Back
अण्णा हजारे: पुण्यातील फ्लेक्सबोर्डवर नाराजी, तरुणांना संदेश!
LBLAILESH BARGAJE
Aug 17, 2025 09:33:02
Pune, Maharashtra
अण्णा हजारे ऑन पुणे फेक्सबोर्ड
Anc:-
पुण्यात अण्णा हजारेंचे फ्लेक्सबोर्ड लागल्यानंतर अण्णांनी नाराजी व्यक्त करत दिली प्रतिक्रिया आहे. मी दहा कायदे आणले मात्र 90 वर्षानंतर देखील मी करत राहावं आणि तुम्ही झोपून राहावं अशी अपेक्षा चुकीची असल्याचं म्हटलं आहे.
अण्णांनी जे केलं ते आपण करावं असं तरुण युवकांना वाटलं पाहिजे, देशाचे नागरिक आहेत तर आपलं काही कर्तव्य आहे की नाही. आपण स्वतंत्र दिवस साजरा केला नुसता तिरंगा हातात घेऊन होणार नाही, बोट दाखवून काहीही होणार नाही. मी मोठ्या आशेने तरुणाकडे पाहतोय, युवा शक्ती ही राष्ट्र शक्ती आहे, ही जागी झाली तर उद्याच भविष्य दूर नाही. मात्र एवढे वर्ष लढून कायदे करून जेव्हा अण्णांनी जाग झालं पाहिजे अस कानावर येत तेव्हा वाईट वाटत अस अण्णा हजारेंनी म्हटलं आहे.
बाईट:- अण्णा हजारे, जेष्ठ समाजसेवक
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowAug 17, 2025 11:47:31Kalyan, Maharashtra:
कल्याण न्यूज फ्लॅश..
कल्याण शीळ रस्त्यावर खड्ड्यांमुळे एका तरुणाचा झाला होता अपघात
उपचारादरम्यान वीस दिवसानंतर झाला मृत्यू
रोहन शिंगरे असे या तरुणाचे नाव
23 जुलै रोजी कामावर जात असताना रस्त्यावरील खड्ड्यात त्याची दुचाकी आदळली त्यामुळे त्याचा तोल जाऊन तो खाली पडला
त्याचा हात मागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली गेल्याने काही अंतरापर्यंत ट्रकने त्याला फरपटत नेले होते
उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते
उपचारात दरम्यान वीस दिवसानंतर त्याचा मृत्यू झाला
रोहन शिंगरे हा घरातील एकुलता एक मुलगा होता
बाईट... वैजयंती घोलप माजी महापौर केडीएमसी
2
Report
SKShubham Koli
FollowAug 17, 2025 11:30:19Thane, Maharashtra:
THANE BREKING
महापालिका निवडणुकीपूर्वीच आमदार जितेंद्र आव्हाड यांना पुन्हा मतदार संघातून राजकीय धक्का...
जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा मुंब्रा मतदार संघातील कळवा येथील असंख्य कार्यकर्ते करणार ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटील यांच्या माध्यमातून कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रभात शिवसेनेत प्रवेश..
ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रम येथे पारपडला भव्य पक्ष प्रवेश...
गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी SP पक्षातील आव्हाडांच्या मतदार संघातील नगरसेवकांनी केला होता शिवसेनेत प्रवेश.. यानंतर आता स्थानिक पातळीवरील असंख्य महिला कार्यकर्त्या व पदाधिकारी यांनी केला प्रवेश
लवकरच उरलेले माजी नगरसेवक आमच्या पक्षात येतील असा विश्वास लांडगे यांनी विश्वास व्यक्त केला आहे...
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू करत पालिका निवडणुकी साठी पक्ष प्रवेश करत रणनीती आखण्याचे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे...
