Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442401

बल्लारपूरमध्ये 210 कुटुंबांना घराचे पट्टे: आमदार सुधीर मुनगंटीवारांची उपस्थिती

AAASHISH AMBADE
Aug 14, 2025 13:33:05
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 1408ZT_CHP_BALLARPUR_LAND ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरमध्ये 210 पात्र लाभार्थ्यांना घराचे पट्टे वाटप, आ. सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील  बल्लारपूर येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (शहरी) 210 निवासी पट्ट्यांचे वितरण करण्यात आले. शासनाच्या जागेवरील अतिक्रमणाचे नियमन करून करण्यात आलेल्या या वाटपामुळे अनेक कुटुंबांच्या आनंदात भर पडली. हा केवळ पट्टे वाटपाचा कार्यक्रम नसून, भविष्यातील सुमारे 12 हजार पात्र लाभार्थ्यांना हक्काचे घरपट्टे देण्याच्या महाअभियानाची भक्कम नांदी आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. त्यांच्या हस्ते बल्लारपूर, नाट्यगृह येथे पट्टेवाटप करण्यात आले. बल्लारपूर मतदारसंघात अत्याधुनिक सैनिक शाळा, बॉटनिकल गार्डन, एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे उपकेंद्र, नगरपरिषदेची नवीन इमारत, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, स्व. सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्र, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय अशी मोठी कामे साकारण्यात आल्याचे ते म्हणाले.  आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
13
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Aug 14, 2025 15:45:15
Kalyan, Maharashtra:
​डोंबिवलीत स्कायवॉकवर धोकादायक इमारतीचा भाग कोसळला; प्रवाशांचे जीव धोक्यात असल्याने ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने स्कायवॉक केला बंद Anc..​डोंबिवली पश्चिमेतील रेल्वे स्कायवॉकला लागून असलेली एक तीन मजली जुनी आणि धोकादायक इमारत पाडण्याचे काम सुरू असताना हा अपघात घडला. विकासकांच्या निष्काळजीपणामुळे इमारतीचा काही भाग स्कायवॉकवर कोसळला. या दुर्घटनेत स्कायवॉकचे छप्पर आणि लोखंडी रॉडचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने, त्यावेळी स्कायवॉकवर गर्दी कमी असल्याने मोठा अनर्थ टळला.​अपघात इतका गंभीर असूनही, विकासकांनी अर्धी इमारत तशीच सोडून दिली आहे. इमारतीचा हा उर्वरित भागही धोकादायक अवस्थेत असून तो कधीही कोसळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका कायम आहे. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी यावर कोणतीही ठोस कारवाई न करता केवळ दुरुस्तीचे आदेश दिले आणि स्कायवॉक प्रवासासाठी सुरूच ठेवला.​या गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच उद्धव ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करत शिवसैनिकांनी स्कायवॉक बंद पाडला. दीपेश म्हात्रे यांनी तात्काळ वॉर्ड अधिकाऱ्याला घटनास्थळी बोलावून संबंधित विकासकावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. Byte:- दीपेश मात्रे (उद्धव ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण जिल्हाप्रमुख)
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 14, 2025 15:34:31
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
