Back
पुण्यात माजी जवानाच्या कुटुंबावर धमका, कागद दाखवा नाहीतर रोहिंग्या म्हटले जाईल!
KPKAILAS PURI
Jul 30, 2025 09:19:27
Pune, Maharashtra
pune bangla issue
kailas puri pune 30-7-25
feed by 2c
“कागद दाखवा नाहीतर रोहिंग्या म्हटले जाईल” — पुण्यात कर्गिल युद्धातील माजी जवानाच्या घरामध्ये जमावाकडून धमक्या....!
Anchor -
पुण्याच्या चंदननगर परिसरात राहणाऱ्या 1999 च्या कारगिल युद्धातील माजी जवान हकीमुद्दीन शेख यांच्या कुटुंबियांना शनिवारी रात्री उशिरा एका जमावाने घरात घुसत नागरित्व सिद्ध करण्याचा दबाव आणला. रात्री १२ ला घरात घुसत जमावाने लहान मुले बायका सगळ्यांना धमकावत कागदपत्रे मागितल्याचा आरोप कुटुंबीयांनी केलाय... विशेष म्हणजे शेख कुटुंब १३० वर्षापासून लष्करामध्ये सेवा देत आहे...! जर आम्हाला कागदपत्रे मागत असतील आणि आम्ही बांगला देशी असल्याचा आरोप करत असतील तर काय करायचे असा सवाल शेख कुटुंबीयांनी विचारला आहे...! नेमका काय आहे प्रकार पाहुयात स्पेशल रिपोर्ट....!
वि ओ - .....हे आहे पुण्यातल्या चंदननगर परिसरात राहणारे शेख कुटुंबीय...! गेली तीन चार दशके ते चंदननगर परिसरात वास्तव्यास आहेत...! विशेष म्हणजे गेली १३० वर्षे शेख कुटुंबीयांनी भारतीय लष्करात सेवा दिलीय. कारगिल युद्धात ही शेख कुटुंबियांचे सदस्य सहभागी झाले होते. पण याच कुटुंबियांना शनिवारी अत्यंत धक्कादायक प्रकाराला सामोरे जावे लागले. शनिवारी रात्रीच्या सुमाराला ६० ते ७० जणांच्या जमावाने घरात प्रवेश त्यांच्या कडे कागदपत्रांची मागणी केली. तुम्ही बांगलादेशी आहात, रोहिंग्या आहात असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. घाबरलेल्या शेख कुटुंबीयांनी या जमावाला कागदपत्रे दाखवली, पण जमावाने ती खोटी असल्याचे सांगत त्यांना पोलिस स्टेशन ला घेऊन गेल्याचा आरोप शेख कुटुंबीयांनी केलाय. आमचे कुटुंबाने देशाची सेवा केली आम्हाला कागदपत्र मागितली तर काय असा सवाल त्यांनी केलाय...!
बाईट - नवाबली शेख
इर्शाद अहमद शेख
वि ओ -.... दुसरीकडे पोलिसांनी असं काही घडलं नसल्याचं स्पष्ट केले. प्राथमिक दृष्ट्या असा काही प्रकार घडल्याचे दिसत नाही मात्र चौकशी सुरू असून जमाव घुसल्याच काही आढळ्यास कारवाई केली जाईल अस पोलिसांनी स्पष्ट केलंय मात्र कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिलाय.
mid ptoc
वि ओ - .... पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. त्यात सत्य समोर येईलच पण या पद्धतीने सोशल पोलिसिंग करणाऱ्या गटावर कारवाई होणार का हाच खरा प्रश्न आहे...!
कैलास पुरी झी 24 तास पुणे
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowJul 31, 2025 04:32:46Nashik, Maharashtra:
nsk_malegaonbomblastwkt
feed by live u to Mumbai
Anchor मालेगाव के सो से ज्यादा जखमी और साथ मृत परिचनो की न्याय की प्रतीक्षा आज खतम होने जा रहा है l करीबन सतरा सालो से चल रहा मामले का फैसला आज स्पेशल एन आय ए कोर्ट का फैसला आज किया जाएगा l मालेगाव के भिक्खू चौक मे ब्लास्ट की जगह से जायजा लिया है हमारे प्रतिनिधी योगेश खरे ने
0
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJul 31, 2025 04:18:35Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी नेर नगर परिषदेचे अध्यक्ष पवन जयस्वाल यांना गळाला लावले आहे. ते लवकरच शिंदेच्या शिवसेनेत दाखल होत असल्याने शिवसेना युबीटी ला जोरदार धक्का बसला आहे, पवन जयस्वाल यांना उद्धव ठाकरेंनी राठोड यांच्या विरोधात विधानसभेची उमेदवारी दिली होती, परंतु ऐन वेळेवर महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला सुटली आणि जयस्वाल यांचा पत्ता कट झाला होता. तरीही पवन जयस्वाल यांनी दंड थोपटून संजय राठोड यांच्या विरोधात प्रचाराचा धुराळा उडविला. तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीत देखील शिवसेना युबीटी खासदार संजय देशमुख यांच्या सोबत जयस्वाल होते, मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने राठोडांनी मोठी खेळी करीत खासदार संजय देशमुख यांना हादरा दिला.
