Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

भाजपा किसान मोर्चा: शेतकऱ्यांना तात्काळ नगदी पीकविमा द्या!

NMNITESH MAHAJAN
Aug 14, 2025 12:34:17
Jalna, Maharashtra
FEED NAME : 1408ZT_JALNA_BJP_MORCHA(2 FILES) जालना : पिकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना नगदी स्वरूपात द्या,भाजपा किसान मोर्चाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी अँकर : दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविम्याची रक्कम जमा झालीय.मात्र अनेक शेतकरी अजूनही पिकविम्यापासून वंचित आहेत.या पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ पिकविम्याची रक्कम जमा करा अशी मागणी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जालन्यातील जयपूर भागातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा झाला आहे मात्र बँकांनी थकीत कर्जापोटी पिकविम्याची रक्कम कर्ज खात्यात वळवली आहे.ही रक्कम कर्ज खात्यात न वळवता शेतकऱ्यांना नगदी स्वरूपात वाटप करा अशीही मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलीय. शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेल्या पीकविमा कर्ज खात्यात वळवू नका भाजपा किसान मोर्चाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
13
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
Aug 14, 2025 15:01:41
Parbhani, Maharashtra:
अँकर- स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत आज परभणी शहरात 300 मीटर लांबीच्या तिरंगा ध्वजाची पदयात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली. शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कमानी पासून या पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. या पदयात्रेत विद्यार्थी वेगवेगळ्या संघटना माजी सैनिक शहरातील भारतीय नागरिकांचा सहभाग बघायला मिळाला.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Aug 14, 2025 14:31:47
Parbhani, Maharashtra:
अँकर- हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मगदार संघात असलेल्या मळई या आदिवासिंच्या गावाला स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर ही पक्का रस्ता नसल्याने गर्भवती महिलेला खाटावरन रुग्णालयात नेण्याची संतापजनक घटना समोर आलीय. हिंगोलीच्या कळमनुरी मतदार संघातील मळई या चारशे लोकवस्ती असलेल्या आदिवासी गावाला स्वातंत्र्यपूर्व काळापासून पक्का रस्ताच नसल्याने येथील नागरिकांना रुग्णालयात नेत असतांना आज ही असे खाटेवर उचलून न्यावं लागतेय, मेकिंग इंडिया आणि डिजिटल इंडियाच्या आपण गप्पा मारत असतांना ग्रामीण भागात मात्र वेगळंच चित्र आहे, येथील आदिवासींना अश्या रोजच मरणयातना भोगाव्या लागत आहेत. हिंगोली जिल्ह्यात शेकडो आदिवासी गाव आहेत,त्यापैकी अनेक गावात जायला आज ही पक्का रस्ता तर सोडाच पाई चालण्यासाठी नीट पाई वाट ही नाहीये,त्यापैकीच मळई हे एक गाव आहे. आदिवासी गावांना रस्त्यासारख्या मूलभूत सुविधा मिळत नसल्याने येथील नागरिक सरकार विरोधात संताप व्यक्त करीत आहेत. मळई येथील सरसाबाई शेळके या गरोदर महिलेला प्रसूतीपूर्व पोटात वेदना होत असल्याने त्यांना तपासणीसाठी रुग्णालयात न्यायचे होते. मात्र गावातुन रस्ता नसल्याने गावकर्यांनी त्यांना खाटेवर झोपवून रुग्णालयात नेलय. आमदार संतोष बांगर यांच्या मतदार संघातील हे गाव आहे, आदिवासींचे जेष्ठ नेते नरहरी झिरवाळ या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. किमान ते तरी आता या आदिवासींच्या जीवनातील खडतर प्रवास सुखकर करण्यासाठी पाउल उचलतील का हे बघावं लागणार आहे. बाईट-वर्षा पांडे- ग्रामस्थ,महिला बाईट- छाया नर्मले- अशावर्कर
3
comment0
Report
GMGANESH MOHALE
Aug 14, 2025 14:05:24
Washim, Maharashtra:
वाशिम: File:1408ZT_WSM_TIRNGA_LOGO रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर: स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून वाशिमच्या कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालयात हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात मानवी साखळी तयार केली.आरोग्यदायी जीवन, सशक्त राष्ट्र, पर्यावरण वाचवा,वंदे मातरम, भारत माता की जय, एक भारत अशा जोशपूर्ण घोषणांनी परिसर देशभक्तीमय झाला.