छत्रपती संभाजीनगर.. *उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बाईट पॉइंटर...* ऑन दर्जेदार कामे - दर्जेदार कामासाठी चांगले कंत्राटदार निवडणे गरजेचे आहे. - प्लॅनिंग कुठेतरी मार खाते, रस्ता फोरलेने ऐवजी सिक्सलेन जरी झाला, तरी त्यामध्ये पाईपलाईन यायला नको अशी प्लॅनिंग करायला हवी. - केंद्र सरकार राज्य सरकारने 50 टक्के- 50 टक्के अशी निधी दिलेली आहे. ऑन गोगावले वक्तव्य. - एखाद्या व्यक्तीने काही म्हटलं तर ते सर्व शिवसेनेचे म्हणणं नाही. वेगवेगळे विचार असतात, स्थानिक लेव्हलचे वेगळे प्रश्न असतात. एखाद्याने नकारात्मक भूमिका मांडली तर तुम्ही तेवढेच दाखवत असतात. ती महायुती सरकारची भूमिका नाही. जर एखाद्याने बोललं तर त्याच्या पक्षाचे नेते त्याची दखल घेत असतात. - अनेक जण बोलून जातात. मात्र त्यानंतर दिलगिरी व्यक्त करतात. माणूस आहे एखाद्या वेळेस बोलून जातात. ऑन मास बंदी. - आम्ही काय बोलायचं ते बोललो,पुन्हा तेच- तेच काढता,आता 15 तारीख आली ना... ते महत्त्वाचं आहे की स्वातंत्र्य दिवस साजराकरणे महत्त्वाचा आहे....? ऑन मतचोरी आरोपी.. - निवडणुकीत सगळीकडे मताची संख्या वाढत असते.लोकसभेला मतदान कमी होतो, त्यापेक्षा जास्त मतदान विधानसभेला, त्यापेक्षा जास्त महानगरपालिकेला- नगरपालिकेला व त्यापेक्षा अधिक जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान होत असतो. - जे मयत असतील त्यांची नाव तर काढली पाहिजे की नाही? - एवढ्या पारदर्शक निवडणुका झाल्या तरी विरोधक कसं करतात.. - विरोधक निवडून आले तर मशीन चांगली, आणि पराभूत झाले तर ईव्हीएम चुकीचं.. मतदार यादीत घोटाळा, सगळी बनवाबनवी असं काहीतरी सांगायचा प्रयत्न विरोधक करतात... - लोकसभेला 48 पैकी 31 जागा आम्ही हरलो. आम्ही पराभव मान्य केला.आम्ही पराभवाला खचून न जाता सामोरे गेलो. आम्हाला चांगले यश मिळालंय. आम्हाला यश मिळालं मात्र आम्ही जमिनीवर पाय ठेवून चालणार. यश- अपयश राहतोच. चमत्कार फक्त मतदार करू शकतो.. हा मतदार राजा मताचा वापर कसा कुठे करायचा मतदारांना ते खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. विरोधक जसं दाखवतात तसं काहीही नाही. ऑन सूरज चव्हाण पदनियुक्त - मला त्या गोष्टी माहिती नाही. मी त्या मिटींगला नव्हतो, त्याबद्दलची माहिती मी घेतो. मला त्यावेळी जे घटकलं त्यावेळी मी तो निर्णय घेतला. मला जी गोष्ट खटकली त्याबद्दल मी तडकाफडकी निर्णय घेत असतो हे सर्वांना माहिती आहे. ऑन लाडकी बहीण - अंगणवाडी सेविका. - आम्ही त्याच्यातून मार्ग काढू,काळजी करू नका लाडक्या बहिणींना नाराज करायचं नाही. लाडक्या बहीण योजनेसाठी ज्या नियम व अटी लावल्या आहेत. त्या नियमात लाडक्या बहिणी बसल्या पाहिजेत. - काहींच्या घरात चारचाकी वाहन असताना ते लाडक्या बहिण योजनेचा लाभ घेतात. - विरोधकांनी आरोप केला होता, निवडणूक झाल्यावर ही योजना बंद होईल. मात्र सात ते आठ महिने झाले, आजही योजना सुरू आहे. आम्ही तसं काही बंद केलेलं नाही. - काही नोकरीला असलेल्यांची देखील या योजनेमध्ये नावे निघाली आहे. ज्यांची एपत आहे.त्यांनी या योजनेचा लाभ घेऊ नये. ज्या गरजू आहे, त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
1
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 14, 2025 15:34:23