BYT:- गोपाल लांडगे कल्याण जिल्हा प्रमुख
मिलिंद पाटील जेष्ठ नगरसेवक TMC
3
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 17, 2025 11:17:28Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1708ZT_WSM_SWABHIMANI_ANDOLAN
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर : वाशिम जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून शेतात साचलेल्या पाण्यात बसून अर्धनग्न होतं आंदोलन केलं. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात तब्ब्ल चार वेळा अतिवृष्टी होऊन नदी नाल्याला पूर आल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालंय,हजारो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, हळद,तूर, कपाशी या पिकाचं मोठं नुकसान झालंय.14 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून, दहा पेक्षा जास्त जनवारांचा मृत्यू झालाय.तर ऐका शेतकऱ्याचाही पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं मृत्यू झालाय त्यामुळं शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे.
बाईट: दामोदर इंगोले, स्वाभिमानी शेतकरी संघटना
8
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowAug 17, 2025 10:50:40Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणी जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या पावसाने पूर्णा आणि परभणी तालुक्यातील पाच महसूल मंडळात पिकांचे मोठं नुकसान झालंय, या भागाची आज जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी पाहणी करून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पूर्णा तालुक्यातील लिमला, दगडवाडी, वझर, देवठाणा, देऊळगाव दुधाटे,धानोरा काळे, मुंबर, माहेर, बानेगाव, फुलकळस इत्यादी गावांना जिल्हाधिकाऱ्यांनी ऐन रविवार असतांना भेटी देत शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केलाय..
14
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 17, 2025 10:50:31Washim, Maharashtra:
वाशिम:
File2:1708ZT_WSM_FARMER_LOSS_WKT
WSM_FARMER_LOSS_SHOTS
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:वाशिम जिल्ह्यात दोन दिवसां पासून पावसानं धुमाकूळ घातल्यामुळं नदी नाल्यांना मोठा पूर आला असून हजारो हेक्टर वरील खरिपाची सोयाबीन, तूर,कपाशी,हळद यासह भाजीपाला पिकांचं होत्याचं नव्ह्तं झालं आहे.पीक नुकसानी मुळं शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पालकत्व स्वीकारलेल्या वाशिम जिल्ह्यात त्यांनी विशेष लक्ष घालून या नुकसानग्रस्त
शेतकऱ्यांना शासनानं विशेष मदत पॅकेज देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे याचाच आढावा घेत शेतकऱ्यांशी बातचीत केली वाशिम चे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी.
12
Report
TTTUSHAR TAPASE
FollowAug 17, 2025 10:31:18Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
3 FILES
slug name -SAT_VEER_JAVAN
सातारा - कोरेगाव तालुक्यातील सासुरे गावचे सुपुत्र हवालदार प्रवीण अंकुश वायदंडे यांना अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलं आहे.आज संपूर्ण गावाने अश्रुपूर्ण डोळ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. “वीर जवान तुझे सलाम” या घोषणांनी वातावरण दुमदुमले.
प्रवीण वायदंडे यांच्या बलिदानामुळे गावाने एक वीरपुत्र गमावला असला तरी त्यांच्या शौर्यकथेने प्रत्येकाच्या हृदयात अभिमान जागवला आहे.
14
Report
ABATISH BHOIR
FollowAug 17, 2025 10:18:37Kalyan, Maharashtra:
कल्याण डोंबिवली मध्ये खड्ड्याची साम्राज्य..
रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते...
Anc...कल्याण डोंबिवली महानगरपालिका दरवर्षी खड्डे बुजवण्यासाठी करोडो रुपयाचा टेंडर काढते मात्र रस्त्यात खड्डा आहे की खड्यात रस्ता हे दिसत नाही गणपती उत्सवाला काही दिवसच राहिले असले तरी रस्त्यावरचे खड्डे बुजवले गेले नाही त्यामुळे येणाऱ्या गणरायाचे आगमन खड्ड्यांमधून होणार का? एकीकडे महानगरपालिका आयुक्त 15 ऑगस्ट ला चिकन,मटण विक्रीवर बंदीवर निर्णय घेते मात्र कल्याण डोंबिवलीतल्या रस्ते वरचे खड्डे केव्हा बुजवणार हे नागरिक विचारात आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी
Wkt... आतिश भोईर
कल्याण
13
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowAug 17, 2025 10:18:21Nala Sopara, Maharashtra:
Date-17aug2025.
