Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना के अंबड़ में भारी बारिश, गल्हाटी नदी में बाढ़

NMNITESH MAHAJAN
Sept 14, 2025 03:47:09
Jalna, Maharashtra
FEED NAME | 1409ZT_JALNA_RAIN(4 FILES) जालना : अंबड तालुक्यात मुसळधार पाऊस,गल्हाटी नदीला पूर अँकर | जालन्यातील अनेक भागात मध्यम आणि मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे.अंबड तालुक्यात देखील काल रात्री मुसळधार पाऊस झाला.अंबडच्या डोमेगाव भागातही पावसानं हजेरी लावली.या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे गल्हाटी नदीला पूर आलाय.
4
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
TTTUSHAR TAPASE
Sept 14, 2025 05:17:54
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 14, 2025 05:17:12
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... स्किप्ट ::- परिवहन मंत्र्यांच्या नातवाला टेस्ला गाडी भेट... लातूरकरांना गळणारी बस....विद्यार्थ्यांची संतापजनक मागणी... टेस्ला नको, पावसात न गळणारी एसटी द्या... AC ::- लातूर जिल्ह्यातील नागरिक व विद्यार्थ्यांनी परिवहन व्यवस्थेबाबत संताप व्यक्त केला आहे. भारतातील पहिली टेस्ला कार नातवाला गिफ्ट देणाऱ्या परिवहन मंत्र्यांकडे विद्यार्थ्यांनी थेट मागणी केली आहे. आम्हाला टेस्ला नको, पावसात न गळणारी बस द्या... सध्या लातूर जिल्ह्यातील अनेक एसटी बसेस मोडकळीस आल्या आहेत. पावसाळ्यात या बसेस गळू लागतात, छप्परातून पाणी टपकते, प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. याचा व्हिडिओ देखील प्रवाशांनी शूट केला आहे. त्यामुळे नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. लातूर जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील प्रवासासाठी मोठ्या प्रमाणावर एसटी बसचा वापर होतो. मात्र गळणाऱ्या व मोडकळीस आलेल्या बसमुळे विद्यार्थी, कामगार आणि सामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे “नवीन लक्झरी गाड्यांऐवजी सामान्य जनतेसाठी सोयीस्कर व सुरक्षित एसटी बसेस उपलब्ध करून द्याव्यात” अशी ठाम मागणी नागरिकांनी केली आहे.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 14, 2025 05:00:39
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव DHARA_ST_BUS भूम-मिरज एसटी बसमधून पाणी गळतीचा त्रास , परिवहन मंत्री हे पालकमंत्री असलेल्या धाराशिव जिल्ह्यात एसटी बसची दुरावस्था. बस गळतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. Anchor धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या जिल्ह्यातील भूम–मिरज एसटी बसमध्ये अक्षरशः पावसाचे पाणी गळू लागल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसात, बसच्या छतावरील गळतीमुळे प्रवाशांच्या अंगावर थेट पाणी येत असून, सिट्स ओल्या होऊन बसण्यास अडचणी निर्माण होत आहेत. परिवहन मंत्री हे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातच एसटी बसची ही अवस्था असेल तर राज्यात एसटीची काय अवस्था असेल असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Sept 14, 2025 05:00:18
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Sept 14, 2025 04:47:31
Amravati, Maharashtra:Feed slug :- AMT_THILORI_RAIN सहा फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 दर्यापूर तालुक्यातील थिलोरी,आमला कळमगव्हाण गावात ढगफुटी सदृश्य पाऊस; संपूर्ण गाव पाण्याखाली, नागरिकांचे हाल अँकर :– अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात काल रात्री मुसळधार पाऊस झाला आहे. दर्यापूर तालुक्यातील थिलोरी, आमला कळमगव्हाण या भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे कपाशी, तूर आणि सोयाबीन पीक पावसाने वाहून गेले आहे. थिलोरी येथील लेंडी नाल्याला मोठ्या पूर आला असून नाल्याचे पाणी थिलोरी गावात शिरले आहे. ढगफुटी सदृश पावसाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे. दरम्यान अनेक घरात पुराचे पाणी शिरले असून जीवनावशक्य साहित्य भिजल्याने अनेक संसार उघड्यावर आले आहे.
6
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 14, 2025 04:34:16
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातील ओढ्यात वाहून गेलेल्या युवकाचा शोध कार्याला सुरुवात ( WKT ) - सोलापुरातील ओढ्यात वाहून गेलेल्या युवकाचा शोध कार्याला सुरुवात - रस्त्याच्या अंदाज न आल्याने सतीश शिंदे नामक व्यक्ती रिक्षासह गेला होता वाहून - पाण्याचा प्रवाह वाढल्याने मोठा असल्याने शोध कार्यात अडचणी - थोड्याच वेळात एनडीआरएफ ची टीम दाखल होणार असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांची माहिती - राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने सुरू होते सर्विस रस्त्याचे याचविषयीचा घटनास्थळावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी... ( WKT )
1
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 14, 2025 04:01:19
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... स्किप्ट ::- भरत कराड च्या आत्महत्येनंतर वांगदारी ग्रामस्थांचे साखळी उपोषण सुरु....साखळी उपोषणाचा आज दुसरा दिवस... AC ::- भरत कराडच्या आत्महत्येनंतर वांगदरी ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतंय वांगदारी ग्रामस्थांनी साखळी उपोषण सुरूवात केली आहे. रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावातील ग्रामस्थांनी शासनाकडे सहा प्रमुख मागण्या सादर केल्या आहेत. हैद्राबाद गॅझेटचा GR रद्द करावा, ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवावे, तसेच भरत कराड यांच्या प्राणत्यागाला न्याय मिळावा, अशा मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत. याशिवाय ओबीसी समाजबांधवांना जाति विषयक दाखले मिळावेत, कराड कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी अशाही मागण्या पुढे ठेवण्यात आल्या आहेत. आज साखळी उपोषणाचा दुसरा दिवस आहे.. बाईट ::- नागरिक
1
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 14, 2025 03:47:44
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1409ZT_CHP_FLOOD_SCENE ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याला रात्री पुन्हा एकदा मुसळधार पावसाने झोडपले, इरई नदीने पात्र सोडल्याने शहराला पुराचा फटका बसण्यास सुरुवात अँकर:-- चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याला काल रात्री पुन्हा एकदा मुसळधार पावसाने झोपून काढलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे आणि यामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी नाले दुथडी भरून वाहताय. चंद्रपूर शहराजवळील इरई धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आल्यामुळे इरई नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. यासोबतच वर्धा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे. यवतमाळ, अमरावती आणि वर्धा या तीन जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे वर्धा नदी दुथडी भरून वाहत आहे आणि हीच नदी चंद्रपूर जिल्ह्यात पूर येण्याचं कारण ठरू शकते. वर्धा नदीला आलेल्या पुराचा फटका इरई नदीला देखील बसला असून यामुळे चंद्रपूर शहरातले रहमत नगर आणि सिस्टर कॉलनी भागातल्या काही परिसरात नदीचे पाणी शिरलं आहे. यामुळे काल रात्री जवळ जवळ 50 ते 60 लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
5
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Sept 14, 2025 03:47:02
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या बेफिकीर हुल्लडबाजीचा प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वी कर्दे समुद्रकिनाऱ्यावर भरधाव वेगात थार गाडी चालवून ती पलटी झाल्याची घटना ताजी असतानाच, हर्णे बंदरात आणखी धक्कादायक प्रकार घडला आहे. समुद्रात वाहन नेण्यास स्पष्ट मनाई असतानाही काही पर्यटकांनी कार थेट समुद्रात चालवत जीव धोक्यात घातला. या धाडसी कृत्यामुळे इतर पर्यटकांचा जीवित धोक्यात आला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार प्रशासनाकडे या प्रकारावर प्रतिबंध घालण्याची मागणी केली असली तरी अद्याप ठोस पावले उचलली गेलेली नाहीत. समुद्रकिनाऱ्यावर हुल्लडबाज पर्यटकांचे वाढते प्रकार लक्षात घेता पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
5
comment0
Report
Advertisement
Back to top