Back
जितेंद्र आव्हाड का बयान: शेतकरी भीक मागत आहेत?
SNSWATI NAIK
FollowJul 23, 2025 01:31:53
Navi Mumbai, Maharashtra
story slug - जितेंद्र आव्हाड ऑन माणिकराव कोकाटे
जितेंद्र आव्हाड ऑन कोकाटे
FTP slug - nm jitendra aavhad
shots-
reporter - swati naik
navi mumbai
*माणिकराव कोकाटे राजीनामा*
माणिकराव खोट बोलतच नाही, ते बोले शेतकरी भिकारी आहेत, शेतकऱ्यांना भीक लागलेय. शेतकरी कर्ज घेतात आणि लग्न करतात. माणिकराव हुशार माणूस आहेत.
कोण म्हणालं ते रम्मी खेळत होते, ते बुद्धिबळ खेळत होते.
*शरद पवार फडणवीस कौतुक*
वाढदिवसानिमित्त मी पण कौतुक केलंय, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मला कौतुक आहे की संवाद जो संपत चाललाय तो फडणवीस जिवंत करायला बघतायत फक्त त्यांच्या आजूबाजूचे जिवंत ठेवतील की नाही याची शाश्वती देता येत नाही.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSATISH MOHITE
FollowJul 23, 2025 08:36:20Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_UBT_Contro
Feed on - 2C
---------------------------
Anchor - नांदेडमध्ये उद्धव ठाकरे सेनेतील वाद पदाधिकारी निवडीवरून चव्हाट्यावर आला. संपर्क प्रमुखासमोरच राडा घालण्यात आला. कालच्या राड्यानंतर माजी जिल्हाप्रमुख आणि माजी महानगरप्रमुखाची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. काल मेळाव्यानिमित्त उद्धव ठाकरे सेनेचे संपर्कप्रमुख बबन थोरात नांदेडमध्ये आले होते. प्रमोद खेडकर यांना काढून दुसऱ्याला जिल्हाप्रमुखपद दिल्याने खेडकर यांनी बैठकीत चांगलाच राडा घातला. पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी तात्काळ दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली होती. संपर्कप्रमुख हे पैसे घेऊन पद वाटप करत असल्याचा आरोप खेडकर यांनी केला. संपर्कप्रमुख थोरात यांना शिवसेना स्टाईल चोप दिल्याचेही खेडकर म्हणाले. पण मला मारहाण झाली नाही, कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचे संपर्कप्रमुख बबन थोरात म्हणाले. पैसे घेतल्याचे आरोप नेहमी होतात असेही थोरात म्हणाले. दरम्यान या सर्व राड्यानंतर माजी जिल्हाप्रमुख प्रमोद खेडकर आणि माजी महानगरप्रमुख गौरव कोटगिरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. दैनिक सामनामधून ही हकालपट्टी आज जाहीर करण्यात आली.
Byte - प्रमोद खेडकर - माजी जिल्हाप्रमुख यु. बी. टी.
Byte - बबन थोरात - संपर्कप्रमुख यु. बी. टी.
