Back
मराठवाड़ा में कुणबी प्रमाणपत्र के लिए बड़ी तैयारी, दो दिनों में प्रशिक्षण शुरू
VKVISHAL KAROLE
Sept 10, 2025 08:01:54
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn divisonal commissioner byte
Feed by tvu
हैदराबाद गॅजेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी सरकारची चांगलीच लगबग सुरू आहे यात आता पुढील दोन दिवसात तलाठी, ग्रामसेवक , सहाय्यक कृषी अधिकारी यांच्यासाठी खास प्रशिक्षण आयोजित करण्यात येईल अशी माहिती विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी दिली आहे.. सोबतच लोकांनी कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज करावे कारण ही प्रक्रिया अर्जानूरूप चालते असेही त्यांनी सांगितले.. 17 सप्टेंबर म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिवशी प्रमाणपत्र पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्याचं धोरण सरकारनं ठरवलंय मात्र लोकांनी अर्ज केल्यावरच ही प्रक्रिया सुलभ होईल त्यामुळे लोकांनी तहसीलदाराकडे अर्ज करावे असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले आहे..
Byte जितेंद्र पापळकर, विभागीय आयुक्त मराठवाडा
6
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowSept 10, 2025 10:47:05Sinnar, Maharashtra:
अँकर:- सिन्नर तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला असून दोन दिवसांपूर्वीच पंचाळ येथील दहा वर्षाचा मुलगा बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाला होता
दरम्यान
नायगाव येथील दिगंबर कातकाडे यांच्या शेतामध्ये सकाळी साडेसातच्या सुमारास दोन ते तीन बिबट्यांचे वास्तव्य निदर्शनास आले असून नारळाच्या झाडावर बिबट्या असलेला व्हिडिओ स्थानिक रहिवाशांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद केला आहे
या भागात बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 10, 2025 10:33:24Junnar, Maharashtra:
Feed 2C
Slug: Junnar Dj Accident
File:04
Rep: Hemant Chapude(Junnar)
ब्रेकींग न्युज
जुन्नर पुणे...
Anc: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नर शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकी दरम्यान डीजे च्या गाडीचा ब्रेक फेल होऊन ढोल पथकातील तीन ते चार जणांना गाडीने चिरडलंय, या दुर्दैवी घटनेत सर्वांची प्रकृती गंभीर असून त्यांच्या वरती जुन्नर मधील खाजगी रुग्णालयात उपचार आहेत,महत्वाचं म्हणजे डीजे वरती बंदी असताना देखील देवराम लांडे यांना आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी डिजे वाजवण्याला परवानगी मिळाली कशी आणि त्यांनी ही मिरवणूक काढली कशी असा सवाल आता नागरिकांकडून केला जातोय.
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया जुन्नर पुणे...
0
Report
SNSWATI NAIK
FollowSept 10, 2025 10:20:08Navi Mumbai, Maharashtra:
story slug - पनवेल मद्ये साखर चतुर्थी च्या गणपती ची स्थापना
पनवेल मे गणेशोत्सव के बाद गणपती की स्थापना
ftp slug - nm panvel ganesh
shots- ganpati mandal
reporter- swati naik
navi mumbai
Anchor- रायगड पनवेल मद्ये अनंत चतुर्दशी नंतर येणाऱ्या पहिल्या संकष्ट चतुर्थीला गणपती बसवण्याची प्रथा आहे ,घरगुती तसेच सार्वजनिक स्वरूपात हे गणपती बसवले जातात याला साखर चतुर्थी चे गणपती म्हणून ओळखले जातात , व्यापाऱ्यांना कष्टकर्यांना गणपती उत्सवामद्ये गणेशोत्सव साजरा करता येत नाही यामुळे अनंत चतुर्थी नंतर येणारे पहिल्या संकष्टी ला दीड दिवसाचे सार्वजनिक आणि घरगुती गणपती बसवतात ,पनवेल मद्ये 25 हुन अधिक सार्वजनिक गणपती मंडळे हा उत्सव साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात
- gf
0
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 10, 2025 10:18:38Parbhani, Maharashtra:
