Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401203

नालासोपाऱ्यात तरुणाचा मरणदंड: प्रियकराच्या रागात बेदम मारहाण!

PTPRATHAMESH TAWADE
Aug 26, 2025 14:47:57
Nala Sopara, Maharashtra
date-26aug2025 rep-prathamesh tawade loc-nalasopara slug-nalasopara death feed send by 2c type-AV # मयत तरुणाचा फोटो जोडला आहे. तरुणीला इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवले बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू नालासोपार्‍़यात राहणार्‍या एका तरुणीला इस्न्टाग्रामवर मेसेज पाठविणार्‍या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. मुलीचा प्रियकर आणि त्याच्या मित्रांनी ही मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला. प्रतिक वाघे (२४) असे या तरुणाचे नाव आहे. तो नालासोपारा पूर्वेच्या मोरेगाव परिसरात राहणारा होता. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मोरेगाव तलावाच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर मुलीचा प्रियकरण भूषण पाटील आणि त्याच्या मित्रांनी मारहाण केली. मारहाणीची चित्रफितही तयार करण्यात आली होती. या मारहाणीत जखमी असलेल्या वाघेवर रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. याप्रकऱणी भूषण पाटील, संकेत पाटील, स्वरूप मेहेर यांच्यासह ७ जणांना अटक करण्यात आली आहे. या हत्येमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
12
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SNSWATI NAIK
Aug 26, 2025 16:17:14
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - आंदोलनासाठी मराठा जनजागृती रॅली आंदोलक की जनजागृती रॅली ftp slug - nm maratha rally shots - reporter- swati naik navi mumbai Anchor -: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्ट पासून मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसणार आहेत. या आंदोलनाची जनजागृती करण्यासाठी सकल मराठा समाज नवी मुंबईच्या वतीने जनजागृती रॅली काढण्यात आलेय. आंदोलन आझाद मैदानावरच होणार असून लोकशाही मार्गाने मनोज जरांगे पाटील आंदोलन करणार असल्याची प्रतिक्रिया नवी मुंबई संघटक विनोद पोखरकर यांनी व्यक्त केलेय. gf - बाईट- विनोद पोखरकर - समनव्यक सकल मराठा समाज /-----------------------
13
comment0
Report
Aug 26, 2025 16:07:33
Yavatmal, Maharashtra:
यवतमाळ : भारत सरकारच्या क्रीडा विभागाच्या "फिट इंडिया सायकलिंग ड्राईव्ह" या विशेष उपक्रमांतर्गत यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत “फिटनेस के डोस – आधा घंटा रोज” या संदेशाचा प्रसार करत नागरिकांना दररोज किमान अर्धा तास व्यायाम करण्याचे आवाहन करण्यात आले. ही रॅली दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सायकलिंग ड्राईव्ह पोलीस मुख्यालय यवतमाळ ते दारव्हा रोड या 10 किलोमीटर अंतरावर शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाली.
13
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Aug 26, 2025 15:47:32
Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग.* स्किप्ट ::- चलो मुंबईच्या पूर्वसंध्येलाच लातूरमध्ये मराठा समाजातील तरुणाचा आत्महत्याचा प्रयत्न., सरकार वेळ काढून पणा करत आहे.. चिठ्ठी लिहून 35 वी वर्षीय तरुणाने केला आत्महत्याचा प्रयत्न.. AC. मराठा आरक्षणा संदर्भात आता आरपारची लढाई असल्याचे म्हणत, मनोज जरांगे यांनी चलो मुंबईचा नारा दिला आहे, दरम्यान याच अनुषंगाने राज्यभरातील मराठा समाज मुंबईकडे आंदोलनासाठी जाण्याची तयारी करतोय, मात्र अशातच लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील शिंदगी बुद्रुक येथील 35 वर्षीय युवकाने विषप्राशन करत आत्महत्याचा प्रयत्न केलाय, सरकार मराठा आरक्षणासंदर्भात वेळ काढूपणा करत आहे, सरकार मनोज जरांगे यांच्यावर जाणून-बुजून वारंवार उपोषणाची वेळ आणत आहे.. यामुळे हताश होऊन बळीराम मुळे या 35 वर्षीय युवकाने खिशात चिट्टी लिहत विषप्राशन करत आत्महत्याचा प्रयत्न केलाय, सध्या त्याच्यावर लातूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत...
