Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001
पोलिटिक्सच्या उत्सवात एकत्र येण्याची गरज - अजित पवार
VKVISHAL KAROLE
Aug 14, 2025 15:34:23
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn ajit pawar Pinter's Ganesh mahasangh speech pointers निवडणूक निमित्ताने राजकारण करावे मात्र निवडणूक झाल्यावर एकत्र येत उत्सव साजरे करायचे असतात संजय शिरसाठ मागण्या केल्या, होय इथं दर्जेदार काम झालेच पाहिजे हे मराठवाड्याचे प्रवेश द्वार आहे माझी इतक्या नेत्यांना विनंती आहे, तुम्हाला संभाजी राजे स्मारक हवंय तर मास्टर प्लॅन तयार करा आणि आम्हाला द्या आम्ही कमी पडणार नाही तुळजाभवानी, अंबाबाई मंदिर, जेजुरी , पंढरपूर सगळीकडे आम्ही जीर्णोद्धार केलाय.. इथं उशाशी धरण  आहे तरी पाणी मिळत नाही शोकांतिका आहे, शिरसाठ साहेब म्हणाले बारामती ला चांगल्या इमारती दिसल्या, मी सकाळी उठून जातो आणि पाहणी करतो... [ इथल्या रस्त्याला हजार कोटी मागितले आहे तो योग्य पद्धतीने खर्च व्हायला हवा, काम दर्जेदार व्हायला हवी... आता मी एक कार्यक्रमातून आलो रस्त्यावर खड्डेच, तिथं 30 कोटी खर्च झाले म्हणे पैसे कुठं गेले खड्ड्यात एक रस्त्याचं काम 27 टक्के बिलो घेतले काय दर्जाचे काम होईल, काम दर्जेदार होण्यासाठी रास्त किमतीत द्यायला हवे... इथल्या विकास कामना अडचण येणार नाही पण नियोजन चांगले पाहिजे, पैठण रस्ता बांधला त्याखाली पाणी लाइन टाकली , ती खराब झाली तर रस्ता फोडायचा का.. हुशार लोकांची मदत घ्या... अतिक्रमण काढले मी पण पिंपरी मध्ये काढले पण लोकांना वाऱ्यावर सोडले नाही, तुम्ही पण लक्ष द्या
13
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRAFULLA PAWAR
Aug 14, 2025 17:17:58
Raigad, Maharashtra:
स्लग - साखर सुतारवाडी ग्रामस्थाचा आत्मदहनाचा प्रयत्न ग्रामस्थ आणि पोलिसांनी वेळीच लक्ष दिल्यामुळे मोठी दुर्घटना टळली हक्काची घर मिळाली नाहीत, पुर्नवसन झाले नाही, शासनाकडून होणाऱ्या दिरंगाई कंटाळून तरूण पेटत्या सरणावर झोपला अँकर - पोलादपूर तालुक्यातील साखर सुतार वाडी येथील दरड ग्रस्त तरुणाने आज आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थ आणि पोलिसांनी वेळीच लक्ष दिल्याने मोठा अनर्थ टळला. दरड दुर्घटना होऊन चार वर्षे झाली तरी पुनर्वसन न झाल्याने ग्रामस्थानी सरण रचून स्वातंत्र्य दिनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. मात्र गावातील एका तरुणाने आजच सरण पेटवून आत्मदहनाचा प्रयत्न केला.मात्र ही बाब लक्षात आल्याने ग्रामस्थ आणि पोलिसांनी त्याला सरणावरून बाहेर काढले.