अँकर- बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्गामध्ये समावेश करून बंजारा समाजाला हेद्राबा द गॅझेट मधील नोंदीनुसार बंजारा समाजाला आदिवासींचे आरक्षण द्यावे या मागणीसाठी परभणीच्या जिंतूर येथे मागील सहा दिवसांपासून विनोद आडे यांनी आमरण उपोषणाच हत्यार उपसलय. आडे यांच्या या उपोषणाला संपूर्ण महाराष्ट्रभरामधून मोठा प्रतिसाद मिळत असून आणि आरक्षणाच्या मागणीवरून आक्रमक झाले आहेत. आडे यांच्या मागणीला पाठिंबा म्हणून आज जिंतूर येथे बंजारा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. या रास्तारोको मध्ये मोठ्या संख्येने बंजारा बांधव सहभागी झाले आहेत. यामध्ये महिलांचा ही मोठा सहभाग आहे... उपोषणकर्ते आडे यांची माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी भेट घेत मागण्यांला आपला पाठिंबा दर्शवलाय. तर परभणीचे खासदार संजय जाधव ही उपोषणकर्त्याची मागणी जाणून घेण्यासाठी उपोषणस्थळी दाखल झाले आहेत...
2
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 10, 2025 10:18:28Washim, Maharashtra:
वाशीम:
File:1009ZT_WSM_BANJARA_RESERVATION_MORCHA
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर: हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे,या मागणीसाठी गोर सेनेकडून आज वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.त्याच गॅझेटमध्ये बंजारा समाज अनुसूचित जमातीत असल्याची नोंद आहे.त्यामुळे बंजारा समाजालाही एसटी प्रवर्गातून आरक्षण लागू करावे,अशी मागणी गोर सेनेकडून करण्यात आली.या मागणी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून,मागण्या मान्य न झाल्यास देशभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गोर सेनेकडून देण्यात आला या मोर्चात बंजारा समाजातील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
बाईट:प्रा.अनिल राठोड,
2
Report
AKAMAR KANE
FollowSept 10, 2025 10:17:32kolhapur, Maharashtra:
नागपूर
- नागपूर जिल्ह्यातील दहेगाव- गोवरी भूमिगत कोळसा खदान प्रकल्पाची पर्यावरण विभागाची सुनावणी दरम्यान b गोंधळ..
- या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या १० ग्राम पंचायतींनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे.
- मोठ्या प्रमाणात नागरिक विरोध नोंदवत दाखल झाले...
- मोठया प्रमाणात नागरिकांचा रोष बघता सूनवाई पुढे ढकलण्यात आली ..
- मोठ्या प्रमाणात 10 ग्रामपंचायत चे नागरिक या ठिकाणी आले होते
- नागरिकांनी घोषणाबाजी करत रोष व्यक्त केला त्यानंतर त्यानंतर हा रोष प्रशासनाला जसाच्या तसा नोंदविण्यात येईल असं उपजिल्हाधिकारी यांच्या कडून सांगण्यात आलं...
- नागरिकांचा या खदानीला विरोध बघता सुनावणी रद्द करण्यात आली..
0
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 10, 2025 09:48:37Chandwad, Maharashtra:
अँकर :- कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत असल्याने नाशिकच्या चांदवडमध्ये प्रहार शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. संतप्त शेतकऱ्यांनी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली चांदवड प्रांताधिकारी कार्यालयाच्या केबिनमध्ये शेतकऱ्यांनी कांदे ओतत ठिय्या आंदोलन करीत प्रशासनाला जाब विचारला. साहेब, आम्हाला ईच्छा मरण द्या.. आधी आर्त हाक शेतकऱ्यांनी दिली.कांद्याला प्रतिकिलो ८ ते १० रुपये भाव मिळत आहे.नाफेड, एनसीसीएफच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करीत चांदवड प्रांतअधिकारी कार्यालयावर कांद्याचा ट्रॅक्टर आणून मोर्चा काढत प्रवेशद्वारासमोर जोरदार निदर्शने केले.यावेळी आंदोलकांनी ओटीमध्ये कांदा आणत प्रांताधिकारी कार्यालयाच्या केबिनमध्ये कांदा ओतून ठिय्या सुरू केले. जिल्हाधिकारी, आयुक्त सचिव तसेच मंत्र्यांना फोन लावण्याची शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्याची मागणी केली.फोन लावत नाही तोपर्यंत ठिय्या सुरूच ठेवण्याचा निर्धार करीत प्रांताधिकाऱ्यांसमोर आक्रोश केला. यावेळी आंदोलकांनी प्रांत कार्यालयातच भजन किर्तन सुरू केले...