14
comment0
Report
ABATISH BHOIR
Aug 26, 2025 14:46:08
Kalyan, Maharashtra:
कल्याणच्या बाजार पेठेत खरेदीसाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी Anchor- कल्याणच्या बाजारपेठेत सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी झालीय. गणेशोत्सवाला अवघे काही तास शिल्लक असताना खरेदीसाठी गणेश भक्तांची बाजारपेठेत मोठी झुंबड उडाली आहे. Vo-गणेश उत्सवात बापाला विराजमान करण्यासाठी लागणारे सजावटीचे शेवटच्या टप्प्यात राहिलेलं साहित्य खरेदी करण्यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी झालीय. कल्याणचा बाजारपेठमध्ये फक्त कल्याण परिसरातीलच नाहीत तर शेजारील अंबरनाथ बदलापूर उल्हासनगर त्याचबरोबर ग्रामीण भागातील मुरबाड शहापूर टिटवाळा इथले नागरिक खरेदीसाठी येतात. कल्याणची बाजारपेठ मोठी आणि स्वस्त असल्याने नागरिकांची पसंती कल्याणच्या बाजारपेठेला असते. सध्या बाजारपेठेत काय परिस्थिती आहे सांगतो आमच्या प्रतिनिधी आतिश भोईर. Wkt-अतिष भोईर
13
comment0
Report
ABATISH BHOIR
Aug 26, 2025 13:46:50
Kalyan, Maharashtra:
कल्याण मधील मनोमेय हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार दहा वर्षाच्या मुलाला दिली दुसऱ्याच रुग्णाची औषधे वेळीच लक्षात आल्याने अनर्थ टळला मुलाच्या नातेवाईकांचा रुग्णालयात गोंधळ निष्काळजीपणा करणारे डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी हॉस्पिटल प्रशासनाने चुकीचे औषध दिल्याची कबुली Anchor :- कल्याण आधारवाडी चौकातील मनोमेय मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मधील डॉक्टरांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. टायफाईड आणि निमोनियाची लागण झालेल्या दहा वर्षाच्या मुलाला उपचार करून या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला मात्र संबंधित डॉक्टरने या मुलाला टायफाईड निमोनियाच्या औषधांसह दुसऱ्याच रुग्णाची औषधे देखील प्रेस्क्रीप्शन मध्ये लिहून दिली . मुलाच्या नातेवाईक आज मुलाला घेऊन दुसऱ्या डॉक्टरकडे इंजेक्शन घेण्यासाठी गेले असता हा प्रकार उघडकीस आला. जर ही औषधं या मुलाने घेतली असती तर त्याच्या आरोग्याला अपाय होण्याची शक्यता होती .वेळीच हा प्रकार उघडकीस आल्याने पुढील अनर्थ टळला. याबाबत या दहा वर्षे मुलाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला असून हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे तर घडल्या प्रकाराबाबत मनोमेय हॉस्पिटल प्रशासनाने देखील दुजोरा देत चुकीचे औषध दिल्याचे सांगत याबाबत चूक लक्षात येताच वेळीच मुलाच्या नातेवाईकांना औषध न देण्याचे कळवल्याचे सांगितले. Byte :- अंकिता गायकवाड ( मुलाची आई) Byte :- सनी सिंग ( डॉकटर मनोमेय मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल)
13
comment0
Report
SKSACHIN KASABE
Aug 26, 2025 13:46:41
Pandharpur, Maharashtra:
26082025 Slug - PPR_COMBING_ACTION file 01 ---- Anchor - गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर पोलिसांची कोंबिंग ऑपरेशन गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित 25 जणांना घेतलं ताब्यात , वाहने आणि शस्त्रे सुद्धा केली जप्त. पंढरपूर शहरामध्ये मागील काही दिवसांमध्ये दोन गटात प्राणघातक हल्ले होण्याचे प्रमाण वाढले होते.परिणामी शहरात भीतीचे वातावरण तयार झाले होते.सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी काल पहाटेपासून गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित असलेल्या अनेकांना ताब्यात घेतलेलं आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या 70 जणांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा दिल्या आहेत तर 22 जणांना तडीपार केले आहे. यामुळे पंढरपूर शहर आणि तालुक्यातील सराईत तसेच अल्पवयीन गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
14
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Aug 26, 2025 13:46:33
Dhule, Maharashtra:
ANCHOR - नंदुरबार जिल्ह्यातील सातपूरच्या डोंगर रांगांमध्ये गणपती बाप्पाच्या आगमनाला पावसाची साथ मिळाली. गणरायांचा आगमनात पूर्वीच नंदुरबार मध्ये मुसळधार पाऊस बरासाला. सातपुडा परिसरात सलग सहाव्या दिवशी पावसाची दमदार हजेरी लावली. गणेशोत्सवाचा खरेदीसाठी बाजारात आलेल्या नागरिकांची यां पाऊसामुळे चांगलीच तारांबळ उडाली. अक्कलकुवा आणि अक्राणी तालुक्यातील नद्याना पूर आला असून, सततच्या पावसामुळे नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यात एन गणपती आगमनाला पाऊसाने बरसत हजेरी लावल्याने सर्वांचीच धावपळ पाहायला मिळाली. प्रशांत परदेशी, नंदुरबार.
