Back
प्रयागराज में गणेश चतुर्थी की भव्य तैयारियां, संगम की मिट्टी से बनीं प्रतिमाएं!
MGMohd Gufran
Aug 22, 2025 03:31:48
Prayagraj, Uttar Pradesh
प्रयागराज में जोर शोर से चल रहीं गणेश चतुर्थी की तैयारियां,
संगम की पवित्र मिट्टी से तैयार की जा रहीं हैं भव्य गणेश प्रतिमाएं,
गणेश प्रतिमाएं तैयार करने में पर्यावरण का भी रखा गया ख़ास ख़्याल,
27 अगस्त को देशभर में आस्था और श्रद्धा के साथ मनाया जाएगा गणेश चतुर्थी का पर्व।
एंकर --
देशभर के साथ संगम नगरी प्रयागराज में भी गणेश चतुर्थी को लेकर तैयारियां तेज हो गईं हैं। 27 अगस्त को गणेश चतुर्थी का पर्व देशभर के साथ संगम नगरी में भी पूरी आस्था और श्रद्धा के साथ मनाया जाएगा। इसको लेकर पंडाल में विराजने वाली भगवान गणेश की प्रतिमा तैयार की जा रहीं हैं। मूर्तिकार दिन रात गणेश प्रतिमाएं तैयार करने में जुटे हैं, इस बार प्रयागराज में गणेश चतुर्थी पर पंडालों में विराजने वाली प्रतिमाएं आस्था और भक्ति की अनूठी अनुभूति कराएंगी। क्योंकि भगवान गणेश की प्रतिमाएं इस बार संगम की मिट्टी से तैयार की जा रहीं हैं। मकसद साफ़ है कि गणेश चतुर्थी के मौके पर जब पंडालों में गणेश प्रतिमाएं पहुंचे तो उनमें आस्था और भक्ती के लिए पूरी दुनियां में मशहूर संगम की मिट्टी की सुगंध भी रहे। ख़ास बात यह है कि भगवान गणेश की ये प्रतिमाएं इको फ्रेंडली भी हैं, क्योंकि इन्हें घास फूस से तैयार किया गया है। प्रतिमाओं पर जो रंग रोगन किए जा रहें हैं वह भी पर्यावरण के अनुकूल हैं।
बंगाल से गणेश प्रतिमाएं तैयार करने के लिए प्रयागराज पहुंचे मूर्तिकार तपन पॉल का कहना है कि इस बार पूरे विधि विधान के साथ पूजन करके संगम की मिट्टी से गणेश प्रतिमाएं तैयार की जा रहीं हैं। उन्होंने बताया कि गणेश चतुर्थी के पहले प्रतिमाओं की अधिक डिमांड है। छोटी साइज से लेकर 12 फिट तक की मूर्तियों की डिमांड है, हालांकि उनके सामने समय कम होने के चलते काफी चुनौती है। इस लिए वह अब नया ऑर्डर नहीं ले रहें हैं। दिन रात मेहनत करके मूर्तियों को अंतिम रूप दिया जा रहा है, ताकि समय पर मूर्तियों को पांडाल तक पहुंचाया जा सके।
वॉक थ्रू... गणेश प्रतिमाएं तैयार करते दिखाते हुए
बाइट -- तपन पॉल, मूर्तिकार
8
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowAug 22, 2025 05:16:49kolhapur, Maharashtra:
फोटो 2c ला पाठवले आहे
------
नागपुरात एका बारमध्ये सुरू असलेल्या अश्लिल नृत्य व तरुणींवर पैसे उधळण्याच्या प्रकाराचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. संबंधित अवैध डान्सबारमध्ये पोहोचलेल्या 20 हून अधिक ग्राहकांसह 25 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेथे तीन तरुणी तोकड्या कपड्यांमध्ये अश्लिल नृत्य करत होत्या. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने गुरुवारी मध्यरात्री ही कारवाई केली.जुनी कामठी मार्गावरील उड्डाणपुलाजवळ असलेल्या शिवशक्ती बारमध्ये हा ‘छमछम’चा प्रकार सुरू होता. पोलिसांनी खबऱ्यांकडून याची माहिती मिळाली. तेथे अश्लिल नृत्य सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी रात्री एक वाजताच्या सुमारास तेथे धाड टाकली.
