Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422303

नाशिकमध्ये पूर: प्रशासनाने नागरिकांना दिला सतर्कतेचा इशारा!

SKSudarshan Khillare
Aug 22, 2025 00:45:10
Niphad, Maharashtra
अँकर :- नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि नाशिक तालुक्यात होत असलेले पावसाचे पूर पाणी गंगापूर धरणातून 7372 क्यूसेक तर दारणा धरणातून 18 हजार 348 क्यूसेक पाण्याचा विसर्ग तर इतर असा एकूण 28 हजार क्यूसेक पाणी गोदावरी नदीतून वाहत असल्याने नाशिकच्या निफाड तालुक्यातील सायखेडा येथे काही घरांना तर स्मशानभूमीला पूर पाण्याने विळखा घातल्याने प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला
11
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRAFULLA PAWAR
Aug 22, 2025 02:31:26
Raigad, Maharashtra:
स्लग - गणेशोत्सवाचं काउंट डाउन सुरु ..... गणेशमूर्तींवर फिरतोय अखेरचा हात ...... रायगडमधील कार्यशाळा गजबजल्या ........ कलाकुसरीच्या कामात महिलांचा हातभार ...... अँकर - गणेशोत्सवाचं काउंट डाउन सुरु झालंय. आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सारेच सज्ज आहेत. कोकणात गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा होत असतो. त्यासाठी गणेश मूर्ती बनवण्याच्या कामाला वेग आलाय. पीओपी वरील बंदीला स्थगिती मिळाल्यानंतर मूर्तिकार खुश आहेत. मूर्तिकार रात्रंदिवस जागून बाप्पाच्या मूर्ती साकारताहेत. त्यामुळे गणेश कार्यशाळा गजबजल्या आहेत. रंगकाम पूर्ण झाल्यानंतर मूर्तीवर वस्त्रालंकार , साजशृंगार चढवणे अशा कलाकुसरीच्या कामात महिला सुद्धा मग्न आहेत. त्यातून त्यांनाही रोजगार उपलब्ध झालाय. बाईट - मूर्तिकार बाईट - महिला कारागीर वॉक थ्रू - गणेश मूर्ती कार्यशाळेतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Aug 22, 2025 02:31:11
Akola, Maharashtra:
Anchor : अकोल्यात संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत शेतकरी कर्जमाफी, ऊस, कांदा, कापूस व दूध दरवाढ, मराठा-धनगर व इतर समाजांना आरक्षण, निवडणुका बॅलेट पेपरवर घेणे अशा विविध मागण्या केल्या.तसेच अलीकडील अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणीही करण्यात आली.या सर्व ज्वलंत विषयांवर तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Aug 22, 2025 02:31:01
Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज... AC ::- वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या 'नीट' परीक्षेच्या निकालानंतर राज्याची 'एमबीबीएस'साठीची पहिली निवड यादी जाहीर झाली आहे. या यादीत आठ हजार शंभर जणांचा समावेश असून राज्यात सर्वाधिक एक हजार २०३ विद्यार्थी हे लातूरचे आहेत. 'नीट' परीक्षेची कठिण पातळी वाढलेली असतानाही लातूरचा डंका पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी सिद्ध केला आहे. नीट'ची कठिण पातळी यावर्षी वाढल्याने लातूरमधील किती विद्यार्थ्यांना 'एमबीबीएस'ला प्रवेश मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते. सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर आठ हजार १०३ जणांचा समावेश असलेली राज्य गुणवत्ता निवड यादी उपलब्ध केली आहे. यात राज्यात सर्वाधिक एक हजार २०३ विद्यार्थी लातूर परीक्षा केंद्रावरील आहेत.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Aug 22, 2025 02:16:58
Nashik, Maharashtra:
nsk_shalarthid anchor राज्यात गाजत असलेल्या शाळांतील शालार्थ आयडी प्रक्रियेसंदर्भात जिल्ह्यातील विनाअनुदानित व अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या शाळार्थ आयडीची तपासणी सुरू झाली आहे. नाशिक विभागातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांनी संस्थांनी शाळांच्या कर्मचाऱ्यांचे कागदपत्रे ऑनलाइन सादर करण्याचे आदेश दिलेयेत. अन्यथा ऑगस्टचे वेतन रोखण्यात येणार असल्याचे स्पष्ट केल्याने खळबळ उडालीय . ९ नोव्हेंबर २०१२ ते १८ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत नियुक्त कर्मचाऱ्यांचे आयडी प्रलंबित असल्याने त्यांनी मूळ आदेश व कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे नाशिक विभागातील घोटाळे आता समोर येणार आहेत. झी २४ तास न हा सर्व घोटाळा समोर आणला होता
6
comment0
Report
PNPratap Naik1
Aug 22, 2025 02:16:53
Kolhapur, Maharashtra:
Kop Uni Exam postpone Feed:- Kop Shivaji University Anc :- कोल्हापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे शिवाजी विद्यापीठाच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सध्या शिवाजी विद्यापीठात बी टेक अभ्यासक्रमाची पुनर्परीक्षा सुरू आहे. पण गेल्या आठ दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही गावांचे रस्ते देखील बंद झाल्यामुळे शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने बीटेक अभ्यासक्रमाच्या दोन विषयांचे पेपर पुढे ढकलले आहेत. यानुसार 21 ऑगस्ट चा पेपर 4 सप्टेंबर तर 22 ऑगस्टचा पेपर 8 सप्टेंबरला घेतला जाणार आहे.
3
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Aug 22, 2025 02:16:49
Latur, Maharashtra:
लातूर ... स्किप्ट ::- निळकंठेश्वर यात्रेचा सांगता... यात्रेत सहा लाख भाविकांचा सहभाग...गर्दीतही शिस्तबद्ध यात्रा पडली पार... किल्लारीत भक्तिरसाचा सोहळा... AC ::- लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथील ग्रामदैवत निळकंठेश्वर यात्रेच्या पालखी सोहळा आज संपन्न झाला. दहा दिवस चाललेल्या या यात्रेत भाविकांचा महासागर उसळला होता. यंदा सहा लाखांहून अधिक भाविकांनी ग्रामदैवत निळकंठेश्वराचे दर्शन घेतले. एवढ्या मोठ्या गर्दीतही कोणताही अनुचित प्रकार न घडता यात्रा सुरळीत पार पडली, हे वैशिष्ट्य ठरलं. जुने गाव मंदिरातून निघालेली पालखी टाळ-मृदंग, दिंड्या, ढोल-ताशांच्या गजरात नवीन किल्लारी येथील मंदिरात पोहोचली. मार्ग फुलांनी सजवण्यात आला होता, जागोजागी रांगोळ्यांनी पालखीचा मार्ग खुलून दिसत होता. भाविकांच्या जयघोषाने आणि वाजत गाजत हि संपूर्ण वातावरण दुमदुमलं होतं.
4
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Aug 22, 2025 02:01:48
Raigad, Maharashtra:
स्‍लग – माणगाव इंदापूरच्‍या वाहतूक कोंडीतून सुटका होणार ....... पर्यायी उपाययोजना करून दिला देण्‍याचा प्रयत्‍न ....... चार नवीन डायव्‍हर्जनसाठी राज्‍य सरकारच्‍या हालचाली ........ 22 कोटी रूपये खर्चाचे अंदाजपत्रक ........ इंदापूर , माणगाव बायपास दृष्‍टीपथात नाही ........ अँकर – मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर येथील वाहूतक कोंडी कोकणवासियांसाठी डोकेदुखी ठरली आहे. यातून कोकणवासीयांची लवकरच सुटका होणार आहे. पर्यायी उपाययोजना करून प्रवाशांना दिलासा देण्‍याच्‍या हालचाली राज्‍य सरकारकडून सुरू झाल्‍या आहेत. माणगाव शहरात चार नवीन डायव्‍हर्जन विकसीत केले जाणार आहेत. त्‍यासाठी 22 कोटी रूपये खर्चाचे अंदाजपत्रक देखील तयार करण्‍यात आले असून त्‍याची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर बायपासची कामं पुढील दोन वर्ष तरी पुर्ण होण्‍याची शक्‍यता नाही. अशावेळी कोकणी जनतेची वाहतूक कोंडीतून सुटका करण्‍याचा प्रयत्‍न शासनाकडून होतो आहे. बाईट – आदिती तटकरे, महिला बालविकास मंत्री
1
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Aug 22, 2025 02:01:41
