Back
रायगडात पावसाची संततधार: नद्या सुरक्षित, पण कुंडलिका नदी इशारा पातळीवर!
PPPRAFULLA PAWAR
Aug 19, 2025 04:03:45
Raigad, Maharashtra
स्लग - रायगडात पावसाची संततधार सुरूच ...... कुंडलिका नदी इशारा पातळी वरून वाहते ..... सावित्री , अंबा नदीच्या पाणी पातळीत घट .......
अँकर - आज सलग सहाव्या दिवशी पावसाची संततधार सुरू असली तरी रायगड जिल्ह्यातील स्थिती धोकादायक नाही. नागोठणे, महाड इथले पुराचे पाणी देखील ओसरले आहे. नद्यांच्या पाणी पातळीत देखील कालच्या तुलनेत घट झाली आहे. सावित्री आणि अंबा नद्या इशारा पातळीच्या खालून वाहत आहेत तर रोहा इथली कुंडलिका नदी इशारा पातळी वरून वाहत आहे.
7
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowAug 19, 2025 05:47:14Kolhapur, Maharashtra:
Kop Rain Update @10am
Feed :- 2C
Anc : कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. त्यामुळे नद्यांची पाणीपातळी वाढून कोल्हापूर आणि गगनबावडा या राज्यमार्गावर पाणी आल्याने मांडूकली गावाजवळ बॅरॅकेट्स लावून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. कोल्हापूर आणि कोकणाला जोडणारा गगनबावडा हा मुख्य मार्ग समजला जातो. पण आता याच मार्गावर पाणी आल्याने कोकणाकडे जाणारा एक रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. तर दुसरीकडे राधानगरी तालुक्यात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे परिणामी. निपाणी - देवगड राज्यमार्गवर पुराचे पाणी आले आहे. राधानगरी मधील फेजीवडे जवळ हे पुराचे पाणी आले असून पाण्यातून वाट काढत संथ गतीने वाहतूक सुरू आहे. कोल्हापुर आणि निपाणीमधून फोंडाघाट मार्गे कोकणात होणारी दुसऱ्या मार्गाची वाहतूक देखील मंदावली आहे. या मार्गांवर पाणी वाढल्यास हा मार्ग देखील वाहतुकीला बंद होण्याची शक्यता आहे.
0
Report
AKAMAR KANE
FollowAug 19, 2025 05:18:53Nagpur, Maharashtra:
Ngp Jaiswal patole byte
live u ने फीड पाठवलं
-----------------------------
नागपूर -
नाना पटोले :
लोकशाही वाचवायची असेल तर निवडणूक आयोगावर महाभियोग आणावाच लागेल.
एकदम न्यायालयात जाणार नाही. आधी जनतेकडे जाऊ. त्याची सुरुवात राहुल गांधींनी बिहार येथून केली आहे.
......-------------------
नाना पटोले यांचा बावनकुळे यांना सवाल, मतदार याद्या तुमच्याकडे तरी आहेत काय. स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आधी याद्या तपासून घ्या हा सल्ला बावनकुळे यांनी दिला असला तरी अंतिम याद्याच नसल्याने तपासायच्या कशा असा सवाल पटोले यांनी केला आहे आणि बावनकुळे यांचा अभ्यास कमी आहे, त्यांनी आधी अभ्यास करावा असा सल्ला दिला आहे.
आता पूर्वी सारखी पद्धत राहिली नाही. अंतिम याद्या फायनल होऊन मग जिल्हाधिकाऱ्यांकडे येतात, याची त्यांनी माहिती घ्यावी असे पटोले म्हणाले आहेत.
