Back
अंबाबाई देवीच्या मूर्तीवरील रासायनिक संवर्धन पूर्ण, भक्तांना दर्शनाची संधी!
PNPratap Naik1
Aug 13, 2025 08:48:58
Kolhapur, Maharashtra
Kop Ambabai Murti Byte & WT
Live U
Anc :- करवीर निवासनी अंबाबाई देवीच्या मूर्तीवरील रासायनिक संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे उद्यापासून अंबाबाई देवीचे भक्तांना दर्शन होणार आहे. आज भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागांना दिलेल्या सूचनेनुसार मंदिराच्या गर्भगृहाच्या स्वच्छतेसह अन्य कामांची पूर्तता केली जाणार आहे. सलग दोन दिवस अंबाबाई देवीच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया सुरु होती. उद्या सकाळी श्री पूजकांमार्फत देवीच्या प्राणतत्त्व पुनर्प्रतिष्ठापित विधी केल्यानंतर देवीच्या मूळ मूर्तीच दर्शन सुरू होणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलीय.
Byte :- अमोल येडगे, जिल्हाधिकारी कोल्हापूर
Anc :- दरम्यान ही सर्व संवर्धन कशी पूर्ण झाली आहे याबाबत अंबाबाई मंदिरातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.
Play WT
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSATISH MOHITE
FollowAug 13, 2025 11:03:30Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Jadutona_Pckg
Feed on - 2C
-----------------------------
Anchor - चोरीचा तपास लावण्यासाठी पोलीसांकाकडे तक्रार देण्याऐवजी चक्क मांत्रिकाला बोलावून सर्व गावासमोर जादुटोना करायला लावल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये घडलाय. चोरीचा संशय असणाऱ्यांना मांत्रिकाने पानाचा विडा खायला लावला. या सर्व भोंदूगिरीचा व्हिडिओ समोर आल्यावर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केलाय.
Vo - मोबाईलमुळे गावागावात इंटरनेट पोहोचून जगाशी गावं कनेक्ट झाली असली तरी गावखेड्यात अजूनही अंधश्रद्धेचा किती पगडा आहे याचा प्रत्यय देणारी घटना नांदेड जिल्ह्यात समोर आलीये. अत्यंत धक्कादायक आणि पुरोगामी महाराष्ट्राला लाजिरवानी वाटावी अशी ही घटना आहे. चोरीच्या संशयावरून सहा जणांना गावातील हनुमान मंदिरासमोर उभे टाकवून त्यांना पाण्याच्या हौदात बुडवण्यात आले. तांदूळ टाकलेला पानाचा विडा त्यांना खाऊ घालण्यात आला. सर्व गावकऱ्यांसमोर हा प्रकार सुरु होता.
Mid WKT -
Vo - बिलोली तालुक्यातील केरूर येथिल रामा आरोटे यांच्या घरी 19 जुलै रोजी चोरी झाली होती. याबाबत आरोटे यांनी पोलिसांकडे तक्रार केली नाही. 11 ऑगस्ट रोजी धर्माबाद तालुक्यातील जारीकोट येथिल गंगाराम कादरी या मांत्रिकाला बोलावले. ज्यांच्यावर संशय होता तो परमेश्वर राठोड आणि अन्य 5 जण असे गावातील एकूण 6 जणांना हनुमान मंदिरासमोर उभे टाकवण्यात आले. या मांत्रिकाने सर्व गावक-र्यांसमोर अंधश्रधेचा बाजार मांडला. गावातील हनुमान मंदिरासमोर लिंबू, मिरची, नारळ ठेवून भोंदू बाबा गंगाराम कादरी याने त्याचा खेळ सुरु केला. ज्यांच्यावर चोरीचा संशय होता अश्या सहा जणांना पाण्याच्या हौदात बुडवण्यात आले. त्यानंतर त्यांना तांदूळ टाकून मंतरलेला पानाचा विडा खायला लावला. पोलीस पाटलाने यासाठी विरोध केला. तरीही प्रकार सुरु असल्याने पोलीस पाटील यांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केला.
