Back
हसन मुश्रीफ: अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत गप्प बसायचं नाही!
SMSarfaraj Musa
Aug 05, 2025 00:46:22
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - अजित पवार मुख्यमंत्री होई पर्यंत गप्प बसायचं नाही - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
अँकर - अजित पवार मुख्यमंत्री होई पर्यंत आपण गप्प बसायचं नाही,असे आवाहन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केले आहे,तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही एकमेव पार्टी आहे, जी युती मध्ये असून देखील छत्रपती, शाहू, फुले आणि आंबेडकरांचा पुरोगामी विचार सोडला नाही,असं मत देखील मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले आहे.ते सांगलीच्या आटपाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्यावतीने आयोजित युवा संवाद मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते.
साउंड बाईट - हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण मंत्री.
व्ही वो - जिथे जमेल तिथे युती,जिथे जमणार नाही तिथे स्वबळावर,हे अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे,त्याप्रमाणे आगामी निवडणूकीबाबत राष्ट्रवादीची भूमिका राहिल, अशी भूमिका राष्ट्रवादी अजीत पवार गटाचे नेते व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे.तसेच निवडणूकीत युतीचा झेंडा कसा लागेल ,आणि त्यामध्येही राष्ट्रवादीचा झेंडा कसा फडकेलं ,यासाठी कार्यकर्त्यानी काम करावे ,असं आवाहनही मंत्री मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
साऊंड बाईट - हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण मंत्री.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 05, 2025 04:47:25Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - एमआयडीसी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाकेबाज कामगिरी; 02 गुन्हे उघडकीस आणुन त्यांचेकडुन एकुण 1लाख 91हजार 700 रू.किंमतीचा मुद्देमाल हस्तगत
अँकर-
एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहर हद्दीत ०२ घरफोडी करणाऱ्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.यामध्ये एकुण 2 गुन्हे उघडकीस आणुन त्यांचेकडुन एकुण 1लाख 91हजार 700रू.किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.एमआयडीसी पोलीस वाणे हद्दीत कोड्याल शाळेजवळ 02 इसम सोने विक्री करण्याकरीता येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून सदर 02 इसमांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी विनायक नगर, एमआयडीसी, सोलापूर व बोळकोटे नगर, एमआयडीसी, सोलापूर येथे झालेल्या रात्रीच्या घरफोड्या केल्याचे कबूल केल्याने एमआयडीसी पोलीस ठाणे त्यांच्याकडून मुद्देमालपैकी 37.36 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 198.80 ग्रॅम वजनाचे चांदिचे दागिने हस्तगत करून एकुण 1लाख 91हजार 700रू.किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे.
बाईट -
भरत चंदनशिवे ( सहाय्यक पोलीस निरीक्षक, एमआयडीसी पोलीस ठाणे )
4
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 05, 2025 04:47:10Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0508ZT_WSM_ILLEGAL_TREES_CUTDOWN
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशीम
अँकर : वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामरगाव परिसरात मागील काही महिन्या पासून अवैध वृक्षतोड सुरू असून, वन विभागाकडून दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.“झाडे लावा – झाडे जगवा” या उपक्रमालाच हरताळ फासल्याचे चित्र येथे दिसत आहे.कामरगाव येथील १३ एकर स्मशानभूमी परिसर आणि कामरगाव–भुलोडा–कारंजा मार्गालगत असलेली २० वर्ष जुनी बाभळीची झाडे अवैधरित्या तोडून लाकूड चारचाकी पिकअपमधून चोरीस नेले गेले. स्थानिकांनी प्रशासनाला माहिती दिल्यानंतर कारवाई झाली नसल्याचा आरोप वृक्षप्रेमी केला आहे तर सध्या महसूल सप्ताह सुरू असतानाच ही घटना घडल्याने ग्रामस्थांत संताप असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
बाईट: स्थानिक नागरिक कामरगाव
2
Report
MAMILIND ANDE
FollowAug 05, 2025 04:47:00Wardha, Maharashtra:
वर्धा
SLUG- 0508_WARDHA_TIGER
- वर्धा जिल्ह्यात पुन्हा एकदा वाघांचं थरारक दर्शन
- खरांगणा - बांगडापूर रस्त्यावर पाच वाघांचा मुक्तसंचार
- व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.
- ग्रामीण भागात भितीचं वातावरण
- वनविभागाकडे तातडीच्या उपाययोजनेची मागणी.
अँकर : वर्धा जिल्ह्यातील खरांगणा आणि बांगडापूर परिसरात नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. कारण, एका व्हिडीओमध्ये तब्बल पाच वाघ रस्त्यावर मुक्त संचार करताना दिसून आले आहेत.“ही धक्कादायक घटना स्थानिकांनी मोबाईलमध्ये कैद केली असून, सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे शेतकरी, विद्यार्थ्यांसह रस्त्याने ये जा करणार्यांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. पाचही वाघ रस्त्यावरून सरळपणे चालताना दिसतात, म्हणजेच या भागात वाघांची संख्या वाढल्याचं स्पष्ट झालं आहेत.