3
Report
SNSWATI NAIK
FollowSept 10, 2025 09:48:23Navi Mumbai, Maharashtra:
story slug - लोकल मद्ये फ्री स्टाईल हाणामारी व्हेएडिओ व्हायरल
ftp slug - nm local train fighting viral video
shots-
reporter - swati naik
navi mumbai
anchor - ठाणे वाशी लोकल मद्ये बसण्याच्या जागेवरून दोन प्रवाश्यांन मद्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली याचा व्हेएडिओ सध्या सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे, याबाबत रेल्वे पोलीस ठाण्यात कोणताही तक्रार दाखल नाही ।
gf
1
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 10, 2025 09:48:14Bhandara, Maharashtra:
भंडारा नगरपरिषदेसामोर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने जनसुनावणी आंदोलन....
ANCHOR :- ओबीसींना आरक्षण न मिळाल्यामुळे गेल्या चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेले आहेत असे असताना सर्व नगरपरिषदांचा स्थानिक स्वराज्य संस्थांचा रिमोट कंट्रोल हा राज्य सरकारच्या हातात आहे आणि कोणतेही सदस्य नसल्याने नागरिकांच्या अडचणी समस्या व गऱ्हाणे ऐकण्याकरिता कुणी नाही. अशातही मुख्यमंत्री म्हणतात की राज्यात रामराज्य आहे तर रामराज्यामध्ये कोणी आत्महत्या करत नव्हता, नागरिकांना अडचणी समस्या येत नव्हत्या. या सर्व नगरपरिषदा आता राज्य सरकार चालवत असून जवळपास 300 कोटींची काम झाली मात्र सर्व टेंडर मॅनेज करून झाली त्यामुळे आज आम्ही ज्या प्रकारे हा आंदोलन केला आहे. आमच्या समस्या जर हे भंडारा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी ऐकल्या नाही, सोडवल्या नाही तर आमचे वरिष्ठ नेते आहेत ते आमचे प्रश्न लावून धरतील. आणि म्हणून नागरिकांच्या समस्या तक्रारी जाणून घेण्याकरिता आम्ही हे आंदोलन केलेले आहे.
BYTE :- चरण वाघमारे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
2
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 10, 2025 09:46:11Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File.name : 1009ZT_MAVAL_FIRING
Total files : 05
Headline : शाळेतून घरी सोडल्याचं किरकोळ कारण आणि तरुणावर थेट गोळीबार
Anchor:
मावळ तालुक्यातील वडगाव परिसरातील केशवनगर भागात एका शालेय विद्यार्थिनीला घरी सोडल्याच्या किरकोळ कारणावरून तरुणांमध्ये वाद होऊन गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. वडगाव मधील न्यू इंग्लिश शाळेच्या समोर दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला काही तरुणांनी चारचाकी गाडीमध्ये घेत बेदम मारहाण केली. यावेळी या विद्यार्थ्यांचा चुलत भाऊ त्या ठिकाणी आला आणि चारचाकी मधील तरुण आणि विद्यार्थ्यांचा चुलत भाऊ यांच्या बाचाबाची झाली. मात्र या मारहाणीचं कारणही तितकच चक्रावणार होतं. या शाळेतील विद्यार्थ्यांना त्याच्या ओळखीच्या विद्यार्थिनीला तिच्या घरी सोडलं होतं याचाच राग मनात धरून या विद्यार्थिनीच्या नात्यातील तरुणांनी या विद्यार्थ्याला चार चाकी मध्ये घेत मारहाण केली होती.