-----------------------------
4
Report
JJJAYESH JAGAD
FollowJul 23, 2025 08:36:06Akola, Maharashtra:
Anchor : अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील पारस येथील मन नदीवरील बॅरेजचे दोन गेट 6100 क्यूसेक्सने उघडले आहेत. पातूर तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने मन नदीत पूर परिस्थिती निर्माण झाल्याने, ह्या बॅरेजचे दोन दरवाजे उघडण्यात आपले आहेत. काल पारस येथे ढगफुटी सदृशय पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले होते. तर आता काल रात्री झालेल्या पावसामुळे बॅरेजचे गेट उघडण्यात आले आहेत. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
5
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 23, 2025 08:08:31Yeola, Maharashtra:
अँकर:- कृषिमंत्री विधान भवनात रमी खेळू शकतात तर आम्ही तहसील आवारात का नाही असा सवाल उपस्थित करत छावा क्रांतिकारी संघटना व छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी येवला तहसील कार्यालयाच्या आवारात प्रत्येक खेळून गांधीगिरी पद्धतीने कृषी मंत्र्यांचा शासनाचा निषेध व्यक्त केला तसेच लातुर येथे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना झालेली मारहाणीच्या निषेधार्थ येवला तहसील कार्यालय आवारात पत्ते खेळत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले याच आंदोलनाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी यांनी सुदर्शन खिल्लारे यांनी
12
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 23, 2025 08:07:47Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2307ZT_JALNA_NCP_DEMAND(8 FILES)
जालना : माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊन त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा,राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी
अँकर | कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊन त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली.यावेळी पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कृषिमंत्री कोकाटे सतत शेतकरी विरोधी वक्तव्य करत असून विधिमंडळात प्रश्नोत्तरांच्या तासात ते रमी खेळतात त्यांचं कामात लक्ष नाही.त्यामुळे अशा मंत्र्याला मंत्रिमंडळातून हकला अन्यथा आंदोलन करू असा ईशारा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला आहे
बाईट | निसार देशमुख, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, जालना
13
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 23, 2025 08:07:25Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व आत्महत्या प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या बंधूची कॉल डिटेलची चौकशी करा - शिवसेना शिंदे गटाची मागणी..
अँकर - सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या करणगणी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि आत्महत्या प्रकरणात आता भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या बंधूंच्या कॉल डिटेलची चौकशीची मागणी शिवसेना शिंदे गटाकडुन करण्यात आली आहे.काही दिवसांपूर्वी भाजपाने शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांच्या कॉल डिटेल्सची चौकशी करण्याची मागणी केली होती आता या मागणीनंतर शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेच्या आटपाडी तालुका प्रमुख मनोज-नांगरे पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर यांच्या कॉल डिटेलची चौकशीची मागणी आटपाडी पोलिसांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि आत्महत्या प्रकरणातील आरोपींना वाचवण्यासाठी राजकीय हस्तक्षेप झाला आहे का ? त्यासाठी गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर या दोघा भावांच्या कॉल डिटेलची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे.
बाईट मनोज नांगरे पाटील युवा सेना तालुकाध्यक्ष - शिवसेना, शिवसेना शिंदे गट
केली आहे.
11
Report
ABATISH BHOIR
FollowJul 23, 2025 08:02:29Kalyan, Maharashtra:
मराठी तरुणीला मारहाण आरोपीला दोन दिवसाची पोलीस कोठडी
anchor-मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या आरोपी गोकुळ झा याला कल्याण न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
Vo- सुनावणी वेळी गोकुळ झा याने माझ्यावर चुकीची कारवाई म्हणत, माझ्या भावाला का ताब्यात घेतले असे सांगत त्याने न्यायालयात गोंधळ घातला. यावेळी न्यायाधीशांनी कायदेशीर प्रक्रियेत अडथळा आणण्याबाबत गुन्हा दाखल करण्याची तंबी दिल्यावर तो शांत झाला. यावेळी पोलिसांनी त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली.
Byte.. हरीश नायर..फिर्यादी वकील
Byte.... संजय धनके.. आरोपी वकील.
10
Report
AKAMAR KANE
FollowJul 23, 2025 07:35:46kolhapur, Maharashtra:
2c ला व्हिडिओ बाईट जोडले आहे
( एक बाईट आणि बाकीचे व्हिडिओ असानमेंटला व्हाट्सअप केले आहे )
------
नागपुरात मध्यरात्री मुलींच्या वस्तीगृहात दोन अज्ञात घुसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय... त्यांनी विद्यार्थिनींचा विनयभंग करण्याचा प्रयत्नही केला
- हिंगणा मार्गावरील आयसी चौकातील ओबीसी मुलींच्या शासकीय वसतिगृहातली घटना
- दाराची कुंडी काढून आत शिरले आरोपी. वसतीगृहात सीसीटीव्ही, पुरेसी सुरक्षा व्यवस्था नाही
- वसतीगृहात ६४ मुली राहतात
एका मुलीचा मोबाईल घेऊनंही गेले होते आहेत
- एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल
- आरोपींना अद्याप अटक नाही...
