Back
तासगांव के पास कार-दुचाकी हादसा: तीन की मौत, चार घायल
SMSarfaraj Musa
Sept 10, 2025 00:45:52
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - तासगावनजीक कार व दुचाकीचा भीषण अपघात बुर्लीचे तिघे ठार: चार जखमी
मृतात आजी,आजोबा व नातवाचा दुर्दैवी अंत..
अँकर - सांगलीच्या तासगाव नजीक चार
कार व दुचाकीचा भीषण अपघातात तीन जण ठार तर चार जण जखमी झाले आहेत. या अपघातात आजी,आजोबा व नातवाचा दुर्दैवी अंत झाला आहे.शिवाजी बापू सुतार, वय-57, आशाताई शिवाजी सुतार-वय -55 आणि वैष्णव ईश्वर सुतार- वय -5,अशी मृतांची नावे आहेत.हे सर्व जण पलूस तालुक्यातील बुर्ली येथील असून दुचाकीवरून नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते.परतता असताना तासगाव- भिलवडी मार्गावर समोरून येणाऱ्या चारचाकीला जोरदार धडक झाली,ज्यामध्ये दुचाकीवरील आजी,आजोबा आणि नातू असे तिघे जण जागीच ठार झाले.तर चारचाकी गाडी ही रस्त्याच्या कडेला जाऊन द्राक्षबागेत कोसळल्याने चारचाकी मधील चौघेजण जखमी झाले असुन त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सर्व जखमी हे शिक्षक दिनाच्या निमित्ताने कडेपूर येथे आयोजित पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहून तासगाव मार्गे सांगलीला परतता होते.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowSept 10, 2025 05:31:55Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1009ZT_WSM_APMC_MALEGAON
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर : वाशिम च्या मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष पोफळे यांच्याविरोधात १३ विरुद्ध शून्य मतांनी अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला.अवघ्या तीन महिन्यांतच त्यांना अविश्वासाला सामोरे जावे लागले.१९ मे २०२५ रोजी बिनविरोध निवड झालेले पोफळे यांनी एका महिन्यात राजीनामा देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र तसे न केल्याने सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला.काल तहसील कार्यालयातील विशेष सभेत तो प्रस्ताव मंजूर झाल्याने पोफळेंना सभापतीपद सोडावे लागणार आहे.
0
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 10, 2025 05:16:48Washim, Maharashtra:
वाशिम :
File:1009ZT_WSM_BHOMDUBABA
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:वाशिमच्या कारंजा येथे दोन भोंदूबाबांनी एका व्यावसायिकाला बोलण्यात गुंतवून तब्बल ६० ते ७० हजार रुपयांची सोन्याची अंगठी लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दुकानात आलेल्या साधूंना पाहून व्यावसायिकाने स्वागत केले.साधूंनी मधुर संवाद साधत त्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर व्यावसायिकाने आपल्या हातातील ६ ते ७ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी त्यांना दिली.अंगठी मिळताच दोन्ही भोंदूबाबा पसार झाले.काही वेळाने व्यावसायिकाला फसवणूक झाल्याचे लक्षात आले.व्यापाऱ्यांनी परिसरात शोध घेतला, मात्र आरोपींचा पत्ता लागला नाही.
0
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 10, 2025 05:15:55Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn samruddhi av
सकाळी रात्रीचा व्हिडिओ दिलाय त्यात खिळे असलेले शॉट्स लावा आणि खिळे कापलेला व्हिडिओ आता अटॅच केलेला आहे...
ANC : छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावरील माळीवाडा इंटरचेंजजवळ असलेल्या पुलावर मोठ-मोठे खिळे मारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या खिळ्यांमुळे रात्री अनेक वाहन पंचर झाली. अनेक वाहनचालकांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून आपला रोष व्यक्त केला. विशेष म्हणजे खिळे मारल्यावर कोणतेही सूचना फलक लावण्यात आले नव्हते. सुदैवाने कोणतेही मोठी दुर्घटना घडली नाही, तसेच काही वाटचालकांच्या तात्काळ हा प्रकार लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान सकाळी हा प्रकार लक्षात आल्यावर महामार्ग प्रशासनानं हे सगळे खिळे कापून टाकलेले आहे हे खिळे पुलाच्या दुरुस्तीसाठी लावले होते अशी प्राथमिक माहिती प्रशासनकडून देण्यात आलेली आहे मात्र मग खिळे लावण्यात आलेले होते तर त्याला बॅरिकेडिंग का केली नव्हती याबाबतचे उत्तर मात्र अजून प्रशासनांना दिलेलं नाही...
