Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sindhudurg416812
वैभव नाईक आणि बावनकुळे यांची भेट: महामार्गावर चर्चा!
UPUmesh Parab
Aug 13, 2025 11:02:09
Oros, Maharashtra
वैभव नाईक आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात भेट रस्त्यावरून आज वैभव नाईक यांनी केले आंदोलन आंदोलन संपताच वैभव नाईक बावणकुळे यांच्या भेटीला मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थे बाबत चर्चा करण्यासाठी आज भेट घेतली बावनकुळे साहेबांना आम्ही महामार्गाची कैफियत मांडल्यानंतर त्यांनी थेट गडकरी साहेबांशी चर्चा केली. आमच्या राजकीय चर्चा झाली नाही भेटी नंतर वैभव नाईक यांनी दिली प्रतिक्रिया byte --- वैभव नाईक feed on desk
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HPHARSHAD PATIL
Aug 13, 2025 12:51:30
Palghar, Maharashtra:
पालघर, ANCHOR - वनविभागाच्या झाडांची अवैधरित्या तस्करी करताना टेम्पो चिखलात अडकला आणि चोरट्यांची चोरी उघडकीस आल्याचा प्रकार पालघर मध्ये समोर आला आहे . पालघरच्या बहिरीफोंडा जायशेत या जंगलातून खैर या महागड्या आणि दुर्मिळ झाडांची काही चोरट्यांकडून मागील अनेक दिवसांपासून चोरी सुरू असल्याचा प्रकार समोर आला होता . यानंतर काल मध्यरात्रीच्या सुमारास वनविभागाच्या जागेतून या झाडांची तस्करी करताना चोरट्यांचा लाकडी ओंडक्यांनी भरलेला टेम्पो चिखलात अडकून पडल्याने हा संपूर्ण मुद्देमात जप्त करण्यात वनविभागाला यश आल आहे . या कारवाईत लाखो रुपयांचा खैर या महागड्या जातीचा लाकूड वनविभागाने जप्त केला असून चोरटे मात्र घटनास्थळावरून पसार झाले आहेत . शंभर पेक्षा अधिक लाकडी ओंडके वनविभागाकडून जप्त करण्यात आली असून पसार झालेल्या चोरट्यांचा वन विभागाकडून शोध घेतला जातोय .
5
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Aug 13, 2025 12:34:10
Palghar, Maharashtra:
Anchor - पालघर मध्ये भर दिवसा एका इसमावर धारदार कुऱ्हाडीने हल्ला . हल्ल्यात बाबूलाल फुलचंद यादव गंभीर जखमी . हल्ला करणाऱ्या इसमाला झाडाला बांधून स्थानिकांकडून बेदम चोप . पालघरच्या कमला पार्क येथील घटना . मुख्य बाजारपेठेतील झाडाला बांधत आरोपीला स्थानिकांनी दिला चोप . जखमी बाबूलाल फुलचंद यादव यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू . स्थानिकांनी बेदम चोप देत आरोपीला केलं पोलिसांच्या स्वाधीन . मात्र हल्ल्याचं कारण अजूनही अस्पष्ट
8
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Aug 13, 2025 12:32:23
Ambernath, Maharashtra:
अंबरनाथ एमआयडीसीतील भूमीपुत्रांची आमा कार्यालयावर धडक! आमा संघटनेनं स्थानिकांची बदनामी केल्याचा आरोप आमा संघटनेनं मागितली स्थानिकांची माफी! Amb agitation Anchor : अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसी भागातील स्थानिक भूमिपुत्रांनी आज आमा संघटनेच्या कार्यालयावर मोर्चा काढला. आनंदनगर एमआयडीसीत दलाल आणि स्थानिकांचा त्रास होत असल्याचा आरोप आमा संघटनेनं काही दिवसांपूर्वी केला होता. याविरोधात भूमिपुत्रांनी मोर्चा हा काढला, यावेळी आमा संघटनेनं हे आरोप संभ्रमातून केल्याचं सांगत स्थानिकांची माफी मागितली. Vo : आमा संघटनेनं काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत एमआयडीसीत भूखंड घेताना दलालांचा त्रास असून स्थानिकांकडूनही दुप्पट तिप्पट किमतीने सेवा पुरवल्या जात असल्याचा आरोप केला होता. या त्रासाला कंटाळून एमआयडीसीतील १४०० कंपन्या राज्याबाहेर जातील, असा इशाराही त्यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर आज आनंदनगर एमआयडीसीतील भूमिपुत्रांनी आमा संघटनेच्या कार्यालयावर मोर्चा काढला आणि जाब विचारला.  चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
8
comment0
Report
AAASHISH AMBADE
Aug 13, 2025 12:21:01