VO 1 :
पण हे प्रकरण इतक्या सहजासहजी मिटलं नाही. विद्यार्थिनीच्या नात्यातील या तरुणांनी या विद्यार्थ्याच्या चुलत भाऊ असलेल्या अक्षय मोहिते वरती केशवनगर मधील एकविरा चौकात दुचाकीवरून येत गोळीबार केला. मात्र या दुर्घटनेमध्ये तो सुखरूप बचावला. अखेर या प्रकरणी अक्षय मोहिते यांनी वडगाव मावळ पोलिसात फिर्याद दिली आणि घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी या प्रकरणी विद्यार्थिनीचे नात्यातील तरुण अभिषेक राजाराम ओव्हाळ, रणजीत ओव्हाळ आणि प्रथमेश सुरेश दिवे या तिघांना अटक केली. त्यांच्यावरती शस्त्र अधिनियम कायदा तसेच तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल केला आहे .
BYTE: कुमार कदम, पोलिस निरिक्षक, वडगाव मावळ (file.no.05)
END VO:
नात्यातील विद्यार्थिनीला घरी सोडण्याचे शुल्लक कारण एखाद्याच्या जीवावर ही बेतू शकल असता हे या घटनेतून अधोरेखित झाला आहे. मात्र किरकोळ कारणासाठी अशाप्रकारे हत्यारांचा वापर कितपत योग्य हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. असं असलं तरी या तरुणांकडे हे पिस्तूल आलं कुठून हा तपास आता वडगाव पोलिस करत आहे.
1
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 10, 2025 09:45:47Parbhani, Maharashtra:
अँकर - दूध का सांडलं या किरकोळ कारणातून एका पतीने आपल्या पत्नीचा काटा काढल्याची घटना परभणीच्या पूर्णा तालुक्यातील बलसा या गावात घडलीय. यामुळे गृहिणी वर्गात एकच खळबळ माजलीय. याला पुरुषी मानसिकता ही जबाबदार असल्याचे आता पुढे येऊ लागलय.
व्हीओ- फोटोत दिसणारे हे व्यक्ती आहेत, परभणीच्या पूर्णा तालुक्यातील बलसा गावचे देविदास शिंदे, हा भोळा भाबडा चेहरा बघून हा व्यक्ती कुणाचा खून करेन यावर तुमचा विश्वास बसणार नाही,पण या व्यक्तीने दूध का सांडलस या शिल्लक कारणातून आयुष्यभर त्यांच्यासाठी राबणाऱ्या 45 वर्षीय पत्नीचा काटा काढलाय, यामुळे त्यांच्या तीन मुलांच मायेच छत्र हरवल आहे. सोमवारची ही घटना असून पत्नी सुनीताबाई शिंदे यांच्याकडून चुकून दूध सांडलं गेलं. यावरून पती देविदास शिंदे यांनी त्यांना मारहाण केली, यावेळी सुनीताबाई पतीला रागात बोलून शेती निघून गेल्या, पत्नी आपल्याला उलट कशी बोलू शकते,या भावनेने देविदास शिंदे यांचा तिळपापड झाला, पती ही पत्नीच्या पाठीमागे शेतात तिथे ही त्यांनी पत्नी सुनीताबाईला मारहाण केली. सोबत असलेल्या रुमालाने त्यांचा गळा आवळून जीवे ठार मारले, ताडकळस पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून नराधम पती देविदास शिंदेला बेड्या ठोकल्यात.
बाईट- रवींद्रसिंह परदेशी- पोलीस अधीक्षक, परभणी
व्हीओ- लहान सहान कामावरून देविदास शिंदे नेहमीच पत्नीची उनी धुनी काढायचे. पुरुषी मानसिकतेच्या पतीने पत्नीला कधीच सन्मान केला,पत्नीला समजून न घेता नेहमीच ते पत्नीवर राग करायचे,क्षणभराचा राग देविदास शिंदे यांना आयुष्यभर खडी फोडायला पाठवणार ठरलाय, त्यामुळे नागरिकांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला पाहिजेत अस आवाहन पोलीस नेहमीच करीत असतात.