Yavatmal, Maharashtra:
यवतमाळ जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा ‘विद्यार्थी संवाद दौरा' सुरु आहे. जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या या दौऱ्यात शाळा, महाविद्यालये तसेच वसतिगृहांना भेट देऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, मूलभूत सोयीसुविधा आणि इतर अडचणी जाणून घेण्यात येत आहे. यात क्रीडांगणांचा अभाव, एसटी बसची असुविधा, वाचनालये व अभ्यासिका नसल्याच्या समस्या पुढे आल्या. या समस्या शासन प्रशासनासमोर मांडून त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
4
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Aug 22, 2025 02:01:30
Palghar, Maharashtra:
पालघर _ पालघर जिल्ह्यातील पडघे येथील शालिग्राम सोसायटी परिसरात एका सहा वर्षीय मुलाचा उघड्या पाण्याच्या टाकीत पडून बुडून मृत्यू झाला आहे. अंकित संजीप राम असे या मृत बालकाचे नाव असून तो सहा वर्षाचा होता. खेळण्यासाठी तो घराबाहेर गेला होता मात्र दुपारपर्यंत घरी परत न आल्याने त्याची शोधाशोध घेतली.मात्र तो मिळून न आल्याने पालकाने पालघर पोलीस ठाण्यात हरवल्या बाबत तक्रार दिली.त्यानंतर सोसायटी परिसरातील सोसायटी परिसरातील एका उघड्या पाण्याच्या टाकीत त्याचा मृतदेह पोलिसांनाआढळून आला. अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह टाकीतून बाहेर काढण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
2
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Aug 22, 2025 02:01:23
Akola, Maharashtra:
Anchor : अकोला महानगरपालिका जवळ एक मोठा अपघात टळला,रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या एका दुचाकीला अचानक आग लागली. काही क्षणांतच गाडीतून धूर आणि आग निघू लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली.नागरिकांनी धाडस आणि तत्परता दाखवत पाणी व इतर साधनांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला त्यांच्या या धाडसामुळे आणि आग मोठ्या प्रमाणात पसरण्यापूर्वीच आटोक्यात आणली गेली.अग्निशमन दलाने अखेर ही आग आटोक्यात आणली.. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि आग पूर्णपणे विझवून परिस्थिती नियंत्रणात आणली. प्राथमिक माहितीनुसार या आगीस शॉर्ट सर्किट कारणीभूत असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.अग्निशमन विभागाकडून यासंदर्भात सविस्तर तपास सुरू आहे.
1
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Aug 22, 2025 01:45:12
Yavatmal, Maharashtra:
यवतमाळ च्या राळेगाव तालुक्यातील वनोजा येथील स्मशानभूमीला रस्ता नसल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नेतांना कुटुंबिय व ग्रामस्थांचे हाल होत आहे. पावसाळ्याच्या दिवसात नाला ओलांडून, चिखल तुडवत स्मशानभूमी कडे जावे लागते आहे. गेल्या तीन वर्षांआधी नवीन स्मशानभूमीचे काम पूर्ण झाले, मात्र अजून पर्यंत स्मशानभूमीला रस्ता नाही, हाच रस्ता शेतकऱ्यांचा पांदन रस्ता आहे, त्यांना सुद्धा चिखल तुडवीत ये जा करावी लागते. ही गैरसोय दूर करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
10
comment0
Report
SKSudarshan Khillare
Aug 22, 2025 00:45:30
Yeola, Maharashtra:
अँकर :- गेल्या दोन -तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्रंबकेश्वर नाशिक दिंडोरी या तालुक्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली होती आज नाशिक जिल्ह्यात पावसाचा काहीसा जोर जरी ओसरला असेल पण गोदावरी खोऱ्यातील दारणा, गंगापूर आणि कडवा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने हे पूर पाणी निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणाचा पाणलोट क्षेत्रात दाखल होत असल्यामुळे निफाड तालुक्यातील चांदोरी, सायखेडा, करंजगाव, शिंगवे या गावांना पूर पाण्याचा फटका बसू नये म्हणून नांदूर मधमेश्वर धरणातून आठ वक्रकार गेटच्या माध्यमातून 45 हजार 765 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येते आहे गोदावरी नदीकाठ च्या गावातील नागरिकांनी नदीकाठी जाऊ नये असा प्रशासनाच्या वतीने इशारा देण्यात आला आहे
11
comment0
Report
SKSudarshan Khillare
Aug 22, 2025 00:45:22
Niphad, Maharashtra:
स्लॅग :- नाशिक जिल्ह्यातील झालेल्या पावसाचे पूर पाणी गंगापूर आणि दारणा धरणातून सोडण्यात आल्याने निफाड तालुक्यातील चांदोरी येथे पूर परिस्थिती निर्माण झाली असून गोदावरी नदी पात्राच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होत पाणी हे पात्र बाहेर आल्याने खंडेराव महाराज मंदिर छतापर्यंत पाण्यात बुडाले तर नदीपात्रात असलेले हेमाडपंथी मंदिराचे कळस दिसेनासे झाले आहे या पुराच्या पाण्यात चांदोरी ग्रामपंचायतचा पाण्याने भरलेला टँकर वाहून गेल्याची घटना घडली आहे तर शेती पिकांचे नुकसान झाले आहे
11
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Aug 21, 2025 18:15:16
Palghar, Maharashtra:
अँकर _ पालघर जिल्ह्यातील बोईसर औद्योगिक सुरक्षित अभावी पुन्हा एकदा चार कामगारांचा बळी गेलाय. कंपनी व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे हे मृत्यू झाल्याचे आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केले आहेत. vo -1. बोईसर तारापूर एमआयडीसीतील प्लॉट नंबर एफ 13 वर असलेल्या मेडली फार्मासिटिकल या कंपनीत दुपारी तीन वाजताच्या सुमारास वायू गळती झाल्याची घटना समोर आली आहे . नायट्रोजन रिएक्शन टॅंक मध्ये वायु गळती झाली असून यात आतापर्यंत चार कामगारांचा मृत्यू झाला झाला तर चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत . या जखमी कामगारांवर सध्या बोईसर मधील शिंदे या खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले आहेत . एल बेंडोझोल नामक औषधाच उत्पादन घेणाऱ्या या कारखान्यात तीन वाजताच्या सुमारास वायू गळती झाली असून या वायुगळतीची बाधा आठ कामगारांना झाल्याचं सांगितलं जातय . मात्र यानंतर चार कामगारांचा रुग्णालयात नेण्याआधीच मृत्यू झाला असून चार कामगारांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. कल्पेश राऊत , बंगाली ठाकूर , धीरज प्रजापती आणि कमलेश यादव अशी मृतांची नावे असून रोहन शिंदे , निलेश हाडळ या दोन गंभीर जखमी कामगारांवर अति दक्षता विभागात उपचार सुरू आहेत . दरम्यान बोईसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सध्या बोईसर पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास केला जातोय . बाईट _ यतीश देशमुख _पोलिस अधीक्षक. vo _2 बोईसर तारापूर एमआयडीसी वायू गळती , कारखान्यांमध्ये घडणाऱ्या दुर्घटना असे प्रकार वारंवार सुरूच आहेत . दुर्दैवाने बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्यांकडून वेळेत फायर ऑडिट , स्ट्रक्चरल ऑडिट , तसंच कामगारांची योग्य काळजी घेतली जात नसल्याने अशा दुर्घटनांमध्ये कामगारांना आपला जीव गमवावा लागतोय . बाईट _ मृताचे नातेवाईक. vo _3 या मात्र संबंधित प्रशासन अशा गंभीर दुर्घटनांकडे दुर्लक्ष करत असल्याने या एमआयडीसीत दुर्घटनांची मालिका काही कमी होताना दिसत नाहीये . त्यामुळे या एमआयडीसीत काम करणाऱ्या कामगारांसह परिसरात राहणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन राहावं लागत असल्याचे चित्र आहे . हर्षद पाटील झी 24 तास पालघर.
14
comment0
Report
Advertisement
Back to top