Rep-prathamesh tawade
Loc-nalasopara
Slug-NALASOPARA AUTO
Feed send by 2c
Type-AV
Slug- नालासोपाऱ्यात इमारतीचा जीर्ण भाग कोसळला
मलबा रिक्षावर कोसळल्याने नुकसान
अँकर - नालासोपारा पूर्वेच्या प्रगती नगर येथील अमन अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्याचा काही भाग अचानक खाली पार्क केलेल्या रिक्षांवर कोसळून दुर्घटना झाली आहे ...
या घटनेत रिक्षा चेंगरून गेल्याने रिक्षाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. रात्री अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
गेल्या दोन दिवसांपासून वसई-विरार परिसरात मुसळधार पावसाचा जोर कायम असून, त्याचा परिणाम अनेक इमारतींच्या संरचनात्मक स्थितीवर झाल्याचे समोर येत आहे.
14
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 17, 2025 10:18:15Ratnagiri, Maharashtra:
भास्कर जाधव
बाईट पॉइंटर.
*ऑन सामाजिक तेढ, सलोखा*
सध्या देशामध्ये सामाजिक सलोखा बिघडविण्याचे सातत्याने प्रयत्न चालू आहेत,
राज्यकर्ते मागील दहा-पंधरा वर्ष प्रयत्न करत आहेत,,,,,,
सत्ता मिळाल्यानंतर या देशाचा उपयोग संपूर्ण जातीच्या लोकांना एकत्र संघ ठेवणे ऐवजी आपला अजेंडा जातीचा आहे इतरांना द्वेष करण्याचा आहे हा मुद्दा दिवसा गणित राज्यकर्त्यांकडून अधोरेखित केला जात आहे,,,,,
*जरांगे पाटील,,,,*
काही लोकांना भडकवण्याचा प्रयत्न सरकारकडूनच होत आहे.
जरांगे पाटलांचा मोर्चा जेव्हा नवी मुंबई पर्यंत पोहोचला होता तेव्हा त्यावेळेला एक खोटा जीआर काढला व तो मोर्चा परतवण्याचा काम केलं, जरांगे पाटलांना बदनाम करण्याची मोहीम याच सरकारने सुरू केली.
सरकारकडून जरंगे पाटलांना फसवण्याच काम सातत्याने सुरू राहिला आहे.
*जरांगे पाटील ओबीसी आरक्षण,,,,,*
सरकारने जी गोष्ट देण्यासाठी शेक आहे ती बोलली पाहिजे.
मराठा समाजाला आरक्षण मिळायल पाहिजे ,शिक्षणासाठी मिळायला पाहिजे ,नोकरी धंदा मध्ये मिळायला पाहिजे.
*ठाकरे ब्रँड,,,*
कोणीही बोलत असेल आम्ही ठाकरे बँड संपवू हे शक्य नाही याचा अर्थ ठाकरे बँड अजून शाबूत आहे,
हे ठाकरे बंधू एकत्र आले तर ठाकरे ब्रँड नष्ट करायचं सोडा, आपण नष्ट होऊ या भीतीपोटी अशी वक्तव्य करतात.
ऑन भारतीय जनता पार्टी,,,,
भारतीय जनता पार्टीच्या लोकांमध्ये जास्तीत जास्त विरोधकांबद्दल सन्मानाने बोलण्याऐवजी जास्तीत जास्त वाईट बोलणार कोण अशा प्रकारची स्पर्धा लागलेली असते त्यांच्या बोलण्याकडे जास्त गांभीर्याने बघण्याची गरज वाटत नाही.
*ऑन एन डी आर एफ टीम* ,,,
गेली तीन-चार महिने एन डी आर एफ ची टीम चिपळूण मध्ये तळ ठोकून आहे.
एनडीआरएफ च्या बद्दलचा अनुभव वाईट आहे.
एन डी आर एफ सी टीम अडचणीच्या काळामध्ये कधीही पुढे सरसावताना दिसत नाही.
पोलीस पोस्टात सामाजिक कार्यकर्ते पोहचतात महसूल खाते पोस्ट मात्र एन डी आर एफ . ची टीम धाडस दाखवत नाही.
