Back
महामृत्युंजय महादेवाच्या मंदिरात भक्तांची गर्दी, श्रावणी सोमवारची खासियत!
SKSudarshan Khillare
Aug 04, 2025 06:30:59
Yeola, Maharashtra
अँकर:-
भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय महादेवाच्या मंदिरात दुसरा श्रावणी सोमवार निमित्त शिवभक्त दर्शनासाठी पहाटेपासून गर्दी केल्याचे यावेळी दिसून आले. यावेळी नंदीभोवती आकर्षक अशी डमरूची फुलांची सजावट करण्यात आली होती. महादेवाच्या मूर्तीला व पिंडीला फुलांनी सजवण्यात आले असून हजारो शिवभक्त या ठिकाणी महादेवाच्या चरणी नतमस्तक होत आहे.
बाईट: अंकुश शिरसाठ - शिवभक्त
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowAug 04, 2025 11:04:27kolhapur, Maharashtra:
2c ला बाईट जोडला आहे
--------
चंद्रशेखर बावनकुळे (महसूल मंत्री)
आज महसुली सप्ताहाचा चौथा दिवस आहे.. प्रत्येक मंडळात छत्रपती शिवाजी महाराज अभियान सुरू झाला आहे.. शैक्षणिक कामासाठी च्या दाखल्याची गरज पडते त्याकरिता हे अभियान सुरू केला आहे..
On राज ठाकरे
मराठी भाषा ही आमच्या रक्तातली भाषा आहे.. मराठी भाषा महाराष्ट्राला देशातील सर्वोत्तम राज्य करणारी भाषा आहे.. मराठी भाषेसाठी आम्ही सर्वजण एका विचाराने आहोत... त्यासोबत हिंदी भाषा बोलणारा व्यक्ती असेल तर आपण कोणाच्या बोलीभाषेवर बंदी आणू शकत नाही...
मराठी सोबत हिंदी बोलणाऱ्या सोबत मारपीट होते हे राज्याला शोभणारे नाही..
मराठी आपली भाषा आहे त्यासोबत हिंदीचा सन्मान केला पाहिजे ही राज ठाकरेंची भूमिका योग्य आहे..
On ठाकरे हेवेदावे विधान
भाजप महायुतीने 51 टक्के मतदानाची तयारी केली आहे.. विधानसभेत सुद्धा आम्हाला 51.78 टक्के मत मिळाले.. राज ठाकरे आणि त्यांच्या मित्र पक्षांनी काय तयारी केली की मला माहिती नाही..मात्र आमची तयारी झाली आहे.. कोणीही आलं आणि लढलं तरीही 51% मत महायुती घेणार आहे.. त्यावेळी एकही जागा काँग्रेस किंवा शरद पवार आणि ठाकरे याच्या पक्षाला मिळणार नाही.. कारण जनतेने स्वीकारला आहे..की देशात नरेंद्र मोदी हे देशाला समृद्ध करत आहे..तर देवेंद्र फडणवीस ते महाराष्ट्राला विकसित करत आहेत.. त्यामुळे जनता विकासासोबत जाणार आहे..
On ठाकरे युती संदर्भ
ज्यांची निवडणूक लढविण्याची तयारी नाही.. ते लोक असे विधान करतात.. आम्ही उद्या निवडणुका लागल्या तरीही आम्ही तयार आहोत.. एक कोटी 51 लाख सदस्य असणार भाजप आणि अजित पवार ,एकनाथ शिंदे तयार आहे... ते काय करणार हे माहित नाही मात्र आमची तयारी पक्की आहे....
On नरेंद्र भोंडेकर, परिणय फुके वाद..शिवसेना बाप
कोणीही वादग्रस्त वक्तव्य करू नये.. तुम्ही सांगत आहात बाप काढलं तर बाप वगैरे असे शब्द काढू नये.. ते चूक आहे...राज्यात आम्ही सर्व भाऊ भाऊ म्हणून काम करत आहोत.. भाजपा मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे... मला विषय माहित नाही.. मात्र बाप वगैरे काढला असेल तर हे योग्य नाही...