1
Report
AKAMAR KANE
FollowAug 05, 2025 04:46:51kolhapur, Maharashtra:
Ngp Ashish Jaiswal ब
live u ने फीड पाठवले
-------
नागपूर
आशिष जयस्वाल (राज्य मंत्री)
On उदय सामंत मागणी
*उदय सामंत यांची मागणी योग्य आहे.. भरत गोगावले हे मंत्री आहेत त्यासोबत वरिष्ठ आमदार आहेत.. आणि त्या जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार आहे.. त्यामुळे उदय सामंत यांनी केलेली मागणी योग्य आहे..आणि त्यांच्या मागणीला आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे..*
On पळवापळवी
मला या संदर्भात माहिती नाही.. महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला बहुमत दिला आहे.. त्यामुळे तीनही पक्षांनी एकमेकांना विश्वासात घेऊन आणि एकमेकांची मने न दुखावता महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी सर्वांनी मिळून काम करूया.. एकमेकांचे मने दुखावतील अशी कोणतीही कृती कोणत्याही पक्षाने करू नये असं माझं मत आहे..
On ओबीसी आरक्षण
आपल्याला कल्पना आहे..ओबीसी मंत्रालय कधी स्थापन झालं.. ओबीसी आरक्षण कोणी घालवलं आणि ओबीसी आरक्षण कोणी मिळवून दिल.. न्यायालयात योग्य बाजू कोणी मांडली ज्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळालं हे सर्वांना माहिती आहे..
On हसन मुश्रीफ..अजितदादा मुख्यमंत्री व्हावे
प्रत्येकांना वाटतं आपल्या नेता मुख्यमंत्री व्हावा अशी मागणी करणे यात काही गैर नाही..
On राज ठाकरे
अगोदर युती होऊ द्या नंतर पाहू.. ते वेगळे का झाले होते याचा अभ्यास अगोदर करायला पाहिजे..
4
Report
AKAMAR KANE
FollowAug 05, 2025 04:46:47kolhapur, Maharashtra:
Ngp Bhondekar byte
live u ने फीड पाठवले
--------
नागपूर
नरेंद्र भोंडेकर (आमदार )
On पडळकर आव्हाड वाद..
विधानभवनाच्या हक्क भंग समितीची उद्या बैठक आहे..
अधिवेशनात शेवटच्या दिवशी झालेली शिवीगाळ आणि मारहाण याबद्दल अध्यक्षांनी गंभीर दखल घेतली आहे..आणि हक्क भंग समितीकडे सुपूर्द केलाय...मागच्या आठवड्यात आमच्या समितीकडे टू प्रकरण आलं आहे..
यामध्ये दोन्ही आमदारांना त्यांचं काय म्हणणे यासाठी त्यांना त्यांना 15 दिवसात म्हणणे मांडण्यासाठी नोटीस पाठवली आहे..तर काही लोकावर गुन्हे नोंदविण्यात आलेत..288 आमदाराच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने उद्या मुंबई पोलिस आयुक्तानं देखील बोलावल आहे... काही लोकांवर क्रिमिनल केसेस आहेत.. अशी आम्हाला माहिती मिळत आहे.. *त्यामुळे यांची पार्श्वभूमी काय आहे हे तपासायची गरज आहे.. हे सर्व हेतू परस्पर किंवा मोठ घातपात करण्याच्या उद्देशाने तर नव्हता याचा तपास केला जाणार..*
हे दोघांमधील आपसातील वाद असल्यामुळे समिती त्यांना अगोदर संधी देते की त्यांचं म्हणणे काय... त्याचं म्हणणं काय याचं निष्कर्ष काढण्यासाठी त्यांना फॉर्मलिटी म्हणून नोटीस दिली आहे.. त्यानंतर त्यावर काय निर्णय घ्यायचे ते ठरवू..
दोन्ही आमदारांना पंधरा दिवसाची नोटीस दिल्याने ते उद्याच्या बैठकीत उपस्थित राहणार नाही..