Byte - प्रवीण वानोळे - पोलीस पाटील, केरूर
Byte - गावकरी
Byte - गावकरी
Vo - पोलीस पाटील वानोळे यांनी व्हिडिओ पोलीसांना दिला. रामतीर्थ पोलिसांनी या प्रकरणात जादूटोना कायद्यान्वये 4 जणांवर गुन्हा दाखल केला.
Byte - विक्रम हराळे - सहाय्यक पोलीस निरीक्षक.
Vo - एकविसाव्या शतकातही ग्रामीण भागात अजूनही अंधश्रद्धा कायम आहे हे या घटनेवरून दिसून आले.
---------------------------------
0
Report
UPUmesh Parab
FollowAug 13, 2025 11:02:14Oros, Maharashtra:
सिंधुदुर्ग ---- राखडलेला मुंबई गोवा महामार्ग पूर्ण व्हावा व खड्डे मुक्त व्हावा यासाठी ठाकरे गटाचे रास्ता रोको माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ येथे करण्यात आले रास्ता रोको... मुंबई गोवा महामार्गांवर वाहनाच्या लागल्या रांगा महामार्गवर रांगोळी घालून दुधाचा अभिषेक करुन ठाकरे गटाचे आंदोलन.. पोलिसांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्या सह कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात वैभव नाईक यांचे सरकारवर टीकास्त्र
Byte --- वैभव नाईक
feed on desk
0
Report
UPUmesh Parab
FollowAug 13, 2025 11:02:09Oros, Maharashtra:
वैभव नाईक आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात भेट
रस्त्यावरून आज वैभव नाईक यांनी केले आंदोलन
आंदोलन संपताच वैभव नाईक बावणकुळे यांच्या भेटीला
मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थे बाबत चर्चा करण्यासाठी आज भेट घेतली बावनकुळे साहेबांना आम्ही महामार्गाची कैफियत मांडल्यानंतर त्यांनी थेट गडकरी साहेबांशी चर्चा केली. आमच्या राजकीय चर्चा झाली नाही भेटी नंतर वैभव नाईक यांनी दिली प्रतिक्रिया
byte --- वैभव नाईक
feed on desk
0
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 13, 2025 11:01:45Nashik, Maharashtra:
nsk_tribslmeet
फीड by 2C
अँकर:
महाराष्ट्र रोजंदारी वर्ग तीन आणि चार कर्मचाऱ्यांचे गेले 35 दिवसांपासून आदिवासी विकास भवनसमोर आंदोलन सुरू आहे सरकार सोबत चर्चा करून देखील आंदोलकांच्या मागण्या मान्य होत नाही. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आज नाशिक मध्ये असता त्यांनी आंदोलकांची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली. आंदोलकांच्या मागण्या जाणून घेत सरकारने तात्काळ या आदिवासी शिक्षकांच्या मागण्या मान्य करून त्यांना सेवेत रुजू करून घ्यावे अशी प्रतिक्रिया दिली.
बाईट: बाळासाहेब थोरात. काँग्रेस नेते.
0
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 13, 2025 10:49:19Ratnagiri, Maharashtra:
मीठगवाणे चिरेखनि स्टॉप च्या पुढे सागरी महामार्गावर सिमेंट बलकरचा भीषण अपघात – सात महिला गंभीर जखमी, एकाचा मृत्यू
मीठगवाणे येथील सागरी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात सात महिला गंभीर जखमी झाल्या असून, त्यापैकी एक महिलेचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, वाघ्रण येथून बांधकामासाठी जानशी पठार दिशेने निघालेल्या महिलांचा टेम्पो समोरून जात असलेल्या लक्झरी बसला ओव्हरटेक करताना चालकाचा ताबा सुटल्याने सुमारे 100 ते 150 फूट रस्त्याच्या कडेला पलटी मारत फरफटत गेला
यात सर्व महिला व एक छोटी मुलगी गंभीर जखमी झाली. अपघातात गाडीतील आणि केबिनमध्ये असलेले इतर पुरुष प्रवासीही जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल येथे हलविण्यात आले.
यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
अपघाताची माहिती मिळताच सागरी पोलीस ठाण्याचे पथक पोलीस सहाय्यक निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली 15-20 मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील अनेक आणि जेठावर प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली .
5
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowAug 13, 2025 10:46:21Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 1308_BHA_BDCC
FILE - 5 VIDEO
भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक अविरोध... सुनील फुंडे अध्यक्ष तर उपाध्यक्ष प्रदीप पडोळे यांची निवड
ANCHOR :- भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज विशेष बैठक बोलावली होती यात अध्यक्षपदासाठी सहकार पॅनलकडून पुन्हा सुनील फुंडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून उपाध्यक्षपद मित्रपक्ष भाजपकडे दिले असून उपाध्यक्ष प्रदीप पडोळे यांची निवड करण्यात आली तर २१ संचालक पदे असलेल्या येथील बँकेच्या निवडणुकीत महायुतीचे सहकार पॅनल आणि काँग्रेसचे परिवर्तन पॅनल रिंगणात होते.यात सहकार पॅनलला १७ तर, परिवर्तन पॅनलला ४ जागा मिळाल्या आहेत.
Byte ;- सुनील फुंडे , बिडीसीसी बँक अध्यक्ष
6
Report
UPUmesh Parab
FollowAug 13, 2025 10:36:11Oros, Maharashtra:
सिंधुदुर्ग -- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे byte
on उद्धव ठाकरे ( महामार्गांवरील खड्डे व वैभव नाईक भेट ) --- मी वैभव नाईक यांना माझ्याशी चर्चा करायला बोलावलं आणि गडकरी साहेबांशी फोन वर चर्चा करुन दिली पुढील तीन महिन्याच्या आत रस्ता पूर्ण करण्याचे आश्वासन गडकरी साहेबांनी दिलंय. राजकारणात खूप काही बोलता येत पण ते बोलायचं नाही.
On भुजबळ ( पालकमंत्री पद ) -- झेंडा वंदन करिता हा मार्ग काढला आहे. तिढा सुटे पर्यंत ही पर्यायी व्यवस्था केलेली आहे. मुख्यमंत्री मंत्र्यांना ज्या जिल्ह्यात पाठवतात तिकडे त्यांना जावंच लागत अशा विषयात नाराजी व्यक्त करायची नसते. भुजबळ साहेब मुख्यमंत्र्यांशी बोलतीलच पण राज्यकर्ते म्हणून काम करत असताना जिकडे पाठवलं जातं तिकडे जावं लागत
on भरत गोगावले --- सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत. एक पाऊल मागे घ्यावं लागेल पण निर्णय लवकर करू.
On धनंजय मुंडे --- ते त्यांच्याशी बोलावलं लागेल.
On स्थानिक वाद -- मी काय प्रकार आहे तो जाणून घेईन
on सिंधुदुर्गात जमीन घेतली (. उबाठा आरोप ) --- मी परिवारासोबत कोकण फिरायला आलो होतो फालतू आरोप केले जातं आहेत. नागपूर शिवाय कुठेही माझी जागा नाही.
On बच्चू कडू --- सार्वजनिक जीवन आणि राजकीय जीवनात लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याला मारहाण करू नये. मारहाण करुन प्रश्न सुटत नाहीत. आतां कोर्ट ठरवेल. कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याला मारहाण करुन प्रश्न सुटत नाहीत
on संजय राऊत ( मांस विक्री ) -- यापूर्वी मागच्या काळातील सरकारने असे निर्णय घेतले होते. नाव घेतली तर राजकारण होईल. शरद पवार साहेबांपासून इतिहास काढला तर अनेक निर्णय घेतले त्याचा अभ्यास करा आणि मग बोला
on कॅबिनेट बैठक ( शिवसेना नेते उनुपस्थित एकनाथ शिंदे नाराज? ?? ) --- ज्या खात्याचा विषय नसतो ते सुट्टी घेऊ शकतात. एकनाथ शिंदे बाहेर आहेत. बैठकीला आले नाही म्हणून ते नाराज आहेत हे बोलण चुकीचं आहे. महायुतीचा धर्म पाळणारा एक सच्चा इमानदार बाणेदार कार्यकर्ता आहे. त्यांच्या उपस्थित न राहण्याने महायुतीत मोठी गडबड झाली असं समजू नये.
