Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

चंद्रकांत पाटील का धमाकेदार इशारा: एक अक्टूबर को सांगली में शक्ति प्रदर्शन!

SMSarfaraj Musa
Sept 25, 2025 12:02:43
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - राष्ट्रवादीच्या मोर्चाला भाजपा देणार प्रत्युत्तर,एक ऑक्टोबर रोजी इशारा मोर्चा व रावण दहन कार्यक्रम - चंद्रकांत पाटलांकडुन जाहीर.. अँकर - आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त विधानानंतर राष्ट्रवादीकडून काढण्यात आलेल्या महाराष्ट्र संस्कृती मोर्चाला भाजपाकडून देखील प्रत्युत्तर देण्यात येणार आहे.एक ऑक्टोंबर रोजी सांगलीमध्ये भाजपाकडून इशारा सभा आणि रावण दहन कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचा भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांकडून जाहीर करण्यात आलाय,जयंत पाटील सह राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निशाणा साधत,एक ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांचा समाचार इशारा सभेतून घेऊ असा गर्भित इशारा देखील चंद्रकांत पाटलांनी देत गोपीचंद पडळकरांच्या पाठीशी भाजपा ठाम असल्याचे स्पष्ट केलं आहे,तसेच कुणी अंगावर आलं तर शिंगावर घ्या,असा आदेश देत हम किसेंको टोंकेगे नाही,टोकेंगो तो छोडोंगे नाही,असा गर्भित इशारा देखील चंद्रकांत पाटलांनी दिला, सांगलीमध्ये भाजपा कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी सभेमध्ये बोलत होते. साउंड बाईट - चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री. Sng_bjp_on_ncp स्लग - राष्ट्रवादीच्या मोर्चानंतर भाजपा देखील उतरणार मैदानात,राष्ट्रवादीला प्रत्युत्तर देण्यासाठी एक ऑक्टोबर रोजी इशारा मोर्चा व रावण दहन कार्यक्रम - चंद्रकांत पाटलांकडुन जाहीर.. अँकर - आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त विधानानंतर राष्ट्रवादीकडून काढण्यात आलेल्या महाराष्ट्र संस्कृती मोर्चाला भाजपाकडून देखील प्रत्युत्तर देण्यात येणार आहे.एक ऑक्टोंबर रोजी सांगलीमध्ये भाजपाकडून इशारा सभा आणि रावण दहन कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचा भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांकडून जाहीर करण्यात आलाय,जयंत पाटील सह राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निशाणा साधत,एक ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांचा समाचार इशारा सभेतून घेऊ असा गर्भित इशारा देखील चंद्रकांत पाटलांनी देत गोपीचंद पडळकरांच्या पाठीशी भाजपा ठाम असल्याचे स्पष्ट केलं आहे,तसेच कुणी अंगावर आलं तर शिंगावर घ्या,असा आदेश देत हम किसेंको टोंकेगे नाही,टोकेंगो तो छोडोंगे नाही,असा गर्भित इशारा देखील चंद्रकांत पाटलांनी दिला, सांगलीमध्ये भाजपा कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी सभेमध्ये बोलत होते. साउंड बाईट - चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MNMAYUR NIKAM
Sept 25, 2025 13:17:56
Buldhana, Maharashtra:बुलढाणा... आरक्षणाच्या मागणीसाठी हजारोच्या संख्येने धडकला बंजारा समाजाचा एल्गार मोर्चा... अनुसूचीत जमाती प्रवर्गातून बंजारा समाजाला आरक्षण देण्याची प्रमुख मागणी... Anchor - हैदराबाद गॅझेटीयर आणि सीपी बेरार नुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्यात याव या प्रमुख मागणीसाठी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाचा एल्गार मोर्चा काढण्यात आला.. या मोर्चामध्ये हजारो बंजारा बांधव, भगिनी, तरुण-तरुणी सहभागी झाले होते.. आपला पारंपारिक पोशाख, नृत्य आणि मागण्या संदर्भात घोषणा देत शहरातील प्रमुख मार्गाने मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.. या मोर्चामध्ये पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज, रायसिंग महाराज, समाजाचे नेते हरिभाऊ राठोड, संजय राठोड यांच्या नेतृत्वात आणि प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा पार पडला.. ज्या पद्धतीने मराठा आंदोलनादरम्यान "एक मराठा लाख मराठा" असे घोषवाक्य पाहायला मिळाले, त्याच पद्धतीने "एक गोर, सव्वा लाखेर जोर" हे घोषवाक्य देखील पाहायला मिळाल.. सरकारने समाजाच्या मागण्या मंजूर कराव्या अन्यथा यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे... बाईट - रायसिंग महाराज, महंत बाईट - नंदिनी चव्हाण, बंजारा युवती