2
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJul 31, 2025 04:18:30Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळच्या मारेगांव तालुक्यातील मार्डी ते मारेगांव या रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांकडे लक्ष वेधत ग्रामस्थांनी या खड्ड्यातील डबक्क्यांमध्ये बसून आंदोलन केले. काँग्रेस नेते संजय खाडे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे. पावसाळ्याच्या दिवसात या रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असून अनेक अपघात घडत आहेत. त्यामुळे त्रस्त नागरिकांनी पाणी साचलेल्या या खड्ड्यांमध्ये बसून संताप व्यक्त केला.
3
Report
SNSWATI NAIK
FollowJul 31, 2025 04:18:21Navi Mumbai, Maharashtra:
story slug -: चिखले गावच्या सरपंच आणि त्यांच्या पतीने औषधीद्रव्य पिऊन केला आत्महतयेचा प्रयत्न, गावात झालेल्या माती उत्खनन प्रकरणी गुन्हे दाखल होत नसल्याने उचलले टोकाचे पाऊल.
FTP slug - panvel village story
shots-
reporter- swati naik
navi mumbai
Anchor -: पनवेल तालुक्यातील चिखले गावच्या सरपंच आणि त्यांच्या पतीने औषधी द्रव्य पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आलेय. चिखले ग्रामपंचायती मध्ये झालेल्या बेकायदेशीर माती उत्खनन प्रकरणी माजी सरपंच आणि ग्रामसेविका यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी सरपंच दिपाली तांडेल यांनी केली होती. यासाठी काही महिन्यांपूर्वी उपोषण देखील करण्यात आले होते. त्यावेळी कारवाईचे आश्वासन मिळाल्याने उपोषण मागे घेण्यात आले होते. मात्र अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई न करता गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने सरपंच दिपाली तांडेल आणि त्यांच्या पतीने औषधीद्रव्य पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित पोलिसांनी दरवाजा तोडून दोघांनाही ताब्यात घेत रुग्णालयात दाखल केलेय. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात सरपंच पती विरोधातच सरकारी कामात अडधळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून माती उत्खनन प्रकरणी मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने संताप व्यक्त करण्यात येतोय.
gf-
4
Report
PPPRANAV POLEKAR
FollowJul 31, 2025 04:17:09Ratnagiri, Maharashtra:
प्रेयसी बोलत नाही म्हणून तरुण विष प्याला
तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
________________
तरुणाने विष प्राशन केल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील कुंडी धावडेवाडी येथे घडली आहे. सोहम राजाराम पवार असं त्याचं नाव आहे. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रेयसी बोलत नसल्याच्या नैराश्यातून त्याने हे कृत्य केलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सोहम याची प्रेयसी गेले चार-पाच दिवस त्याच्याशी बोलत नव्हती. या नैराश्येतून त्याने बुधवारी विष प्राशन केलं. सोहमला अस्वस्थ वाटू लागल्याने देवरूख ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
प्रकृती गंभीर असल्याने त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेची नोंद देवरुख पोलिस स्थानकात करण्यात आली असून, याबाबत अधिक तपास देवरूख पोलिस स्थानकाचे निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
4
Report
PNPratap Naik1
FollowJul 31, 2025 04:05:32Kolhapur, Maharashtra:
Kop Ambabai Anc /GFX
Feed :- File
Anc :- करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या 1447 कोटीच्या विकास आराखड्याला उच्चाअधिकार समितीने मंजुरी दिल्यानंतर हालचाली गतिमान झाले आहेत. तीन टप्प्यात आराखड्याची अंमलबजावणी केली जाणार असून पहिल्या टप्प्यात अंबाबाई मंदिर परिसरातील 64 योगिनीच्या शिल्पकृतीचे संवर्धन आणि इतर कामे केली जाणार आहेत. यासाठी 143 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. पुरातत्व विभागाने या कामांसाठी मंदिर परिसराची सखोल पाहणी केली असून काही नोंदी दर्शवल्या आहेत त्यानुसार प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे.
GFX In
पहिल्या टप्प्यातील नियोजित विकास कामे कोणकोणती केली जाणार आहेत यावर एक नजर टाकूया.
तडे गेलेल्या दगडांची दुरुस्ती केली जाणार
गळती आणि ओलावा रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार
दगडी शिल्पाकृतीवरील रंग विद्रोपतीची शुद्धी केली जाणार
64 योगिनी शिल्प मूर्तीचे संवर्धन केली जाणार
किरणोत्सव मार्गातील अडथळे काढली जाणार
मूळ मंदिराशी अंतर्गत मंदिराची सुसंगत रचना केली जाणार.