5
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Aug 14, 2025 13:50:51
Nala Sopara, Maharashtra:
Date-14aug2025 Rep-prathamesh tawade Loc-nalasopara Slug-NALASOPARA BOGUS Feed send by 2c Type-Av आपण ही बातमी याआधी केली होती त्यात अपडेट https://youtu.be/GdkwpJ53U2c?si=roBzSjyrUZ-0zyuy Slug- नालासोपाऱ्यातील सुषमा गुप्ता नाव बोगस पत्ता शोधून स्थानिक नागरिकांनी दिली माहिती विधानसभा निवडणुकीत क्षितिज ठाकूर यांनी दिली होती माहिती अँकर - नालासोपाऱ्यात माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मतदार संघातील सुषमा गुप्ता या बोगस मतदार महिलेचे सहा वेळा नाव आल्याचे उजेडात आणले होते...राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर लक्ष वेधल्यानंतर नालासोपाऱ्यात सुषमा गुप्ता हे नाव बरेच चर्चेत आले आहे ... नालासोपाऱ्यातील नगीनदास पाडा परिसरात जीवदानी माता चाळ कमिटी या चाळीत सुषमा गुप्ता राहते, असा उल्लेख निवडणूक आयोगाच्या मतदार यादीत करण्यात आला आहे केवळ नावच नव्हे, तर फोटोसह या पत्त्याची नोंद अधिकृत यादीत आहे. मात्र, स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, सुषमा गुप्ता या पत्त्यावर कधीच राहिल्या नाहीत. त्यामुळे मतदार यादीतील या नोंदीची सत्यता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले असून, निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे...चुकीची नोंद तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. निवडणूक आयोगाकडून प्रत्येक निवडणुकीपूर्वी मतदार यादीची तपासणी व अद्ययावत करण्याचे काम केले जाते. तरीसुद्धा अशा चुका घडत असल्याने नागरिकांच्या शंका वाढल्या आहेत. बाईट- ब्रिजेश शुक्ला, स्थानिक नागरिक.
10
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Aug 14, 2025 13:50:12
Virar, Maharashtra:
Date-14july2025 Rep-prathamesh tawade Loc-nalasopara Slug-VIRAR ED ACTION Feed send by 2c Type-Av for 2c entry Slug -नालासोपारातील ४१ अनधिकृत इमारतींच्या घोटाळ्यात ईडीकडून चौघांना अटक वसई-विरार : वसई-विरार परिसरात उभारण्यात आलेल्या ४१ अनधिकृत इमारतींच्या प्रकरणात प्रवर्तन निदेशालयाने (ED) आज सक्त कारवाई करत ४ जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये अनिल कुमार पवार, वाय.एस. रेड्डी, सीताराम गुप्ता आणि अरुण गुप्ता यांचा समावेश आहे. अटक झालेल्या सर्वांना पुढील कारवाईपूर्वी जे.जे. रुग्णालय, मुंबई येथे वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे. या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर मनी लॉन्ड्रिंग व बेकायदेशीर आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप असून, ईडीच्या तपासातून आणखी काही नावं समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
11
comment0
Report
JMJAVED MULANI
Aug 14, 2025 13:48:43
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 1408ZT_INDAPURCCTV FILE 1 इंदापूरच्या तक्रारवाडीत दिवसाढवळ्या दुचाकीची चोरी..... चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाली कैद Anchor _ इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी मधून दिवसाढवळ्या दोनच्या सुमारास राहुल सावंत यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे.चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हा चोरटा स्पष्टपणे चोरी करताना दिसून येतोय, भिगवण पोलिस या अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत.