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn ajit pawar Pinter's Ganesh mahasangh speech pointers निवडणूक निमित्ताने राजकारण करावे मात्र निवडणूक झाल्यावर एकत्र येत उत्सव साजरे करायचे असतात संजय शिरसाठ मागण्या केल्या, होय इथं दर्जेदार काम झालेच पाहिजे हे मराठवाड्याचे प्रवेश द्वार आहे माझी इतक्या नेत्यांना विनंती आहे, तुम्हाला संभाजी राजे स्मारक हवंय तर मास्टर प्लॅन तयार करा आणि आम्हाला द्या आम्ही कमी पडणार नाही तुळजाभवानी, अंबाबाई मंदिर, जेजुरी , पंढरपूर सगळीकडे आम्ही जीर्णोद्धार केलाय.. इथं उशाशी धरण  आहे तरी पाणी मिळत नाही शोकांतिका आहे, शिरसाठ साहेब म्हणाले बारामती ला चांगल्या इमारती दिसल्या, मी सकाळी उठून जातो आणि पाहणी करतो... [ इथल्या रस्त्याला हजार कोटी मागितले आहे तो योग्य पद्धतीने खर्च व्हायला हवा, काम दर्जेदार व्हायला हवी... आता मी एक कार्यक्रमातून आलो रस्त्यावर खड्डेच, तिथं 30 कोटी खर्च झाले म्हणे पैसे कुठं गेले खड्ड्यात एक रस्त्याचं काम 27 टक्के बिलो घेतले काय दर्जाचे काम होईल, काम दर्जेदार होण्यासाठी रास्त किमतीत द्यायला हवे... इथल्या विकास कामना अडचण येणार नाही पण नियोजन चांगले पाहिजे, पैठण रस्ता बांधला त्याखाली पाणी लाइन टाकली , ती खराब झाली तर रस्ता फोडायचा का.. हुशार लोकांची मदत घ्या... अतिक्रमण काढले मी पण पिंपरी मध्ये काढले पण लोकांना वाऱ्यावर सोडले नाही, तुम्ही पण लक्ष द्या
2
comment0
Report
SKSudarshan Khillare
Aug 14, 2025 15:30:57
Yeola, Maharashtra:
*लासलगाव (नाशिक) ब्रेकिंग.....* - कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी.... - अखेर बांगलादेशाने कांदा आयात बंदी हटवली... - 13 डिसेंबर 2025 पर्यंत बांगलादेशात कांदा भारतातून पाठवण्यास परवानगी.... - या निर्णयामुळे कांद्याच्या दरात घसरणीला लागणार ब्रेक... - कांद्याच्या बाजारभावात 100 ते 300 रुपये प्रति क्विंटल पर्यंत वाढण्याची शक्यता.... - आज आणि उद्या 200 टनापर्यंत कांदा बांगलादेशात पाठवण्याची परवानगी... - त्यानंतर मोठ्या प्रमाणात कांदा पाठवण्यासाठी परवानगी दिली जाणार....
3
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 14, 2025 15:30:12
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn shirsath pointers मी कितीही हसत खेळत बोललो त्याची ही बातमी वेगळी होते... दादा मोठ्या मनाचा माणूस आहे कुणी चिंता करू नका, जे मागितले ते  मिळते, कॅबिनेट मध्ये प्रस्ताव आला त्यावर पैसे लिहले नसले तर मंजूर पैसे लिहले असले तर नामंजूर इतके बारीक लक्ष असते ( दादा ना टोला ) गण रायांनी दादाच्या कानात हळूच सांगावे आम्हाला शहराला हजार कोटी द्यावे अतिक्रमण पाडले आता रस्ते करायचे आहे, किती एस्टीमेट होते यावर दादांची नजर आहे, जोरात टाळ्या वाजवा म्हणजे पैसे लवकर मिळतील, मी एक वाक्य वापरले पैसे आमच्या बापाचा आहे का तर हेड लाइन झाली... आजचा दिवस गणपती ला नमन करायचा दिवस आहे या निमित्ताने दादा आले ते ही काहीतरी देऊन जातील
2
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Aug 14, 2025 15:01:41
Parbhani, Maharashtra:
अँकर- स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत आज परभणी शहरात 300 मीटर लांबीच्या तिरंगा ध्वजाची पदयात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली. शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कमानी पासून या पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. या पदयात्रेत विद्यार्थी वेगवेगळ्या संघटना माजी सैनिक शहरातील भारतीय नागरिकांचा सहभाग बघायला मिळाला.