1
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 05, 2025 04:31:02Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0508ZT_WSM_CROP_DAMAGE
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर: वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.जून महिन्यातील मुसळधार पावसात ९,०९६ आणि २२-२३ जुलैच्या अतिवृष्टीत आणखी १४,६२७ शेतकरी बाधित झाले.दोन्ही महिन्यांत २३,७२३ शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकट ओढावले असून, २५,२०१ हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, पंचनामे अद्याप पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
4
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowAug 05, 2025 04:19:35Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_KADU_ON_AMBANI एक फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
अंबाणीला एवढा शौक आहे तर डुक्कर पाळावे, आम्ही दोन हजार डुक्कर अंबानीला देतो; बच्चू कडू यांची खोचक टीका
अँकर :– कोल्हापूरच्या माधुरी हत्तीला अंबानीच्या नयनतारा अभयारण्यात नेण्यात आल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येत आहे कोल्हापुरात नागरिकांनी भव्य मोर्चा काढत माधुरी हत्तीनीला परत आणण्याची मागणी केली आहे यावर बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून कडू यांनी अंबानींना खोचक टोला लगावत अंबानींना डुक्कर पाडण्याचा सल्ला दिला आहे. डुक्कर शेतकऱ्याला आणि हत्ती अंबानीला जसा पैसा आहे तसा प्राणी आहे अंबानीला एवढा शौक आहे तर डुक्कर पाळावे आम्ही दोन हजार डुक्कर अंबानीला देतो त्यांनी आमची हत्तीनी परत द्यावी असे बच्चू कडू म्हणाले आहे.
बाईट :– बच्चू कडू, माजी राज्यमंत्री
8
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowAug 05, 2025 04:19:26Vasai-Virar, Maharashtra:
Date-5aug2025
Rep-prathamesh tawade
Loc-vasai
Slug-VASAI HIGHWAY
Feed send by 2c
Type-AV
मृत महिलेचा फोटो जोडला आहे.
Slug- मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडीने पुन्हा एका महिलेचा बळी घेतला आहे
रुग्णवाहिका चार तास कोंडीत अडकून
उपचाराअभावी महिलेचा मृत्यू
अँकर - मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका तब्बल चार तास अडकून पडल्याने उपचाराअभावी एका महिलेचा मृत्यू झाला आहे..
छाया पुरव असे या महिलेचे नाव असून त्या सफाळे येथील मधुकर नगरात राहणाऱ्या होत्या... पुरव यांच्या अंगावर शनिवारी झाड कोसळून झालेल्या अपघातात त्या गंभीर झाल्या होत्या... त्यांना तातडीच्या उपचारासाठी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात नेण्यात येत होते , परंतु मुंबई अहमदाबाद महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर दररोज होणाऱ्या ट्राफिक कोंडीत त्या अडकल्या.. तब्बल चार तास त्यांची रुग्णवाहिका कोंडीत अडकून पडल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली होती.. यांच्या कुटुंबीयांनी अखेर त्यांना मुंबईला नेण्याचा निर्णय मागे घेतला आणि मीरा भाईंदर परिसरातील एका खाजगी रुग्णालयात त्यांना नेले मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता..
गेल्या तीन वर्षांपासून मुंबई अहमदाबाद महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून या मार्गावर सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे तर अनेक अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे...
7
Report
TTTUSHAR TAPASE
FollowAug 05, 2025 04:19:19Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
3 FILES
SLUG NAME -SAT_NIMANTRAN
सातारा जिल्ह्यातील परळी येथील नवउद्योजिका सौ. अंजना शंकर कुंभार यांना १५ ऑगस्ट रोजी दिल्लीतील राष्ट्रपती भवन आणि लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. जिल्ह्यातील त्या एकमेव महिला उद्योजिका आहेत ज्यांना हा सन्मान लाभला आहे.उमेद अभियानांतर्गत लखपती दीदी योजनेचा लाभ घेऊन त्यांनी मातीच्या मूर्ती, भांडी आणि खेळण्यांचा व्यवसाय राज्यभर विस्तारला. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले.सातारा डाक विभागामार्फत त्यांच्या घरी जाऊन महिला पोस्ट कर्मचाऱ्यांच्या हस्ते निमंत्रण पत्रिका देण्यात आली. हा महिला सक्षमीकरणाचा आदर्श ठरला आहे.
7
Report
PNPratap Naik1
FollowAug 05, 2025 04:19:13Kolhapur, Maharashtra:
Story :- Kop Mahadevi Elephant
Feed :- Live U
Anc :- नांदणी मठातील महादेवी हत्ती परत यावी यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात जना आंदोलन सुरूच आहे. आज गडहिंग्लज मध्ये आत्मक्लेष महामोर्चा काढला जाणार आहे. एक दिवस माधुरी हत्तीसाठी अशा प्रकारचे ब्रीद घेऊन आंदोलक गडहिंग्लज मधील जैन मंदिर ते गडहिंग्लज प्रांत अधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार आहेत. या मोर्चासाठी गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्यातील आंदोलन मोठ्या संख्येने येतील असा दावा करण्यात आलाय.