On राहुल गांधी सुप्रीम कोर्ट फटकारले...
राहुल गांधी वेडे झाले आहे.. ते कधी निवडणूक आयोग, कधी सैन्यावर बोलत असतात.. त्यांना अजून या देशाची लाईन कळाली नाही.. त्यांना काही दिवस प्रशिक्षणाची गरज आहे.. जर विदेशात चांगलं प्रशिक्षण मिळत असेल तर एकदा विदेशात जाऊन यावं.. नाहीतर आमच्याकडे प्रशिक्षण संस्था चांगले आहेत...त्यांनी आम्हाला सल्ला मागितला तर कुठे जायचं ते सल्ला आम्ही राहुल गांधींना देऊ..
On एकनाथ शिंदे दिल्ली दौरा..
दिल्लीचा महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांशी काही संबंध नाही.. जागा वाटपाचा निर्णय आम्ही अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस मिळून घेणार. दिलीतील एकनाथ शिंदे यांची भेट स्थानिक स्वराज्य संस्थांशी निगडीत असू शकत नाही..
On मेघना बोर्डीकर वादग्रस्त विधान
मंत्र्यांनी वादग्रस्त विधान करू नये असं मी आणि मुख्यमंत्र्यांनी या अगोदर सांगितले आहे.. मेघना ताईंसोबत मी बोललो मात्र त्यांच्या बोलण्याचा संदर्भ वेगळा होता असं त्यांनी सांगितलं... तरीही मंत्री म्हणून आचारसहिता पाळली पाहिजे आणि वादग्रस्त विधान टाळले पाहिजे..
0
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 04, 2025 11:00:42Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळ च्या पुसद तालुक्यातील मारवाडीखुर्द येथील हनुमान मंदिरातल्या 'नंदी'ला गावाकऱ्यांनी शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप दिला. अनेक वर्षांपासून मंदिराला हा 'नंदी' सोडण्यात आला होता. त्यामुळे नंदीने गावकऱ्यांच्या हृदयात स्थान मिळवले होते. लाडक्या 'नंदी'ने प्राण त्यागल्यानंतर गावकऱ्यांनी या 'नंदी'ची गावातून अंत्ययात्रा काढत त्याला साश्रु नयनांनी भावनिक निरोप दिला.
0
Report
ABATISH BHOIR
FollowAug 04, 2025 10:49:22Kalyan, Maharashtra:
धावत्या मेल मधील प्रवासाच्या हातावर फटका मारून खाली पाडून प्रवाशाची लुटपाठ प्रकरण..
कल्याण जीआरपी पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीला घेतले ताब्यात ..
आरोपीवर या आधीही पाच गुन्ह्यांचा रेकॉर्ड;
आता सज्ञान आरोपीप्रमाणे खटल्याची पोलिसाची मागणी
Anc...कल्याण रेल्वे मार्गावर पुन्हा एकदा फटका गँगने आपली दहशत निर्माण केली आहे. आंबिवली ते शहाड दरम्यान धावणाऱ्या मेल एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या गौरव निकम या तरुणावर फटका मारून त्याला ट्रेनमधून खाली पाडण्यात आलं. हा धक्का एवढा गंभीर होता की गौरवने आपला एक पाय गमावला आहे.घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने गौरवच्या हातावर फटका मारला, ज्यामुळे तो ट्रेनच्या दरवाजातून खाली पडला. त्यानंतर आरोपीने निकम ला मारहाण करत त्याच्या कडील ₹ २०,००० रक्कम व मोबाईल हिसकावून घेतला.या घटनेनंतर कल्याण जीआरपीने तात्काळ कारवाई करत एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. अधिक धक्कादायक बाब म्हणजे या आरोपीवर याआधी पाच गुन्हे फटका मारून लूट केल्याचे नोंदवले गेले आहेत. तो अल्पवयीन असल्यामुळे प्रत्येकवेळी कायद्याच्या पळवाटांचा फायदा घेत सुटत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.या वेळी मात्र पोलिसांनी न्यायालयात या आरोपीविरोधात सदन्यान आरोपीप्रमाणे खटला चालवण्याची विनंती करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता या गंभीर प्रकरणात आरोपीला शिक्षा होण्याची शक्यता आहे दरम्यान, जखमी गौरव निकम याच्यावर सध्या मुंबईतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. रेल्वे सुरक्षा यंत्रणांची कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