जीव धोक्यात घालून लोकांना वाचविणे हे एन डी आर एफ चे काम आहे पण हे होताना दिसत नाही.
*ऑन मोदी एक्सप्रेस ट्रेन*
कोकणासाठी मोदी एक्सप्रेस ट्रेन बुक करायची असेल तर भाजपच्या जिल्हाध्यक्षांना संपर्क करावा लागतो,,,,
या देशाचे संस्कार, संस्कृती ,राजकीय सभ्यता, राजकीय प्रणाली हे सर्व धुळीस मिळवण्याचे काम भाजप करीत आहे त्यांनी तसा विडा उचलला आहे.
नशीब भाजपचे लोक भारतात जी ट्रेन आली ती नरेंद्र मोदींमुळे आली ,,,,
प्रत्येक सणाला ट्रेन या सुटतातच,,,,
काँग्रेसच्या काळात कुठे नेहरू स्टेडियम ,कुठे इंदिरा गांधी स्टेडियम असे नाव असायचे तेव्हा हे लोक कांगावा करायचे ,आता मात्र प्रत्येक गोष्टीला स्वतःचे नाव जोडतात.
आज तुम्ही काहीही न करता स्वतःची नावे लावताय. आणि म्हणून मागील 60 वर्षे ह्या लोकांना सत्ता का दिली नाही आणि आता दिली आहे त्यामुळे लोक पश्चाताप करत आहेत.
देश अतिशय परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
*ऑन विद्यमान सरकार,,,*
सातत्याने सांगितल्या जात होते ईव्हीएमचा घोटाळा करून हे सरकार सत्तेत येतंय, दुसऱ्यांचे खासदार आमदार चोरून हे सरकार सत्तेत येतंय ,कालची निवडणूक लोकांची मतं चोरून हे सरकार सत्तेवर आले ते आता पुराव्यानिशी सिद्ध होताना दिसत आहे. राहुल गांधी आणि त्यांच्यासारखे अनेक लोक सरळ सरळ निवडणूक आयोगासमोर पुरावे ठेवत आहेत.
*ऑन निवडणूक आयोग,,,,,*
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तीन महिन्यात 60 लाख मतदान वाढलं कसं व बिहारच्या निवडणुकीमध्ये 65 लाख मत कमी कशी होतात ? हे उत्तर देत नाहीत
*निवडणूक आयोग हा देशाचा निवडणूक आयोग आहे की भारतीय जनता पार्टीचा सरकार निवडून आणणार निवडणूक आयोग आहे अशा प्रकारची शंका यावी किंवा पुरेपूर त्याला आधार असावा असे वाटते.*
*ऑन राहुल गांधी,,,,*
राहुल गांधी जीवावर उदार होऊन देशाची लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि आम्ही त्यांच्या मागे ठामपणे उभे आहोत.
*भास्कर जाधव*
*नेते, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट*
14
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 17, 2025 10:16:39Nashik, Maharashtra:
Nsk_parprnatiypkg
Video sent yday
Anchor नाशिक मध्ये परप्रांतीय मुजोरी गेल्या दोन दिवसापासून गाजते आहे. नाशिक मध्ये एका महिलेसोबत त्रंबकेश्वर देवस्थानलाही या मुजोरीचा फटका बसलाये. बघूया काय चाललंय नाशकात
Vo 1 दिंडोरी नाका परिसरातील मराठी महिलेबर हात उगारणारा हा परप्रांतीय बघा....आपल्याच इमारतीत राहणाऱ्या या परप्रांतीयांना उघडे न फिरण्याची आणि अंतरवस्त्र बाहेर वळण्यासाठी टाकू नये याची विनंती ही महिला करतेय...मात्र तिच्या अंगावर धावून जाऊन तिला धमकवणाऱ्या या परप्रांतीयाला कंटाळून या इमारतीतील सात फ्लॅटधारक आपला फ्लॅट विकून गेले आहेत... विशेष म्हणजे हे सर्व फ्लॅट याच परप्रांतीयाने विकत घेतलेत... अखेर मनसेने या परप्रांतीयाला धडा शिकवत त्याला हिसका दाखवला आहे
Byte पीडित महिला मनसे कार्यकर्ते
Vo 2 याच पद्धतीने व्हीआयपी दर्शनासाठीचा असलेला उत्तर दरवाजा बंद करून त्र्यंबकेश्वर संस्थाने सर्वसामान्यांचे दर्शन व्हावे यासाठी प्रयत्न केला मात्र तोच दरवाजा तोडण्याचा प्रयत्न जमलेल्या उत्तर भारतीयांनी आणि एका महिलेने केला... यावेळी पोलिसांवर दबाव आणत त्यांनी आपले काम सुरूच ठेवले प्रशासनाने अखेर आपला दणका दाखवत दोन-तीन टार्गट परप्रांतीयांना फटके दिलेत....