बाईट- रवींद्रसिंह परदेशी- पोलीस अधीक्षक, परभणी
व्हीओ- लिटर दोन लीटर दूध सांडलेलं दुध विकत घेता येऊ शकते,पण गेलेला जीव कधी परत येत नाही, अलीकडच्या काळात लोक रागीट बनत चालली असून रागाच्या भरात आपलीच माणसं संपवत असल्याचे नेहमीच ऐकायला मिळत आहे,त्यामुळे समाजातील लोकांनी आता कौटुंबिक द्वेषभावना सोडून सहिष्णुतेने वागण्याची गरज निर्माण झालीय...
3
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 10, 2025 09:45:36Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
5 FILES
SLUG NAME -SAT_JANSURAKSHA
सातारा - जनसुरक्षा विधेयका विरोधात साताऱ्यात महाविकास आघाडी आणि श्रमिक मुक्ति दलाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.साताऱ्यातील पोवई नाक्यावरील शिवतीर्थ येथे या विधेयका विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको करण्यात आला आणि या विधेयकाची होळी करण्यात आली.यावेळी श्रमिक मुक्ति दलाचे भारत पाटणकर,काँग्रेस, उबाठा आणि शरद पवार पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाईट - भारत पाटणकर श्रमिक मुक्ति दल
रणजितसिंह देशमुख काँग्रेस जिल्हाध्यक्ष
3
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 10, 2025 09:34:12Jalna, Maharashtra:
FEED NAME | 1009ZT_JALNA_POLICE(14 FILES)
जालना : दुचाकी चालवणाऱ्या 30 अल्पवयीन मुलांना पकडले
पोलिसांनी पालकांना बोलाऊन दिली समज
यापुढे कडक कारवाई करणार
पोलिसांचा ईशारा
अँकर | जालना वाहतूक पोलिसांनी दुचाकी चालवणाऱ्या 30 अल्पवयीन मुलांना पकडून कारवाई केली आहे.दुचाकी वाहन चालवणारे सर्व मुलं 18 वर्षाखालील वयोगटातील आहेत.जालना वाहतूक पोलिसांनी 18 वर्षाखालील वाहनं चालवणाऱ्या मूलांवर कारवाई करण्याची मोहीम सुरु केली आहे.त्यामुळे आज पकडलेल्या मुलांच्या पालकांना बोलावून पोलिसांनी समज दिली.यापुढे अल्पवयीन मुलं वाहन चालवताना दिसल्यास कडक कारवाईचा ईशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.
बाईट : प्रताप इंगळे, पोलीस निरीक्षक, जालना वाहतूक शाखा
2
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 10, 2025 09:33:49Raigad, Maharashtra:
स्लग - जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात रायगड जिल्ह्यात आंदोलन ...... माणगाव इथं मोर्चा तर महाडमध्ये निदर्शने .......
अँकर - राज्यातील जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात आज रायगड जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले. माणगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. तर महाड मध्ये आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. जनसुरक्षा कायदा रद्द करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह सर्वहारा जन आंदोलन सारख्या सामाजिक संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
3
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 10, 2025 09:22:07Akola, Maharashtra:
Anchor : हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने जाहीर केल्यानंतर आता बंजारा समाजाने देखील अशीच मागणी जोर धरली आहे. हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, अशी मागणी बंजारा समाजाने केली आहे.हैदराबाद गॅजेटमुळे विखुरलेले बंजारा समाजाचे घटक आता एका प्रवर्गात येऊ शकतील, अशी आशा समाजाने व्यक्त केली आहे. “मराठा समाजाला गॅजेट लागू होऊ शकते, तर आमच्याकडेही सर्व पुरावे असताना बंजारांना गॅजेटचा लाभ मिळालाच पाहिजे” अशी ठाम भूमिका समाजाने घेतली आहे..आपल्या या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने बंजारा बांधवांनी मोर्चा काढून सरकारकडे न्याय मिळवून देण्याची हाक दिली.
Byte : कुलदीप जाधव, अध्यक्ष, गोरसेना, अकोला
2
Report