8
Report
UPUmesh Parab
FollowAug 19, 2025 05:18:49Oros, Maharashtra:
अँकर ----- मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा फटका कोकण रेल्वेला देखील बसलाय. कोकण रेल्वे मार्गांवरून येणाऱ्या आणि जाणाऱ्या एक्सप्रेस तसेच पॅसेंजर गाड्या उशिराने धावत आहेत. कोकण कन्या - 2 तास 15 मिनिट मेंगलोर मुंबई - 3.38 रत्नागिरी दिवा - 1.10 गरीब रथ - 2.34 मंगला एक्सप्रेस - 1.00 spl उदना एक्सप्रेस - 3.29 जबलपूर सुपरफास्ट 1.00 या गाड्या उशिराने धावत आहेत. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी
4
Report
AKAMAR KANE
FollowAug 19, 2025 05:15:53Nagpur, Maharashtra:
Ngp Jaiswal patole byte
live u ने फीड पाठवलं
------
नागपूर -
आशिष जयस्वाल, राज्यमंत्री, सह पालक मंत्री, गडचिरोली
On Gadchiroli ऑरेंज अलर्ट
आज पावसाचा इशारा दिला आहे. *राज्यात सरकार प्रशासन सारे अलर्ट मोड वर आहे. स्वतः CM लक्ष ठेवून आहेत.*
4
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 19, 2025 05:03:40Ambegaon, Maharashtra:
Feed 2C
Slug: Ambegaon Ganesh Murti
File:02
Rep: Hemant Chapude(Ambegaon)
Anc: गणेश उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपण असून उत्तर पुणे जिल्ह्यात घरगुती गणपती तसेच मंडळाच्या गणपती मुर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी असून यंदा कच्चा मालाच्या वाढलेल्या किंमती मुळे गणेश मुर्तींच्या किंमतीत ३० टक्यांनी वाढ झालीय,कारखान्यात ६ इंचापासून ९ फुटापर्यंतच्या मुर्ती बनवल्या गेल्या असून POP मुर्ती वरील बंदी उशीरा उठल्याने मुर्ती बनवण्यासाठी कमी वेळ मिळाल्याने याचा हि फटका मुर्ती कारांना बसलाय, असं असलं तरी गणेश मुर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी पाहायला मिळतीय..
Byte: श्रीधर राजगुरू(मुर्तीकार)
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया आंबेगाव पुणे...
5
Report
AKAMAR KANE
FollowAug 19, 2025 05:03:28Nagpur, Maharashtra:
Ngp Bawankule byte
live u ने फीड पाठवले
-------
नागपूर -
चंद्रशेखर बावनकुळे :
ऑन पूर परिस्थितीने नुकसान :
आपत्ती व्यवस्थापन निधीतून रक्कम काढण्याचे आणि ज्यांची घरं वाहून गेली त्यांना तातडीने मदत करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आजच्या कॅबिनेट बैठकीत सविस्तर चर्चा होऊन आवश्यक निर्णय घेतले जातील.
ऑन तहसीलदार गाणे, कारवाई आणि सामन्यातून कारवाईवर टीका :
कारवाई करण्याचा विषय आहे कारण,
कासी ज्युडिशियल authority असताना अधिकाऱ्याने खुर्चीवरून गाणे म्हणणे, ऑर्केस्ट्रा करणे योग्य आहे काय. माझ्याकडे महसूल मंत्री म्हणून कासी ज्युडिशियल अपील असतात, अशावेळी *उद्या समजा मी अधिकृत खुर्चीवर बसून गाणे म्हटले, ऑर्केस्ट्रा केला तर चालेल काय?* त्यांनी बाहेर कुठेतरी हॉल घ्यायला पाहिजे होता, कार्यक्रम करायला पाहिजे होता. ते न करता, एकदा रिलीव्ह झाल्यानंतर पुन्हा परत येऊन त्या खुर्चीवर बसून गाणे म्हटले हे शोभले नाही.
ऑन 36 पैकी 15 जिल्ह्यात पुढील दोन दिवस रेड किंवा ऑरेंज अलर्ट असल्याबद्दल..
प्रशासन अलर्ट मोड वर आहे, सर्व सूचना दिल्या आहेत, स्वतः मुख्यमंत्री वॉर रूम द्वारे परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.