Byte पंढरीनाथ कांदे ( कल्याण जीआरपी वरिष्ठ पोलीस निरीक्षक)
3
Report
SKSACHIN KASABE
FollowAug 04, 2025 10:48:26Pandharpur, Maharashtra:
04082025
Slugv- PPR_SENA_RADA
file 01
----
Anchor - शिवसेनेच्या दोन गटांमध्ये पंढरपूरमध्ये राडा शिवसेनेचे संपर्क नेते शिवाजी सावंत यांच्या राजीनाम्या नंतर आज पंढरपूर शासकीय विश्राम गृहात बैठक बोलावण्यात आली होती पक्षाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये आपल्याला डावल जात असल्याचा आरोप सावंत यांनी केला होता त्यांच्या समर्थनात अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते
यानंतर पक्षाचे निरीक्षक संजय कदम यांनी बैठक बोलावली होती त्यांच्या समोरच दोन गट भिडले सोलापूर जिल्ह्यात शिवाजी सावंत विरुद्ध महेश साठे असे दोन गट निर्माण झाले आहेत
5
Report
SMSATISH MOHITE
FollowAug 04, 2025 10:46:45Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Solar
Feed on - 2C
-----------------------
Anchor - सोलार बसवून दिड वर्ष उलटले तरी जोडणी न दिल्याने नांदेड जिल्हा परिषदेचे सोलार धुळखात पडून असल्याचा प्रकार झी 24 तासने उघड केला होता. जवळपास 70 ते 80 लाख रुपये खर्चून सोलार बसवन्यात आले होते. मात्र महावितरनची जोडणी न दिल्याने सोलार बंद अवस्थेत होते. सोलार बसवूनही वापराविना पडून असल्याने जिल्हा परिषदेला दर महिन्याला लाखो रुपयांचे बिल भरावे लागत होते. आमदार आनंद बोनढारकर यांनीही जिल्हा परिषदेत जाऊन सोलार बंद असल्याबाबत अधिकाऱ्यांची कानउघानी केली होती. जिल्हा परिषदेचा हलगर्जिपणा उघड केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनीस्वतः लक्ष घालून सोलार सुरु करून घेण्यासाठी पाठपुरावा केला. शनिवारी महावितरनणे जोडणी देऊन सोलार यंत्रणा सुरु केली.
Byte - संतोष शिंदे - कार्यकारी अभियंता जी. प. नांदेड
------------------
4
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowAug 04, 2025 10:45:47Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 0408_BHA_MAHAYUTI_PKG
FILE - 8 VIDEO
भंडारा जिल्ह्यात भाजपा शिवसेना वाद शिगेला.... नरेंद्र भोंडेकर व परिणय फूके यांच्यात दुरावा... शिवसेनेचा बाप मीच अस फुकेच वक्तव्य.... फुकेणी जाहीर माफी मागावी शिवसेनेची भूमिका....
Anchor :- भाजप आमदार परिणय फुके यांनी महसूल दिनाच्या कार्यक्रमात शिवसेनेचा बाप मीच,.. असे वादग्रस्त वक्तव्य केले. आता हा वक्तव्य चांगलाच शिगेला गेला असून राज्यात महायुती मध्ये आता वाद पेटला आहेः....
Vo :- *शिवसेनेचा बाप मीच आहे*..... आमदार परिणय फूके यांच्या वक्तव्याने राज्यात महायुतीमध्ये मोठा वाद पेटला आहे.... भंडारा जिल्ह्यात परिणय फुके व आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा वाद काही नवीन नाही.... 2019 च्या विधान सभा निवडणुकीत नरेंद्र भोंडेकर हे अपक्ष मैदान होते. भाजपा वतीने अरविंद भालाधरे यांना मैदान उतरवल होत. यात नरेंद्र भोंडेकर यांचा विजय झाला. पुन्हा 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महायुती मध्ये भंडारा विधानसभा शिवसेनेच्या वाट्याला गेली. यात शिवसेनेकडून नरेंद्र भोंडेकर हे मैदानात होते. पण परिणय फुके यांना भोंडेकर नको होते.
शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा विरोध म्हणून फुकेंनी भंडारा विधानसभेची जागा भाजपला द्यावी असा अठ्ठहास केला होता. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खास मर्जीतील नरेंद्र भोंडेकर असल्यामुळे. इथेही फुके यांची चालली नाही... अशा चर्चा रंगल्या होत्या या निवडणुकीत अपक्ष उमेदवार नरेंद्र पहाडे यांना भाजपाचा लोकांनी सहकार्य दिलं पण शेवटी निवडणूक जवळ येताच शिवसेनेच्या दबावानंतर परत भाजपाने महायुतीच्या उमेदवाराला मदत केली...
त्यानंतर जून 2025 ला जिल्हा सहकारी दूध संघाची संचालक मंडळाची निवडणूक झाली व त्यात शिंदे सेनेचे आमदार भोंडेकर यांनी नवीन समीकर तयार करत काँग्रेस सोबत ही निवडणूक लढविली यातून पुन्हा नवीन वादाला सुरुवात झाली. त्यानंतर जुलै महिन्यात झालेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत भोंडेकर व फुके हे एकत्र निवडणूक लढविताना दिसले..... मात्र निकाल पुढे येताच शिंदे शिवसेना पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय कुंभलकर यांनी पत्रकार परिषद घेत कुणाचेही नाव न घेता महायुतीत आमचा गळा कापला गेला असा आरोप लावला होता....
BYTE :- संजय कुंभलकर,
VO :- 1 ऑगस्टला महसूल दिनाचे निमित्त साधून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा भंडारा दौरा कार्यक्रमात परिणय फुके म्हणाले, माझ्यावर अनेकांनी खापर फोडले. मी काही कोणाच्या आरोपाला उत्तर देत नाहीत. पण त्या दिवशी मला हे माहीत झाले की, कसे असते तुमच्या घरी जर पोराला चांगले मार्क मिळाले, तर कोणाचे कौतुक होते पोरगा किंवा आई. काही चांगले झाले तर कोणी केले आईने केले आणि जर काही खराब झाले तर कोणी केले, बापाने केले. त्या दिवशी मला हे पक्क माहीत झाले की शिवसेनेचाही बाप मीच आहे, असे वादग्रस्त विधान परिणय फुके यांनी केले आहे.
BYTE :- परिणय फूके,
Vo :- तर परिणय फुके यांनी हे एका व्यक्तीवर टीका केली नाही तर पक्षावर केली आहे.... परिणय फुके परिपक्व नाही त्याच हे वक्तव्य पोरकट आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागावी असं वक्तव्य स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केलं आहे....
BYTE - नरेंद्र भोंडेकर, 121
VO :- महायुतीतील या दोन्ही पक्षाचे अंतर्गत वाढ हे मागील काही वर्षांपासूनच सुरू होते..... मात्र आता सहकार क्षेत्रातील निवडणुका व यांचे आलेले निकाल यामुळे आता हे वाढ चव्हाट्यावर आल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत या वादाची ठिणगी पडणार आहे.... त्यामुळे भंडारा विधानसभा मतदार संघात भाजपा विरूद्ध शिवसेना असा संघर्ष पहायला मिळणार आहे...