On उदय सामंत --- सर्वांनी एकत्र काम केले आहे. हिंदुत्वाच सरकार यावं म्हणून एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतली म्हणून महायुतीच सरकार आलं. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा महत्वाची भूमिका घेतली होती. उदय सामंत यांचं खरं आहे
byte --- चंद्रशेखर बावनकुळे
feed on desk
11
Report
AKAMAR KANE
FollowAug 13, 2025 10:30:51Nagpur, Maharashtra:
हा बाईट पण whats up केलाय.. Assingmnet ला
------------
नागपूर
बाईट - उदय सामंत, मंत्री शिंदेंसेना
On अजित पवार
- अजित दादांनी याबद्दल काय बोललो मी ऐकलं नाही.. आणि सरकारच काय मत ते मला माहिती नाही.. त्यामुळे ते ऐकून बोलणं उचित राही..
On निधी मंजूर
- विकासाची कामे ही एक प्रक्रिया आहे.. निवडणुका आली की विकास कामांची कामे दिली जाते असा एकनाथ शिंदे साहेबांचा स्वभाव नाही.. त्यांनी मुख्यमंत्री असताना देखील नगर विकास विभागाला मोठ्या प्रमाणात निधी दिला होता.. त्यामुळे निवडणुका आल्यावरच ते निधी देतात अशी त्यांची प्रवृत्ती नाही.. विकासाकरिता हे पैसे दिले गेले आहे..
On जरांगे मोर्चा..
- एखाद्या व्यक्तीला कायमस्वरूपी समाजासमोर विलन ठरवणे हे योग्य नाही.. शिंदे साहेबांच्या कार्यकाळात मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला गेला तो दहा टक्के आरक्षण आज देखील देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात कायम आहे.. मराठा समाजाला न्याय मिळवून देणे हे आमची सर्वांची जबाबदारी मात्र हे सर्व करताना.. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये हे देखील शासनाची भूमिका आहे.. सरकारला सर्व समाजाला घेऊन जाण्याची भूमिका असते त्यामुळे याबद्दल कोणीही गैरसमज करून एखाद्या व्यक्तीला विलन ठरवू नये...
On धनंजय मुंडे सरकारी बंगला..
- मंत्रीपद गेल्यावर काही कालावधी सरकारी बंगला ठेवला तरी चालतो.. परंतु त्याचे दंड भरावे लागते त्यातील प्रक्रियेचा तो भाग असेल.. मंत्री नसल्यामुळे ते कधी ना कधी सोडावेच लागते.. हा सामान्य विभागाचा विषय आहे. ते लक्ष घालून काय ती कारवाई करेल..
On जैन समाज आक्रमक
- सभागृहातील भाषण हायकोर्टातील निर्णयावर होत.. कोर्टाचा निर्णय झाल्यावर गिरगाव मधील कबूतरखाना बंद करावा लागला. *मुंबईमधील 51 कबूतर खाणे एकही अधिकृत नाही..*
- त्याला अधिकृत ठिकाण किंवा पर्यायी व्यवस्था करून दिली पाहिजे... हे माझं भाषण आहे.. त्यामध्ये ज्यांना राजकारण करायचं त्यांना करू द्या.. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर बैठक घेऊन सकारात्मक भूमिका मांडलि आहे..