5
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 19, 2025 05:00:15Yavatmal, Maharashtra:
AVB
यवतमाळच्या उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार किसन वानखेडे यांना पूरग्रस्त भागाची पाहणी करताना सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प विरोधकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पैनगंगा नदीकाठच्या सावळेश्वर, चातारी, सिंदगी, बोरी, माणकेश्वर आदी गावे बाधित करून प्रस्तावित सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प करण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरू आहे. आमदार किसन वानखेडे यांनी विधिमंडळ अधिवेशनात या प्रकल्पाला मान्यता देऊन काम सुरू करण्याची मागणी केली होती, त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील 50 गावांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे या जलविद्युत प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शवित शेतकऱ्यांनी सावळेश्वर येथे आमदार किसन वानखेडे यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी "जान देंगे मगर जमीन नही देंगे" अशा घोषणा देण्यात आल्या. शेतकऱ्यांचा आक्रोश पाहता आमदार किसन वानखेडे देखील नरमले आणि मी तुमच्या सोबत आहे असे सांगून त्यांनी वेळ निभविली.
बाईट : किसन वानखेडे : आमदार
3
Report
ABATISH BHOIR
FollowAug 19, 2025 04:46:39Kalyan, Maharashtra:
मध्य रेल्वे दुसऱ्या दिवशी लोकल सेवा विस्कळीत;
मुसळधार पावसामुळे अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक अनिश्चित काळासाठी वीस ते पंचवीस मिनिटं उशिराने सुरू.
कल्याण रेल्वे स्टेशन हा मुख्य रेल्वे स्टेशन एक्सस्प्रेस गाड्या उशिराने असल्याने रेल्वे प्रवासी ताटकळत..
कल्याणवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या दोन्ही मार्गावरील लोकल 20-25 मिनिटे उशिराने
कालही सकाळ-संध्याकाळच्या गाड्या उशिराने धावल्यानं चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले होते आज नियोजित वेळेवरती लोकल गाड्या येतील अशी अपेक्षा होती
मुंबई मध्ये मुसळधार व मात्र तांत्रिक अडचण आणि पावसामुळे आज सकाळपासून उशिरा सुरू असलेल्या या लोकल ट्रेनचा प्रवाशांना फटका
वेळेत लोकल न धावल्याने प्रवाशांमध्ये व सकाळी कामाला जाणाऱ्या चाकरमानांची कल्याण स्थानकावर गर्दी.
Wkt... आतिश भोईर
5
Report
AKAMAR KANE
FollowAug 19, 2025 04:33:02Nagpur, Maharashtra:
Ngp Water lodging
live u ने फीड पाठवले
--------
नागपूर -
- नागपूरसह परिसरात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे विमानतळकडे जाणाऱ्या मुख्य मार्ग हॉटेल pride समोर परिसरात सकाळी साचलं होते पाणी
- विमानतळावर येणारऱ्या एका मार्गावर साचलं पावसाचं पाणी
- पावसाच्या पाण्यातून वाहनं विमानतळावर येत आहे.. त्यामुळे त्यांची तारांबळ होतं होती
- काल रात्री मुसळधार पाऊस झाल्याने श हरातील सखल भागात साचलं होते पाणी
8
Report
HPHARSHAD PATIL
FollowAug 19, 2025 04:32:37Palghar, Maharashtra:
पालघर मध्ये मुसळधार पाऊस सुरू असून नदी नाले ओसंडून वाहत आहेत. नद्यांच्या पूर आला असून धरणक्षेत्रातही चांगला पाऊस पडत आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील यांनी.
8
Report
ABATISH BHOIR
FollowAug 19, 2025 04:32:30Kalyan, Maharashtra:
कल्याण डोंबिवली मध्ये सकाळ भागामध्ये पाणी सातारा सुरुवात..