0
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 22, 2025 05:15:38Beed, Maharashtra:
बीड:...तर, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या लक्ष्मण हाके यांची जीभ हासडणाऱ्यास लाखाचे बक्षीस देऊ; मनोज जारंगेंचे समर्थक गंगाधर काळकुटे यांची जीभ घसरली..!
Anc:ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके सतत दोन जातीत तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल देखील एकेरी भाषेत बेताल वक्तव करत आहेत. लक्ष्मण हाकेंनी जातीय तेढ निर्माण करू नये. अन्यथा त्यांची जीभ हासडली जाईल. जो कोणी लक्ष्मण हाके यांची जीभ हासडेल त्याला लाख रुपये बक्षिस देऊ अशी घोषणा मनोज जरांगे यांचे समर्थक मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी केली आहे.
यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असे वातावरण तापले आहे. दरम्यान माझी जीभ कशाला हासडता जीवच घ्या, असे आव्हान लक्ष्मण हाके यांनी केले. मी संविधानिक पद्धतीने वक्तव्य करतो. हे साऱ्या महाराष्ट्राला माहित आहे. माझे वक्तव्य लोकशाहीला धरून आहे. उलट मनोज जरांगे हेच अभद्र आणि शिवराळ भाषेत बोलतात असेही लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 तारखेला मुंबईत मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आहे. त्याच पार्श्वभूमीवर ओबीसी आणि मराठा आंदोलकांची शाब्दिक बाचाबाची समोर येत आहे.
बाईट: गंगाधर काळकुटे, मराठा समन्वयक
बाईट: लक्ष्मण हाके, ओबीसी आंदोलक
0
Report
MKManoj Kulkarni
FollowAug 22, 2025 04:46:20Mumbai, Maharashtra:
अँकर -- इलेक्ट्रिक वाहनांना आज पासून अटलसेतूवरून टोल माफीचा प्रवास सुरू झाला आहे. तुमच्याकडे इलेक्ट्रिक वाहन असेल आणि तुम्हाला अटलसतूवरून जायचं असेल तर आजपासून या वाहनांना टोल भरावा लागणार नाही राज्य सरकारने एप्रिल महिन्यातच राज्यात इलेक्ट्रिक वाहनधारकांना टोल मधून मुक्ती दिली होती त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे अटल सेतू वरून इलेक्ट्रिक वाहन टोलमुक्त झाले आहेत याचबरोबर पुढील दोन दिवसात मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून तसेच समृद्धी महामार्गावरून इलेक्ट्रिक वाहनांना टोल मधून सूट देण्यात आली आहे यामध्ये जड इलेक्ट्रिक वाहने असतील त्यांना मात्र सूट देण्यात आलेली नाही.अटल सेतू हा शिवडी ते नवी मुंबईतील पनवेल नव्हा शेवा असा आहे.यावर येण्याजण्याचा ३७५ रुपये टोल भरावा लागतो. अटल सेतू वरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मनोज कुळकर्णी यांनी
Wkt n shots
मनोज कुळकर्णी
Feed send TVU ४३
Slug -- Atal setu Wkt n shots
1
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 22, 2025 04:46:16Yavatmal, Maharashtra:
वाडवडिलांनी सांगितल्याप्रमाणे 'आला पोळा कपाशी, सोयाबीन पिके सांभाळा' असा सल्ला आता कृषी विभागाकडूनही दिल्या जात आहे. श्रावणी अमावस्या म्हणजेच पोळा सणाला येणारी पिठोरी अमावस्या ही पिकांवर फवारणी करून किडींचा नायनाट करण्यासाठी उत्तम आहे. सध्या सोयाबीन, कापूस व इतर पिकांवर रोगराई, गुलाबी बोंड अळी, पांढरी माशीचा प्रादुर्भाव वाढला आहे.
त्याच्या नियंत्रणासाठी पोळ्याची अमावस्या महत्वाची आहे.
•आला पोळा कपाशी सोयाबीन सांभाळा ही म्हण कशासाठी?
•अमावस्येच्या काळात पिकांवर नेमक्या अशा काय गोष्टी घडतात?
#अमावस्या काळातच कापसाला पातेधारणा होते, फुलधारणा किंवा कपाशी लागायला सुद्धा सुरुवात झालेली असते.
#पोळा अमावस्येच्या रात्रीच्या दोन दिवस अगोदर व दोन दिवस नंतर कपाशीवर गुलाबी बोंडअळीचे पतंग मोठ्या प्रमाणावर अंडी घालतात.
#कीटकांचे मिलन होऊन सर्व पिकांवर अंडी घातल्या जातात.