Byte कैलास घुले विश्वस्त त्र्यंबकेश्वर संस्थान
Vo 3 मुंबई पुण्याप्रमाणे आता नाशिक शहर विकसित होत आहे तसा तसा परतण्याचा लोंढा छोट्या मोठ्या उद्योगांसाठी नाशिकमध्ये वाढत आहे. या प्रकोपाची लक्षणे आत्तापासून दिसू लागली असून नाशिककरांनी आता या विरोधात दंड थोपटणे सुरुवात केली आहे. गरज आहे ती प्रशासनानं याकडे आत्ताच लक्ष देण्याची
13
Report
JMJAVED MULANI
FollowAug 17, 2025 10:01:18Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 1708ZT_INDAPURBHRNEKRIDA
BYTE 1
क्रीडा खातं बरं होतं, लय त्रास नव्हता… पण आता त्रास घ्यावाच लागेल* मात्र लगेच सारवा करत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, हा त्रास नाही ही जबाबदारी आहे…
ANCHOR - इंदापूर तालुक्यातील दगडवाडी येथे निरा नदीकाठावर पूर संरक्षण भिंत बांधकामाच्या भूमिपूजन सोहळ्यात मंत्री भरणे बोलत होते. भाषणात ते म्हणाले, परवा मी विदर्भात होतो, काल मराठवाड्यात होतो… त्यामुळे सतत फिरावं लागतं. क्रीडा व अल्पसंख्यांक खातं बरं होतं, लय त्रास नव्हता, पण आता त्रास घ्यावाच लागेल.
यानंतर तात्काळ त्यांनी स्पष्ट करत सांगितलं, हा त्रास नाही… ही जबाबदारी आहे. आपल्या नेत्यांनी ठेवलेला विश्वास आहे,असे म्हणत मंत्री भरणे यांनी पुन्हा सारव केली.
*साउंड बाईट – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे*
14
Report
TTTUSHAR TAPASE
FollowAug 17, 2025 09:31:48Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -SAT_DESAI_BYTE
शंभूराज देसाई On शरद पवार
1978 च्या शरद पवारांच्या पुलोद सरकारच्या वक्तव्यावर त्यांचे साथीदार आणि वसंतदादांच्या कुटुंबियांनीच भाष्य करावे, असे मंत्री शंभूराज देसाई म्हणाले.
शंभूराज देसाई On उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी आपलं देशप्रेम असल्याने आम्ही महाविकास आघाडी केली असल्याचे म्हटले यावर शंभूराज देसाई यांनी निवडणुका एका बरोबर आणि सरकार स्थापन दुसऱ्या बरोबर हे लोकशाहीचे तत्व नसल्याची टीका केली.
14
Report
MNMAYUR NIKAM
FollowAug 17, 2025 08:47:49Buldhana, Maharashtra:
व्यवस्थेच्या उदासीनतेचा बळी: विनोद पवार यांच्या मृत्यूने अनेक प्रश्न उपस्थित
स्वतंत्र भारतातही हक्कांसाठी मरावं लागतंय..!