8
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 05, 2025 04:19:08Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांचा गाडीवर आमदारकीचा लोगो
- राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षांचा 'कार'नामा, आमदार नसतानाही गाडीवर आमदार असल्याचे लोगो
- अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या गाडीवर आमदार असणारा लोगो लावल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण
- आमदार नसतानाही गाडीवर आमदाराचा लोगो, सोलापुरात ठरतोय चर्चेचा विषय
- उमेश पाटील यांच्या एम एच 04 एच डी 5565 या नंबरच्या गाडीवर आमदाराचा लोगो असल्याचे दिसून आलं
- महाराष्ट्रातील 288 विधानसभा सदस्य आणि 78 विधानपरिषद सदस्यांना शासकीय कामासाठी गाडीवर आमदाराचा लोगो लावण्याचा अधिकार
- मात्र जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांना स्वतःच्या गाडीवर आमदारकीचा लोगो लावून " मला आमदार झाल्यासारखं वाटतंय " असं तरी म्हणायचं नाही ना ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय
7
Report
TTTUSHAR TAPASE
FollowAug 05, 2025 04:18:59Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
5 FILES
SLUG NAME -SAT_SAHYADRI_TIGER
वाघांचे CCTV आहे
सातारा - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील SKT02 ही वाघीण वाघांचे वंशवृद्धी करणारी सह्याद्रीची जननी ठरली आहे. २०१४ ते २०१७ या काळात तिने तीनवेळा पिल्लांना जन्म दिला असून तिच्या लेकीही आता प्रजनन करत आहेत.सह्याद्री, तिलारी, राधानगरी, चांदोली, कोयना व कर्नाटकमधील काली व्याघ्र प्रकल्प यामधील ३२ वाघांपैकी १४ वाघ महाराष्ट्रात आहेत.SKT02 वाघीण सध्या सुमारे १५ वर्षांची असून आजही सह्याद्रीच्या जंगलात सक्रिय आहे. तिची मुलगी SKT04 हिनेही २०२४ मध्ये तीन पिल्लांना जन्म दिला.
बाईट्स:
गिरीश पंजाबी, वन्यजीव संशोधक, WCT
तुषार चव्हाण, IFS, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प
5
Report
SKSACHIN KASABE
FollowAug 05, 2025 04:16:59Pandharpur, Maharashtra:
05082025
Slug - PPR_PUTRADA_EKADASHI
file.01
-----
Anchor - आज श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी आहे. या निमित्ताने पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूर मध्ये भाविकांची गर्दी झाली आहे.
श्रावणात महादेवाच्या दर्शनासाठी भाविक शिव मंदिरात जातात. पण पंढरपूर हे शैव आणि वैष्णव दोन्हीचे संगम असणारे मोठे अध्यात्मिक क्षेत्र आहे. विठोबाचे मस्तकावर शिवलिंग असल्याने येथे शिवाचीही पूजा होते
आज एकादशी मुळे पंढरपूर मध्ये भाविकांची गर्दी झाली आहे. संत नामदेव पायरी, चंद्रभागा नदी ,प्रदक्षिणा मार्ग दर्शन रांग भाविकांच्या गर्दीने फुलून गेली आहे
5
Report
PNPratap Naik1
FollowAug 05, 2025 04:00:56Kolhapur, Maharashtra:
Anc :- नांदणी मठातील महादेवी हत्ती परत यावी यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात जना आंदोलन सुरूच आहे. आज गडहिंग्लज मध्ये आत्मक्लेष महामोर्चा काढला जाणार आहे. एक दिवस माधुरी हत्तीसाठी अशा प्रकारचे ब्रीद घेऊन आंदोलक गडहिंग्लज मधील जैन मंदिर ते गडहिंग्लज प्रांत अधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार आहेत. या मोर्चासाठी गडहिंग्लज आजरा चंदगड तालुक्यातील आंदोलन मोठ्या संख्येने येतील असा दावा करण्यात आलाय. दरम्यान सोशल मीडियावरती अंबानी उद्योग समूहा विरोधातील आंदोलन जोरदार सुरू आहे.. जिओ सिम विरोधातील हत्यार उपसल्या नंतर अंबानी उद्योगाच्या इतर व्यवसायांवर देखील बहिष्कार टाकावा असा आवाहन केलं जात आहे.
10
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 05, 2025 04:00:05Beed, Maharashtra:
बीड: वाल्मीक कराडच्या वकिलांची उच्च न्यायालयात धाव दोष मुक्तीचा अर्ज बीड न्यायालयान फेटाळला होता आता उच्च न्यायालयात अपील; सूत्रांची माहिती.
Anc- आरोपी वाल्मीक कराड ने संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोषी नसल्याचा अर्ज बीडच्या विशेष मकोका न्यायालयाकडे वकिलांच्या मार्फत केला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. वाल्मिक कराडने आता वकिलांच्या मार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दोष मुक्तीच्या अर्ज संदर्भात आणि दोषारोप पत्रासंदर्भात उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडने वकिलांच्या मार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आता उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
8
Report