-----
बाईट -- पोलीस अधिकारी
तक्रारदार मुलगी
13
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 23, 2025 07:35:36Nashik, Maharashtra:
nsk_coreksseize
feed by 2C
vidoe 2
Anc : पवारवाडी पोलिसांनी मालेगाव शहरात कोडीनयुक्त कॉरेक्स बाटल्यांची अवैध विक्री करणाऱ्या दोघांना अटक करत मोठी कारवाई केली आहे. मोमीन अबू ओसामा अब्दुल मजिद (रा. मालेगाव) आणि सैय्यद वसिम सैय्यद जलील (रा. सुरत, गुजरात) हे दोघे नशाकारक कॉरेक्स बाटल्या विक्रीसाठी आणत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी छापा टाकून मोमीन अबू ओसामा अब्दुल मजिद याला पकडले आणि त्याच्याकडून सुमारे ३०,००० रुपये किमतीच्या Rexnox T कंपनीच्या १०० कोडीनयुक्त बाटल्या जप्त केल्या. चौकशीत त्याने या बाटल्या सैय्यद वसिम सैय्यद जलील याच्याकडून घेतल्याचे सांगितले, त्यानंतर सैय्यद वसिम यालाही ताब्यात घेण्यात आले. या दोन्ही आरोपींविरोधात पवारवाडी पोलीस स्टेशनमध्ये NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला
14
Report
SGSagar Gaikwad
FollowJul 23, 2025 07:35:26Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_protest
अँकर
आदिवासी आश्रमशाळांमध्ये बाह्यस्रोतांद्वारे भरती प्रक्रिया रद्द करून रोजंदारी कर्मचारी वर्ग ३ आणि वर्ग ४ यांना रोजंदारी आदेश देण्यात यावेत, या मागणीसाठी तुळशीराम खोटरे हे गत ९ दिवसांपासून नाशिकच्या ईदगाह मैदानावर आमरण उपोषणास बसलेले आहेत...काल उपोषणाच्या नवव्या दिवशी त्यांची प्रकृती बिघडल्याने दुपारनंतर मैदानावर मनपाच्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय पथकाने तपासणी केली. दरम्यान बुधवारी अर्थात आज होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतरच्या आदिवासी विभागाशी संबंधित विषयावरील बैठकीकडे आंदोलकांचे सर्व लक्ष लागले आहे.....मंगळवारी खोटरे यांची प्रकृती बिघडल्याचे समजल्याने आमदार हिरामण खोसकर यांच्यासह मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी खोटरे यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. खोटरे यांच्या आमरण उपोषण आंदोलनाकडे आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले होते. त्यांची प्रकृती बिघडण्यास प्रारंभझाल्यानंतर तब्बल आठवडाभराने आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी खोटरे यांची भेट घेऊन आमरण उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र, खोटरे यांनी शासन, प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन कायम ठेवणार असल्याचा इशारा देत उपोषण ठेवले....
14
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 23, 2025 07:01:17Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - आता काही बोलणार नाही,25 तारखेनंतर सगळं ऐकून काय बोलायचं ते बोलतो - भाजप आमदार गोपीचंद पडळकर..
अँकर - आपण आता काही बोलणार नाही, ज्यांना जे करायचे ते करू द्या,25 तारखेनंतर सगळे ऐकून,काय बोलायचे ते बोलतो,असा इशारा भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधकांना दिला आहे. विधानभवनाच्या राड्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीमध्ये सांगलीच्या आळसंद मध्ये भाजप कार्यकर्ता मेळावा पार पडला,या मेळाव्यात पडळकर विरोधकांवर काय बोलतात,याकडे सगळ्यांचेच लक्ष राहिलं होतं,मात्र पडळकर यांनी संयमाची भूमिका घेत,काही लोक बोलतात मी असा बोलतो,तसा बोलतो.पण मी आता त्यावर काही बोलणार नाही,कोण म्हणते 25 तारखेनंतर आम्ही असं करणार,
तसं करणार आहे,त्यामुळे त्यांच्या सगळ्यांचा मी ऐकून घेतो आणि त्यानंतरच बोलतो,अस स्पष्ट केले आहे.