On उद्धव ठाकरे शिंदे टीका
- *हे सर्व उशिरा सुचलेलं शहाणपण आहे.. लोकसभा निवडणुका झाल्यावर महाराष्ट्रात आमचं सरकार येणार म्हणून मुख्यमंत्र्यांची कोट शिवली.. काही योजना आल्या त्यानंतर काही लोकांचा टांगा पलटी झाला.. आणि आता ईव्हीएम वरून आंदोलन सुरू आहे.. जर लोकसभा निवडणुकीवर आक्षेप असेल तर सर्व खासदारांनी राजीनामा द्यायला हवा.. त्यावेळीच्या मतदार याद्या योग्य आत्ताच्या अयोग्य.. त्यावेळी चे मंत्री चांगले आत्ताचे वाईट... महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही मोठी ऍक्टिव्हिटी राज्यभरात राबवत आहोत.. हा दाखवण्याचा यांचा प्रयत्न आहे...*
- *स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींसोबत राज ठाकरे युती करतील की नाही.. हे मला माहित नाही मात्र राज ठाकरे हे राहुल गांधींना कधी ना कधी प्रश्न विचारतील की स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल तुमची भूमिका काय ते... ती भूमिका पाठ करावी त्यांनी*
On कबूतर खाना समिती आंदोलन
- कबुतराच्या विष्टेमुळे रोगराई कशी पसरते हे मी माझ्या उत्तरात म्हटलं आहे.. यावर पर्यायी व्यवस्था करावी असा सुतोवाच केला होता.. आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी यावर बैठक घेतली त्यामुळे यामध्ये चांगलं काहीतरी निष्पन्न होईल...
On रोहित पवार चिन्ह वाद
- *एखाद्या कार्यकर्त्याला मी अमेरिकेत जाऊन डोनाल्ड ट्रम्प बनू शकतो, असे स्वप्न बघायला हरकत नाही.. असंच आम्हाला निशाणी मिळेल हे त्यांचं स्वप्न आहे.. कधी ना कधी त्यांना अजित दादा सोबत यावं लागेल. हे भविष्य काय ठरणार..*
On voice of Devendra
- खाजगी किंवा पक्षाकडून असेल तर कोणाच्याही नावाने अशी स्पर्धा ठेवू शकतो.. देवेंद्रजी नागपूरचे सुपुत्र आहे.. त्यांनी राजकारणातील वेगळा आदर्श निर्माण करत आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत.. अशा व्यक्तींची माहिती पोहोचविण्याचा एखाद्या पक्षाने ठरवलं असेल तर त्यामध्ये दोष देण्यासारखं काही नाही..
- भाजपाच्या लोकांनी व्हॉइस ऑफ देवेंद्र सुरू केल्यामुळे आम्ही ताबडतोब व्हॉइस ऑफ एकनाथ शिंदे सुरू करणं हे योग्य नाही..
On हिंजेवाडी
- याचा अर्थ एमआयडीसी मध्ये जागा शिल्लक नाही... म्हणजे उद्योजक महाराष्ट्रात येत आहे.. त्यांच्या सोयीसाठी आम्हाला जागा उपलब्ध करणे ही जबाबदारी आहे.. बुट्टीबोरी मध्ये देखील फाल्कन सारखा अंबानीचा प्रोजेक्ट येतो आहे.. जिथे जिथे उद्योगासाठी जागा आवश्यक आहे तिथे देण्याची आमची तयारी आहे.. गडचिरोली चंद्रपूर मध्ये देखील काम सुरू आहे.. त्यामुळे विदर्भातील औद्योगिक विकासाला चालना मिळत आहे.. भविष्यात देशातला स्टील हब हा गडचिरोली जिल्हा बनणार.. अशी एकंदरीत शासनाची भूमिका आहे..
- हिंजेवाडीत खाजगी उद्योग आहेत.. त्यांच्या ज्या काही समस्या होत्या.. मी आणि अजित दादांनी भेटून दूर केले आहे..