GFX :-
1
Report
KPKAILAS PURI
FollowJul 31, 2025 04:01:43Pune, Maharashtra:
pimpri pistol
kailas puri Pune 31-7-25
feed by 2c
Anchor - ..... पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाकडून अवैधरित्या पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला मोशी प्राधिकरण परिसरात अटक करण्यात आलीय. सुरज राजू गिराम ग्रुप डोंगरे असं अटक करण्यात आलेल्या वीस वर्षीय गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस जप्त केली आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.
2
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJul 31, 2025 04:00:33Ambegaon, Maharashtra:
Feed 2C
Slug: Ambegaon Adivare Waterfall
File'01
Rep: Hemant Chapude(Ambegaon)
Anc: आंबेगाव तालुक्याच्या अडिवरे परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे उंचकड्याच्या डोंगरावरून पांढरे शुभ्र धबधबे खळखळून वाहू लागलेत,हिरवागार निसर्ग बहरलाय दाट धुके दाटून येताय, पावसाच्या हि जोरदार सरी कोसळताय,हे सार विलोभनीय दृश्य मन प्रसन्न करून टाकतंय,या मनमोहर दृश्यांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी
Wkt: हेमंत चापुडे(प्रतिनिधी)
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया आंबेगाव पुणे..
4
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 31, 2025 03:49:40Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
4 FILES
SLUG NAME -SAT_KARAD_GOLD
सातारा-तब्बल अर्धा किलोची 11 सोन्याची बनावट बिस्किटे देऊन त्या बदल्यात 50 लाख रुपये फसवणूकीचा प्रकार कराड शहर पोलिसांनी उधळून लावत तिघांना अटक केली आहे.
सोनाराने दाखवलेली सतर्कता व पोलिसांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे बनावट सोने विकणाऱ्या टोळीचा पर्दापाश करण्यात यश आले आहे.
*अटक केलेले आरोपी:-*
गोविंद पदातुरे (रा. अहमदपूर, जि. लातूर), सर्जेराव कदम (रा. पिसाद्री, कोल्हापूर) व अधिक गुरव (रा. म्हासुर्णे, खटाव)
*बाईट:- राजू ताशिलदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कराड*
8
Report
KPKAILAS PURI
FollowJul 31, 2025 03:49:33Pune, Maharashtra:
pimpri illegal
kailas puri Pune 31-7-25
feed by 2c
Anchor - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इ क्षेत्रीय कार्यलयाअंतर्गत येणाऱ्या प्रभाग ३ मोशी मधल्या गट क्र. २५०,ऑस्ट्रिया इमारत जवळ, देहू -आळंदी रस्ता येथील अंदाजे १८०५१ चौरस फूट क्षेत्रफळ असलेली १६ अनाधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली.या कारवाईमध्ये अनाधिकृत पत्राशेड आणि अनधिकृत बांधकामांचा समावेश आहे. शहरात नव्याने वाढती अनाधिकृत बांधकामे आणि विनापरवाना व्यावसायिक पत्राशेड हटविण्यासाठी इ क्षेत्रीय कार्यालय धडक कारवाई पथक, अनाधिकृत बांधकाम अतिक्रमण नियंत्रण विभागाकडून मोशी मध्ये अनाधिकृत बांधकाम निष्कासनाची कारवाई करण्यात आली..!
8
Report
VKVISHAL KAROLE
FollowJul 31, 2025 03:49:28Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn school av
Feed attached
छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन येथे जि. प.च्या शाळेची इमारत बांधकाम करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर्स प्रा. लि. यांच्यात सामंजस्य करार झाला. टोयोटा किर्लोस्कर या कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून हे बांधकाम होणार आहे. या करारांतर्गत बिडकीन येथील जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळेचा सर्वागीण पायाभूत विकास करण्यात येणार आहे. बिडकीन येथील जि. प. शाळेत सध्या मराठी माध्यमाची पहिली ते चौथी आणि उर्दू माध्यमाचे पहिली ते दहावीपर्यंत वर्ग आहेत. एकूण ८०० विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. किर्लोस्करमार्फत उभारल्या जाणाऱ्या नव्या इमारतीत १२०० विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतील. करारानुसार ३० नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष, वाचनालय, खेळाची खोली, स्वयंपाकघर आदींचा समावेश आहे. याशिवाय सुरक्षितता, शिस्त व जीवनकौशल्यावर आधारित मूलभूत शिक्षणाचे साहित्यही दिले जाईल. २०२५ ते २०२८ दरम्यान तीन टप्प्यांत ही कामे पूर्ण होतील...