6
Report
TTTUSHAR TAPASE
FollowAug 04, 2025 10:34:56Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
3 FILES
SLUG NAME -Sat_Crocodile
सातारा -कराड येथील प्रीतिसंगम घाटावर मगरचे दर्शन झालं आहे. कृष्णा आणि कोयना नदीचा संगमावर मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ असते .या घाटावर अनेक वेळा या भागात मगरीचे दर्शन झाले होते.आज या भागातील छायाचित्रकार सुरेश पवार यांनी dron कॅमेऱ्याच्या सहाय्याने या मगरीला चित्रीकरण केलं आहे.खूप मोठी अशी ही मगर असल्याने या संगमावर पोहण्यासाठी जाणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
8
Report
SMSATISH MOHITE
FollowAug 04, 2025 10:20:20Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Sand
Feed on - 2C
------------------------------
Anchor - गोदावरी नदीपात्रातून अवैध्य वाळू उपसा करणाऱ्या 3 बोट स्फ़ोट घडवून नष्ट करण्यात आल्या. नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध्य वाळू उपसा होतो. नायगाव तालुक्यातील बरबडा परिसरातील नदीत वाळू माफियानी थैमान घातले होते. दिवसरात्र बोटच्या सहाय्याने वाळू उपसा केला जात होता. पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांच्या पथकाने 3 बोट पकडल्या. या तिन्ही बोटी जिलेटिनचा स्फोट करुन नष्ट करण्यात आल्या.
--------------------
5
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 04, 2025 10:18:15Khed, Maharashtra:
Feed 2C
Slug: Khed Sairat
File:05
Rep: Hemant Chapude(Khed)
ब्रेक*
*खेड/पुणे*
- पतीला जबर मारहाण करत २८ वर्षीय पत्नीचे अपहरण
- पुण्याच्या खेड तालुक्यातील खरपुडी येथील धक्कादायक प्रकार
- सैराट चित्रपटा सारखा अंतर जातीय प्रेम विवाहातून मारहाण आणि अपहरण झाल्याचा प्रकार
- खेड पोलिस स्टेशनमध्ये मुलीचा भाऊ आणि आई सह १५ जणांवर अपहार आणि जबर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल
- विश्वनाथ गोसावी आणि त्याची पत्नी प्राजक्ता गोसावी २८ वर्षीय असे मारहाण झालेल्या दांपत्याचे नाव
Byte: विश्वनाथ गोसावी(पती)
Byte: स्नेहल राजे (सहाय्यक पोलिस निरीक्षक )
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया खेड पुणे
9
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 04, 2025 10:17:35Jalna, Maharashtra:
FEED NAME : 0408ZT_JALNA_WAGHMARE(4 FILES)
जालना : रोहीत पवार शेंबडा,त्याच्याच रसदीवर जरांगेंचं आंदोलन सुरुय
ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा आरोप
राशीनमध्ये झालेल्या घटनेची किंमत रोहित पवारांना चुकवावी लागेल
रोहित पवार जातीयवादी, मतदान मागायला आल्यानंतर त्यांच्या तोंडाला काळं फासा- वाघमारे
जरांगे बीडमध्ये जाऊन जाती जातीत भांडणं लावतो,स्वतः राहत असलेल्या मतदान संघात होणाऱ्या खून करणाऱ्या आरोपीबाबत जरांगे का बोलत नाही.?
महादेव मुंडे प्रकरणात SIT नेमली म्हणजे त्यात त्यांनी बहादरकी मिळवून घेऊ नये.SIT नेमून काहीही होत नाही,
अँकर : आमदार रोहीत पवार शेंबडा असून त्याच्याच रसदीवर जरांगेंचं आंदोलन सुरु असल्याचा आरोप जालन्यातील ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केला आहे.रोहित पवार यांच्या मतदार संघातील राशीनमध्ये झालेल्या घटनेची किंमत रोहित पवारांना चुकवावी लागेल असा ईशारा वाघमारे यांनी रोहित पवार यांना दिला आहे.रोहित पवार जातीयवादी, मतदान मागायला आल्यानंतर त्यांच्या तोंडाला काळं फासा असं आवाहन देखील वाघमारे यांनी पवारांच्या मतदार संघातील जनतेला केलं आहे.जरांगे बीडमध्ये जाऊन जाती जातीत भांडणं लावतो,स्वतः राहत असलेल्या मतदार संघात होणाऱ्या खून करणाऱ्या आरोपीबाबत जरांगे का बोलत नाही.?या खुनातील आरोपींना पकडण्याबाबत का बोलत नाही असा सवाल वाघमारे यांनी केला आहे.महादेव मुंडे प्रकरणात SIT नेमली म्हणजे त्यात त्यांनी बहादरकी मिळवून घेऊ नये.SIT नेमून काहीही होत नाही,जरांगे यांच्या अंतरवालीतील SIT चौकशीचं काय झालं असं सवाल देखील वाघमारे यांनी केला आहे.
