं अडकल्याची माहिती समोर आली आहे.पहाटे ढगफुटी सारखा पाऊस आणि लेंडी प्रकल्पाचे पाणी गावात शिरल्यानं ही परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती मुखेडचे आमदार तुषार राठोड यांनी दिली आहे
बाईट :तुषार राठोड,आमदार,मुखेड,नांदेड
2
Report
APAMOL PEDNEKAR
FollowAug 18, 2025 06:33:31Mumbai, Maharashtra:
ब्रेक
मुंबईच्या कांजूर विभागात मोठ्या प्रमाणात एल बी एस मार्गावर पाणी
एलबीएस वरून ठाणे कडे जाणारी वाहतूक बंद
पाण्यात रिक्षा देखील बंद
Wkt मयुर राणे
1
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 18, 2025 06:33:17Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी
मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ
परचुरी ब्रिजला लागलं बावनदीचं पाणी
नारळीच्या बागेमध्ये सुद्धा आठ फुटांचे पाणी
खेडमधील जगबुडी नदीने ओलांडली धोका पातळी
जगबुडी नदीची धोका पातळी 7 मीटर, सध्याची पाणीपातळी 7.20 मीटर
संगमेश्वरमधील शास्त्री नदीने ओलांडली इशारा पातळी
राजापूरमधील कोदवली नदीनेही ओलांडली इशारा पातळी
प्रशासनाकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा
जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट
बावनदी देखील पाणी पातळीत कमालीची वाढ
24 तासात जिल्ह्यात 134 मिलिमीटर पावसाची नोंद
जवळपास सर्वच तालुक्यामध्ये 100 मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद
खेड दापोली संगमेश्वर मध्ये 150 पेक्षा जास्त पाऊस
1
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowAug 18, 2025 06:33:04Parbhani, Maharashtra:
अँकर- हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरण 100 टक्के भरलं असून एलदरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने सिद्धेश्वर धरणात पाण्याचा येवा सुरू आहे,त्यामुळे सिद्धेश्वर 12 दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून पूर्णा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आलाय... या धरणाचे ड्रोन दृश्य आम्ही खास झी 24 तासच्या प्रेक्षकासाठी घेऊन आलोत...
4
Report
AKAMAR KANE
FollowAug 18, 2025 06:30:11Nagpur, Maharashtra:
Ngp wadetiwar byte
live u ने फीड पाठवले
-------------
नागपूर -
बाईट - विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते
On अतिवृष्टी -
- मराठवाडा आणि खास करून पश्चिम विदर्भात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे, धरणांची दरवाजे न सांगता उघडल्याने शेतीचे आणि घरांचे नुकसान झाले आहे, शेती आहे की तलाव आहे इतका प्रचंड पाऊस झाला आहे आणि होत्याच नव्हतं झालेला आहे
- सरकारकडे मागणी आहे की तातडीने या भागात मराठवाडा किंवा विदर्भ शेतीचे पंचनामे करा, घरांचे पंचनामे करा आणि तातडीने या सगळ्यांना मदत कशी देता येईल यासाठी निर्णय घ्या अशी आमची सरकारकडे मागणी आहे
- मागच्या वेळच्या अतिवृष्टीचे पैसे अजूनही आले नाही, सव्वा दहा लाख कोटींवर कर्ज गेलेलं आहे, पुन्हा राज्याला कर्जबाजारी करतात, अधिकच कर्ज वाढले आहे पण ते शेतकऱ्यांसाठी वाढेल, तेव्हा शेतकरी आशीर्वाद देतील पण त्यांना आता मात्र वाऱ्यावर सोडू नका
On निवडणूक आयोग -
- पुरावे दिलेत ज्यावेळी निवडणूक आयोगाकडे आम्ही पुरावे मागत होतो आम्ही सीसीटीव्ही फुटेज मागत होतो मतदान कसं वाढलं?
- एका बुथवार 15% 20% मतदान झालं असेल पाच वाजेनंतर तर लाईन दिसायला पाहिजे, ती लाईन दिसत नाही, ती कुठे गेली प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्हीची व्यवस्था केली पाहिजे, तिथे होती का ?
- अलापल्ली तालुक्यातून माझ्याकडे दहा-बारा गावांमध्ये झालेली मतदारांची आकडेवारी आली
- तकलादू प्रेस कॉन्फरन्स होती, राजीव कुमार है उद्या राज्यसभेवर नाहीतर इतर मंडळावर दिसेल, निष्पक्ष मुळात दिसले नाही त्यांच्या भाषणातून द्या बोलेतून शब्दांचा जो प्रयोग होता त
- सात दिवसात प्रतिज्ञापत्र मागताय म्हणजे पुरावे तुमच्याकडे होते, ते आयोगाने नष्ट केले, चोराने चोरी करायचे आणि मुद्देमाल मात्र मालकाकडून मागायचा हे गजबच आहे
- चोरी करून गेले, लावायची आणि त्यांनी तक्रार केले त्यांना पुरावे लागतात, हे विचित्र काम आहे निवडणूक आयोगाचा चित्र विचित्र निवडणूक आयोग देशात कधीही आलेला नाही
- राहुल गांधी माफी मागणार नाही, आमचे झालेले पत्र व्यवहार सगळे रेकॉर्डवर आहेत आम्ही दिलेल्या पत्राचे उत्तर कुठलेही निवडणूक आयोगाने दिलेले नाही
- आमचे उत्तर दिला असता आणि मागितलेले माहिती दिली असते तर तो निवडणूक आयोगाला अधिकार प्राप्त झाला असत
On प्रफुल पटेल - शरद पवार -
- प्रफुल पडेल आज जे बोलत आहेत आणि त्यांना भाजपबरोबर जायचं होतं ते यापूर्वी ठरलेला होता, पवार साहेबांचा मन वाळवून वाळवून ते थकले होते अशी माहिती आहे, थकल्यानंतर अजित पवारांची स्थिती अशी होती आम्ही साक्षीदार आहोत अनेक जण साक्षीदार आहेत
- अजित पवार आणि प्रफुल पटेल यांचे फार सख्य नव्हतं, त्यांचे संबंध चांगले नव्हते, आम्ही आघाडीत असल्याने आम्हाला त्याची माहिती आहे हे कोणी नाकारू शकत नाही
- त्यांचा आग्रह भाजपमध्ये जाण्याचा कशामुळे होत आहे कुठेही लपून राहिलेलं नाही हे भारतातील शेंबड्या पोरालाही माहित आहे त्यांचा आग्रह कशासाठी होता
- ज्या प्रकारचा घटनाक्रम आहे त्यानुसार भाजपमध्ये जाणं त्यांना आवश्यक होता, आणि ते पवार साहेबांकडे जे बोलले असते पवार साहेब हुशार आहेत ते खेळवत ठेवतात अशावेळी ज्यावेळी त्यांना निर्णय घ्यायचा नसतो
- कोणीतरी जायचं म्हटलं तर एकटा जाऊन उपयोग नाही म्हणून ते प्रफुल पटेल अजित दादांकडे वळले
- पवार साहेबांकडे बोलले असतील त्यावेळी पवार साहेबांनी स्पष्ट भूमिका मांडली
On।प्रफुल पटेल -
- आता काल मी त्या विषयावर बोलताना सांगितले की तुमची आघाडीत सत्तेचा मलिदा खात आहेत, पक्ष त्यांना विचारा आता त्यांच्यात काय चाललं आहे आता होणार नाही सोयीचा करतील भाजपा बॉस आहे
- हे सत्तेतील मालक नाही, सत्तेतील मालक आणि चालक हे देवेंद्र फडणवीस आणि भाजप आहे, हे त्यांनी नेमलेले आमच्याकडे जसं म्हणतात वार्षिक माणसं आहेत
On उपराष्ट्रपती निवडणूक खरगे -
- मला या संदर्भात बोलता येणार नाही कारण राष्ट्रीय निर्णय आहे तो त्या लेव्हलचा निर्णय आहे आमच्या एका माणसा संदर्भात निर्णय घेतील
On राधाकृष्ण उपराष्ट्रपती -
- तो उद्धवजींचा निर्णय आहे, त्यामुळे महाराष्ट्रात राज्यपाल असताना अनेकदा आम्ही त्यांना भेटलो, अनेक गंभीर विषयावर चर्चा झाली, या राज्यात येणारा ड्रग्स, महिला अत्याचार, शेतकरी प्रश्न अशा अनेक विषयावर भेटलो
- त्यांनी महाराष्ट्राची खुर्ची सांभाळताना महाराष्ट्राच्या हितासाठी काही ठोस निर्णय घ्यावा असं मला ऐकिवात नाही, त्यामुळे त्यांची त्या खुर्चीवर बसून फेअर भूमिका होते आणि महाराष्ट्राच्या हिताची भूमिका होते असा कुठेच जाणवला नाही, त्यामुळे उद्धवजी सुद्धा पाठिंबाचा निर्णय घेणार नाहीत असं मला वाटतं
On शिवभोजन थाळी -