8
comment0
Report
ABATISH BHOIR
Aug 14, 2025 17:17:48
Kalyan, Maharashtra:
वोटचोरीच्या विरोधात कल्याण मध्ये काँग्रेसच्या वतीने कॅन्डल मार्च.. हातामध्ये मशाल घेऊन आणि सत्ताधारी पक्षाविरोधात जोरदार घोषणाबाजी Anc..लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपकडून मोठ्या प्रमाणात मतांची चोरी झाल्याचा आरोप करत त्याच्या विरोधात कल्याणमध्ये जिल्हा काँग्रेसतर्फे कॅन्डल मार्च काढण्यात आला. vo..विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मतदार यादीमध्ये घोळ असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगावर दबाव टाकून त्यांच्या मदतीने मतदार यादीमध्ये फेरफार करून मतांची चोरी करत ही सत्ता मिळवल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. याविरोधात संपूर्ण देशभरात स्थानिक पातळीवर आंदोलन छेडण्याचे निर्देश राहुल गांधी यांनी दिले असून कल्याण काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली कल्याणात कॅन्डल मार्च काढण्यात आला. कल्याण स्टेशन परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत हा मार्च काढण्यात आला. यावेळी हातामध्ये मशाल घेऊन आणि सत्ताधारी पक्षाविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत जे दाखले दिले त्याचा अर्थ नरेंद्र मोदी हे वोटचोरी करून देशाचे पंतप्रधान झाले असून या वोट चोरीमुळे देशाची वाट लागली असल्याचा आरोप यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केला. तसेच येणाऱ्या महापालिका निवडणुकीत अशा प्रकारची वोट चोरी आम्ही होऊन देणार नाही आणि याहीपेक्षा जोरदार आंदोलन आम्ही करणार असल्याचा इशाराही त्यांनीअनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. Byte.. सचिन पोटे कल्याण जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी
4
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Aug 14, 2025 17:15:35
Palghar, Maharashtra:
पालघर - पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाला तिरंगाची विद्युत रोषणाई . तिरंगाच्या विद्युत रोषणाईने पालघरच जिल्हाधिकारी कार्यालय झळकलं . विद्युत रोषणाई पाहण्यासाठी पालघरकरांची गर्दी . आकर्षक विद्युत रोषणाईने पालघर जिल्हाधिकारी कार्यालय उजळल .
3
comment0
Report
JMJAVED MULANI
Aug 14, 2025 16:47:25
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 1408ZT_INDAPURMASHAL BYTE 1 इंदापूरकरांकडून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मशाल रॅली..... शेकडोच्या संख्येने इंदापूरकर रॅलीत सहभागी..... मशाल मिरवणुकीला 45 वर्षाची परंपरा.... Anchor_देशाच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संधीला पुण्याच्या इंदापूर शहरातून प्रदीप दादा गारटकर मित्र परिवाराच्या वतीने भव्य मशाल मिरवणूक काढण्यात आली.यामध्ये शेकडोंच्या संख्येने इंदापूरकर सहभागी झाले होते. याला 45 वर्षाची परंपरा आहे..... शहरातील विविध भागातून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली परंपरेनुसार हातात शेकडो मशाली घेवून, ही क्रांतीची मशाल रॅली काढण्यात आली. या मशाल मिरवणुकीत शहरातील तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण सहभागी झाले होते. बाईट_प्रदीप गारटकर आयोजक तथा पुणे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
10
comment0
Report
JMJAVED MULANI
Aug 14, 2025 16:32:49
Baramati, Maharashtra:
JAVED MULANI SLUG 1408ZT_INDAPURUJNI FILE 5 स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला उजनी धरणावर साकारली आकर्षक विद्युत रोषणाई..... विद्युत रोशनाईतून साकारली तिरंग्याची लक्षवेधी प्रतिमा.... उजनी धरणावर स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रध्वजाच्या रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई .. उजनीत सध्या १०२ टक्के पाणीसाठा... Anchor : पुणे ,सोलापूर आणि अहिल्यानगर ,जिल्ह्याचे वरदान ठरलेल्या उजनी धरणावर देशाच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून राष्ट्रध्वजाच्या रंगाची आकर्षक विद्युत रोशनी करण्यात आलीय. ती पाहण्यासाठी नागरिक व पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गांवरिल भिमा नदीवरील पुलावर प्रवासी थांबून छायाचित्र टिपण्यासाठी सायंकाळी व रात्रीच्यावेळी गर्दी करीत आहेत. उजनी धरणात सध्या १०२.४५ टक्के पाणीसाठा असून ११८. ५४ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. धरण ९ ऑगस्ट रोजी शंभर टक्के भरले आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त मागील वर्षी १५ ऑगस्टला अशीच आकर्षक विद्युत रोषणाई केल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या ट्विटरवरून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकुन कौतुक केले होते.