5
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Aug 14, 2025 14:31:47
Parbhani, Maharashtra:
अँकर- हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मगदार संघात असलेल्या मळई या आदिवासिंच्या गावाला स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर ही पक्का रस्ता नसल्याने गर्भवती महिलेला खाटावरन रुग्णालयात नेण्याची संतापजनक घटना समोर आलीय. हिंगोलीच्या कळमनुरी मतदार संघातील मळई या चारशे लोकवस्ती असलेल्या आदिवासी गावाला स्वातंत्र्यपूर्व काळापासून पक्का रस्ताच नसल्याने येथील नागरिकांना रुग्णालयात नेत असतांना आज ही असे खाटेवर उचलून न्यावं लागतेय, मेकिंग इंडिया आणि डिजिटल इंडियाच्या आपण गप्पा मारत असतांना ग्रामीण भागात मात्र वेगळंच चित्र आहे, येथील आदिवासींना अश्या रोजच मरणयातना भोगाव्या लागत आहेत. हिंगोली जिल्ह्यात शेकडो आदिवासी गाव आहेत,त्यापैकी अनेक गावात जायला आज ही पक्का रस्ता तर सोडाच पाई चालण्यासाठी नीट पाई वाट ही नाहीये,त्यापैकीच मळई हे एक गाव आहे. आदिवासी गावांना रस्त्यासारख्या मूलभूत सुविधा मिळत नसल्याने येथील नागरिक सरकार विरोधात संताप व्यक्त करीत आहेत. मळई येथील सरसाबाई शेळके या गरोदर महिलेला प्रसूतीपूर्व पोटात वेदना होत असल्याने त्यांना तपासणीसाठी रुग्णालयात न्यायचे होते. मात्र गावातुन रस्ता नसल्याने गावकर्यांनी त्यांना खाटेवर झोपवून रुग्णालयात नेलय. आमदार संतोष बांगर यांच्या मतदार संघातील हे गाव आहे, आदिवासींचे जेष्ठ नेते नरहरी झिरवाळ या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. किमान ते तरी आता या आदिवासींच्या जीवनातील खडतर प्रवास सुखकर करण्यासाठी पाउल उचलतील का हे बघावं लागणार आहे. बाईट-वर्षा पांडे- ग्रामस्थ,महिला बाईट- छाया नर्मले- अशावर्कर
12
comment0
Report
GMGANESH MOHALE
Aug 14, 2025 14:05:24
Washim, Maharashtra:
वाशिम: File:1408ZT_WSM_TIRNGA_LOGO रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर: स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून वाशिमच्या कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालयात हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात मानवी साखळी तयार केली.आरोग्यदायी जीवन, सशक्त राष्ट्र, पर्यावरण वाचवा,वंदे मातरम, भारत माता की जय, एक भारत अशा जोशपूर्ण घोषणांनी परिसर देशभक्तीमय झाला.
11
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Aug 14, 2025 13:50:51
Nala Sopara, Maharashtra:
Date-14aug2025 Rep-prathamesh tawade Loc-nalasopara Slug-NALASOPARA BOGUS Feed send by 2c Type-Av आपण ही बातमी याआधी केली होती त्यात अपडेट https://youtu.be/GdkwpJ53U2c?si=roBzSjyrUZ-0zyuy Slug- नालासोपाऱ्यातील सुषमा गुप्ता नाव बोगस पत्ता शोधून स्थानिक नागरिकांनी दिली माहिती विधानसभा निवडणुकीत क्षितिज ठाकूर यांनी दिली होती माहिती अँकर - नालासोपाऱ्यात माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मतदार संघातील सुषमा गुप्ता या बोगस मतदार महिलेचे सहा वेळा नाव आल्याचे उजेडात आणले होते...राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर लक्ष वेधल्यानंतर नालासोपाऱ्यात सुषमा गुप्ता हे नाव बरेच चर्चेत आले आहे ... नालासोपाऱ्यातील नगीनदास पाडा परिसरात जीवदानी माता चाळ कमिटी या चाळीत सुषमा गुप्ता राहते, असा उल्लेख निवडणूक आयोगाच्या मतदार यादीत करण्यात आला आहे केवळ नावच नव्हे, तर फोटोसह या पत्त्याची नोंद अधिकृत यादीत आहे. मात्र, स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, सुषमा गुप्ता या पत्त्यावर कधीच राहिल्या नाहीत. त्यामुळे मतदार यादीतील या नोंदीची सत्यता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले असून, निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे...चुकीची नोंद तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. निवडणूक आयोगाकडून प्रत्येक निवडणुकीपूर्वी मतदार यादीची तपासणी व अद्ययावत करण्याचे काम केले जाते. तरीसुद्धा अशा चुका घडत असल्याने नागरिकांच्या शंका वाढल्या आहेत. बाईट- ब्रिजेश शुक्ला, स्थानिक नागरिक.