#त्याचा परिणाम 5-6 दिवसांनी सर्व पिकावर दिसून येतो.
# कपाशीवर फुलाची डोमकळी दिसू लागते. तर सर्व कीटकांचा मोठा प्रादुर्भाव सुरू होतो.
त्यामुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पोळ्याच्या अमावस्येची फवारणी करणे अतिशय जरुरीचे आहे. त्यामागे अनेक वर्षांची परंपरा आहेच; पण कृषी विद्यापीठांनी सांगितलेले शास्त्रही आहे.
शिवाय फ़ेरोमन ट्रॅप व पिवळे चिकट गंध सापळे देखील पिकात लावावे अशा सूचना कृषी विभागाने दिल्या आहे.
3
Report
KPKAILAS PURI
FollowAug 22, 2025 04:45:19Pimpri-Chinchwad, Maharashtra:
pimpri kidnapping
kailas puri Pune 22-8-25
feed by 2c
for web
अनैतिक संबंधांना कंटाळून पत्नीने केले पतीच्या प्रेयसीचे अपहरण...!
कैलास पुरी, झी मिडिया पिंपरी चिंचवड
आय टी नगरी हिंजवडी मध्ये बुधवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमाराला अनैतिक संबंधाला कंटाळून पत्नीने पतीच्या प्रेयसीचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अपहरण करण्यात आलेली २६ वर्षीय तरुणी हिंजवडी मध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात सेल्स मार्केटिंगचे काम करते. तिचे गेल्या काही महिन्यांपासून एका विवाहित पुरुषाशी प्रेम संबंध होते... ही बाब पत्नीला खटकत होती... अखेर नवऱ्याचे अनैतिक संबंध थांबवण्यासाठी संतप्त पत्नीने आपल्या भावाला आणि आईला घेऊन थेट नवऱ्याच्या प्रेयसीचे अपहरण केले. बुधवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास ब्रम्हा क्रॉप फेज-2, विप्रो सर्कल इथ एका बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात काम करणाऱ्या महिलेच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीकडून फोन आला. “तुमचे पार्सल द्यायचे आहे” असे सांगत महिलेला ऑफिसबाहेर बोलावून घेतले. त्या ठिकाणी निळ्या रंगाच्या कारमधून आरोपी पत्नी, तिचा भाऊ आणि आई उतरले. त्यांनी महिलेला जबरदस्तीने कारमध्ये बसवून तिला ताथवडे आणि वाकड परिसरात फिरवत बेदम मारहाण केली.".माझ्या नवऱ्याचा नाद सोडून दे, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील”, अशी धमकी ही पत्नीने तरुणीला दिली...! अखेर अडीच तासांच्या थरारा नंतर पोलिसांनी तरुणीची सुटका केली. नवऱ्याच्या अनैतिक संबंधांना कंटाळून आपण हे कृत्य केल्याची कबुली आरोपी पत्नीने पोलिसांसमोर दिली. पोलिसांनी पीडित महिलेची सुटका केली आहे. या प्रकरणात पत्नी, तिचा भाऊ व आईविरोधात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
2
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 22, 2025 04:33:11Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2208ZT_CHP_MAHAKALI
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूरच्या देवी महाकाली देवीचे दर्शनद्वार झाले अधिक सुंदर, नवी चांदीची महिरप लावल्यानंतर गाभारा झाला प्रसन्न, भाविकांनी व्यक्त केले आत्मिक समाधान
अँकर:-- चंद्रपूरच्या पुरातन देवी महाकाली मंदिरातील मुखदर्शन आता अधिक सुंदर झाले आहे. दर्शनी भागात लखलखत्या चांदीची महिरप बसवण्यात आली असून त्यामध्ये देवीचे छायाचित्र लावण्यात आले आहे. चंद्रपूरच्या देवी महाकाली मंदिर हे पुरातत्त्व खात्याच्या अंतर्गत येत असल्याने या ठिकाणी वेगळ्या पायाभूत विकासासाठी मर्यादा आहेत. मात्र आतील गाभारा हा अधिक प्रसन्न व देखणा करण्याच्या दृष्टीने महाकाली विश्वस्तांनी वेगळी कल्पना लढविली. विश्वस्त अनिल महाकाले यांनी मांडलेली कल्पना भक्तांनी उचलून धरली. नाशिकच्या मीनल आर्ट या चांदीच्या महिरप घडविणाऱ्या संस्थेकडून अत्यंत कलात्मक अशी महिरप तयार करण्यात आली. ही महिरप दर्शनासाठी खुली असून मोठ्या संख्येत भाविक मंदिरात या नव्या मुखदर्शनचा लाभ घेत आहेत. गेली काही वर्षे दर्शनासाठीची उत्तम सुविधा मंदिरात उभारण्यात आल्याने भक्तांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यातच आता चांदीच्या महिरपीसह देवीचे दर्शन घडत असल्याने आनंद व्यक्त होत आहे.