0
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 10, 2025 05:06:30Yeola, Maharashtra:
अँकर :-15 सप्टेंबर रोजी नाशिक येथे शेतकरी बांधवांसाठी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या पार्श्वभूमीवर येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह या ठिकाणी संपन्न झाली या प्रसंगी नाशिक जिल्हा प्रभारी माजी आमदार सुनील भुसारा, प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव शिंदे,नाशिक जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, गोकुळ पिंगळे, विश्वजीत चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सज्ज राहावे असे आवाहन माजी आमदार सुनील भुसारा यांनी केले
4
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 10, 2025 05:02:53Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी तालुक्यातील वाटद-खंडाळा तिहेरी खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी दुर्वास पाटील याचे वडील दर्शन पाटील याला सीताराम वीर याच्या खुनाच्या गुन्ह्यात जयगड पोलिसांनी अटक केली आहे.
सिताराम विरच्या खूनात संशयित दुर्वास पाटील आणि त्याच्या मित्रांना मदत तसेच त्या गुन्ह्यात सहभाग असल्याच्या संशयातून पोलिसांनी दर्शन पाटील याला अटक केली. पोलिसांनी त्याला न्यायालयापुढे हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दुर्वासची प्रेयसी भक्ती मयेकर हिला सीताराम वीर हा सातत्याने फोन करून त्रास देत असल्याच्या रागातून दुर्वासने आपल्या साथीदारांच्या मदतीने त्याला जबर मारहाण केली होती. या मारहाणीत सीमारामचा मृत्यू झाला होता.
3
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 10, 2025 05:02:39Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1009ZT_WSM_TEACHER_TRANSFER
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर: वाशिम जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेनुसार जिल्ह्यातील 1007 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.कार्यमुक्त झालेल्या शिक्षकांना24 तासांत बदलीच्या शाळेत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले.हे आदेश प्राप्त होताच जिल्ह्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.काही शाळांना पालकांनी कुलूप लावले, तर शिक्षक शाळा सोडताच विद्यार्थी रडल्याची दृश्ये दिसून आली.ही बदली प्रक्रिया ग्रामविकास विभागाच्या 18जून 2024 च्या सुधारित धोरणानुसार पार पडली. विविध संवर्गांमधून ऑनलाईन पोर्टलवर प्रक्रिया पूर्ण करून शासनाकडून आलेली यादी 21ऑगस्ट 2025 रोजी शिक्षण विभागाला प्राप्त झाली होती.
3
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 10, 2025 05:01:55Junnar, Maharashtra:
Feed 2C
Slug: Junnar Lenyadri Ganpati
File:04
Rep: Hemant Chapude(Junnar)
Anc: अष्टविनायक लेण्याद्रीच्या गिरजात्मज बाप्पाचा गाभारा संकष्टी चतुर्थी निमित्त आकर्षक अशा विविधरंगी फुलांनी सजविण्यात आला असून विविधरंगी फुलांनी सजलेले लाडक्या बाप्पाचे रूप विलोभणीय असेच दिसत होते,या वेळी लाडक्या बाप्पाला केळीचा महानैव्यद्य दाखवण्यात आला, चतुर्थी निमित्त पहाटेपासूनच लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया जुन्नर पुणे...
0
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 10, 2025 05:01:39Ratnagiri, Maharashtra:
चिपळूण :
रत्नागिरी जिल्हा काँग्रेसची चिपळूण मध्ये महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
जिल्ह्यातील सर्व तालुका प्रमुखांसह महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चिपळूण मध्ये बैठक.
आगामी नगरपंचायती,जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेस पक्षाची बैठक असल्याची माहिती.
जिल्हाध्यक्ष सोनल लक्ष्मी घाग यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण मधील धवल प्लाझा येथे बैठक.
0
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 10, 2025 04:49:15Yavatmal, Maharashtra:
AVB
हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या अन्यथा आता पांढरं वादळ येईल, त्याला थांबवण्यासाठी देशाचे सैनिक देखील कमी पडतील असा इशारा यवतमाळ मधील बंजारा समाज संघटनांनी दिला आहे. भाजपाचे पदाधिकारी असलेल्या तसेच इतर प्रमुख बंजारा नेत्यांनी बैठक घेऊन बंजारांना एसटी तून आरक्षणाची मागणी केली आहे. शासनाने मान्य केलेल्या हैदराबाद गॅजेटमुळे आम्हाला बळ मिळालेले आहे,
आम्ही विखुरलेले बंजारा आता एका प्रवर्गात येऊ शकत आहे, मराठ्यांना हैदराबाद गॅजेट लागू होत असेल तर सर्व पुरावे असणाऱ्या बंजारांना तर ते लागू झालेच पाहिजे. तेलंगणा, आंध्र प्रदेशात बंजारा समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण मिळते. संस्कृती आणि बोलीभाषा एक आहे. असे बंजारा समाज संघटनांनी म्हटले आहे.
