Back
भंडारा शिक्षकाची आत्महत्या: जंगलात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला
PTPRAVIN TANDEKAR
Aug 12, 2025 02:01:02
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Bhandara
Slug - 1208_BHA_SUICIDE
FILE - 3 IMAGE
रावणवाडीतील जंगलात शिक्षकाची आत्महत्या
Anchor : भंडारा तालुक्यातील
रावणवाडी जंगलात एका ४२ वर्षीय शिक्षकाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. रमेश पंचबुद्धे (रा. खुर्शीपार, ता. भंडारा) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. ही घटना सोमवार दुपारी १ वाजताच्या सुमारास उघडकीला आली. रमेश हे सोमवार सकाळी १० वाजताच्या सुमारास रावणवाडी-धारगाव परिसरात गेले होते. दरम्यान, दुपारी १ वाजताच्या सुमारास एका झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह आढळला. आत्महत्या करण्यामागचे कारण स्पष्ट झालेले नाही. रमेश पंचबुद्धे हे मानेगाव बाजार येथील चैतन्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे शिक्षक होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली असा आप्त परिवार आहे.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKShubham Koli
FollowAug 12, 2025 08:35:02Thane, Maharashtra:
ठाणे महानगरपालिकेच्या तिरंगा सेल्फी पॉईंट व प्रतिज्ञा फलक स्वाक्षरी फलकाचे आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन
घरोघरी तिरंगा २०२५ या अभियानात ठाणे महानगरपालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या तिरंगा प्रतिज्ञा फलक स्वाक्षरी तसेच, तिरंगा सेल्फी पॉईंटचे उद्घाटन आज महापालिका आयुक्त सौरभ राव व अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी व इतर अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले... हर घर दिरंग या कार्यक्रमांमध्ये ठाणे महानगरपालिकेने खूपच उत्साहामध्ये सहभाग नोंदवला आहे तिरंगी बद्दल गौरव ही भावना महापालिकेची आहे.. शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये तिरंग्या बद्दल आदर व तिरंग्याचे महत्त्व पटवून देण्या करिता महापालिका काम करत आहे.. या उपक्रमामध्ये मुख्यता ठाणे महानगरपालिका हद्दीमधील ज्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून घाणीचे साम्राज्य पडून होते असे 15 ठिकाण निवडले असून त्यांची देखील स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.. असे यावेळी महापालिका आयुक्त सौरभ राव म्हणाले आहे..
0
Report
JJJAYESH JAGAD
FollowAug 12, 2025 08:34:55Akola, Maharashtra:
Anchor : अकोला शहराच्या शेजारील हिंगणा गावातील शासकीय ई क्लास जमिनीवर काही नागरिकांनी अवैधरित्या कब्जा करून बांधकाम केले होते..या संदर्भात प्रशासनाकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या.. विशेष म्हणजे ही जागा शासकीय क्रीडा संकुलासाठी राखीव आहे.संबंधित तक्रारींची दखल घेत महसूल विभाग, महापालिका आणि पोलीस विभाग यांच्या संयुक्त कारवाईतून या परिसरातील ई क्लास जमिनीवरील संपूर्ण पक्के बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले..प्रशासनाच्या या कारवाईमुळे अवैध बांधकामधारकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
0
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 12, 2025 08:34:38Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn bhonge action av
Feed attached
छत्रपती संभाजी नगर हुन धार्मिक स्थळवरील भोंग्याबाबत एक मोठी बातमी, शहरातील 937 धार्मिक स्थळावरून पोलिसांनी तब्बल 11495 भोंगे आतापर्यंत उतरवले आहेत शहरात एकूण 1906 धार्मिक स्थळ आहेत त्यापैकी 937 धार्मिक स्थळांवर हे भोंगे होते, शांतता कमीटीची बैठक घेऊन लोकांचं समुपदेशन करून ही कारवाई करण्यात आलेली आहे...राज्य सरकारच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे अशी महिती पोलिसांनी दिली...
0
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 12, 2025 08:34:24Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1208ZT_CHP_AMMA_NOTICE_1_2
( 2 file sent on 2C)
टायटल:--- पुरातत्व विभागाची नोटीस, अम्मा चौक ७ दिवसांत हटवण्याचे निर्देश, भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांना जबर धक्का
अँकर:--- चंद्रपूरच्या गांधी चौक परिसरातील प्राचीन मुरलीधर शिवालय मंदिराजवळ उभारल्या जात असलेल्या अम्मा चौक स्मारकावर भारतीय पुरातत्व विभागाने आक्षेप घेतला आहे. महापालिका आयुक्त विपिन पालीवाल यांना नोटीस बजावत, ७ दिवसांच्या आत बांधकाम व सौंदर्यकरण हटवण्याचे निर्देश दिले आहेत. हे मंदिर संरक्षित स्मारक असल्याने त्याच्या परिसरात कोणतेही नवीन बांधकाम करण्यास कायदेशीर बंदी आहे.भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या दिवंगत आईच्या स्मरणार्थ नेताजी भवनाजवळ हे स्मारक उभारले जात होते. काँग्रेसने यास विरोध करत आंदोलन केले व पुरातत्व विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या कारवाईनंतर आता मनपा पुढे काय भूमिका घेते, याकडे चंद्रपूरकरांचे लक्ष लागले आहे.
बाईट १) रामू तिवारी, शहर जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Report
KJKunal Jamdade
FollowAug 12, 2025 08:34:12Shirdi, Maharashtra:
Sangmner News Flash
भाकड जनावरांसह शेतकरी प्रांत कार्यालयात घुसले...
प्रांतअधिकाऱ्यांच्या दालनासमोर शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी...
संगमनेर शहरात शिवआर्मी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे आंदोलन...
भाकड जनावरांचा प्रश्न गंभीर झाल्याने शेतकरी आक्रमक...
गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा करावी अशी शेतकऱ्यांची मागणी...
गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे भाकड जनावरे सांभाळणे झाले जिकिरीचे...
गायींचे गोऱ्हे घेऊन प्रांत अधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या....
0
Report
AKAMAR KANE
FollowAug 12, 2025 08:33:07Nagpur, Maharashtra:
2c ला फोटो जोडले आहे
--------
ट्रक व मोटारसायकल ची धडक होऊन दुचाकीस्वारचा जागीच मृत्यू...
नागपुर अमरावती राष्ट्रीय महामार्गावर हिंगणा पोलीस स्टेशन अंतर्गत धामणा शिवारात ट्रक व मोटारसायकल ची जबर धडक होऊन दुचाकी स्वार रामेश्वर गावंडे 30 वर्ष जागीच ठार झाला.
दुपारी वेदांता धाब्याजवळ ट्रक नागपूरच्या दिशेने जाण्यासाठी u turn घेत असतांना मागून येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने दुचाकी स्वराचा यात मृत्यू झाला.
0
Report
SKSACHIN KASABE
FollowAug 12, 2025 08:19:29Pandharpur, Maharashtra:
12082025
Slug - PPR_ROAD_PROBLEM_
file 02
----
Anchor - ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवायला लोकप्रतिनिधींना वेळ नाही आणि प्रशासनाचे लक्ष नाही असा प्रकार माळशिरस तालुक्यात सुरू आहे.
माळशिरस तालुक्यातील उंबरे थिटे वस्ती ते नेवरे रस्ता खराब झाला आहे. रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे शाळेला जाणारे लहान लहान विद्यार्थी ,शेतकरी ग्रामस्थ , रुग्ण यांची अडचण होत आहे. अनेकदा पाठ पुरावा करूनही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला वेळ नाही.
4
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 12, 2025 08:17:16Beed, Maharashtra:
बीड: एक घर एक वाहन, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठीच्या बैठकीत ग्रामस्थांचा संकल्प..!
Anc: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. याचीच तयारी गाव खेड्यात मागील पंधरा दिवसांपासून सुरू आहे. बीड जिल्ह्यातील जवळपास साडेतीनशे गावात बैठका पार पडल्या. या बैठकीत मुंबईला जाण्याची तयारी पूर्ण करण्यात आली. तर आज बीड जवळील पालवन या गावात बैठक पार पडली. या बैठकीतून एक गाव एक वाहन ही संकल्पना राबविण्यात आली. लाखोंच्या संख्येने समाज बांधव मुंबईत पोहोचतील अशी व्यवस्था या माध्यमातून केली जात आहे.
आरक्षणाची ही शेवटची लढाई असून मोठ्या संख्येने समाज बांधवांनी मुंबईला यावं. असे आवाहन देखील जरांगे पाटील यांनी केलंय. जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आल्या. त्या आजतागायत सुरू आहे. बीड जिल्ह्यातून मोठा पाठिंबा जरांगे पाटील यांना आहे.
बाईट: गंगाधर काळकुटे, मराठा आंदोलक
4
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 12, 2025 08:16:53Khed, Maharashtra:
Feed 2C
Slug: Khed Chandus Accident
File:02
Rep: Hemant Chapude(Khed)
Anc: खेड तालुक्यातील कुंडेश्वर अपघातात 10 महिलांचा अपघाती मृत्यु झाला याच घटनेची पुनरावृत्ती चा थरार एसटी बसमधील प्रवाशांनी अनुभवलाय..
राजगुरुनगर पाईट रस्त्यावरुन जाणा-या एसटी बसमधील विद्यार्थी महिला नागरिक प्रवास करत असताना चांदुस घाटात एसटी बस पुन्हा मागे निघाली यावेळी चालकाने प्रसंगावधान राखत प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले मात्र यावेळी कालच्या अपघाताचा थरार डोळ्यासमोर आल्याची भावना प्रवाशांनी बोलुन दाखवत रोजचा प्रवास असाच करावा लागत असल्याची भावना विद्यार्थींनी बोलुन दाखवली
यावेळी घटनास्थळावरुन आढावा घेत महिला विद्यार्थींनी नागरिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
Wkt+121: प्रतिनिधी हेमंत चापुडे To प्रवासी महिला विद्यार्थींनी
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया खेड पुणे..
4
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowAug 12, 2025 08:15:30Latur, Maharashtra:
लातूर PKG
स्किप्ट ::- आमदार रमेश कराड यांची जीभ घसरली.... स्वतःच्या मतदारसंघालाच म्हणाले पाकिस्तान.... आमदार रमेश कराड यांच्या वक्तव्यानंतर नवा वाद....
AC ::- सत्ताधारी मंत्री-आमदारांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी सरकारची डोकेदुखी वाढली असतानाच, आता लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केलेल्या भाषणाने नवा वाद पेटलाय. गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण कार्यक्रमात लातूर ग्रामीण मतदारसंघात विजय कसा मिळवला हे सांगताना कराड यांची जीभ घसरली आणि त्यांनी लातूर ग्रामीण मतदारसंघाची तुलना थेट पाकिस्ताशी केली. पाहुयात ZEE 24 TAAS चा स्पेशल रिपोर्ट....
VO 01 ::- काल लातूरमध्ये दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. याच व्यासपीठावर आमदार रमेश कराड विजय मिळवण्याचा प्रवास सांगत होते. पण बोलता बोलता भाषण भरकटलं आणि भाषणादरम्यान कराड यांनी लातूर ग्रामीण मतदारसंघ म्हणजे पाकिस्तानात भारताचा झेंडा लावण्यासारखा आहे असं वक्तव्य केलं. खरं तर, या मतदारसंघात अनेक वर्ष काँग्रेसचं वर्चस्व होतं. देशमुख कुटुंब ठरवत असे की कोण आमदार होणार. 2019 च्या निवडणुकीत लातूर ग्रामीण ची जागा शिवसेनेला मिळाली आणि धीरज देशमुख मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. त्यावेळी कराड यांना संधी मिळाली नाही, मात्र भाजपने विधानपरिषदेवर घेतलं. त्यानंतर 2024 मध्ये भाजपच्या तिकिटावर त्यांनी काँग्रेसचं गड मोडून विजय मिळवला. हा विजय मुख्यमंत्र्यांसमोर सांगताना त्यांनी अजब उपमा दिली आणि वाद ओढवून घेतला.
साऊंड बाईट ::- रमेश कराड ( आमदार ग्रामीण )
VO 02 ::- या वक्तव्यावर काँग्रेसने जोरदार हल्लाबोल केला आहे. माजी आमदार धीरज देशमुख यांनी ट्विट करत रमेश कराड यांच्यावर टीका केली आहे. ज्या मतदारसंघातून तुम्ही निवडून आला, त्याची तुलना पाकिस्तानशी कशी करता? हे मतदारांचा अपमान आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे...
बाईट ::- अभय साळुंखे ( जिल्हाध्यक्ष काँग्रेस )
बाईट ::- मोहसीन खान ( लातूरकर )
VO 03 ::- या अगोदर आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांनी सरकारला अनेकदा अडचणीत आणलं आहे. विशेष म्हणजे, आमदार रमेश कराड यांचा अधीकार्याला दम देतानाचा व्हिडीओ नुकताच समोर आला होता. त्यामुळे आता त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या या वक्तव्यावरून – बेताल बोलणाऱ्यांना आणि वागणाऱ्यांना लगाम कोण लावणार? असा सवाल राजकीय वर्तुळात अधिक जोरात उपस्थित होत आहे.
............................
वैभव बालकुंदे
ZEE 24 TAAS लातूर
Mo.9168315296
4
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowAug 12, 2025 08:04:27Parbhani, Maharashtra:
अँकर- मराठा समाजाचा ओबीसींमध्ये समावेश करावा या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी चलो मुंबई हे आंदोलन 29 ऑगस्ट रोजी आयोजित केली आहे. या आंदोलनाची जनजागृतीसाठी जरांगे पाटील वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन जनजागृती करीत आहेत. मराठा समाजातील मुलांचे भलं झालं पाहिजेत या उद्देशाने मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनात नेहमीच सक्रिय सहभागी असणारे परभणी येथील प्रसिद्ध सायकलवीर संदीप गव्हाणे हे 23 ऑगस्ट पासून परभणी ते मुंबई सायकलवारी काढून जरांगे पाटलांच्या चलो मुंबई या आंदोलनात सहभागी होणार आहेत, मागील महिनाभरापासून ते दररोज 30 किलोमीटर परिसरातील गावा गावात जाऊन मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जनजागृती करीत आहेत. त्यांच्या या जनजागृतीला गावागावातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे गव्हाणे सांगतायेत.
बाईट- संदीप गव्हाणे- सायकलवीर
9
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 12, 2025 08:04:11Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - जोरदार पावसाचा खरीप पिकांना मोठा फटका, बक्षी हिप्परगा गावातील शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ
- दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावांना जोरदार पावसाचा फटका.
- बक्षी हिप्परगा गावाला रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी..
- बक्षी हिप्परगा गावातून जाणाऱ्या ओढ्याची पाणी पातळी वाढली.
- बोरामणी येथून ओढ्याला आलेल्या पाण्यामुळे शेतीचं मोठं नुकसान
- सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक खरीपांच्या पिकांना नैसर्गिक संकट
- दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक शेती पिकांना फटका बसल्यामुळे नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी..
Byte : शेतकरी
7
Report
SKSudarshan Khillare
FollowAug 12, 2025 07:21:40Yeola, Maharashtra:
अँकर:-
गणपती उत्सवाच्या काही दिवस आधीच प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी) वरील बंदी न्यायालयाने उठवल्यानंतर, मूर्तिकारांना मोठा दिलासा मिळाला. मात्र ही दिलासा देणारी बातमी थोडी उशिरा आल्यामुळे,येवल्यात मूर्ती निर्मितीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे अवघड झाले आहे.
बंदी कायम राहील या भीतीमुळे अनेक मूर्तिकारांनी काम थांबवून ठेवले होते. न्यायालयाने बंदी उठवल्याचा निर्णय जाहीर होईपर्यंत वेळ निघून गेला, त्यामुळे मूर्ती तयार करण्यासाठी लागणारा साधारण दोन-तीन महिन्यांचा कालावधी कमी झाला.
त्यामुळे उपलब्ध मूर्तींचा साठा मर्यादित राहिला आणि मागणी जास्त असल्याने किमतीत लक्षणीय वाढ झाली. लहान मूर्तींपासून ते मोठ्या मंडपातील गणपतीपर्यंत सर्वच प्रकारांमध्ये २५ ते ३० टक्क्यांपर्यंत दरवाढ झाल्याचं मूर्तिकार सांगत आहे. याच गणरायाची मूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी...
14
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 12, 2025 07:08:10Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1208ZT_CHP_PROTEST
( single file sent on 2C)
टायटल:---- चंद्रपूरमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची जोरदार निदर्शने, नक्षल प्रोत्साहन भत्ता पुन्हा सुरू करण्याची मागणी
अँकर: राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र जिल्हा शाखा चंद्रपूरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. प्रलंबित मागण्या, तसेच नक्षलग्रस्त भागातील एकस्तर पदोन्नती व प्रोत्साहन भत्ता पुन्हा सुरू करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. शिक्षण आणि आरोग्य विभागातील समस्यांकडे शासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संघटनेने केला. आंदोलनात विविध शासकीय विभागांचे कर्मचारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
बाईट १)दिपक जेऊरकर, अध्यक्ष, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना चंद्रपूर
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
13
Report
MNMAYUR NIKAM
FollowAug 12, 2025 07:07:47Buldhana, Maharashtra:
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या राज्यप्रवक्त्या .... जयश्री शेळके यांचा आमदार संजय गायकवाड यांच्यावर घणाघात........
सत्य पचवायला वस्तुस्थिती पचवायला फार हिम्मत लागते ती हिम्मत नकली शिवसेनेच्या नकली लोकांमध्ये नक्कीच नाही .
एकनाथ शिंदे गटाचे लोकप्रतिनिधी ज्या प्रकारे बोलतात ते ऐकल्यानंतर कदाचित ते त्यांचा इतिहास विसरले असतील परंतु बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील जनता महाराष्ट्रातील जनता इतिहास विसरलेली नाही
हे महाशय तीन निवडणुका पराभूत झाले ज्यावेळी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद मिळाला आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी यांना उमेदवारी दिली.. ठाकरे यांच्या नावापुढे लागला त्यावेळी पहिल्यांदा हे महाशय बुलढाणा विधानसभा मतदारसंघांमधून निवडून येऊन महाराष्ट्राच्या विधानसभेत जाऊन पोहोचले हे ते विसरले परंतु आम्ही आणि महाराष्ट्रातील जनता हे विसरलेली नाही
राहिला विषय त्यांचं अनुकरण करण्याचा अनुकरण करण्याचा प्रश्नच येत नाही ते जे बोलले ते बरोबरच आहे पुढच्या दहा पिढ्या जरी आल्या तरीही त्यांचं अनुकरण करता येणार नाही... कारण अनुकरण ...कॉपी ही चांगल्या आणि योग्य कृतीची योग्य वक्तव्याचे केले जाते चुकीच्या गोष्टींची कॉपी केली जात नाही त्याच्यामुळे त्यांनी केलेली वक्तव्य आणि त्यांनी केलेली कृती जर आपण पाहिली तर निश्चितच त्यांच्या कृतीची कधीही कॉपी करता येऊ शकत नाही इतक्या खालच्या पातळीवर कोणीही जाऊ शकत नाही...
14
Report