बाईट १) अनिल महाकाले, विश्वस्त, महाकाली मंदीर
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
3
Report
SKSACHIN KASABE
FollowAug 22, 2025 04:31:34Pandharpur, Maharashtra:
Slug - PPR_NEVARE_BRIGDE_
file 03
-----
Anchor - पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यातील नेवरे आणि नांदुरे गावाला जोडणारा भीमा नदीवरील पूल पाण्याखाली.
उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेले पाणी आणि वीर धरणातून नीरा नदीत सोडलेल्या पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे माळशिरस तालुक्यातील नेवरे आणि पंढरपूर तालुक्यातील नांदुरे या दोन गावाला जोडणारा भीमा नदीवर असलेला पूल आज पाण्याखाली बुडाला आहे. यामुळे लोकांची दळणवळण बंद झाले आहे. प्रशासनाकडून लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रात न उतरण्यासाठी लोकांना आवाहन केले जात आहे
3
Report
PNPratap Naik1
FollowAug 22, 2025 04:31:27Kolhapur, Maharashtra:
Kop Ratnagiri Road WT
Feed :- Live U & 2C
Anc :- कोल्हापूर जिल्ह्याला काहीसा दिलासा मिळालाय. पंचगंगा नदीची पाणी पातळी 42 फूट 10 इंचावर आली आहे. पंचगंगा नदीची धोका पातळी 43 फूट इतकी आहे. पंचगंगेची पाणीपातळी काहीशी उतरल्याने दिलासा मिळाला असला तरी जिल्ह्यात अद्याप पूरस्थिती कायम आहे. अनेक महत्त्वाच्या मार्गावरील पाणी काहीसं कमी झाल असला तरी, या मार्गावरची वाहतूक बंद आहे. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.
Play WT
4
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 22, 2025 04:30:31Washim, Maharashtra:
वाशिम:
File:2208ZT_WSM_SOYBEAN_CROP_DAMAGE
रिपोर्टर: गणेश मोहळे, वाशिम
अँकर: वाशिम जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 4 लाख 11 हजार एकर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं असून यामध्ये सर्वाधिक 2 लाख 80 हजार एक्कर वरील सोयाबीन पिकाचं नुकसान झालंय. त्यामुळे यंदा सोयाबीनच्या उत्पादनात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.आधीच सोयाबीनला योग्य दर नसल्याने शेतकरी अडचणीत होते आता उत्पादनातही घट होणार असल्याने दुहेरी संकट शेतकऱ्यांवर ओढावणार आहे.
0
Report
KPKAILAS PURI
FollowAug 22, 2025 04:18:04Pimpri-Chinchwad, Maharashtra:
pimpri parol
kailas puri Pune 22-8-25
feed by 2c
Anchor - ..... पॅरोलवर कारागृहातून बाहेर येत तीन वर्ष फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात पिंपरी चिंचवड पोलिसा आयुक्तालयाच्या वाकड पोलिसांना यश आलंय...! नितीन समुद्रे असं अटक करण्यात आलेल्या 38 वर्षीय आरोपीचे नाव आहे. समुद्र याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगर इथं कारागृहात असताना पॅरोलवर बाहेर आल्या नंतर तो तीन वर्षापासून फरार होता. बातमीदार मार्फत तो वाकड ब्रिज जवळ आल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार सापळा रचत पोलिसांनी त्याला अटक केली.