बाईट : पंजाब जाधव
2
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 10, 2025 04:49:01Solapur, Maharashtra:
आत्मतृप्ती योजनेला सोलापूरकरांकडून तब्बल तीन लाख 55 हजार रुपयांची मदत
सोलापूरकरांनी आत्मतृप्ती योजनेला भरभरून प्रतिसाद दिला असून 3 लाख 55 हजार रुपये रोख तर 2 लाख रुपये किमतीचे शेकडो किलो धान्य देण्यात आलंय. स्व. विष्णुपंत कोठे आत्मतृप्ती योजनेच्या माध्यमातून 2019 सालापासून वर्षातील 365 दिवस दररोज 100 निराधारांना दोन वेळचे मोफत जेवणाचे डबे घरपोच दिले जातात. लोकांनी भरभरून सहकार्य केल्याबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूरकरांचे आभार मानले आहेत.
3
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 10, 2025 04:32:45Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Shirur Chandoh Suicide
File:03
Rep: Hemant Chapude(Shirur)
Anc: शिरूर तालुक्यातील चांडोह येथे वन विभागाच्या जागेत झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे,नक्की हत्या की आत्महत्या याचा तपास सध्या शिरूर पोलीस करत असून मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटली नसून याचा हि तपास शिरूर पोलिस करत आहेत.
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया शिरूर पुणे...
2
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 10, 2025 04:17:31Yavatmal, Maharashtra:
AVB
यवतमाळ च्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कर्तव्यावर असलेल्या परिचरिकेला मारहाण झाली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिचारिका संघटना संतप्त झाल्या आहेत. एका रुग्णाच्या मध्य धुंद नातेवाईकाने ही मारहाण केली असून मारहाण करणारा आरोपी सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे. याबाबत परिचारिकेने सुरक्षा रक्षकाला सांगितल्यानंतर त्यांनी मद्यपीला बाहेर काढले. घडलेल्या प्रकाराची तक्रार पोलिसात दाखल केली असून आरोपीवर कारवाईची मागणी केली आहे. शिवाय वारंवार असे प्रकार घडत असल्याने रोष व्यक्त करीत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
बाईट : विद्या खडसे
8
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 10, 2025 04:16:31Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1009ZT_WSM_CHIA_SEED_PRICE
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर :वाशिम जिल्ह्यासाठी नाविन्यपूर्ण पीक असलेल्या चियाच्या दरात मागील काही दिवसांपूर्वी घसरण झाली होती. चियाचे दर १८ हजार रुपये प्रती क्विंटलच्या खाली घसरले होते. काल मात्र चियाच्या दरात मोठी सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत काल चियाला किमान १७ हजार ६०० रुपये ते कमाल २० हजार ७०१ रुपये प्रती क्विंटलपर्यंतचे दर मिळाले. काल बाजारात २८० क्विंटल चियाची आवक झाली होती. चियाच्या दरात सुधारणा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून,दरवाढीमुळे येत्या हंगामातही जिल्ह्यात चियाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे
11
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 10, 2025 04:16:14Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_ATTACK
गाडी अडवून कोयता आणि काठ्यांनी बेदम मारहाण
धाराशिव मध्ये कॉन्ट्रॅक्टवर असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला
मास्क लावून मोटरसायकलवर आलेल्या हल्लेखोराने केला हल्ला
भूम पंचायत समितीचे तांत्रिक अधिकारी रवी राख व त्यांचा सहाय्यक कृष्णा बांगर दोघांवर झाला हल्ला
भूम तालुक्यातील अंद्रूड रस्त्यावर घडली घटना, रस्ता विचारण्याचा बहाणा करून थांबवली गाडी, दोन्ही कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण
एका कर्मचाऱ्याला बीड येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे
याप्रकरणी वाशी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
11
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 10, 2025 04:04:53Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0909ZT_WSM_BIKE_THIEF_ARRESTED
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर:वाशिमच्या रिसोड पोलिसांनी वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका टोळीला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल १२ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.जप्त झालेल्या मोटारसायकलीं ची एकूण किंमत सुमारे ८लाख २५ हजार रुपये इतकी आहे.गेल्या काही दिवसांत रिसोड व परिसरात मोटारसायकल चोरीच्या घटनांत वाढ झाली होती.या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी दोन संशयित तरुणांना ताब्यात घेतले.चौकशीत त्यांनी वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील विविधठिकाणांहून मोटारसायक ली चोरी केल्याची कबुली दिली.त्यानंतर विविध ठिकाणांहून चोरी गेलेल्या १२ मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास रिसोड पोलिस करत आहेत.
6
Report