7
Report
AKAMAR KANE
FollowAug 13, 2025 10:21:04Nagpur, Maharashtra:
2c ला जोडला आहे व्हिडिओ
-------
नागपूर
रिंग रोडवर मानकापूर जवळ भरधाव व्हॅगनार पलटल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय
सोमवारी दुपारी 12.15 च्या सुमारास हा अपघात झालाय
--- सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही
--- ज्या वॅगनारचा अपघात झाला ती व्हॅगनार दोन पलटी मारून परत उभी राहिली.... दरम्यान व्हॅगनार चालकाने याप्रकरणी पोलिसात तक्रार केलीय की दुसऱ्या वाहनाने सिग्नल बाउन्स केले होते त्यामुळे हा अपघात झाला
याप्रकरणी मानकापूर पोलीस तपास करत असून... कोणत्या गाडीने सिग्नल मोडून निघाली हे तपासत आहे.... सीसीटीव्ही चित्रित झालेल्या या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही
9
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 13, 2025 10:18:26Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1308ZT_CHP_TREE_FALL
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीच्या आयुध निर्माणी वसाहतीत शाळेच्या वर्गखोलीवर झाड कोसळले , मोठा अनर्थ टळला
अँकर:----- शाळेचे वर्ग सुरू असताना शाळेच्या दोन इमारतीच्या मधोमध असलेल्या वृक्ष कोसळला आणि त्याची एक फांदी इयत्ता 5 वी च्या खोलीवर कोसळल्याने वर्गातील चार ते पाच विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरातील आयुध निर्माण वसाहतीत घडली. किरकोळ जखमी झालेल्या विद्यार्थ्यांवर आयुध निर्माणी वसाहतीतील दवाखान्यात उपचार करण्यात आले. केंद्रीय विद्यालयाचे काही वर्ग या वसाहतीतील टाईप ३ सेक्टर ४ या भागातील बंद असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीत घेण्यात येत आहे. या शाळेच्या दोन इमारतीच्या मध्ये एक मोठे झाड होते. आज सकाळपासून जिल्ह्यात पाऊस कोसळत असल्याने हे झाड कोसळले व त्याची एक मोठी फांदी इयत्ता ५ च्या खोलीवर कोसळली. यामुळे सिमेंट ऍसबेसटास टिनाचे शेड तुटून त्याचे तुकडे वर्ग खोलीत खाली पडले. यात चार ते पाच विद्यार्थ्यांना किरकोळ इजा झाली. इतर सर्व विद्यार्थी आपापल्या वर्गात असल्याने मोठा अनर्थ टळला.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
9
Report
ABATISH BHOIR
FollowAug 13, 2025 10:16:45Kalyan, Maharashtra:
15 ऑगस्ट रोजी चिकन मटण दुकानं बंद विरोधात सर्व राजकीय पक्षाचा विरोध.
मटण चिकन विक्री बंदीच्या निर्णया विरोधात कॉग्रेस बरोबर, मनसे देखील आक्रमक
काँग्रेस आक्रमक, निर्णय मागे घ्या अन्यथा 15 ऑगस्टला महापालिकेत कोंबड्या सोडू...
Anchor :- 15 ऑगस्ट रोजी कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत चिकन मटन विक्री बंदी असल्याचा निर्णय केडीएमसीने घेतला. या बंदीच्या निर्णयानंतर सर्व थरातून केडीएमसीचा निषेध नोंदवण्यात येतोय. काँग्रेसने देखील या निर्णयाविरोधात आक्रमक पवित्र घेतला आज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी हा निर्णय म्हणजे नागरिकांचे स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न आहे केडीएमसीनेदर हा निर्णय मागे घेतला नाही तर 15 ऑगस्ट रोजी कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात पोल्ट्री फार्म ची गाडी आणू महापालिकेत कोंबड्या सोडू असा इशारा प्रशासनाला दिलाय
Byte.. सचिन पोटे
कोग्रस जिल्हा अध्यक्ष
असे फालतू धार्मिक निर्णय घेत बसू नका
मटण चिकण जप्त करून "अभिनव" पोल्ट्री फार्म उभारणार का ?