13
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Aug 14, 2025 13:48:38
Raigad, Maharashtra:
स्‍लग – खरबाची वाडीला जिल्‍हाधिकारी यांची भेट ........ अँकर – संवाद सेतू कार्यक्रमाअंतर्गत रायगडचे जिल्‍हाधिकारी किशन जावळे यांनी माणगाव तालुक्‍यातील खरबाची वाडी या आदिवासी वाडीला भेट दिली. गावात काम करणारया स्‍वदेस फाऊंडेशनच्‍या कार्यकर्त्‍यांशी चर्चा करून ति थल्‍या विकास कामांचा आढावा घेतला. जिल्‍हाधिकारी यांनी यावेळी गावातील काही घरांनाही भेटी देवून आदिवासी बांधवांशी संवाद साधत त्‍यांच्‍या समस्‍या जाणून घेतल्‍या.
7
comment0
Report
YKYOGESH KHARE
Aug 14, 2025 13:35:16
Nashik, Maharashtra:
Nsk_chavhanblame Feed by 2C अँकर संपूर्ण राज्यामध्ये सध्या ईव्हीएम आणि मतदान यादी मधील घोळ चर्चेमध्ये आहे. जिल्हा जिल्ह्यामध्ये संशयास्पद नाव मतदार यादी मध्ये समाविष्ट झाल्याचा समोर येत आहे. अशातच नाशिक जिल्ह्यातील बागलाण विभागाचे माजी आमदार यांनी गुजरात मधील एका माणसाने आपल्याला ईव्हीएम मॅनेज करण्यासाठी संपर्क केल्याचं सांगत खळबळ उडून दिली आहे Vo 1 नाशिक जिल्ह्यातील बागलाण मतदारसंघाचे हे आहेत माजी आमदार संजय चव्हाण... सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षांमध्ये ते कार्यरत आहेत..चव्हाण यांच्या पत्नी दीपिका बागलाण विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी-सपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत होत्या. तथापि, त्यांचा भाजप उमेदवार दिलीप बोरसे यांच्याकडून 1.29 लाख मतांनी पराभव झाला...मात्र या मतदानापूर्वी विधानसभेमध्ये गुजरातमधील एका माणसाकडून 5-8 कोटी रुपयांना ईव्हीएममध्ये फेरफार करण्याची ऑफर देण्यात आली, असा दावा राष्ट्रवादी-सपाचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी केला आहे. Byte माजी आमदार संजय चव्हाण Vo 2 राष्ट्रवादी-सपा प्रमुख शरद पवार यांनी महाराष्ट्र विकास आघाडी (MVA) शी संपर्क साधून "EVM व्यवस्थापन" द्वारे 288 पैकी 160 जागा जिंकण्यास मदत करु शकतात असा दावा करणाऱ्या दोन व्यक्तींनी केला होता, असा आरोप केल्यानंतर काही दिवसांतच राष्ट्रवादी-सपाचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी हा खळबळजनक दावा केलाय संजय राऊत यांनी सुद्धा असाच संपर्क उद्धव ठाकरे यांनाही करण्यात आला होता असे म्हटले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रेस कॉन्फरन्स नंतर आरोप प्रत्यरोपांमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने याबाबतचा निष्पक्ष अहवाल समोर ठेवण्याची गरज आहे
7
comment0
Report
PNPratap Naik1
Aug 14, 2025 13:35:09
Kolhapur, Maharashtra:
Kop Sugar Rate PKG Feed :- Live U Anc :- आत्ता बातमी महागाईची. मागील हंगामात साखरेचे घटलेले उत्पादन, केंद्र सरकारने कमी केलेला साखरेचा कोटा त्यात देशांतर्गत बाजार पेठेत साखरेची वाढलेली मागणी यामुळे साखरेने घाऊक बाजार पेठेत उच्चाकी दर गाठला आहे.. ऐन सणासुदीमध्ये साखरेचे किलो पाठीमागे 3 ते 4 रुपयांनी दर वाढल्यामुळे सर्वसामान्याचे कंबरडे पून्हा एकदा मोडले आहे. GFX In घाऊक बाजार पेठेत साखरेने गाठले उच्चाकी दर. किलो पाठीमागे 