14
comment0
Report
AKAMAR KANE
Aug 26, 2025 13:32:00
kolhapur, Maharashtra:
गणेशोत्सवानिमित्त नागपुरात कडेकोट बंदोबस्त, गर्दीच्या ठिकाणी ड्रोनची घेणार मदत 2c ला shots आणि बाईट जोडले आहे ------- नागपूर गणेशोत्सवा दरम्यान नागपुरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे.तब्बल आठ हजार पोलीस कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी तैनात असणार.. तर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना पेंडॉलमध्ये सीसीटीव्ही लावण्यास सूचना करण्यात आले आहे... तसेच शहरातील 3500 पेक्षा जास्त सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस वॉच ठेवणार आहे मोठी मंडळे गणेश उत्सव मंडळ आणि गर्दी असलेल्या ठिकाणी पोलीस ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवणार आहेत... पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आलं असून एसआरपीएफ आणि होमगार्ड ही बंदोबस्ताला असणार आहेत.. -==-- बाईट --- रवींद्र सिंगल पोलीस आयुक्त नागपूर
14
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Aug 26, 2025 13:03:20
Dhule, Maharashtra:
ANCHOR - धुळे शहरात गणपती आगमनाची लगबग सुरु झाली आहे. शहरात यावर्षी प्रथमच भाजप गणेशोत्सव साजरा करत आहे. एक दिवस अगोदरच भाजपचा राजा ची मिरवणूक आग्रा रोडवरील श्रीराम मंदिरापासून करण्यात आली. ढोल ताश्यांच्या गजरात आणि आकर्षक सजावटी सह गणेशाचे आगमन झाले. यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. शहराला विकासाच्या वाटेवर नेण्याचे साखले यावेळी घालण्यात आले. byte - गजेंद्र अपळकर, महानगप्रमुख प्रशांत परदेशी, धुळे.
14
comment0
Report
PJPrashant Jha2
Aug 26, 2025 12:49:27
Patna, Bihar:
पटना में nsui कार्यकर्त्ताओं की bjp के कार्यकर्त्ताओं ने जमकर पीटा आज bjp के छात्र संवाद में NSUI के लोग धर्मेंद्र प्रधान को काला झंडा दिखाने पहुंचे bjp कार्यकर्ताओ ने दौड़ा दौड़ा कर पीट दिया पटना में मंगलवार को केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान का विरोध करने पहुंचे NSUI कार्यकर्ताओं को BJP समर्थकों ने जमकर पीटा। इसका वीडियो भी सामने आया है। इसमें BJP कार्यकर्ता NSUI समर्थकों को दौड़ा-दौड़ाकर पीटते दिख रहे हैं। ये पूरा हंगामा ज्ञान भवन के बाहर हुआ है। NSUI कार्यकर्ता केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के काफिले को घेरने की कोशिश कर रहे थे। इसी दौरान BJP कार्यकर्ताओं ने उनकी पिटाई कर दी। सभी केंद्रीय शिक्षा मंत्री को काला झंडा दिखाने पहुंचे थे। केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान दोपहर 1:30 बजे ज्ञान भवन में आयोजित भाजपा युवा मोर्चा के यूथ कॉन्क्लेव में पहुंचे थे
14
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Aug 26, 2025 12:47:06
Yavatmal, Maharashtra:
यवतमाळच्या दारव्हा बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर एसटी बस ने एका व्यक्तीला चिरडले. दादाराव वानखडे असे मृताचे नाव आहे. एसटी बस तेलगव्हाण वरून दारव्हा डेपोमध्ये येत असताना हा अपघात झाला. दारव्हा आगाराचा कारभार मागील काही दिवसांपासून वादग्रस्त ठरत असतानाच, आता हा अपघात घडल्याने बस स्थानकातील व्यवस्था व एकूणच कारभार अनियंत्रित असल्याचा आरोप प्रवाशांमधून होत आहे.