Byte.. मनोज घरत
माजी नगरसेवक मनसे
13
Report
SNSWATI NAIK
FollowAug 13, 2025 10:16:31Navi Mumbai, Maharashtra:
story slug -विमानतळाच्या नावावरून मनसे
झाली आक्रमक
विमानतळ के नाम के उपर से मनसे ने पोचा कालीक
ftp slug - nm mns airport name issue
shots-
reporter - swati naik
navi mumbai
नवी मुंबई ब्रेकिंग
नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरावरून पनवेलमध्ये मनसे आक्रमक.
पनवेल पालिकेने शहरात लावलेले नवी मुंबई विमानतळ लिहिलेले साइन बोर्ड वर फासले काळे.
स्व. दी बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ , हे नाव नसल्याने मनसे आक्रमक
नवी मुंबई विमानतळाला दी बा पाटील यांचे नाव देण्यासाठी मनसे आक्रमक
gf-
=====================
10
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowAug 13, 2025 10:15:30Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File name : 1308ZT_MAVAL_KARLA_ACCIDENT
Total files : 04
Headline : लोणावळ्यातील कार्ला गडाच्या घाटात भाविकांच्या गाडीचा अपघात
अपघातात एक जण गंभीर जखमी तर अन्य पाच जण किरकोळ जखमी
Anchor:
लोणावळ्यातील कार्ला गडाच्या घाटात आई एकविरा देवीच्या दर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. गाडीचे ब्रेक फेल झाल्याने आणि पेडलखाली अडकलेल्या पाण्याच्या बाटलीमुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. गाडीत असलेल्या सहा जणांपैकी एक जण गंभीर जखमी झाला असून अन्य पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. पावसामुळे निसरड्या रस्त्यावरून घसरलेली गाडी झाडाला धडकली आणि दरीत कोसळण्यापासून थोडक्यात बचाव झाला.
7
Report
PNPratap Naik1
FollowAug 13, 2025 09:48:04Kolhapur, Maharashtra:
Kop Jotiba Prasad Choppal 121
Feed :- Live U
Anc :- कोल्हापूर जिल्ह्यातील दख्खनचा राजा अशी ख्याती असणाऱ्या जोतिबा डोंगरावर भेसळुक्त प्रसाद विकला जात असल्याचा गंभीर आरोप जोतिबाच्या ग्रामस्थांनी केलाय. इतकंच न्हवे तर अन्न आणि औषध प्रशासनाचे भेसळयुक्त पेढा खावा निर्मिती करणाऱ्यांशी लागेबांधे असल्याचा गंभीर आरोप देखील करण्यात आलाय. या संदर्भात जोतिबा डोंगरावरील ग्रामस्थ आणि काही ग्राहकांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.
Play Choppal
12
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 13, 2025 09:47:59Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1308ZT_CHP_VOTER_ISSUE
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपुरात काँग्रेसने शोधून काढला कथित मतदार घोटाळा, चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहरांमधील पिपरी भागात एकाच बंद घराच्या पत्त्यावर आहेत 119 मतदारांचे वास्तव्य
अँकर:-- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभरात वोटर घोटाळा उघडकीस आणल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी देश व राज्यात अशाच पद्धतीने बोगस मतदार भरती झाल्याची प्रकरणे उघडकीस आणण्याची सुरुवात केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहरात अशाच पद्धतीने काँग्रेसने एक कथित घोटाळा उघडकीस आणला आहे. एका बंद घरात 119 मतदारांचे वास्तव्य असल्याचे कागदपत्र सांगतात. त्यावरून या जागी तपास केला असता या ठिकाणी मात्र कुणीही आढळून आले नाही. अशा पद्धतीने एकाच पत्त्यावर 119 मतदार असल्याची माहिती घरमालकाला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्यानंतरच स्पष्ट झाली. दुसरीकडे हा यंत्रणेचा भोंगळपणा असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे.
बाईट १) सय्यद अन्वर , तक्रारकर्ते
बाईट २) सुधाकर बांदोडकर, घरमालक
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
13
Report