14
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Aug 14, 2025 16:32:40
Yavatmal, Maharashtra:
विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून भाजपा युती सरकार सत्तेत आले आहे. असा आरोप करीत यवतमाळ मध्ये काँग्रेसने भव्य मशाल मोर्चा काढला. निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपने मतांवर दरोडा टाकलेला असून या मतचोरीची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. निवडणूक आयोगाने निष्पक्ष व पारदर्शी निवडणूका घेणे त्यांचे कर्तव्यच आहे पण त्यांच्यावरच संशयाचे ढग जमा होत असतील तर ते लोकशाही साठी घातक आहे. लोकशाही व्यवस्था अबाधित रहावी व निवडणूक आयोगावर निर्माण झालेले हे संशयाचे ढग दूर करण्यासाठी विधानसभा निवडणुकीतील मॅच फिक्सिंगची चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. या आंदोलनात आमदार बाळासाहेब मांगुळकर माजी मंत्री वसंत पुरके आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. संविधान चौकातून निघालेल्या या मशाल यात्रेत 'मत चोर, खुर्ची सोड' अशा घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहराच्या प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण केले.
11
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Aug 14, 2025 16:32:31
Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज.... स्किप्ट ::- लातूर शहर आणि परिसरात पावसाची दमदार हजेरी... तिन तासांपासून जोरदार पाऊस.... AC ::- मागील अनेक दिवसापासून पाठ फिरवलेल्या पावसाने आज लातूर जिल्ह्यातील अनेक भागात हजेरी लावली आहे.लातूर शहर आणि परिसरात मागील अनेक दिवसापासून पावसाने दडी मारली होती..पावसाने नाही म्हणायला काही वेळा नावालाच हजेरी लावली होती..मोठा पावसाची मागील अनेक दिवसांपासून पासून लातूरकर प्रतीक्षा करत होते..आज दुपारी काही वेळ पावसाच्या मध्यम सरी पडून गेल्या होत्या.मात्र रात्री सात नंतर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या तिन तासांपासून जोरदार पाऊस पडत आहे... मागील 30 दिवसानंतर पावसाने दमदार हजेरी लावली आहे.हा पाऊस लातूर शहर आणि काही भागातच पहावयास मिळाला आहे..आज ही जिल्ह्यात मोठ्या पावसाची प्रतीक्षा केली जात आहे ...