- सत्तेमध्ये बसलेल्या मुर्दाडांनी गरीब शिवभोजन चालवणाऱ्यांचे पैसे द्या, मेहनत करून घामाचे पैसे आहेत, सात सात महिने पैसे नाही, त्यांच्याही आत्महत्याची वाट पाहत आहे काय
- यांच्याकडे सगळे तिजोरी साफ करताना, साफ केली म्हणून कोणाचेच पैसे मिळत नाही, डीपीसीचा पैसा नाही, संजय गांधी योजनेचा पैसे नाई, आमदारांना निधी नाही, लाडके बहीण आणि फक्त आणि फक्त जोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तोपर्यंत लाडकी बहीण आहे, ज्या दिवशी हे सगळं संपेल लाडकी बहीण तिकडे, आम्ही इकडे
-
4
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 18, 2025 06:19:21Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1808ZT_JALNA_WATER_HOUSE(15 FILES)
जालना :ब्रेकिंग : शहरात रात्रीपासून मुसळधार पाऊस
श्रीकृपा रेसिडेन्सीच्या 50 घरांमध्ये शिरलं पाणी
रस्त्यावर गुडघाभर पाणी असल्याचं चित्र
घरांमध्ये पाणी शिरल्यानं धान्यासह साहित्याचं नुकसान
अँकर- जालना शहरात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असून शहरातील श्रीकृपा रेसिडेन्सीमधील तब्बल 50 घरांमध्ये पाणी शिरलंय.. रात्री 2 वाजल्यापासून शहरात जोरदार पाऊस पडत असून शहरातल्या काही भागात अतिवृष्टी झालीये.. कोठारी नगर येथील रस्त्यांवर गुडघाभर पाणी असून घरांमध्ये धान्यासह साहित्याचं नुकसान झालं आहे.. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र अद्याप कोणीही याठिकाणी येऊन पाहणी केली नाही. त्यामुळं काही जीवितहानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहिल असं नागरिकांनी म्हंटलंय.
बाईट-राहुल करणाडे, नागरिक (कपाळाला टीका)
बाईट- संजय शहाणे, नागरिक (डोक्यावर टोपी)
बाईट- निलेश बगडिया, नागरिक ( गुलाबी शर्टी)
6
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 18, 2025 06:19:07Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - चांदोलीत अतिवृष्टी,धरण 91 टक्के भरल्याने धरणातून साडेसहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू.
अँकर - सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झाली आहे.गेल्या 24 तासात 83 मिलीमीटर पाऊसाची नोंद झाली असून चांदोली धरण 91.80 टक्के भरले आहे.त्यामुळे चांदोली धरणातून वारणा नदी पात्रात साडे सहा हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.गेल्या आठवड्यापासून चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे.34.40 टीएमसी क्षमता असणाऱ्या धरणात आता 31.58 टीएमसी इतका पाणीसाठा निर्माण झाल्याने प्रशासनाकडून धरणातून पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रात करण्यात येत असल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे,असा आवाहन करण्यात आले आहे.
6
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 18, 2025 06:16:55Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी - रत्नागिरीच्या धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस
खोरनिनको धरणाचं रौद्ररूप
लांजा तालुक्यातील खोरनिनको धरण पूर्ण क्षमतेने भरलं
मानवनिर्मित सांडव्यावरून पाण्याचा जोरदार प्रवाह
5
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 18, 2025 06:16:37Raigad, Maharashtra:
स्लग - रायगड जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट ..... सलग चौथ्या दिवशी पाऊस ...... संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत .....