13
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Aug 14, 2025 13:50:12
Virar, Maharashtra:
Date-14july2025 Rep-prathamesh tawade Loc-nalasopara Slug-VIRAR ED ACTION Feed send by 2c Type-Av for 2c entry Slug -नालासोपारातील ४१ अनधिकृत इमारतींच्या घोटाळ्यात ईडीकडून चौघांना अटक वसई-विरार : वसई-विरार परिसरात उभारण्यात आलेल्या ४१ अनधिकृत इमारतींच्या प्रकरणात प्रवर्तन निदेशालयाने (ED) आज सक्त कारवाई करत ४ जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये अनिल कुमार पवार, वाय.एस. रेड्डी, सीताराम गुप्ता आणि अरुण गुप्ता यांचा समावेश आहे. अटक झालेल्या सर्वांना पुढील कारवाईपूर्वी जे.जे. रुग्णालय, मुंबई येथे वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे. या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर मनी लॉन्ड्रिंग व बेकायदेशीर आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप असून, ईडीच्या तपासातून आणखी काही नावं समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
14
comment0
Report
JMJAVED MULANI
Aug 14, 2025 13:48:43
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 1408ZT_INDAPURCCTV FILE 1 इंदापूरच्या तक्रारवाडीत दिवसाढवळ्या दुचाकीची चोरी..... चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाली कैद Anchor _ इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी मधून दिवसाढवळ्या दोनच्या सुमारास राहुल सावंत यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे.चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हा चोरटा स्पष्टपणे चोरी करताना दिसून येतोय, भिगवण पोलिस या अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत.
13
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Aug 14, 2025 13:48:38
Raigad, Maharashtra:
स्‍लग – खरबाची वाडीला जिल्‍हाधिकारी यांची भेट ........ अँकर – संवाद सेतू कार्यक्रमाअंतर्गत रायगडचे जिल्‍हाधिकारी किशन जावळे यांनी माणगाव तालुक्‍यातील खरबाची वाडी या आदिवासी वाडीला भेट दिली. गावात काम करणारया स्‍वदेस फाऊंडेशनच्‍या कार्यकर्त्‍यांशी चर्चा करून ति थल्‍या विकास कामांचा आढावा घेतला. जिल्‍हाधिकारी यांनी यावेळी गावातील काही घरांनाही भेटी देवून आदिवासी बांधवांशी संवाद साधत त्‍यांच्‍या समस्‍या जाणून घेतल्‍या.
12
comment0
Report
YKYOGESH KHARE
Aug 14, 2025 13:35:16
Nashik, Maharashtra:
Nsk_chavhanblame Feed by 2C अँकर संपूर्ण राज्यामध्ये सध्या ईव्हीएम आणि मतदान यादी मधील घोळ चर्चेमध्ये आहे. जिल्हा जिल्ह्यामध्ये संशयास्पद नाव मतदार यादी मध्ये समाविष्ट झाल्याचा समोर येत आहे. अशातच नाशिक जिल्ह्यातील बागलाण विभागाचे माजी आमदार यांनी गुजरात मधील एका माणसाने आपल्याला ईव्हीएम मॅनेज करण्यासाठी संपर्क केल्याचं सांगत खळबळ उडून दिली आहे Vo 1 नाशिक जिल्ह्यातील बागलाण मतदारसंघाचे हे आहेत माजी आमदार संजय चव्हाण... सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षांमध्ये ते कार्यरत आहेत..चव्हाण यांच्या पत्नी दीपिका बागलाण विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी-सपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत होत्या. तथापि, त्यांचा भाजप उमेदवार दिलीप बोरसे यांच्याकडून 1.29 लाख मतांनी पराभव झाला...