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1308ZT_CHP_2_GATES ( single file sent on 2C) टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील 24 तासातल्या संततधार पावसाने शहरालगतच्या ईरई धरणाची पाणीपातळी उंचावली, 7 पैकी 2 दरवाजे उघडून विसर्ग सुरू अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात झालेल्या संततधार पावसाने शहरालगतच्या ईरई धरणाची पाणीपातळी उंचावली आहे. धरणाची 7 पैकी 2 दरवाजे उघडून विसर्ग सुरू करण्यात आलाय. 1 आणि 7 क्रमांकाचे दरवाजे 0.25 मीटर्सने उघडण्यात आले आहेत. आजच्या दिवशी जिल्ह्यातील वार्षिक पर्जन्य सरासरी 62 टक्क्यांवर आहे. जिल्ह्यातील 2 मोठ्या सिंचन प्रकल्पांपैकी असोलामेंढा 82 % तर इराई 72 टक्के भरले आहेत. 8 मध्यम प्रकल्पांपैकी 4 पूर्ण क्षमतेने भरले असून दमदार पावसाने शेतकरी सुखावला आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
10
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Aug 13, 2025 12:20:32
Akola, Maharashtra:
Anchor : अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातील बुब पेट्रोल पंपवर पेट्रोल भरण्यासाठी उभ्या असलेल्या एका युवकाला दोन जणांनी जबर मारहाण करून जखमी केल्याची घटना घडलीय..ही संपुर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याचा तपास मूर्तिजापूर शहर पोलीस करीत आहे..ही मारहाण निंबा गावाचे सरपंच प्रदीप फुके यांना करण्यात आलीय.. फुके हे दैनंदिन कामे आटपून निंबा यागावी जात असतांना पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंप येथे थांबले असता रांगेत उभे राहण्याच्या कारणावरून वाद झाले या वादात सरपंच प्रदीप फुके यांना संगमत करून किरकोळ कारणावरून दोन व्यक्तींनी जबर मारहाण केल्याची घटना घडली यात प्रदीप यांना गंभीर दुखापत झाली असून हा सर्व प्रकार सिसिटीव्ही मध्ये कैद झाली आहे.
14
comment0
Report
YKYOGESH KHARE
Aug 13, 2025 12:20:21
Nashik, Maharashtra:
नाशिक ब्रेक - - नाशिक महापालिका हद्दीतील कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश - १५ ऑगस्टला महापालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश - नाशिक महापालिकेच्या पशुवैदकीय विभागाने काढले आदेश - १५ ऑगस्टला कुणीही जनावरांची कत्तल करू नये, पालिका प्रशासनाच आवाहन - १५ ऑगस्टला जनावरांची कत्तल करतांना आढळल्यास कारवाईचा इशारा
12
comment0
Report
JMJAVED MULANI
Aug 13, 2025 12:19:29
Baramati, Maharashtra:
JAVED MULANI SLUG 1308ZT_INDAPURPATIL BYTE 1 महिन्याभरात मला एखाद्या पद मिळालं तर गेलेले माघारी फिरतील" माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटलांच्या विधानाने उडाली खळबळ Anchor_महिन्याभरात मला एखादं पद मिळालं तर तालुक्यातील जो 10 टक्के वर्ग आहे तो पटापट माघारी फिरेल असं विधान राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापुरात केलंय. हर्षवर्धन पाटील यांचा तिसऱ्यांदा पराभव झाल्यानंतर काही पदाधिकारी कार्यकर्ते त्यांना सोडून गेलेत त्यानंतर आता हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तालुक्यात असा दहा टक्के वर्ग आहे की आता मला महिन्याभरात एखादं पद मिळालं तर तो पटापट माघारी फिरेल मी पण त्याचीच वाट बघतोय, परिस्थिती बदलत राहते काही चिंता करायचं कारण नाही. काल काय झालं याचा विचार हर्षवर्धन पाटलाने आयुष्यात केला नाही, उद्या काय करायचं ते बोल घटना घडत राहतात असं हर्षवर्धन पाटील म्हणाले. साऊंड बाईट _हर्षवर्धन पाटील
14
comment0
Report
ABATISH BHOIR
Aug 13, 2025 12:18:13
Kalyan, Maharashtra:
डोंबिवलीत बस डिव्हायडरवर चढली, मोठी वाहतूक कोंडी ​डोंबिवली शेलार नाका परिसरात आज दुपारी तीन च्या सुमारास एका खाजगी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस डिव्हायडरवर चढली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, ​​ही बस डोंबिवलीतील गार्डन सर्कलवरून डोंबिवली स्टेशनच्या दिशेने जाताना घडली बस डिव्हायडरवर चढल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी क्रेनच्या मदतीने बस बाजूला हटवली त्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली. सध्या टिळक नगर पोलीस या प्रकरणी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करत आहेत
13
comment0
Report
MAMILIND ANDE
Aug 13, 2025 12:01:54
Wardha, Maharashtra:
**वर्धा ब्रेकिंग* SLUG- 1308_WARDHA_HEAVY_RAIN - देवळी तालुक्यातील सरूळ शिवारात यशोदा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वर्धा - राळेगाव मार्गाची वाहतूक प्रभावित - यशोदा नदीला पूर आल्याने पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतेय पाणी - पुलावरून पाणी वाहत असल्याने वर्धा - राळेगाव मार्गावरील वाहतूक प्रभावित - वर्धा जिल्ह्यात जोरदार पावसामुळे काही भागात नदी नाल्यांना पूर - आवागमन करणाऱ्यांना पूर ओसरण्याची प्रतिक्षा - पंधरा दिवसाच्या दीर्घ विश्रांतीनंतर वर्ध्यात जोरदार पाऊस वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस; यशोदा नदीला पूर, वाहतूक ठप्प अँकर- वर्धा जिल्ह्यात पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. देवळी तालुक्यातील सरूळ शिवारातून वाहणाऱ्या यशोदा नदीला मोठा पूर आला असून, या नदीवरील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. परिणामी, वर्धा ते राळेगाव या प्रमुख मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.पूल जलमय झाल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या असून, नागरिकांना पूर ओसरण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. जिल्ह्यातील इतर भागांमध्येही नद्यांना व नाल्यांना पूर आल्याच्या घटना समोर येत आहेत. विशेषतः ग्रामीण भागात प्रवास करणाऱ्यांसाठी ही परिस्थिती अधिक अडचणीची ठरत आहे. विवो- स्थानिक प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना नदीकाठी जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस जोरदार पावसाचा इशारा दिल्यामुळे सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
10
comment0
Report
AKAMAR KANE
Aug 13, 2025 12:01:34
Nagpur, Maharashtra:
Ngp Rain Shots live u ने फीड पाठवले -- नागपुरात आज सकाळपासून पावसाची रिपीरीप सुरू आहे... --- विदर्भात चंद्रपूर यवतमाळ आणि अमरावती येथे पुढील 48 तासासाठी ऑरेंज अलर्ट आहे... गडचिरोलीलाही आजचा ऑरेंज अलर्ट आहे... --- विदर्भात अनेक ठिकाणी पावसाचा जोर सुद्धा वाढलेला आहे --- 17 तारखेपर्यंत पावसाचा हा जोर विदर्भात कायम राहण्याची शक्यता आहे
12
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 13, 2025 12:00:40
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn bajaj nagar rada av Feed attached बजाजनगरातील प्रताप चौकात पुन्हा एकदा दारूच्या दुकानासमोर काही तरुणांनी चांगलाच राडा घातला आहे किरकोळ वादातून दारूच्या नशेत असलेल्या तिघांना काही जणांनी बेदम मारहाण केली. या मारहाणी दरम्यान कपडे फाटेपर्यंत मार देण्यात आलाय  हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.  स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारच्या घटना येथे वारंवार घडत असून त्यामुळे परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करून अशा घटनांना आळा घालावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
11
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 13, 2025 11:47:18
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn teja terror pkg Feed already sent Anchor : छत्रपती संभाजी नगर मध्ये तेजा उर्फ सय्यद फजल या गुंडाची चांगलीच दहशत होती मंगळवारी त्यांना त्याच्या मैत्रीनीवर ही गोळी चालवली होती त्यात त्याला पोलिसांनी अटक केली मात्र अटकेत असतानाही आणखी काही मुलींना गोळ्या मारणार आहे असा माज त्यान दाखवला होता याचा माज उतरवावा अशी भूमिका झी 24 तास ने घेतली होती आणि संभाजीनगर पोलिसांनी नेमकं तेच करत आज या गुंडाची रस्त्यावर धिंड काढत माज उतरवला आहे... Vo 1... गुंड तेजाचा संभाजीनगर पोलिसांनी उतरवला माज शहरातील वेगवेगळ्या रस्त्यावर तेजाला अनवाणी  फिरवलं कुणाचेही गुंडगिरी खपवून घेणार नाही पोलिसांचा इशारा पोलिसांच्या अटकेत असलेला हा आहे कुख्यात गुंड सय्यद फजल उर्फ तेजा या तेजाला पोलिसांनी मंगळवारी अटक केली होती मैत्रिणीवर गोळीबार केल्याप्रकरणी ही अटक होती , मात्र अटकेत असतानाही त्याचा माज काही कमी झाला नव्हता माध्यमांचे कॅमेरे पाहताच अजून काही मुलींना मला गोळी मारायची आहे असं म्हणत त्याने मज दाखवला होता...