अँकर - रायगड जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पाऊस बरसतो आहे. हवामान विभागानं जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट दिलाय. जोर कमी असला तरी अधून मधून पावसाच्या सरी बरसत आहेत. रस्त्यावर, सखल भागात पाणी साचले आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असली तरी त्या इशारा पातळीच्या खालून वाहत आहेत. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू असला तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. समुद्र खवळलेला आहे. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. रायगड मधील पावसाची सद्यस्थिती सांगताहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार ......
वॉक थ्रू - प्रफुल्ल पवार
4
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 18, 2025 06:16:29Beed, Maharashtra:
बीड : माजलगाव तालुक्यात मुसळधार पावसामुळे जीवनापूर गावच्या नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला
Anc- बातमी आहे बीडमधून... माजलगाव तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झाले आहे. सलग पावसामुळे जीवनापूर येथील नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
जीवनापूर, पारगाव, उमरी, लोणगाव, पाथरुड आदी गावांचा रस्ते वाहतुकीशी संपर्क पूर्णपणे खंडित झाला असून नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. अनेक शेतजमिनी पाण्याखाली गेल्यामुळे सोयाबीन, कापूस, मका यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
पूरामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
9
Report
SNSWATI NAIK
FollowAug 18, 2025 06:15:11Navi Mumbai, Maharashtra:
story slug - एपीएमसी मार्केट आणि मॅफको येथे रस्त्यावर पाणी
एपीएमसी मार्केट मे पानी
ftp slug - nm apmc water login
shots-
reporter- swati naik
navi mumbai
anchor - नवी मुंबई मद्ये काल पासून पावसाची संततधार सुरू असून याचा फटका तुर्भे मॅफको मार्केट ला बसला आहे,मॅफको येथील सखल भागात रस्त्यावर पाणी साचण्यास सुरवात झाली आहे,रस्त्यावर पाणी साचले असल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे, तर एपीएमसी भाजी मार्केट मद्ये देखील पाणी साचले असून ग्राहकांना या पाण्यातून वाट काढावी लागत आहे ।
gf -
---------------------
8
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 18, 2025 06:06:10Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - गोवंशी हत्या बंदी कायदा विरोधात सदाभाऊ खोत भडकले,गोवंश हत्या बंदी नव्हे हा गोपालक हत्या कायदा - गोरक्षकांच्या गोरखधंद्या विरोधात नांगराचा फाळ घेऊन रस्त्यावर उतरणार.
अँकर - गोवंश हत्याबंदी कायदयावर सत्ताधारी आमदार सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे.गोवंश हत्या बंदी कायदा, गोपालक हत्या कायदा बनला आहे,अशी टीका आमदार खोत यांनी केली आहे. गोरक्षक रस्तो-रस्ती भाकड जनावरे अडवून खंडणी बहाद्दर बनले आहेत. वाकड जनावरांमुळे शेतकऱ्याला दोन पैसे मिळत होते मात्र आज गोरक्षकांच्या गोरख धंद्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.त्यामुळे गोभक्षक विरोधात आता नांगराचा फाळ घेऊन आम्ही उतरणार असल्याचा इशारा,ते आमदार सदाभाऊ खोत यांनी दिला आहे सांगलीच्या इस्लामपूर मध्ये बोलत होते
आला आहे.
बाईट - सदाभाऊ खोत - आमदार .
12
Report
MNMAYUR NIKAM
FollowAug 18, 2025 06:05:47Buldhana, Maharashtra:
बुलढाणा जिल्ह्यात पावसाचा हाहाकार
देऊळगाव साकर्षा येथे मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत..रस्ते बंद
Anchor -
बुलढाणा जिल्ह्यात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्षा परिसरात मुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
पावसाचा जोर इतका जास्त आहे की, अनेक ठिकाणी पाणी साचले असून परिसरातील सर्व शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मेहकर-अकोला रोड पूर्णपणे बंद झाला आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
सखल भागात पाणी शिरल्यामुळे अनेक घरांमध्येही पाणी साचले आहे. सध्या पावसाचा जोर कमी असला तरी, परिसरातील नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पुढील काही दिवस पावसाचा अंदाज असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
12
Report