8
comment0
Report
ABATISH BHOIR
Aug 14, 2025 16:32:22
Kalyan, Maharashtra:
शिवसेनेतर्फे डोंबिवलीतील फडके रोडवर "सराव दहीहंडीचे" आयोजन.. 16 तारखेला दहीहंडी ही संपूर्ण राज्य भर उत्सव साजरा करतात मात्र डोंबिवली फडके रोड येथे शिवसेना शिंदे गट पक्षा पडून सराव दहीहंडी चा (चोर दहीहंडी ) कार्यक्रम चे आयोजन केले आहे या सराव दहीहंडी सराव हंडी साठी कल्याण, डोंबिवली, ठाणे, भिवंडी, उल्हासनगर येथून शेकडो गोविंदा पथके सहभागी झाले आहेत या पथकांना आकर्षक चषक आणि रोख रकमेचे पारितोषिके देण्यात येणार आहे Byte..राजेश मोरे आमदार
11
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Aug 14, 2025 16:31:14
Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File.Name : 1408ZT_MAVAL_DOG_MISSING Total files : 02 Headline -लोणावळ्यात हरवलेल्या कुत्र्याचा शोध मालकाची ५० हजारांच्या बक्षिसाची घोषणा Anchor: लोणावळ्यातील एका श्वानप्रेमीची तळमळ आता सर्वत्र चर्चेत आहे. घरातील सदस्य हरवला की जशी धडपड होते, तशीच धडपड तो आपल्या पाळीव कुत्र्यासाठी करत आहे. दीड महिन्यापासून हरवलेल्या या कुत्र्याचा शोध घेणाऱ्यास तब्बल ५० हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले असून, लोणावळा-खंडाळा परिसरात सर्वत्र त्याची पोस्टर्स लावली आहेत. इतक्या मोठ्या बक्षिसाच्या घोषणेमुळे नागरिकांमध्ये उत्सुकता तर निर्माण झालीच आहे, पण त्याचबरोबर या मालकाच्या श्वानप्रेमाचीही चर्चा रंगली आहे. एका बाजूला भटक्या कुत्र्यांबाबत कडक धोरणे राबवली जात असतानाच, दुसऱ्या बाजूला या माणसाचे आपल्या कुत्र्यावरचे निस्सीम प्रेम सर्वांचे मन जिंकत आहे.
11
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 14, 2025 16:31:02
Jalna, Maharashtra:
FEED NAME :1408ZT_JALNA_MORCHA(10 FILES) जालना : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला काँग्रेस पक्षाचा मशाल मोर्चा भाजप सरकारचा केला निषेध भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी अँकर : जालन्यात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला काँग्रेस पक्षाने मशाल मोर्चा काढत भाजप सरकारचा निषेध नोंदवला. कथीत 'मतचोरी' आणि निवडणूक आयोग-भाजप यांच्यातील संबंधांविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. कर्नाटक राज्यातील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात एक लाखाहून अधिक बनावट मतदार असल्याचा तसेच तेथे मतचोरी झाल्याचा आरोप देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता. या आरोपाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मशाल मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जालना शहरातही आज काँग्रेस पक्षाकडून मशाल मोर्चा आणि कॅन्डल मार्च काढण्यात आला. शहरातील मामा चौक ते महात्मा गांधी चौकापर्यंत झालेल्या या मोर्चादरम्यान भाजपविरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. यावेळी मशाल मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. बाईट : राजाभाऊ देशमुख, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस, जालना
9
comment0
Report
AAASHISH AMBADE
Aug 14, 2025 16:16:05
Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 1408ZT_GAD_POLICE_AWARDS ( single file sent on 2C)  टायटल:-- गडचिरोली पोलीस दलातील 7 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना  राष्ट्रपती ‘पोलीस शौर्य पदक’ जाहिर, 2017 साली हेमलकसा-कारमपल्ली रस्त्यावरील चकमकीदरम्यान जवानांनी बजावली होती उत्कृष्ट कामगिरी अँकर:-- देशभरामध्ये पोलीस दलात किंवा इतर सशस्त्र दलात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शासनाकडून सन्मानित केले जाते. यावर्षी सुद्धा महाराष्ट्र राज्यात एकुण 07 अधिकारी व अंमलदार यांना पोलीस शौर्य पदक जाहिर झाले असून, हे सर्व अधिकारी व अंमलदार गडचिरोली पोलीस दलातील आहेत. दलाला मागील पाच वर्षात एकूण 03 शौर्य चक्र, 210 पोलीस शौर्य पदक व 08 गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक प्राप्त झाले आहेत.  1) सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी सुखदेव बंडगर,  2) सफौ/1127 मनोहर कोतला महाका,  3) चालक पोहवा/977 मनोहर लचमा पेंदाम,  4) पोशि/3311 प्रकाश ईश्वर कन्नाके,  5) पोशि/5415 अतुल सत्यनारायण येगोलपवार,  