15
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Aug 26, 2025 12:46:51
Dhule, Maharashtra:
ANCHOR - गेल्या आठवाड्यापासून पाऊस बरसात असल्याने नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात बिकट परिस्थितीत निर्माण झाली आहे. पावसाळ्यात सातपुड्याच्या दुर्गम भागात आदिवासींचे हाल सुरु आहेत. उकली नदीवर पुलाअभावी चिमुकल्यांचा पुराचा पाण्यातून धोकादाय प्रवास करावा लागत आहे. पालकांचा हात धरून वाहत्या पाण्यातून चिमुकल्यांना वाट काढावी लागतेय. नदीच्या प्रवाहातून 50 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ही जीव घेणी कसरत करावी लागत आहे. पुराचा पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करण्याची वेळ यां मुलांवर आली आहे. अक्कलकुवा तालुक्यातील कुकडी पादर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चापडीच्या उकलापाडा गावानजीक असलेल्या उकली नदीवर अनेक वर्षांपासून पूल नसल्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची हाल होतं आहेत. BYTE - ग्रामस्थ. प्रशांत परदेशी, नंदुरबार.
14
comment0
Report
SMSATISH MOHITE
Aug 26, 2025 12:46:42
Nanded, Maharashtra:
Satish Mohite Slug - Ned_CongressByte Feed on - 2C ---------------------------- Anchor - आझाद मैदानावर परवानगी नाकारतांना उच्च न्यायालयात सरकारने कोणती भूमिका घेतली होती हे तपासणे महत्त्वाचे आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य, एखाद्या समाजाच्या मागण्याच्या भूमिकेच्या विरोधात आहे. मागच्या सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाया पडून दिलेला शब्द , दिलेला वचन या नाकर्त्या सरकारकडून पूर्ण झालं नाही असेही सपकाळ म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंगजांची फोडा, तोडा राज्य करा ही भूमिका घेतलेली आहे..सरकारची या आंदोलनाच्या अनुषंगाने चुकीची भूमिका आहे. -ये सरकार लोकशाही को डरती हैं, इसलिये कभी पुलिस को , कभी कोर्ट को आगे करती हैं असे सपकाळ म्हणाले. Byte - हर्षवर्धन सपकाळ. ------------------- अमीत देशमुख बाईट उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला , तो कुठल्या कारणाच्या आधारावर दिला याची माहिती मला नाही , मला अस वाटत की अन्य मार्गाने सुध्दा ज्या मागण्या अंदोलकाना मागायच्या. असतील तेव्हा सरकारने त्यांना सहकार्य केलं पाहिजे . सरकार तर कोणाचच आंदोलन ऐकायला तयार नाही . देशात राज्यात सामान्य माणसाची सुनवाई होत नाही . अशी अनेक आंदोलन दडपली गेली मागच्या काळात . अजुन तेच सूरू आहे. ------------- छत्रपती शाहू महाराज बाईट उच्च न्यायालयाने कश्याला मनाई केली , परवानगी का नाकारली , तरीही ते जाऊन पोहचतील तिथं . मत काय आहे ते शासनाला सांगतील. आंदोलन चालू राहील पाहिजे , न्याय मिळाला पाहिजे. -----------------
14
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Aug 26, 2025 12:45:08
Raigad, Maharashtra:
स्लग - गणेशोत्सवात बुरुड समाजाला व्यवसायीक संधी गौरी पूजनासाठी सुपे बनवण्याच्या कामाला वेग अँकर - गणेशोत्सव कोकणातील सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जातो. यातून प्रत्येक समाज घटकाला परंपरेने उत्पन्नाचे साधन मिळते. त्यापैकी एक म्हणजे बुरुड समाज. गणेशोत्सवात शेवटचे दोन दिवस गौराईचे आगमन, कोड कौतुक आणि पुजनाचे असतात. गौराई पुजनाला ओवसा असं म्हटल जातं. यासाठी बांबुपासून बनवलेले सुप आणि सुपली याचा वापर केला जातो. यामुळे सुप बनवणाऱ्या बुरुड समाजाला चांगले उत्पन्न मिळते. या वर्षी गौरीपुजन पूर्वा नक्षत्रात येत असल्याने नव विवाहितांचे ओवसे होणार आहेत. त्यामुळे मोठी सुपे आणि छोट्या सुपलीला अधिक मागणी असल्याने बुरुड समाज बांधवांना चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. बांबु पासून सुप, टोपली, दुरडी आदी वस्तु बुरुड समजा मार्फत वर्षभर बनवल्या जातात मात्र गणपती कारखानदारांप्रमाणे बुरुड समाज बांधवांकडे सुपे बनवण्याची लगबग सुरु आहे. बाईट - गणेश सोंडकर बाईट - सुप्रिया मोरे
14
comment0
Report
Advertisement
Back to top