टोयोटा कंपनीचा एका मोठा प्लांट बिडकीन मध्ये लवकरच सुरू होणार आहे त्या दृष्टीने कंपन्यांनी हालचाल सुरू केली आहे...
7
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 31, 2025 03:46:22Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
2 FILES
SLUG NAME -SAT_LUT
सातारा - पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील तासवडे टोलनाका परिसरात असणाऱ्या श्रावणी हॉटेल येथे कोल्हापूरहून मुंबईला एसटी थांबलेली होती. या ठिकाणी अनोळखी तीन ते चार संशयितांनी एसटीतून प्रवास करणाऱ्या कोल्हापूरमधील प्रशांत कुंडलिक शिंदे यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या ताब्यातील कृष्णा कुरिअर कासार गल्ली कोल्हापूर येथील कुरियर गोल्ड पॅकिंग असलेला माल घेऊन पळून गेले आहेत. या बॅगमध्ये 35 हजार रुपये व सोन्याचे दागिने असलेले लहान वीस डबे ठेवलेले होते, अशी माहिती समोर आली आहे. संशयितांनी कारमधून साताऱ्याच्या दिशेने पलायन केल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले आहे. घटनेवेळी एका संशयिताला जमावाने पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही तळबीड पोलीस ठाण्यात सुरु आहे.
4
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 31, 2025 03:46:14Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - जिल्ह्यात दमदार पावसामुळे फुलांचा उत्पादनात वाढ मात्र श्रावण महिना असूनही दर जैसे थेच
- सोलापूर जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे विविध फुलांच्या उत्पादनात वाढ
- श्रावण महिन्यात फुलांना चांगली मागणी, घाऊक बाजार पेठेत दर मात्र जैसे थेच
- गुलाब, झेंडू, शेवंती या फुलांचे दर सध्या 40 रुपयांपर्यंत असून ते स्थिर आहेत
- सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, तसेच कर्नाटकातील विजयपुरातून होते विविध फुलांची आवक
- सर्वसामान्य नागरिकांना विकत घ्याव्या लागणाऱ्या किरकोळ बाजारात मात्र फुलांची चढ्यादराने विक्री
4
Report
SGSagar Gaikwad
FollowJul 31, 2025 03:46:04Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_biptya_cctv
*बिबट्याने केला कुत्र्यावर हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेरेत कैद*
अँकर
नाशिकच्या जुना चेहडी रोड वरील गाडेकर मळा, खर्जुल मळा येथे बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे काल रात्री या बिबट्याने घरासमोर पाळीव कुत्र्यावर हल्ला करून ठार केले....हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने परिसरात घबराट निर्माण झाली आहे..... जुना चेहडी रोड गाडेकर मळा येथील विशाल गाडेकर यांच्या घरी एक पाळीव कुत्रा असून काल रात्री बारा वाजेच्या सुमारास या परिसरात वावर असलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले.... या परिसरात शेती भाग असून काही अंतरावरून वालदेवी नदी जात असल्याने नदी कडून हे हे वन्य प्राणी येत असल्याचे दिसून येत आहे....वन विभागाने या भागात पिंजरा लावावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे....
4
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 31, 2025 03:45:55Jalna, Maharashtra:
FEED NAME | 3107ZT_JALNA_GORANTYAL(10 FILES)
जालना :हजारो समर्थकांसह गोरंटयाल भाजप पक्षप्रवेशासाठी मुंबईकडे रवाना
गोरंटयाल यांचा 3 वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष प्रवेश
प्रदेश भाजपा कार्यालयात होणार प्रवेश सोहळा
काँग्रेसच्या लोकांनी गोरंटयाल यांच्याविरोधात निवडणूकीत काम केल्यानं गोरंटयाल निवडणुकीत पराभूत झाले-कार्यकर्त्यांचा आरोप
अँकर : काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटयाल आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गोरंटयाल भाजपात प्रवेश करणार आहेत.या सोहळ्यात हजारो गोरंटयाल समर्थक सुद्धा भाजपात प्रवेश करणार आहेत. या प्रवेशासाठी गोरंटयाल हजारो समर्थकांसह मुंबईकडे रवाना झालेत.विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी गोरंटयाल यांच्या विरोधात काम केलं मात्र पक्षाकडून गोरंटयाल यांच्या विरोधात काम करणाऱ्या विरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.हा अन्याय असल्याची प्रतिक्रिया गोरंटयाल समर्थकांनी दिली आहे.त्यामुळे गोरंटयाल यांच्या सोबत भाजप पक्ष प्रवेश करत असल्याचं कार्यकर्त्यांनी म्हटलं आंबे.
बाईट गोपाल मोरे,गोरंटयाल समर्थक
बाईट : अक्षय गोरंटयाल,कैलास गोरंटयाल यांचे चिरंजीव
7
Report