( कालचा व्हीडिओ वापरा ) या प्रकरणाची पोलिसांनी ही गंभीर दखल घेतली होती आणि त्याला योग्य धडा शिकवलं जाईल असं सांगितलं होतं आणि त्याची प्रचिती संभाजीनगर पोलिसांनी आज दिली या तेजाला आज त्याचं प्राबल्य असलेल्या किल्ले अर्क बुद्धी लेन कॅनॉट परिसर टीव्ही सेंटर भागात पोलिसांनी दिंड काढत फिरवलं संभाजीनगर पोलीस कोणाचाही मार्च खपवून घेणार नाही तो उतरवला जाईल असा इशारा यावेळी पोलिसांनी दिला Byte मंगेश जगताप, पोलीस निरीक्षक Vo 2... तेजावर याआधीही सतरा गुन्हे दाखल आहेत जेव्हा जेव्हा तो जेलमधून बाहेर पडायचा त्यावेळेस त्याचे समर्थक त्याचं मोठमोठे हार नेऊन स्वागत करायचे याबाबतचे तो व्हिडिओ बनवायचा आणि समाज माध्यमांवर व्हायरल सुद्धा करायचा... मात्र आज पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेनं त्याची सगळीच मस्ती जिरवली आहे यापुढे कोणीही शहरात असा माज दाखवायचा प्रयत्न केला तर त्याची हीच अवस्था होईल असा इशाराच पोलिसांनी आज आपल्या कृतीतून दिला आहे.. विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर...
13
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 13, 2025 11:34:35
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सिटूच्या वतीने टेरिफ कराच्या निषेधार्थ डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात सिटूच्या वतीने आक्रमक आंदोलन - डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे करण्यात आले दहन - टेरिफ करामुळे सोलापुरातील चादर टॉवेल उत्पादकांची अडीचशे कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचा दावा - सरकारने अमेरिकेच्या दबावाखाली दहा वर्षांचा संरक्षण करार करण्याचा प्रयत्न त्वरित थांबवण्याची मागणी - डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रतीकात्मक पुतळा दहन करताना पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये काहीशी झटापट
14
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 13, 2025 11:33:53
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn teja old vdo Feed attached ANCHOR : कुख्यात गुंड तेजा उर्फ सय्यद फजल याची  रस्त्यावर धिंढ काढत पोलिसांनी त्याचा माज उतरवला , तेजाचा शहरातील काही भागात प्रचंड प्रभाव होता त्याचे फॉलोवर्स सुद्धा होते त्याचे काही जुने व्हिडिओ पुढे आले आहेत त्यात  जेव्हा जेव्हा तो जामीनावर बाहेर येतो, तेव्हा त्याचे साथीदार कारागृहाच्या गेटवर त्याचं जंगी स्वागत करतात अस दिसतंय,  त्याच्यासाठी भला मोठा हार आणला जातो, त्यामुळे संभाजीनगर शहरातील गुंडांमध्ये पोलिसांचा धाक उरला की नाही असा प्रश्न उपस्थित होत होता धक्कादायक म्हणजे पोलीस ठाणे, कारागृह आणि न्यायालय म्हणजे या आरोपींसाठी स्वतःच घर बनले होते... त्यामुळे संभाजीनगर पोलिसांनी आज  रस्त्यावर धिंड काढून त्याचा माज उतरवण्याचा प्रयत्न केला...
13
comment0
Report
GMGANESH MOHALE
Aug 13, 2025 11:33:35
Washim, Maharashtra:
वाशिम: File:1308ZT_WSM_FLAG_ANDOLAN रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर:वाशिमच्या वीज वितरणच्या मुख्य कार्यालयासमोर 1 मे 2024 ला ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला मुख्य अभियंत्यासह 80 कर्मचारी अनुपस्थित होते.या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करूनही मागील अनेक महिन्यांपासून केवळ चौकशीचा फार्स सुरू असून, दोशींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रध्वज सन्मान समितीच्या वतीने साखळी उपोषण करण्यात आले.या उपोषणात मोठ्या प्रमाणात महिला आणि नागरिक सहभागी झाले होते. दोषींवर कारवाई केली झाली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलन कृत्यांनी दिला. बाईट : चेतन इंगोले,अध्यक्ष,राष्ट्रध्वज सन्मान समिती,वाशिम. बाईट : वैशाली मेश्राम,महिला जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी( SP),वाशिम.
14
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top