3 ते 4 रुपये वाढले साखरेचे दर. 39 रुपये किलोनी मिळणारी साखर पोहचली 42 ते 43 रुपये किलोपर्यत. दिवाळी पर्यत आणखी साखरेचे भाव वाढणार का? याची ग्राहकांना भीती GFX Out VO 1:- मागणी आणि पुरवठा मध्ये मोठी तफावत निर्माण झाल्यानंतर महागाई वाढते हा बाजार सिद्धात आहे. साखरे बाबतही हेच झालंय. साखर कारखान्याच्या मागील गळीत हंगामात गाळपाचे गणित बिघडल्यामळे साखरेचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे बाजार पेठेत साखरेचे भाव वाढले आहेत.. त्यामुळे 3800 रुपये क्विंटल रुपयांनी मिळणारी साखर 4250 पर्यत पोहचली आहे. त्यामुळे घाऊक बाजारपेठेत साखरेची उचल कमी झाली आहे. Byte :- मनोज नष्टे, व्यापरी VO 2 :- आगामी काळात गणेशोत्सव, दसरा, दिवाळी हे सण सलग आहेत. या सणांपूर्वीच साखरेचे भाव वाढले आहेत. ऐन सणासुदीला हे दर अधिक वाढणार का याची भीती ग्राहकांमध्ये आहे. त्यामुळे सरकारने तातडीने यामध्ये हस्तक्षेप करावे अशी मागणी ग्राहक करत आहे. Byte :- विजय मेटकर, ग्राहक VO 3:- मागील हंगामात ब्राझीलमध्ये साखर उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेला प्रतिक्विंटल 3900 रुपये दर आहे. त्यापेक्षा देशांतर्गत बाजारपेठेत साखरेला चांगले भाव मिVO असल्याने साखर कारखानदारांनी निर्यातीकडे कानाडोळा केला. साखर कारखानदार यांना साखरेचे प्रति क्विंटल 100 रुपये अधिक दर मिळाल्याने ते समाधानकारक आहेत.. पण हे दर अधिक वाढणार नाहीत याची काळजी सरकार घेईल असं साखर अभ्यासक यांना वाटतंय. Byte :- अवताडे, साखर अभ्यासक VO 4:- साखर अभ्यासकाना सरकार यापेक्षा अधिक दर वाढू देणार नाहीत याची काळजी घेतील असं वाटतंय. अभ्यासकानी व्यक्त केलेला अंदाज खरा ठरो अन्यथा महागाईच्या झळामध्ये सर्वसामान्य नागरिक भरडले जातील हे नक्की . प्रताप नाईक जी 24 तास कोल्हापूर
11
comment0
Report
YKYOGESH KHARE
Aug 14, 2025 13:35:04
Nashik, Maharashtra:
nsk_tollpkg feer by 2C Anchor देशभरातील विविध राज्यांमधील राष्ट्रीय महामार्गावर 15 ऑगस्ट पासून तीन हजार रुपयात वर्षभर मनसोक्त प्रवास करता येणार आहे... मात्र या योजनेतील पाच मिळवायचा असेल तर जरा सांभाळूनच.... सध्या याबद्दलच्या विस्तृत सूचना नसल्यामुळे आपली फसवणूक होऊ शकते. बघूया हा पास कसा करायचा आहे Vo 1 देशांतर्गत महामार्ग सुस्थितीत आणि वेगवान होत असल्याने अनेक नागरिक आपल्या वाहनांनी पर्यटनासाठी विविध राज्यांमध्ये जाताना दिसतात.. मात्र त्यांना लागणारा टोल हा त्यांच्या पेट्रोल खर्चाच्या बरोबरीने असतो... सर्वसामान्यांना एकूणच वाढत्या टोल मधून आणि प्रवास खर्चातून दिलासा देण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आता तीन हजार रुपयांचा वार्षिक पास 15 ऑगस्ट पासून लागू केला आहे... हा पास काढण्यासाठी तुम्हाला NHI app किंवा राजमार्ग यात्रा या ॲपला डाऊनलोड करावे लागेल. या ॲपमध्ये फास्टट्रग रिचार्ज ची सोय देण्यात आली आहे... किंवा थेट एन एच आय च्या वेबसाईटवर जाऊन आपण आपला पास डेबिट कार्ड अथवा यूपीआय पेमेंट द्वारे करून घेऊ शकता.. सध्या ही सुविधा उपलब्ध झालेली दिसून येत नसली तरी आज उशिरा रात्रीपर्यंत ही सुविधा वेबसाईटवर आणि ॲप मध्ये उपलब्ध होऊ शकते.. सध्या वेगवेगळ्या लिंक आणि ॲप आपल्याला वेगवेगळ्या सूचना देत आहेत मात्र कुठेही पेमेंट करताना त्याची विश्वासार्हता तपासून बघा अन्यथा उद्यापर्यंत पास काढण्याची वाट बघा Byte 1 नवनाथ केदार टोल मॅनेजर सिन्नर एन एच आय Vo 2 या पासचा वापर केंद्रीय वाहतूक मंत्रालयाच्या आत्यारीत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग आणि राष्ट्रीय द्रुतगति महामार्गांवर करता येणार आहे... मात्र यामध्ये अजून काही अडचणी आहेत 1) ज्यामध्ये स्थानिक लोकांना असलेली सवलत कशी मिळणार याबद्दलचा खुलासा नाही 2) मंथली पास घेणाऱ्या नोकरदारांना आता अटीनियम बदलणार की तेच राहणार याबद्दल स्पष्टता नाही 3) खाजगी वाहने आणि व्यावसायिक वाहने यांच्या ट्रॅफिक लेन एकच असल्यामुळे टोलवर कोळंबा हा कायम राहण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे या वेगवेगळ्या असाव्या अशी मागणी आहे Byte 2 प्रादेशिक अधिकारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नाशिक ( हा बाईट पाच ते 6 वाजेपर्यंत मिळेल, आला की पाठवतो) Vo 3सध्या यात काही अडचणी असल्या तरी मात्र या पासेसमुळे आंतर राज्यीय वाहतूकिल्ला चालना मिळून पर्यटन व्यवसायामध्ये वृद्धी होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला सर्व सामान्यांना वाढत्या टोलच्या आर्थिक भारामधून सुटका होण्यास मदत होईल. आता गरज आहे ही योजना आणि त्याचे नियम समजावून वाहनधारकांनी या योजनेला प्रतिसाद देण्याची
12
comment0
Report
AAASHISH AMBADE
Aug 14, 2025 13:33:05
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1408ZT_CHP_BALLARPUR_LAND ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरमध्ये 210 पात्र लाभार्थ्यांना घराचे पट्टे वाटप, आ. सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील  बल्लारपूर येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (शहरी) 210 निवासी पट्ट्यांचे वितरण करण्यात आले. शासनाच्या जागेवरील अतिक्रमणाचे नियमन करून करण्यात आलेल्या या वाटपामुळे अनेक कुटुंबांच्या आनंदात भर पडली. हा केवळ पट्टे वाटपाचा कार्यक्रम नसून, भविष्यातील सुमारे 12 हजार पात्र लाभार्थ्यांना हक्काचे घरपट्टे देण्याच्या महाअभियानाची भक्कम नांदी आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. त्यांच्या हस्ते बल्लारपूर, नाट्यगृह येथे पट्टेवाटप करण्यात आले. बल्लारपूर मतदारसंघात अत्याधुनिक सैनिक शाळा, बॉटनिकल गार्डन, एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे उपकेंद्र, नगरपरिषदेची नवीन इमारत, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, स्व. सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्र, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय अशी मोठी कामे साकारण्यात आल्याचे ते म्हणाले.  आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
10
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Aug 14, 2025 13:32:45
Akola, Maharashtra:
Anchor : अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात गणेशोत्सव व धार्मिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सर्वधर्मीय शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती..आगामी गणेशोत्सव तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सर्वधर्मीय शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली..या बैठकीस महावितरण, पोलिस, महसूल, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते..बैठकीदरम्यान गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनी सणाच्या काळात भेडसावणाऱ्या विविध समस्यांची माहिती दिली..यावर जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी तात्काळ तोडगा काढण्यासाठी संबंधित विभागांना निर्देश दिले..तसेच सण शांततेत, सुव्यवस्थित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी परस्पर सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
5
comment0
Report
JMJAVED MULANI
Aug 14, 2025 13:32:23
Baramati, Maharashtra:
JAVED MULANI SLUG 1408ZT_INDAPURMAHSUL FILE 5 इंदापुरात महसूल कर्मचारी संघटनेने केलं एक दिवस लेखणी बंद आंदोलन Anchor_ इंदापूर मधील महसूल कर्मचारी संघटनेने एक दिवस लेखणी बंद आंदोलन केलेय. इंदापूर शहरातून पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत मंडळ अधिकारी अशोक पोळ यांना दमदाटी शिवीगाळ करत मारहाण करणाऱ्या आणि मंडळ कार्यालय जाळून टाकत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या त्या दोन पक्षकार महिलांवर कारवाई करण्याच्या मागणीच निवेदन इंदापूर पोलिसांना देण्यात आलंय. अशोक संपत पोळ यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५० अन्वये अधिनियमीत व कायदेशीर पद्धतीने पारीत केलेल्या अर्धन्यायिक आदेशाने संबंधित प्रकरणामधील पक्षकार यांनी व्यथीत होऊन मंडल अधिकारी कार्यालय इंदापूर मध्ये १३ ऑगस्ट रोजी अशोक पोळ अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत त्यांचेवर हल्ला केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
12
comment0
Report
ABATISH BHOIR
Aug 14, 2025 13:17:27
Kalyan, Maharashtra:
आयुक्त तोंड दाखवत नाहीत तर अतिरिक्त आयुक्त खोटं बोलतायत ... हिंदू खाटीक समाज आंदोलनावर ठाम उद्या 15 ऑगस्ट रोजी केडीएमसी मुख्यालयासमोर आंदोलन Anc...कल्याण डोंबिवली महानगरपालिका 15 ऑगस्ट रोजी चिकन मटन विक्री बंदीच्या निर्णयावर ठाम आहे अनेकदा विनंती निवेदन देऊन देखील केडीएमसी ठाम असल्याने हिंदू खाटीक समाजाने आक्रमक पवित्रा घेतलाय .आयुक्त तोंड दाखवत नाहीत तर अतिरिक्त आयुक्त खोटं बोलतायत.. आमचं उद्याचे आंदोलन कसे असेल हे उद्याच दिसेल असा इशारा हिंदू खाटीक समाजाच्या वतीने देण्यात आले कल्याण डोंबिवली मध्ये 15 ऑगस्ट रोजी चिकन मटन विक्रीवर बंदी आणण्याचा निर्णय कल्याण डोंबिवली महापालिकेने घेतला त्यानंतर गेला आठवडाभरापासून कल्याण डोंबिवली महापालिके विरोधात राजकीय पक्ष हिंदू खाटीक समाज तसेच इतर संघटना या रोष व्यक्त करतात हा निर्णय मागे घेण्याची मागणी करत आहेत . आज हिंदू खाटीक समाजाच्या प्रतिनिधींनी अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांची भेट घेतली यावेळी झालेल्या बैठकीत 15 ऑगस्ट रोजी चा चिकन मटन बंदीचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली मात्र अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी 1988 च्या ठरावाचा दाखला देत यंदा हा निर्णय मागे घेणे शक्य नसल्याचे सांगितले तसेच .