कल्याणच्या मुख्य रस्त्यावरील पाणी साचल्याने वाहतूक कोंडी
Anc.. कल्याण आणि डोंबिवली परिसरामध्ये सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू होती तर एक तासापासून मुसळधार पावसामुळे अनेक सकळ भागातील रस्त्यावरती पाणी साचायला सुरुवात झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक, आंबेडकर रोड,स्टेशन परिसर या ठिकाणी देखील पाणी साचलेला आहे याचा परिणाम वाहतूक वर ही देखील झाला आहे कल्याणचा भिवंडी, शिळफाटा रोड हा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावरील देखील वाहतूक संत गतीने सुरु आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी
Wkt... आतिश भोईर
कल्याण
6
Report
SNSWATI NAIK
FollowAug 19, 2025 04:32:23Navi Mumbai, Maharashtra:
story slug - नवी मुंबई मद्ये पावसाचा जोर वाढला wkt
FTP slug - nm rain wkt
shots - rain
reporter- swati naik
navi mumbai
anchor - नवी मुंबई मद्ये देखील पावसाची संततधार सुरू असून पहाटे पासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे , गेल्या 24 तासात 185 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे याबाबत आढावा घेतला आहे आमच्या प्रतीनेधी स्वाती नाईक यांनी ।
बाईट- wkt
-//---------
6
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowAug 19, 2025 04:31:55Virar, Maharashtra:
Date-19aug2025
Rep-prathamesh tawade
Loc-virar
Slug-VIRAR NALA WKT
Feed send by 2c
Type-WKT
Slug- विरार मध्ये नाल्यात प्लास्टिक कचऱ्याचा खच
महानगरपालिकेच्या नालेसफाईचा दावा फोल
साचलेल्या प्लास्टिक मुळे पाण्याच्या प्रवाहात अडथळे
नाल्यातील पाणी रस्त्यावर आल्याने जनजीवन विस्कळीत
अँकर - विरार पूर्वेच्या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा खच साचल्याने असल्याने नाल्यातील पाणी रस्त्यावर येऊ लागले आहे .. त्यामुळे पालिकेच्या नालायक सफाईचा दावा फोल ठरताना दिसत आहे... नाल्यांत साचलेल्या प्लास्टिक कचऱ्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडखळला असून, त्याचा परिणाम रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून दिसून येत आहे.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी कोट्यवधी खर्च करून नालेसफाई केल्याचे आश्वासन पालिकेकडून दिले जाते, मात्र प्रत्यक्षात महानगर पालिकेच्या या निष्काळजीपणामुळे पावसाळ्यातील त्रास अधिकच वाढला आहे..पालिकेच्या नाले सफाईचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांनी...
7
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 19, 2025 04:17:28Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1908ZT_CHP_RAIN_CONTINUE
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार, चंद्रपूर शहरात पूर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका कायम
अँकर:--- चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. एकीकडे वर्धा नदीला पूर आला असताना जोरदार पावसाने चंद्रपूरकरांच्या चिंता वाढविल्या आहेत. विशेष म्हणजे अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात गेले 3 दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे इसापूर धरणातुन मोठ्या प्रमाणात पैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या धरणाचे पाणी पैनगंगा नदीतून वर्धा नदीत आल्याने वर्धा, इरई आणि झरपट नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. मात्र या सर्व परिस्थितीत दिलासादायक बाब म्हणजे सध्या इरई धरणातून पाण्याचा विसर्ग बंद आहे. इरई धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यास इरई नदीमुळे चंद्रपूर शहरात पूर परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
14
Report
JJJAYESH JAGAD
FollowAug 19, 2025 04:17:18Akola, Maharashtra:
Anchor : अकोला जिल्ह्यावर अतिवृष्टी आणि पुराचा मोठा तडाखा बसलाय..
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जिल्ह्यात दोन दिवसांत म्हणजेच १७ आणि १८ ऑगस्ट रोजी बरसलेल्या पावसामुळे घरांचा आणि शेतपीकांच मोठा नुकसान झाला आहे.
Vo 1 : प्राप्त माहितीनुसार तब्बल ३८९ घरांची पडझड झाली आहे. यामध्ये ८ घरे पूर्णतः तर ३८१ घरे अंशतः कोसळली आहेत.याशिवाय, ५९ हजार २८९ हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झालं आहे.अकोला, मूर्तिजापूर आणि पातूर या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली असून नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे पातूर तालुक्यातील ९ गावांचे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला असून पंचनामे करून नुकसान भरपाई त्वरित मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Byte : शेतकरी
8
Report