6
Report
HPHARSHAD PATIL
FollowAug 22, 2025 04:17:51Palghar, Maharashtra:
पालघर _
बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील मेडली फार्मासिटिकल या कंपनीमध्ये विषारी वायूची गॅस गळती होऊन चार जणांचा मृत्यू झाला तर इतर दोन कामगारांना बाधा झाली होती. दोघांवर बोईसर मधील शिंदे हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असून दोघांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती देण्यात आले आहे. तर मृत्यू झालेल्या चार कामगारांचे मृतदेह सर्व विच्छेदनासाठी तारापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहेत. सध्या हा कारखाना सील करण्यात आला असून पालघर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
3
Report
DPdnyaneshwar patange
FollowAug 22, 2025 04:17:44Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_FIGHTING
कॉलेजच्या तरुणांमध्ये कोयता, कत्तीने हाणामारी ची घटना
हाणामारीत दोघेजण गंभीर जखमी
कॉलेजमध्ये बारावीत शिकणाऱ्या तरुणाचा झाला होता वाद वादात बाहेरच्या तरुणांनी केला हस्तक्षेप
हस्तक्षेप केल्याने दोन गटात जोरदार हाणामारी
परंडा शहरातील रा गे शिंदे महाविद्यालयाच्या परिसरात घटना घडल्याची माहिती
मारहाणीत चैतन्य शेळके हा तरुण गंभीर जखमी
वाळू तस्करी बंदूक लावून फिरणे अशा स्वरूपाचे या तरुणावर गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती
धाराशिव सोलापूर बीड जिल्ह्यातून हा तरुण तडीपार असल्याची देखील प्राथमिक माहिती
घटनेची चौकशी करण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल भांडण का झालं याचा घेत आहेत तपास
5
Report
KPKAILAS PURI
FollowAug 22, 2025 04:17:16Pimpri-Chinchwad, Maharashtra:
pimpri bike
kailas puri Pune 22-8-25
feed by 2c
Anchor - पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत काळेवाडी पोलिसांनी वाहनचोरी करणाऱ्या टोळीवर कारवाई करून तब्बल ८.४० लाख रुपये किंमतीच्या २० दुचाकी हस्तगत केल्या आहेत. यामध्ये विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले १० गुन्हे उघडकीस आले आहेत. काळेवाडी मधल्या पाचपीर चौकात सापळा लावून पोलिसांनी शुभम चंद्रकांत शिंदेला अटक केली. चौकशी नंतर पोलिसांनी त्याचा साथीदार सोमनाथ शांताराम कासरुंग यालाही अटक करण्यात आली.
3
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 22, 2025 04:16:47Washim, Maharashtra:
वाशिम:
File:2208ZT_WSM_FROMHOBBY_TO_INDUSTRY
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर: वाशीम जिल्ह्यातील हिवरा बुद्रुक येथील सुषमा संतोष कांबळे यांनी साध्या छंदातून उद्योग उभारून बेरोजगारीवर मात केली आहे.लहानपणापासून कला आणि क्रिएटिव्ह कामाची आवड असलेल्या सुषमाला उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तर्फे मार्गदर्शन व अर्थसाहाय्य मिळाले.सुरुवातीला दहा हजारांचे कर्ज घेऊन त्यांनी मातीच्या मूर्ती, पणत्या, शोभेच्या वस्तू व पेंटिंग तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला.त्यांच्या मूर्तींना गणेशोत्सवात मोठी मागणी मिळाली व वार्षिक उत्पन्न २५–३५ हजारांपर्यंत पोहोचले.त्यानंतर त्यांनी शिलाई व ब्युटी पार्लर व्यवसाय सुरू केला. शिलाईतून वार्षिक ४५–५० हजार, तर प्रेरीका म्हणून ८० हजार रुपयांपर्यंत मानधन मिळवू लागल्या.सुषमाच्या या प्रयत्नामुळे केवळ त्या आत्मनिर्भर झाल्या नाहीत, तर गावातील इतर महिलांनाही हंगामी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.त्यांची यशोगाथा ग्रामीण महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
बाईट:सुषमा संतोष कांबळे
बाईट: प्रतिभा भगत
5
Report
TTTUSHAR TAPASE
FollowAug 22, 2025 04:15:39Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -SAT_DESAI_DADA
सातारा:-सातारा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर पूरग्रस्त भागाची पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून पाहणी करण्यात आली.ही पाहणी करतेवेळी देसाई यांनी कराड तालुक्यातील तांबवे येथील पुलाची दुरावस्था पाहून अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे. तांबवे पुलाचे भूमिपूजन एकदा अजितदादांनी आणि एकदा पृथ्वीराज चव्हाण बाबांनी केले होते.तर अजित पवारांमुळे पुलांची उंची कमी झाल्याचे लोकांनी सांगताच, अजित दादांना पाणी दाखवायला पाहिजे, अशी खोचक टिप्पणी देसाई यांनी केली.
6
Report