Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

शेतकऱ्यांचा पीक विमा संकट: 1 रुपयात योजना बंद!

VKVISHAL KAROLE
Jul 15, 2025 02:01:21
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn crop insurance av Byte by live u _csn krushi adhikari byte थोडे शॉट्स आणि शेतकरी बाईट्स 2 सी केले आहेत गेल्यावर्षी पर्यंत 1 रुपयात पीक विमा योजना सरकारकडून राबवल्या जात होते मात्र यात मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या त्यामुळं सरकारने 1 रुपयात पीक विमा योजना बंद केली , मात्र याचा फायदा होण्या ऐवजी मोठ्या प्रमाणात बळीराजाला फटका बसण्याची चिन्ह आता दिसतायत.. गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत राज्यात अवघ्या 10 ते 15 टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा काढलाय तर दुष्काळ ग्रस्त मराठवाड्यात ही अवघा 9 टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे त्यामुळं घोळ थांबवण्यासाठी बंद केलेली योजना खऱ्या बळिराजा साठी मारक ठरतेय की काय असे चित्र आहे... 2024 मध्ये मराठवाड्यात 31 जुलै पर्यंत 77 लाख 54 हजार 38 शेतकरी विमा संरक्षणात होते तर या वर्षी  15 जुलै पर्यंत अवघे  7 लाख 62 हजार 813 शेतकरी विमा संरक्षणात आहे...  राज्याचा विचार करता 2024 मध्ये  1 कोटी 68 लाख 42 हजार 542 शेतकरी विमा संरक्षणात होते यावर्षी 15 जुलै पर्यंत अवघे 11 लाख 73 हजार 938 शेतकरी विमा संरक्षणात आहे म्हणजे 6.97 टक्के ही आकडेवारी आहे.. याची मुख्य 2 कारणे आहेत एक म्हणजे यावेळी 1 रुपयात पीक विमा बंद केला त्याऐवजी पीक प्रमाणे शेतकऱ्यांना प्रीमियम भरायचे आहे ते जास्त असल्याची शेतकरी वर्गात ओरड आहे तर दुसरीकडे  गेल्या पीक विम्यात 5 प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती समावेश होता त्या आता सरसकट काढून टाकण्यात आला आहेत म्हणजे जास्त पैसे देऊनही फक्त अंतिम पीक सरासरीच्या कमी आले तरच पीक विमा नुकसान भरपाई मिळणार असे चित्र आहे.. त्यामुळं शेतकरी हवालदिल झालाय... पिकविम्यातील या 5 प्रमुख बाबी आता वगळण्यात आल्या आहेत... 1... प्रतिकुल हवामान घटकांमुळे पेरणी लावणी/उगवण न होणे हंगामातील अपूरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे केवळ अधिसूचित मुख्य पिकांची अधिसुचित क्षेत्रात व्यापक प्रमाणावर पेरणी / लावणी होऊ न शकलेल्या क्षेत्रासाठी पेरणी / लावणी न झालेले क्षेत्र हे सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ७५ टक्के पेक्षा जास्त असल्यास विमा संरक्षण देय होते 2....हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत, मात्र सर्वसाधारण काढणीच्या १५ दिवस आधीपर्यंत पूर, पावसातील खंड, दुष्काळ इ. बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये मागील लगतच्या ७ वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या ५० टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर विमा संरक्षण देय होते 3.... पिक पेरणीपासून काढणी पर्यन्तच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट दुष्काळ, पावसातील खंड, पूर, क्षेत्र जलमय होणे, किड व रोगांचा व्यापक प्रादुर्भाव, भूस्खलन, नैसर्गिक आग, वीज कोसळणे, वादळ, गारपीट आणि चक्रीवादळ यासारख्या टाळता न येणाऱ्या जोखमींमुळे पिकांच्या उत्पादनात येणा-या घटीपासून व्यापक विमा संरक्षण दिले जात होते 4....स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबी अंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी अथवा विज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसुचित पिकाचे ठराविक क्षेत्रातील नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येत होते 5 ...काढणी पश्चात नुकसान ज्या पिकांची काढणीनंतर शेतात पसरवून अथवा पेंढ्या बांधून सुकवणी करणे आवश्यक असते अशा कापणी/काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकाचे काढणीनंतर दोन आठवड्यांच्या आत (१४ दिवस) गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगरमोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निकषांचे अधिन राहून नुकसान भरपाई निश्चित केली जाईल असा नियम होता... हे 5 ही निकष आता पीक विम्यात नाहीत फक्त सरासरीच्या तुलनेत पिकांच्या उत्पादनात घट होणे हा एकमेव निकष आता कायम आहे... त्यामुळं शेतकरी पीक विम्याबाबत उत्सुक दिसत नसल्याचे  संभाजी नगरचे कृषी अधीक्षक सांगताय...तर शेतकरी ही याबाबत नाराज आहेत.... Byte प्रकाश देशमुख, कृषी अधीक्षक, छत्रपती संभाजी नगर बाईट्स शेतकरी
3
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top