मात्र या मतदानापूर्वी विधानसभेमध्ये गुजरातमधील एका माणसाकडून 5-8 कोटी रुपयांना ईव्हीएममध्ये फेरफार करण्याची ऑफर देण्यात आली, असा दावा राष्ट्रवादी-सपाचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी केला आहे. Byte माजी आमदार संजय चव्हाण Vo 2 राष्ट्रवादी-सपा प्रमुख शरद पवार यांनी महाराष्ट्र विकास आघाडी (MVA) शी संपर्क साधून "EVM व्यवस्थापन" द्वारे 288 पैकी 160 जागा जिंकण्यास मदत करु शकतात असा दावा करणाऱ्या दोन व्यक्तींनी केला होता, असा आरोप केल्यानंतर काही दिवसांतच राष्ट्रवादी-सपाचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी हा खळबळजनक दावा केलाय संजय राऊत यांनी सुद्धा असाच संपर्क उद्धव ठाकरे यांनाही करण्यात आला होता असे म्हटले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रेस कॉन्फरन्स नंतर आरोप प्रत्यरोपांमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने याबाबतचा निष्पक्ष अहवाल समोर ठेवण्याची गरज आहे
11
comment0
Report
PNPratap Naik1
Aug 14, 2025 13:35:09
Kolhapur, Maharashtra:
Kop Sugar Rate PKG Feed :- Live U Anc :- आत्ता बातमी महागाईची. मागील हंगामात साखरेचे घटलेले उत्पादन, केंद्र सरकारने कमी केलेला साखरेचा कोटा त्यात देशांतर्गत बाजार पेठेत साखरेची वाढलेली मागणी यामुळे साखरेने घाऊक बाजार पेठेत उच्चाकी दर गाठला आहे.. ऐन सणासुदीमध्ये साखरेचे किलो पाठीमागे 3 ते 4 रुपयांनी दर वाढल्यामुळे सर्वसामान्याचे कंबरडे पून्हा एकदा मोडले आहे. GFX In घाऊक बाजार पेठेत साखरेने गाठले उच्चाकी दर. किलो पाठीमागे 3 ते 4 रुपये वाढले साखरेचे दर. 39 रुपये किलोनी मिळणारी साखर पोहचली 42 ते 43 रुपये किलोपर्यत. दिवाळी पर्यत आणखी साखरेचे भाव वाढणार का? याची ग्राहकांना भीती GFX Out VO 1:- मागणी आणि पुरवठा मध्ये मोठी तफावत निर्माण झाल्यानंतर महागाई वाढते हा बाजार सिद्धात आहे. साखरे बाबतही हेच झालंय. साखर कारखान्याच्या मागील गळीत हंगामात गाळपाचे गणित बिघडल्यामळे साखरेचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे बाजार पेठेत साखरेचे भाव वाढले आहेत.. त्यामुळे 3800 रुपये क्विंटल रुपयांनी मिळणारी साखर 4250 पर्यत पोहचली आहे. त्यामुळे घाऊक बाजारपेठेत साखरेची उचल कमी झाली आहे. Byte :- मनोज नष्टे, व्यापरी VO 2 :- आगामी काळात गणेशोत्सव, दसरा, दिवाळी हे सण सलग आहेत. या सणांपूर्वीच साखरेचे भाव वाढले आहेत. ऐन सणासुदीला हे दर अधिक वाढणार का याची भीती ग्राहकांमध्ये आहे. त्यामुळे सरकारने तातडीने यामध्ये हस्तक्षेप करावे अशी मागणी ग्राहक करत आहे. Byte :- विजय मेटकर, ग्राहक VO 3:- मागील हंगामात ब्राझीलमध्ये साखर उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेला प्रतिक्विंटल 3900 रुपये दर आहे. त्यापेक्षा देशांतर्गत बाजारपेठेत साखरेला चांगले भाव मिVO असल्याने साखर कारखानदारांनी निर्यातीकडे कानाडोळा केला. साखर कारखानदार यांना साखरेचे प्रति क्विंटल 100 रुपये अधिक दर मिळाल्याने ते समाधानकारक आहेत.. पण हे दर अधिक वाढणार नाहीत याची काळजी सरकार घेईल असं साखर अभ्यासक यांना वाटतंय. Byte :- अवताडे, साखर अभ्यासक VO 4:- साखर अभ्यासकाना सरकार यापेक्षा अधिक दर वाढू देणार नाहीत याची काळजी घेतील असं वाटतंय. अभ्यासकानी व्यक्त केलेला अंदाज खरा ठरो अन्यथा महागाईच्या झळामध्ये सर्वसामान्य नागरिक भरडले जातील हे नक्की . प्रताप नाईक जी 24 तास कोल्हापूर
