Back
परभणी में ऐतिहासिक बाढ़: गोदावरी में पानी, 50 मंडल प्रभावित
GDGAJANAN DESHMUKH
Sept 25, 2025 11:50:56
Parbhani, Maharashtra
अँकर- सततची अतिवृष्टी आणि माजलगाव, जायकवाडी धरणातून गोदावरीमध्ये केल्या जात असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे परभणी जिल्ह्यात हाहाकार माजलाय. पिकांची अक्षरशहा माती झालीय,गोदावरीला आलेल्या पुरामुळे 19 गावांना पिकांचा वेढा पडलाय. हे पुराचे पाणी हजारो
घरात शिरून जनजीवन विस्कळीत झालंय, जिल्ह्यातील 52 मंडळापैकी 50 मंडळात अतिवृष्टी ची नोंद झालीय,यापैकी 10 मंडळात तर सलग 10 वेळा अतिवृष्टी झालीय,यावरूनच ही परिस्थिती किती भीषण आहे,हे लक्षात येणार आहे,बघुयात या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट
व्हीओ- शेतात दिसत असलेले हे पोहोणपाणी,पिकांची झालेली नासाडी,खरडून गेलेले शेत,गावाला पडलेला पुराचा वेढा येथील लोकांना अक्षरशहा देशोधडीला लावणारा आहे.
यंदाच्या पावसाने होत्याच नव्हतं केलंय,शेतकऱ्यांचा पूर्ण खरीप हंगाम वाया गेलाय,पैश्याची जमवा जमाव करून शेतकर्यांची सोन्यासारखी पिके पिकवली होती,हाताच्या फोडाप्रमाणे वाढवली होती. पण जुलै,ऑगस्ट आणि सप्टेंबर या सगळ्याच महिण्यात झालेल्या धोधो पावसाने शेती पिक उध्दवस्त झालीयेत, यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबायचं नाव घेत नाहीयेत, आठ दिवसांपासून पीक पाण्यात आहेत, सोयाबीन जाग्यावर काळवंडले गेले असून सोयाबीनला शेंगा राहिला नाहीये, कापसाची बोंडे सडली आहेत. भाजीपाला वर्गीय पिके उध्दवस्त झालीयेत.जी काही शेतात पीक हिरवेगार दिसतायेत,ते पिके ही अति पावसामुळे मरून जाणार आहेत. आता मंत्र्यांचे तफे शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. पालकमंत्री मेघना बोर्डीकर हे पाहणी दौऱ्यावर गेले असता. काजळी रोहिणी आणि राजवाडी येथील शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. आज मदत व पुनर्वसनमंत्री यांचं ताफा पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथे आला असता येथील सावित्रीबाई काळे यांनी मंत्र्यासमोर हंबरडा फोडला. काळे यांच्या शेतातील सर्व पीक आणि शेतातील टिन पत्र्याचे घर पुरात वाहून गेल्याने त्यांना अश्रू अनावर झाले होते.
बाईट- सावित्री काळे- महिला शेतकरी
व्हीओ- परभणी जिल्ह्यात दरवर्षी 761 मिलिमीटर एवढा सर्वाधिक पाऊस पडत असतो, पण यंदा वार्षिक सरासरीच्या 108 टक्के एवढा पाऊस झालाय,त्यामुळे जिल्ह्यातील एलदरी,सिद्धेश्वर,निम्न दुधना धारणामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. तर माजलगाव आणि जायकवाडी धरणातून गोदावरीच्या पात्रात पाणी सोडल्यामुळे पाच तालुक्यातील 36 गावांचा संपर्क तुटला होता. या गावातील 1238 नागरिकांना रेस्क्यू करून सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले. एकूण 52 मंडळांपैकी 50 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे, विशेष बाब म्हणजे 10 मंडळात 4 वेळा अतिवृष्टी झालीय. यामुळे पिकांमध्ये अक्षरशहा पोहोनपाणी झालंय,
बाईट- रमेश रायमले- शेतकरी
व्हीओ- जिल्हा प्रशासनाने पुराची भयावह परिस्थिती बघून परभणी जिल्ह्यात सैन्यदल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाला पाचारण केले होते. यामध्ये १२३८ जणांना स्थलांतरित केले आहे. अशांना शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रात आश्रय द्यावा लागलाय. शेतकऱ्यांच्या पिकांबरोबर शेतकेयांची स्वप्न ही बेचिराख झाली आहेत, त्यांनी वर्ष काढायचा कस हा सवाल त्यांच्या समोर आव ठोकून उभा ठाकलाय. आता मुला मुलींची शिक्षण कशी करायची,मुलींची लग्न करायची,पीक कर्ज फेडायचे ही चिंता शेतकऱ्यांना सतावू लागलीय, अलीकडच्या आठ महिन्यात मराठवाड्यातील 707 शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांमधून ओला दुष्काळा बरोबर कर्ज माफीची ही मागणी होऊ लागलीय,पण मंत्री मात्र हे चित्र मंत्रीमंडळा समोर मांडू अस म्हणतायत.
बाईट- मकरंद पाटील- मदत व पुनर्वसनमंत्री
एन्ड व्हीओ- पीक विम्याचे बदलले ट्रिगरमुळे आता शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याची शक्यता कमी झालीय,कारण शेतात पिकच राहिली नाहीत,तर पीक कापणी प्रयोगावरून घेणार कसे आणि पीक कापणी प्रयोगातून शेतकर्यांना पीक विमा देणार कसे असा सवाल उपस्थित झाला आहे. त्यामुळे निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतकर्यांची झालेली वाईट परिस्थिती सुधारण्यासाठी आता मायबाप सरकारने कागदी घोडे नाचविण्यापेक्षा आणि नियम लावन्यापेक्षा शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्यासाठी शेतकऱ्यांचा आधार बनण्याची गरज निर्माण झालीय...
गजानन देशमुख, झी मीडिया,परभणी
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MNMAYUR NIKAM
FollowSept 25, 2025 13:17:560
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 25, 2025 13:02:010
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 25, 2025 12:49:040
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 25, 2025 12:37:040
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 25, 2025 12:33:340
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 25, 2025 12:30:330
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 25, 2025 12:18:350
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 25, 2025 12:05:380
Report
KJKunal Jamdade
FollowSept 25, 2025 12:05:240
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 25, 2025 12:02:430
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 25, 2025 11:45:410
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 25, 2025 11:22:440
Report
JMJAVED MULANI
FollowSept 25, 2025 11:20:580
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 25, 2025 11:19:57Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 2509ZT_CHP_SUICIDE_66
( single file sent on 2C)
टायटल:-- PTC file
अँकर:-- THIS IS PTC FILE
आशीष अम्बाडे
जी मीडिया
चंद्रपूर
3
Report