साउंड बाईट - गोपीचंद पडळकर - आमदार ,भाजपा.
व्ही वो - तसेच देवेंद्र फडणवीसांसाठी आम्ही बाजीप्रभू प्रमाणे लढायला तयार आहोत,जो पर्यंत शिवाजी महाराज गडावर पोहचत नाहीत, तोफांचा आवाज जो पर्यंत येत नाही, तो पर्यंत आपण खिंड आणि जीव सोडणार नाही,अशी बाजीप्रभूंची भूमिका होती,तश्या पध्दतीचे आपण कार्यकर्ते आहोत,असं देखील यावेळी आमदार गोपीचंद पडळकरांनी स्पष्ट केले.
साऊंड बाईट - गोपीचंद पडळकर - आमदार, भाजपा.
14
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 23, 2025 07:01:03Washim, Maharashtra:
वाशिम:
File2:2307ZT_WSM_CROP_DAMAGE_WKT
WSM_CROP_DAMAGE_SHOTS
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर: वाशिम जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक भागात नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत.वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर व रिसोड तालुक्यात काल ढगफुटी सदृश्य पाऊस झाला त्यामुळे पिंपरी सरद गावाजवळ उतावळी नदीला या महिन्यात दोनदा महापुराची तीव्र झळ बसली असून, नदीकाठची शेती खरडून गेली आहे.शेकडो हेक्टरवरील उभ्या खरीपाच्या पिकासह फळबागाच मोठ नुकसान झालं आहे.शेतकरी आता पूर्णपणे हतबल झाला आहे.याचाच शेतकऱ्याच्या बांधावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी..
USE WKT+121
वाशिम जिल्ह्यात निसर्गाचा कहर सुरूच आहे.काल पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत.रिसोड तालुक्यातील पिंपरी सरद गावाजवळ उतावळी नदीला अवघ्या महिन्यात दोन वेळा महापूर आल्याने परिसरात हाहाकार माजलाय.या पुरामुळे वाशीम जिल्ह्यातील मागरूळपीर व रिसोड तालुका त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील लोणार व मेहकर तालुक्याला या अतिवृष्टीमुळे नदीकाठची शेकडो हेक्टर शेती खरडून गेली आहे. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे.काही शेतकऱ्यांनी दुबार, तिबार पेरणी करून शेवटचा प्रयत्न केला होता.मात्र, आता जमिनी पुन्हा पेरणीसाठी योग्य राहिलेल्या नाहीत.परिणामी शेतकरी पूर्णपणे हताश झाले आहे या नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदतीची गरज आहे. आता पंचनामे नको थेट मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
13
Report
ABATISH BHOIR
FollowJul 23, 2025 06:40:24Kalyan, Maharashtra:
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आज बंद –
व्यापाऱ्यांचा आक्रोश, प्रशासनाविरोधात संताप
anc...कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत आज एकदिवसीय लक्षणिक बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी बाजार समितीतील दुकाने बंद ठेवत मुख्य प्रवेशद्वारावर टाळे लावून बॅरिकेटिंग केली. बाजार समिती प्रशासनाकडून जागा परस्पर इतर संघटनेला देण्यात आल्याने स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर सोमवारपासून बेमुदत बंदचा इशारा कल्याण कृषी उत्पन्न व्यापारी संघटनेकडून देण्यात आला आहे.