14
comment0
Report
YKYOGESH KHARE
Aug 14, 2025 13:35:04
Nashik, Maharashtra:
nsk_tollpkg feer by 2C Anchor देशभरातील विविध राज्यांमधील राष्ट्रीय महामार्गावर 15 ऑगस्ट पासून तीन हजार रुपयात वर्षभर मनसोक्त प्रवास करता येणार आहे... मात्र या योजनेतील पाच मिळवायचा असेल तर जरा सांभाळूनच.... सध्या याबद्दलच्या विस्तृत सूचना नसल्यामुळे आपली फसवणूक होऊ शकते. बघूया हा पास कसा करायचा आहे Vo 1 देशांतर्गत महामार्ग सुस्थितीत आणि वेगवान होत असल्याने अनेक नागरिक आपल्या वाहनांनी पर्यटनासाठी विविध राज्यांमध्ये जाताना दिसतात.. मात्र त्यांना लागणारा टोल हा त्यांच्या पेट्रोल खर्चाच्या बरोबरीने असतो... सर्वसामान्यांना एकूणच वाढत्या टोल मधून आणि प्रवास खर्चातून दिलासा देण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आता तीन हजार रुपयांचा वार्षिक पास 15 ऑगस्ट पासून लागू केला आहे... हा पास काढण्यासाठी तुम्हाला NHI app किंवा राजमार्ग यात्रा या ॲपला डाऊनलोड करावे लागेल. या ॲपमध्ये फास्टट्रग रिचार्ज ची सोय देण्यात आली आहे... किंवा थेट एन एच आय च्या वेबसाईटवर जाऊन आपण आपला पास डेबिट कार्ड अथवा यूपीआय पेमेंट द्वारे करून घेऊ शकता.. सध्या ही सुविधा उपलब्ध झालेली दिसून येत नसली तरी आज उशिरा रात्रीपर्यंत ही सुविधा वेबसाईटवर आणि ॲप मध्ये उपलब्ध होऊ शकते.. सध्या वेगवेगळ्या लिंक आणि ॲप आपल्याला वेगवेगळ्या सूचना देत आहेत मात्र कुठेही पेमेंट करताना त्याची विश्वासार्हता तपासून बघा अन्यथा उद्यापर्यंत पास काढण्याची वाट बघा Byte 1 नवनाथ केदार टोल मॅनेजर सिन्नर एन एच आय Vo 2 या पासचा वापर केंद्रीय वाहतूक मंत्रालयाच्या आत्यारीत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग आणि राष्ट्रीय द्रुतगति महामार्गांवर करता येणार आहे... मात्र यामध्ये अजून काही अडचणी आहेत 1) ज्यामध्ये स्थानिक लोकांना असलेली सवलत कशी मिळणार याबद्दलचा खुलासा नाही 2) मंथली पास घेणाऱ्या नोकरदारांना आता अटीनियम बदलणार की तेच राहणार याबद्दल स्पष्टता नाही 3) खाजगी वाहने आणि व्यावसायिक वाहने यांच्या ट्रॅफिक लेन एकच असल्यामुळे टोलवर कोळंबा हा कायम राहण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे या वेगवेगळ्या असाव्या अशी मागणी आहे Byte 2 प्रादेशिक अधिकारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नाशिक ( हा बाईट पाच ते 6 वाजेपर्यंत मिळेल, आला की पाठवतो) Vo 3सध्या यात काही अडचणी असल्या तरी मात्र या पासेसमुळे आंतर राज्यीय वाहतूकिल्ला चालना मिळून पर्यटन व्यवसायामध्ये वृद्धी होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला सर्व सामान्यांना वाढत्या टोलच्या आर्थिक भारामधून सुटका होण्यास मदत होईल. आता गरज आहे ही योजना आणि त्याचे नियम समजावून वाहनधारकांनी या योजनेला प्रतिसाद देण्याची
13
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top