इतक्या वर्षात यंदा विरोध होतोय त्यामुळे यापुढे याबाबत चर्चा केली जाईल असं आश्वासन दिल .हिंदू खाटीक समाजाच्या प्रतिनिधींनी या बैठकीत केडीएमसीच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली .मटन चिकन विक्री हा हिंदू खाटीक समाजाचा व्यवसाय आहे.. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो आमच्यावर अन्याय करू नका.. तुम्ही 1988 च्या ठरावाचा दाखला देता मात्र हा ठराव महापालिकेने केलाय शासनाने नाही .. . आम्ही आयुक्तांच्या भेटीसाठी वेळ मागतोय मात्र आयुक्त वेळ देत नाहीत ,आम्ही काही गुन्हा केलाय का ? असा सवाल केला.आयुक्त तोंड दाखवत नाहीत तर अतिरिक्त आयुक्त खोटं बोलतायत असा हल्लाबोल केला . केडीएमसी आपल्या भूमिकेवर ठाम आहे त्यामुळे आमचं उद्याचे आंदोलन कसे असेल हे उद्याच दिसेल असा इशारा देखील हिंदू खाटीक समाजाच्या वतीने देण्यात आला byte... संतोष घोणे हिंदू खाटीक समाज अध्यक्ष
13
comment0
Report
AAASHISH AMBADE
Aug 14, 2025 13:15:54
Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 1408ZT_GAD_RANBHAJI_FEST ( single file sent on 2C)  टायटल:-- गडचिरोलीत आत्मा ने आयोजित केला रानभाजी महोत्सव, शासकीय कृषी महाविद्यालय परिसरात आयोजित महोत्सवाला मोठा प्रतिसाद, जिल्हाभरातून आदिवासी शेतकऱ्यांनी 80 स्टॉलची केली उभारणी    अँकर:--गडचिरोलीत रानभाज्यांचा महोत्सव सुरू झालाय. गडचिरोलीकरांचा या महोत्सवाला भरभरून प्रतिसाद लाभलाय. ग्रामीण भागात वास्तव्याला असणा-या आदिवासींना या कोसळधार पावसात तब्येत कशी टिकवून ठेवायची याचे गुपित माहित होते. ते होते त्या त्या भागातील रानभाज्या. या रानभाज्यांचे विविध पदार्थ या मोसमात जेवणात असले की तब्येत ठणठणीत. विस्मरणात गेलेल्या अनेक  रानभाज्या आजही दुर्गम आदिवासी भागात त्याच चवीने ग्रहण केल्या जातात. मात्र शहरी नागरिकांना याची माहितीच नसते. अशा भाज्यांची ओळख आणि त्यांचे आहारातील चलन वाढावे यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेने रानभाजी महोत्सव आयोजित करत पुढाकार घेतला. आणि बघता बघता तब्बल 80 रानभाज्या महोत्सवात दाखल झाल्या. अळींबी, बांबू, काटवल, लालमाठ, वाघाटी, बोपली, शेवगा, राजगिरा, अंबाडी, कढीपत्ता, शरणी, अळू, चाकवत, बोरु, चवळी, आंबटचुका, करडई पाने, तांदुळजा, गुलवेल, कुयरी, वारकु, करडकोसला, करंजी, केना, पीठपापडा, विंचू, जिवती, फांदी, पोई, कुडा, टाकळा/तरोटा, पातुर, कपाळफोडी, आंबुशी, कुरडू, खापरखुटी, चिवळ, आघाडा, घोळभाजी, मटारु, भुईआवळा, सुरण, दिंडा आदींचा यात समावेश होता. रानभाज्या पावसाळ्यातील विविध आजारांना पळवून लावण्यासाठी गुणकारी आहेत. यातील भाज्या केवळ पावसाळ्यात उगवत असल्या तरी काही औषधी गुण असलेल्या भाज्या बारमाही उत्पादित करून गडचिरोलीतील निसर्गरम्य आणि प्रदूषणाचा लवलेश नसलेल्या जिल्ह्यात शेतक-याना पदरी २ पैसे अधिक पडण्याची शक्यता मिळवून देतात. आशीष अम्बाडे झी मीडिया गडचिरोली
13
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top