Anchor - १५ ऑगस्ट... स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी, जिथे आपण देशासाठी काहीतरी चांगलं करण्याच्या शपथा घेतो, तिथेच एका तरुणाला आपल्या मागण्यांसाठी, आपल्याच लोकांसाठी जीव द्यावा लागला. हा तरुण होता विनोद पवार... आणि त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरली ती प्रशासनाची दिरंगाई आणि उदासीनता...पाहुयात हा सविस्तर वृत्तांत
VO 1- बुलढाणा जिल्ह्यातील आडोळ खुर्द गाव. अनेक वर्षांपासून या गावकऱ्यांच्या मूलभूत मागण्या प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. रस्ते, पाणी, आणि घरांसाठी ते अनेक वर्षांपासून निवेदनं देत आहेत. पण त्यांची ही हाक कुणीही ऐकली नाही. अखेर, याच मागण्यांसाठी त्यांनी १५ ऑगस्ट रोजी जिगाव प्रकल्पाजवळ जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. या आंदोलनात विनोद पवार आघाडीवर होते. त्यांनी प्रशासनाचा निषेध करत पूर्णा नदीत उडी घेतली."
VO 2- ही घटना घडल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. एनडीआरएफच्या पथकाने शोधमोहीम सुरू केली, पण तब्बल ३० तासांनंतर १६ ऑगस्टला विनोद पवार यांचा मृतदेह मलकापूर जवळ सापडला. ३० तास... प्रशासनाच्या बेफिकीरीचा हा सर्वात मोठा पुरावा आहे."
Vo 3 - आम्ही कितीवेळा प्रशासनाकडे गेलो, निवेदनं दिली, पण त्यांनी आमच्याकडे दुर्लक्षच केलं. माझ्या नवऱ्याचा जीव त्यांच्या याच बेपर्वाईमुळे गेला. त्यांना काहीच फरक पडत नाही की एक माणूस मरेपर्यंत लढतोय... अशी दुःखद भावना विनोद पवार यांच्या पत्नीने व्यक्त केली....
Byte - आशा पवार, पवार यांच्या पत्नी
Vo 4 - माझे वडील ज्यांच्यासाठी लढत होते, त्यापैकी एकानंही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. हे खूप धक्कादायक आहे. प्रशासन तर जबाबदार आहेच, पण ज्यांनी त्यांना एकटं सोडलं, ते सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत... हे सांगताना विनोद पवार यांच्या मुलीला गहिवरून आलं....
Byte - करुणा पवार, पवार यांची मुलगी
VO 5- विनोद पवार... एक समाजसेवक, जो लोकांच्या प्रश्नांसाठी लढला. आज त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पण त्यांच्या मनात एकच प्रश्न आहे: 'याला जबाबदार कोण?' यापूर्वीही जिल्ह्यात कैलास नागरे या तरुणाने शेतकऱ्यांना पाणी मिळाव यासाठी आत्महत्या केली होती. या दोन घटनांमध्ये एक गोष्ट समान आहे - प्रशासनाचे दुर्लक्ष आणि सामान्य माणसाचा बळी."
आजही अनेक ठिकाणी सामान्य माणूस मूलभूत सुविधांसाठी लढतोय. विनोद पवार यांचा बळी हे केवळ एक उदाहरण आहे. हा प्रश्न आहे व्यवस्थेवरच्या विश्वासाचा. जेव्हा एक माणूस लोकांच्या हक्कांसाठी जीव देतो, आणि प्रशासन शांत बसतं, तेव्हा कोणावर विश्वास ठेवायचा? यापुढे किती विनोद पवार यांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागणार? मयूर निकम झी 24 तास बुलढाणा....
14
Report
TTTUSHAR TAPASE
FollowAug 17, 2025 08:47:41Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
4 FILES
SLUG NAME -SAT_THIEF_DEATH
सातारा- सातारा शहरात मध्यरात्री धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. चोरीसाठी आलेल्या युवकाचा चौथ्या मजल्यावरून पडून जागीच मृत्यू झाला आहे. तर त्याच्यासोबत असलेल्या साथीदाराला नागरिकांनी पकडून मारहाण केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. मात्र इतर काही साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व चोरटे पुणे जिल्ह्यातील मंचर येथील असल्याचे समोर आले आहे.
14
Report