Byte व्यापारी 1,2
13
Report
VKVISHAL KAROLE
FollowJul 23, 2025 06:04:15Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
संभाजीनगर
पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू
बिडकीनच्या निलजगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन
पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गा 100 फुटी रुंदीकरण्याचा निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी
बिडकीन परिसरातील पाच ते सहा गावातील नागरिक रस्त्यावर
रास्ता रोको आंदोलनामुळे पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गा वर वाहतूक कोंडी
14
Report
ABATISH BHOIR
FollowJul 23, 2025 06:04:03Kalyan, Maharashtra:
मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या आरोपीला कल्याण न्यायालयात केलं हजर
Anchor-कल्याणच्या नांदिवली परिसरात एका रुग्णालयात रिसेप्शनिस्टचं काम करणाऱ्या मराठी तरुणीला अमराठी असलेल्या गोकुळ झा या व्यक्तीने मारहाण केली.
Vo- या प्रकरणी मनसेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर हे प्रकरण चांगल चिघळलं. अखेर मनसैनिकांनीच या गोकुळ झा ला ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केलं. यानंतर त्याला मानपाडा पोलिसांनी काही वेळापूर्वीच कल्याणच्या न्यायालयात हजर केलं. आता या गोकुळ झा न्यायालय किती दिवसांची पोलीस कोठडी सुनावते हे पहावे लागेल.
14
Report
AKAMAR KANE
FollowJul 23, 2025 05:35:04kolhapur, Maharashtra:
2c ला संग्रहीत ps हुडकेश्वरचा व्हिडिओ जोडला आहे
-----
नागपूर:-
*नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर सहा आरोपींनी नागपूर आणि यवतमाळ येथे सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीयया प्रकरणामध्ये पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून आरोपींवर सामूहिक बलात्कार, पीटा अॅक्ट आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर आणि यवतमाळ येथून आरोपींना पकडण्यात आले असून त्यात नागपूर दोन आणि यवतमाळचे चार आरोपींचा समावेश आहे. *
अटक सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता २४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपींची संख्या आणखी वाढू शकतेपीडित 17वर्षीय मुलगी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. 11जुलै रोजी ती घरातून बाहेर पडली होती. हुडकेश्वर पोलिसांनी तिला तीन तासांच्या आत शोधून काढत कुटुंबीयांच्या ताब्यात दिले होते. मात्र,16 जुलै रोजी ती पुन्हा बेपत्ता झाली कुटुंबीयांनी शोधा घेतला परंतु ती सापडली नाही. अखेर कुटुंबीयांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
तपासादरम्यान उघड झालेल्या माहितीनुसार ती विद्यार्थिनी दोन मित्रांच्या संपर्कात असल्याचे ही निष्पन्न झाले.त्या दोघांनी तिला एकांत ठिकाणी नेऊन जबरदस्तीने सामूहिक बलात्कार केला व सोडून दिले. त्यानंतर ती यवतमाळकडे निघून गेलीअपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर हुडकेश्वर पोलीस ठाएक पथक तिचा शोध घेत होते. तपासादरम्यान ती यवतमाळच्या मादणी येथे असल्याची माहिती मिळाली. पीडितेच्या कुटुंबीयांसोबत हुडकेश्वर पोलिसांचे पथक 18 जुलै रोजी यवतमाळला पोहोचले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर तिला नागपुरात आणून महिला पोलीस अधिकाऱ्यांसमोर तिचा जबाब नोंदवण्यात आला. वैद्यकीय तपासणीनंतर सामूहिक बलात्कार, पीटा अॅक्ट आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. हुडकेश्वर पोलिसांच्या पथकाने 24 तासांत आरोपींना जेरबंद केले*पीडितेची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून यवतमाळच्या एका युवकासोबत झाली होती. मोबाईल क्रमांकांची देवाणघेवाण झाल्याने दोघांमध्ये संपर्क सुरू होता. त्या युवकाने तिला यवतमाळला बोलावले. 17 जुलै रोजी ती त्याच्या घरी पोहोचली. त्याच दिवशी त्याने तिला एका खोलीत नेले, जिथे चार आरोपींनी तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. विरोध केल्यावर तिच्यावर मारहाण करण्यात आली. दुसऱ्या दिवशी, 17जुलै रोजी, तिला यवतमाळजवळील शेतात नेऊन पुन्हा चारही आरोपींनी सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपी अटकेत आहे
14
Report