6) पोशि/5916 हिदायत सदुल्ला खान,  7) शहीद पोशि/5210 सुरेश लिंगाजी तेलामी (मरणोत्तर) यांना पोलीस शौर्य पदक मिळाले आहेत.  2017 साली सी- 60 पथके पोस्टे कोठी येथून भुसुरुंग रोधी वाहनांद्वारे भामरागडला परत येत असताना, नक्षल्यानी भुसुरुंग स्फोट घडवून आणून पोलीस पथकांवर हल्ला केला होता. या भ्याड हल्याचा पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी विवेकबुद्धी आणि मोठया धैर्याने प्रतिकार केला. त्यांनी जखमी व अडकलेल्या पोलीस जवानांचे तसेच स्वतःचे संरक्षण करत नक्षल्यांच्या प्रखर गोळीबाराला प्रत्युत्तर दिले होते. या कामगिरीची दखल घेऊन मा. राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक जाहिर झाले आहे.  आशीष अम्बाडे झी मीडिया गडचिरोली
13
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Aug 14, 2025 16:15:53
Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File.name : 1408ZT_MAVAL_GOVERNOR Total files : 01 Headline : स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन दाखल मुळशीचे तहसिलदार विजयकुमार चोबे यांनी केले स्वागत Anchor: स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे पुणे गणेशखिंड राजभवन येथे आगमन झाले. मुळशीचे तहसिलदार विजयकुमार चोबे यांनी त्यांचे स्वागत केले. पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीत वाजवत राज्यपालांना मानवंदना दिली. राज्यपालांच्या हस्ते उद्या १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता पुणे विधान भवन येथे ध्वजारोहण होणार आहे...
12
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Aug 14, 2025 16:15:48
Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळ मध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाची ब्रिटिशकालीन इमारत, जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय, नगरपरिषद कार्यालयाची प्रशासकीय इमारत तिरंग्याच्या रंगात आकर्षक अशा विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे. या तिरंगी विद्युत रोषणाईने यवतमाळकरांचे लक्ष वेधून घेतले आहे, शिवाय तिरंगी रोषणाईने उजळलेल्या ह्या ईमारती बघण्यासाठी नागरिकांनी देखील रात्री उशिरापर्यंत उत्साह दाखविला. यासोबतच खडक सामना नदीवरील बेंबळा धरणाची भिंत देखील तिरंगी रंगात न्हाऊन निघाली आहे, विशेष म्हणजे मुसळधार पाऊस झाल्याने बेंबळा धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून खेळणारे पाणी देखील तिरंगी रंगात लक्ष वेधत आहे.
12
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Aug 14, 2025 16:15:33
Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File.name : 1408ZT_MAVAL_KASARSAI_DAM Total files : 02 Headline -मावळ आणि मुळशीतील कासारसाई धरणाच्या सांडव्यावर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला तिरंगा विद्युत रोषणाई Anchor: मावळ आणि मुळशी तालुक्यातील दहा गावांना सिंचन आणि पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या कासारसाई धरणाला भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आकर्षक तिरंगा विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यंदा मावळात समाधानकारक पाऊस पडल्याने कासारसाई धरणाच्या सांडव्यावरून पाणी सोडण्यात आले आहे. तर सध्या कासारसाई धरण 92 टक्के भरले असून, मावळ आणि मुळशीतील दहा गावांचे शेतकरी समाधानी आहेत...
12
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Aug 14, 2025 16:00:28
Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File name : 1408ZT_MAVAL_DAM_ROSHNAI Total times : 01 Headline : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पवना धरणावर तिरंगी विद्युत रोषणाई Anchor: भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पिंपरी-चिंचवड आणि मावळ तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणाला आकर्षक अशी तिरंगा रंगात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पवना धरणाच्या सांडव्यावरून पाणी सोडण्यात आल्याने ही तिरंगा विद्युत रोषणाई पाहण्यासाठी नागरिक गर्दी करू लागले आहेत. यावर्षी भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी ही तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
12
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top