बाईट नवनाथ वाघमारे, ओबीसी नेते
8
Report
MAMILIND ANDE
FollowAug 04, 2025 10:16:35Wardha, Maharashtra:
वर्धा
SLUG- 0408_WARDHA_RAIN
- वर्ध्यात आठवडाभरानंतर बरसलाय पाऊस
- उकाड्यापासून हैराण सामान्य नागरिकाला मिळालाय दिलासा
- पाऊस झाल्यानं पिकाला मिळालय जीवदान
- येत्या काही दिवसात उकाडा वाढण्याची शक्यता
अँकर - वर्ध्यात गेल्या आठवडाभऱ्याच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावलीय. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहेय. गेल्या काही दिवसात उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. पाऊस झाल्यानं वातावरणात गारवा निर्माण झालाय. आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. त्यामुळं पाऊस येण्याची शक्यता वर्तविली जात होती.असाच पाऊस अधून मधून सुरू राहिल्यास पिक वाढी साठी चांगली मदत होऊ शकते...
11
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 04, 2025 10:16:26Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - वकीलावर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ वकिलांचा विटा पोलीस ठाण्यावर मोर्चा..
अँकर - सांगलीच्या विटा येथे वकिलांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला आहे. शहरातील एका वकिलावर विटा पोलीसांकडुन करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ विटा न्यायालयातील वकिलांनी एकत्रित येत विटा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढला.हाताला काळ्या फित बांधून विटा पोलिसांचा निषेध देखील नोंदवण्यात आला आहे.विटा शहरातील वकील विशाल कुंभार यांच्यावर पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने कारवाई करत ताब्यात घेण्यात आले,सदर प्रकार हा कायद्याचं उल्लंघन करणारा असून संबंधित पोलिसा अधिकारी व कर्मचारयांच्यावर कारवाई करावी,अन्यथा विटा पोलिसांच्या विरोधात राज्यभर आंदोलन छेडु असा इशारा विटा वकील संघटनेकडून देण्यात आला आहे.
बाईट - अँड विजय जाधव - अध्यक्ष,
वकील संघटना,विटा.
8
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowAug 04, 2025 09:50:50Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_MURDER_UPDATE सात फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
अमरावती महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हत्या प्रकरणात दोन सुपारी किलर अटकेत; सर्व तीनही आरोपी अटक
अँकर :– महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या निर्घृण हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला असून पोलिसांनी या प्रकरणात दोन सुपारी किलरना अटक केली आहे. या दोघांची नावे श्रेयश महल्ले आणि ओम शिकार अशी असून महिलाच्या पतीनेच आपल्या पत्नीच्या खुनाची सुपारी दिली होती अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे पोलीस दलातही खळबळ उडाली असून या हत्येचा उद्देश आणि पतीच्या भूमिकेवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
ग्राफिक्स...
मृत महिला पोलीस कर्मचाऱ्याचा पती राहुल तायडे यानेच हत्या घडवून आणण्यासाठी सुपारी दिली होती
राहुल तायडे हा स्वतःही पोलीस विभागात कार्यरत आहे.
गेल्या एका महिन्यापासून खुनाची योजना आखली जात होती
राहुलचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते, आणि तो तिच्याशी लग्न करण्याचा विचार करत होता.
पती-पत्नीमध्ये तीन ते चार वर्षांपासून मतभेद सुरू होते.
अपघातामुळे पत्नी काही काळ आईच्या घरी राहत होती, आणि त्याचा फायदा घेत खुनाची घटना घडवण्यात आली.
12
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 04, 2025 09:49:55Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
csn husband kill attempt av
feed attached
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीला संपवण्यासाठी पत्नीने उशिने तोंड दाबले तर प्रियकरांनी गळा आवळला.. डाव फसला, नागरिकांकडून प्रियकराला चोप
Anc...
छत्रपती संभाजीनगरमध्ये अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची हत्या करण्यासाठी पत्नीने उशीने तोंड दाबले तर तिच्या प्रियकराने गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. वरच्या मजल्यावर राहणाऱ्या घरमालकाला आवाज गेल्याने त्यांनी धावत बाहेर येऊन नागरिकांना आवाज दिला. प्रकार समजल्यानंतर नागरिकांना कळताच नागरिकांनी प्रियकराला चांगलाच चोप दिला. तर यावेळी पत्नी मुलासह पसार झाली आहे. शीला सुरेश खालापुरे वय ३६ राहणार कोमल नगर पडेगाव, प्रियकर राजू भानुदास खैरे राहणार पैठण अशी आरोपींची नाव आहे. तर सुरेश श्रीमंत खालापुरे वय 42 राहणार कोमल नगर पडेगाव हे फिर्यादी आहेत. सुरेश खालापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुरेश हे रिक्षा चालक असून ते कुटुंबासह कोमल नगर येथे राहतात. त्यांची आरोपी पत्नी शीला खालापुरे ही वाळूज एमआयडीसी मधील कंपनीत काम करते. त्यांना तीन मुली व एक मुलगा आहे खालापूर यांच्या दोन्ही मोठ्या मुलींचे विवाह झाले आहे. काही दिवसांपूर्वी शीला खालापुरे हिने कंपनीतील काम सोडून दुसऱ्या ठिकाणी काम सुरू केले होते. आरोपी शीला खालापुरे व राजू खैरे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधात शीला चपती सुरेश श्रीमंत खालापुरे हा अडसर ठरत होता. यामुळे दोघांनी मिळून शीलाच्या पतीचा खून करायचा प्लॅन रचला. दरम्यान २ ऑगस्ट रोजी राजू खैरे हे जेवण करून पलांगावर झोपले होते. याचवेळी आरोपीशीला हिने घराचा दरवाजा उघडा ठेवून प्रियकर राजूला घरात बोलावले. राजू घरात आल्यानंतर शिलाने दरवाजा लावून घेतला. ठरलेल्या प्लॅन नुसार खून करायचा असल्यामुळे झटापटी चा आवाज बाहेर जाऊ नये यासाठी शिलाने घरातील टीव्हीचा आवाज वाढवून ठेवला. आरोपी पत्नीने सुरेश यांच्या तोंडावर उशी ठेवून दाबण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपी राजू खैरे यांनी गळा वळण्याचा प्रयत्न केला. तिघांमध्ये झटापट झाल्याने फिर्यादी सुरेश खानापुरे हे भिंत आणि पलंगाच्या मधोमध पडल्याने आरोपींना गळा आवडता आला नाही. यावेळी आरडा ओरड झाल्याने वरच्या मजल्यावर राहणारे घरमालक विशाल जाधव खाली आले घटनेचा गांभीर्य लक्षात घेता त्यांनी गल्लीतील नागरिकांना आवाज देत बोलावले. हा प्रकार समजल्यानंतर नागरिकांनी आरोपी राजू याला पकडत चांगलाच चोप दिला. या घटनेनंतर घाबरलेल्या आरोपी शिलाईने नववर्षाच्या मुलाला घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.याप्रकरणी पत्नी व प्रिय कराविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचलेल्या नवऱ्याचा byte आहे...
12
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 04, 2025 09:49:41Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0408ZT_WSM_VEGETABLE_PRICES
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर : वाशिम जिल्ह्यात २२ आणि २३ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसासह त्यानंतरच्या सततच्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले असून, टमाटरसह इतर पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. मागील आठवड्यापर्यंत टमाट्याचा दर ४० रुपये प्रति किलो होता.मात्र आवक घटल्यामुळे सध्या टमाट्याचा दर ८० ते १०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. केवळ टमाटरच नव्हे तर इतर भाजीपाल्यांच्या किमतीतही सरासरी ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ग्राहकांना याचा फटका बसत असला, तरी व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर मात्र या परिस्थितीचा थेट परिणाम झाला आहे
13
Report