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 25, 2025 13:02:01
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 25, 2025 12:49:04
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - वाशी मार्केट आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चौकशीसाठी उपोषण करणार - मंत्री चंद्रकांत पाटील.. अँकर - मुंबईच्या वाशी मार्केट आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चौकशीसाठी उपोषणाचा इशारा थेट भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिलाय, उपोषणासाठी प्रसंगी मंत्रीपद काढून घ्या,असं सांगू ना पण आता सोडणार नाही,असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांना दिला आहे,ते सांगलीमध्ये भाजपा कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होतो. साऊंड बाईट - चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 25, 2025 12:37:04
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 25, 2025 12:33:34
Raigad, Maharashtra:स्‍लग – बंदी असतानाही ऑनलाईन गेमिंग जुगार सुरूच ........ रायगड पोलीसांनी केला पर्दाफाश ......... राजस्‍थानमधून एकाला घेतले ताब्‍यात, पाचजणांचा शोध सुरू ......... 19 कोटी 44 लाख रूपये रकमेची 44 बँक खाती गोठवली ........... अँकर- भारतात ऑनलाईन जुगाराला बंदी असतानाही अॅप्‍सच्‍या माध्यमातून जुगाराचे प्रकार राजसोसपणे सुरू असल्याचे समोर आले आहे. रायगड पोलीसांच्या सायबर सेल विभागाने अशाच एका ऑनलाईन जुगाराचा उलगडा गेला आहे. राजस्थान मधून एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून, या प्रकरणात कोट्यावधींचे व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले आहे. महत्वाचे म्हणजे यात काही बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही सहभाग असण्याची शक्यता पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी भारमल हनुमान मिना याला राजस्‍थानच्‍या सवाई माधवपूर येथून ताब्यात घेतले आहे. अन्य पाच आरोपींचा शोध सुरू आहे. पोलीसांनी 44 बँक खाती त्‍यातील 19 कोटी 44 लाख रूपयांच्‍या रकमेसह गोठवली आहेत. बाईट - आँचल दलाल , पोलिस अधीक्षक
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 25, 2025 12:18:35
Satara, Maharashtra:TUSHAR TAPASE 7 FILES SLUG NAME -SAT_VISHBADHA सातारा - नवरात्र उत्सवातील उपवासादरम्यान वरीचा पिठाची भाकरी खाल्ल्याने 20 हून अधिक महिलांना विषबाधा तर 10 हून अधिक पुरुषांना विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.वरी पिठाची भाकरी खाल्ल्याने 8 हून अधिक नागरिकांना खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.बाधित झालेल्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.माण- खटाव भागातील मांडवे, पळशी, दहिवडी, बोंबाळे,किरकसाल, वडूज यांसारख्या अनेक गावांमधील महिला पुरुष यांना ही विषबाधा झाली आहे.वैभव ट्रेडर्स, अरियंत ट्रेडर्स, साई बाजार या दुकानातून स्थानिक दुकानदारांना वरीच्या पिठाचे विक्री ग्राहकांना त्याचबरोबर अन्य दुकानदारांना केली होती.. या दुकानांना सील करण्यात आला आहे.वरी पिठाची भाकरी उपवास असलेल्या लोकांनी खाऊ नये असा आव्हान देखील आता प्राथमिक आरोग्य केंद्र कडून करण्यात येत आहे.. बाईट्स -
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 25, 2025 12:05:38
Raigad, Maharashtra:स्‍लग – पेणमध्‍ये हुतात्‍मा नाग्‍या कातकरी यांचा स्‍मृतीदिन साजरा अँकर – भारतीय स्‍वातंत्रय लढयातील चिरनेर जंगल सत्‍याग्रहातील आदिवासी हुतात्‍मा नाग्‍या कातकरी यांचा स्‍मृतीदिन आज पेणमध्‍ये साजरा करण्‍यात आला. यानिमित्‍ताने अंकुर ट्रस्‍ट व इतर सेवाभावी संस्‍थांच्‍या वतीने पेण शहरात रॅली काढण्‍यात आली. या आदिवासी बांधव आपल्‍या पारंपारीक वेशभूषेत मोठया संख्‍येने सहभागी झाले होते. महात्‍मा गांधी वाचनालयात झालेल्‍या सभेत सामुहिक वनहक्‍क दावे मंजुर करावेत अशी मागणी करण्‍यात आली. अंकुर ट्रस्‍टच्‍या डॉ. वैशाली पाटील, खासदार धैर्यशील पाटील या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Sept 25, 2025 12:05:24
Shirdi, Maharashtra:Anc - अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात दोन गटात तुंबळ राडा झाल्याची घटना काल रात्री घडली आहे.. मोहनीराजनगर भागात किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे.. दोन्ही गटांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यात पोलिस वाहनावर दगडफेकीसह दोन पोलिस जखमी झाले आहेत.. याप्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांच्या स्विय सहाय्यकावर देखील गुन्हा दाखल झाला आहे.. V/O - कोपरगाव शहरात काल रात्री दोन गटात तुफान राडा झाला आहे.. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.. सुरुवातीला पोलिसांची कुमक कमी असल्याने जमावाने पोलीस वाहनावर दगडफेक केल्याची माहिती समोर येत आहे.. नंतर काही क्षणात पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आले.. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करून परिसर शांत केला.. या प्रकरणात संबंधित दोन्ही गटातील 63 जणांवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन्ही बाजूच्या 16 आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय.. Byte - अमोल भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी V/O - या प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांच्या स्वीय सहाय्यकावर देखील गुन्हा दाखल झाला आहे.. आमदार काळे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत झालेल्या प्रकारावर चर्चा केली.. माझ्या स्वीय सहाय्यक गुन्हा दाखल झाला असला तरी हा वाद गाडीचा धक्का लागल्याच्या कारणातून झाला असल्याने, या प्रकरणाला राजकीय वळण देऊ नये असे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटलंय... Byte - आशुतोष काळे, आमदार राष्ट्रवादी अजित पवार गट
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 25, 2025 11:50:56
Parbhani, Maharashtra:अँकर- सततची अतिवृष्टी आणि माजलगाव, जायकवाडी धरणातून गोदावरीमध्ये केल्या जात असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे परभणी जिल्ह्यात हाहाकार माजलाय. पिकांची अक्षरशहा माती झालीय,गोदावरीला आलेल्या पुरामुळे 19 गावांना पिकांचा वेढा पडलाय. हे पुराचे पाणी हजारो घरात शिरून जनजीवन विस्कळीत झालंय, जिल्ह्यातील 52 मंडळापैकी 50 मंडळात अतिवृष्टी ची नोंद झालीय,यापैकी 10 मंडळात तर सलग 10 वेळा अतिवृष्टी झालीय,यावरूनच ही परिस्थिती किती भीषण आहे,हे लक्षात येणार आहे,बघुयात या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट व्हीओ- शेतात दिसत असलेले हे पोहोणपाणी,पिकांची झालेली नासाडी,खरडून गेलेले शेत,गावाला पडलेला पुराचा वेढा येथील लोकांना अक्षरशहा देशोधडीला लावणारा आहे. यंदाच्या पावसाने होत्याच नव्हतं केलंय,शेतकऱ्यांचा पूर्ण खरीप हंगाम वाया गेलाय,पैश्याची जमवा जमाव करून शेतकर्यांची सोन्यासारखी पिके पिकवली होती,हाताच्या फोडाप्रमाणे वाढवली होती. पण जुलै,ऑगस्ट आणि सप्टेंबर या सगळ्याच महिण्यात झालेल्या धोधो पावसाने शेती पिक उध्दवस्त झालीयेत, यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबायचं नाव घेत नाहीयेत, आठ दिवसांपासून पीक पाण्यात आहेत, सोयाबीन जाग्यावर काळवंडले गेले असून सोयाबीनला शेंगा राहिला नाहीये, कापसाची बोंडे सडली आहेत. भाजीपाला वर्गीय पिके उध्दवस्त झालीयेत.जी काही शेतात पीक हिरवेगार दिसतायेत,ते पिके ही अति पावसामुळे मरून जाणार आहेत. आता मंत्र्यांचे तफे शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. पालकमंत्री मेघना बोर्डीकर हे पाहणी दौऱ्यावर गेले असता. काजळी रोहिणी आणि राजवाडी येथील शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. आज मदत व पुनर्वसनमंत्री यांचं ताफा पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथे आला असता येथील सावित्रीबाई काळे यांनी मंत्र्यासमोर हंबरडा फोडला. काळे यांच्या शेतातील सर्व पीक आणि शेतातील टिन पत्र्याचे घर पुरात वाहून गेल्याने त्यांना अश्रू अनावर झाले होते. बाईट- सावित्री काळे- महिला शेतकरी व्हीओ- परभणी जिल्ह्यात दरवर्षी 761 मिलिमीटर एवढा सर्वाधिक पाऊस पडत असतो, पण यंदा वार्षिक सरासरीच्या 108 टक्के एवढा पाऊस झालाय,त्यामुळे जिल्ह्यातील एलदरी,सिद्धेश्वर,निम्न दुधना धारणामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. तर माजलगाव आणि जायकवाडी धरणातून गोदावरीच्या पात्रात पाणी सोडल्यामुळे पाच तालुक्यातील 36 गावांचा संपर्क तुटला होता. या गावातील 1238 नागरिकांना रेस्क्यू करून सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले. एकूण 52 मंडळांपैकी 50 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे, विशेष बाब म्हणजे 10 मंडळात 4 वेळा अतिवृष्टी झालीय. यामुळे पिकांमध्ये अक्षरशहा पोहोनपाणी झालंय, बाईट- रमेश रायमले- शेतकरी व्हीओ- जिल्हा प्रशासनाने पुराची भयावह परिस्थिती बघून परभणी जिल्ह्यात सैन्यदल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाला पाचारण केले होते. यामध्ये १२३८ जणांना स्थलांतरित केले आहे. अशांना शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रात आश्रय द्यावा लागलाय. शेतकऱ्यांच्या पिकांबरोबर शेतकेयांची स्वप्न ही बेचिराख झाली आहेत, त्यांनी वर्ष काढायचा कस हा सवाल त्यांच्या समोर आव ठोकून उभा ठाकलाय. आता मुला मुलींची शिक्षण कशी करायची,मुलींची लग्न करायची,पीक कर्ज फेडायचे ही चिंता शेतकऱ्यांना सतावू लागलीय, अलीकडच्या आठ महिन्यात मराठवाड्यातील 707 शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांमधून ओला दुष्काळा बरोबर कर्ज माफीची ही मागणी होऊ लागलीय,पण मंत्री मात्र हे चित्र मंत्रीमंडळा समोर मांडू अस म्हणतायत. बाईट- मकरंद पाटील- मदत व पुनर्वसनमंत्री एन्ड व्हीओ- पीक विम्याचे बदलले ट्रिगरमुळे आता शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याची शक्यता कमी झालीय,कारण शेतात पिकच राहिली नाहीत,तर पीक कापणी प्रयोगावरून घेणार कसे आणि पीक कापणी प्रयोगातून शेतकर्यांना पीक विमा देणार कसे असा सवाल उपस्थित झाला आहे. त्यामुळे निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतकर्यांची झालेली वाईट परिस्थिती सुधारण्यासाठी आता मायबाप सरकारने कागदी घोडे नाचविण्यापेक्षा आणि नियम लावन्यापेक्षा शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्यासाठी शेतकऱ्यांचा आधार बनण्याची गरज निर्माण झालीय... गजानन देशमुख, झी मीडिया,परभणी
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 25, 2025 11:45:41
Akola, Maharashtra:Anchor : राज्य सरकारने मराठा आरक्षणा करिता हैदराबाद गॅझेट लागू केलेल्या निर्णयाला ओबीसी समाजाकडून जोरदार विरोध होत आहे. या निर्णयाविरोधात अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ओबीसी बांधवांकडून तब्बल 11 दिवसांपासून उपोषण सुरू होतं.सरकारने शेवटी या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे उपोषणकर्त्यांनी हे उपोषण तात्पुरतं मागे घेतलं आहे. मात्र, राज्य सरकारने ओबीसी बांधवांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर उपोषणकर्त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे तर याला कारणीभूत राज्य सरकारच ठरणार, असा इशाराही देण्यात आला आहे.ओबीसी समाजाच्या मागण्यांकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावं, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली आहे. Byte : उपोषणकर्ता
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Sept 25, 2025 11:22:44
Nashik, Maharashtra:feed send by 2c reporter-sagar gaikwad slug-nsk_protest *वडनेर दुमाला येथील बिबट्याचा हल्ल्यात दोन वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर गावकरी आक्रमक* *वनविभागाच्या कार्यालयात मांडला ठिया; बिबट्याला पकडण्याची केली मागणी* अँकर नाशिकच्या वडनेर दुमाला परिसरात काल एका २ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केल्याची हृदय पिळून टाकणारी घटना घडली, यात दोन वर्षाच्या श्रुतिक गंगाधरण याचा मृत्यू झाला यानंतर वडनेर दुमाला सह पंचक्रोशीतील नागरिक आक्रमक झाल्या असून आज त्यांनी वनविभागाच्या कार्यालयावर धडक दिली आणि मुख्य वनसंरक्षक कार्यालयात गावकऱ्यांनी या मांडत आपला आक्रोश व्यक्त केला वनविभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत परिसरात आणखी पिंजरे वाढविण्याची मागणी केली जर पाच दिवसात बिबट्याला पकडले नाही तर मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला याच बरोबर वन विभागाच्या कार्यालयात बिबट्या सोडण्याचा इशारा दिलाय बाईट - केशव पोरजे ( माजी नगरसेवक) बाईट - श्री जी मल्लिकार्जुन ( मुख्य वनरक्षक अधिकारी)
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Sept 25, 2025 11:20:58
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top