Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune412106

देहू ते येलवाडी रस्त्याची अवकळा: नागरिकांची हायवेवरची कडवी मागणी!

CHAITRALI RAJAPURKAR
Jul 02, 2025 03:03:03
Pune, Maharashtra
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File.name : 0207ZT_MAVAL_ROAD_ISSUE Total files : 05 Headline : देहू ते येलवाडी रस्त्याला अवकळा पीएमआरडीए आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष कायम Anchor: देहू ते येलवाडी या रस्त्याची दुरावस्था झाली आहे.पावसाने येथील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यात पाणी साचले आहे. त्यामुळे चाकण तळेगाव एमआयडीसी कडे जाणाऱ्या नागरिकांचे तसेच कामगारांचे हाल होत आहेत. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम खाते आणि पीएमआरडीएकडे केली होती. तसेच येलवाडी ग्रामस्थांनी देखील याबाबत रास्ता रोको आंदोलन केले होते. त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र या रस्त्यावर मुरूम टाकून तात्पुरती केली आहे. मात्र मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे या रस्त्यावरती पूर्णतः चिखल झाला आहे. तसेच मोठे मोठे खड्डे असल्याने पावसाचे पाणी साठल्याने या खड्ड्याच्या खोलीचा अंदाज वाहन चालकांना येत नसल्यामुळे अनेक अपघात या रस्त्यावरती होत आहेत. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी आता वाहन चालक आणि नागरिकांकडून केली जात आहे. याच रस्त्याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी... Wkt chaitralli (file no.03) बाईट नितीन गाडे,स्थानिक ग्रामस्थ (file.no.04) बाईट : वाहन चालक (file no.05)
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement