Back
भंडारा-गोंदिया: मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान!
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 11, 2025 03:34:49
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Bhandara
Slug - 1107_BHA_PADDY_LOSS
FILE - 4 VIDEO
पुराच्या पाण्यात शेती गेल्याने कृषी विभागाच्या वतीने पंचनामे सुरू....
Anchor :- भंडारा-गोंदिया जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे अनेकांची घरे जमीन दोस्त झाली आहेत. तर शेतीसुद्धा पाण्याखाली गेली असून धान पीक, भाजीपाला पिकांना याचा फटका बसलेला आहे. शेतात पाणी साचल्यामुळे पीक खराब झालं आहे.. तर ज्या शेती पाण्याखाली गेल्या आहेत असा शेतीचे पंचनामे कृषी विभागाच्या वतीने सुरू आहे. संपूर्ण पंचनामे झाल्यावर किती टक्के नुकसान झालं याची आकडेवारी समोर येणार आहे.
13
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 11, 2025 07:36:23Beed, Maharashtra:
बीड : पावसाने घेतली उसंत, खरिपाची पीके संकटात..!
Anc: मान्सूनपूर्व पावसावर विश्वास ठेवून बीडच्या शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. मात्र गत तीन आठवड्यापासून पावसाने पाठ फिरवली असल्याने खरिपाची पीके आता धोक्यात आली आहेत. मान्सूनपूर्व पावसाने अनेक पाणी प्रकल्प तुडुंब झाले आहेत त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्तास तरी मिटला आहे. परंतु जिल्ह्यातील शेती केवळ पावसावरच अवलंबून आहे. अनेक भागातील शेतीमधील ओलावा संपला आहे. अशात पाऊस झालाच नाही तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची दाट शक्यता आहे.
2
Share
Report
KJKunal Jamdade
FollowJul 11, 2025 07:34:28Shirdi, Maharashtra:
Anc - राहाता तालुक्यातील लोणी गावाजवळ असलेल्या सादतपुर शिवारात शेतकरी पती-पत्नीचा एकाच दिवशी गूढ मृत्यू झालाय.. पत्नीचा मृतदेह स्वतःच्या मालकीच्या शेततळ्यात तर पतीचा घरात संशयास्पद मृतदेह आढळून आला.. मृत्यू मागे घातपात आहे की आत्महत्या याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे.. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे..
V/O - सादतपूर शिवारात गायकर वस्तीवर राहणारे 60 वर्षीय रेवजी मुरलीधर गायकर आणि 55 वर्षीय पत्नी नंदा गायकर यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.. नंदा यांचा मृतदेह शेततळ्यात तर रेवजी यांचा मृतदेह घरात संशयास्पदरित्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.. सासरी राहणारी गायकर दांपत्याची मुलगी आई वडिलांना फोन लावत होती मात्र समोरून काहीही प्रतिसाद मिळत नव्हता.. शेवटी तिने जवळच राहणाऱ्या चुलत भावाला संपर्क साधून विचारणा केली.. चुलत भाऊ रेवजी यांच्या घरी गेला असता रेवजी जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आणि त्यांच्या तोंडातून फेस आलेला बघून त्याने आजूबाजूच्या लोकांना बोलावले.. रेवजी यांच्या पत्नी नंदा यांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता घराजवळच त्यांच्या शेततळ्यात नंदा यांचा मृतदेह आढळून आला.. पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचा घटनास्थळी पंचनामा करत आश्वी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.. मात्र रेवजी यांच्या तोंडातून फेस आल्याचे दिसून आल्याने त्यांनी विष प्राशन केले की त्यांना कुणी पाजले? हे तपासात समोर येईल.. यासह नंदा यांचा मृतदेह शेततळ्यात आढळल्याने त्या पाय घसरून पडल्या की त्यांचा घातपात झाला? याचाही तपास पोलिसांना करावा लागणार आहे.. संशयपासद दोन मृत्यूच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे..
0
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 11, 2025 07:33:57Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - महापालिका विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या कृष्णा नदी पात्रात जलसमाधी आंदोलन, संतप्त शिवसैनिकांनी घेतल्या नदीत उड्या..
अँकर - सांगली महापालिकेच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्यावतीने थेट कृष्णा नदीमध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात आले आहे.नदीच्या पात्रात उतरून नदी शिवसेनेच्यावतीने महापालिकेच्या कारभाराचा निषेध नोंदवण्यात आला आहे.
प्रवीण पालिकेकडून दखल घेण्यात येत नसल्याने संतप्त शिवसैनिकांनी कृष्णा नदीमध्ये उड्या घेत जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला,मात्र यावेळी नदीकाठावर असणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी शिवसेनेच्या तिघा कार्यकर्त्यांना पाण्यातून बाहेर काढले. शिवसेना शिंदे गट आणि सांगली महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने चार महिन्यांपूर्वी कृष्णा नदीच्या काठावर कृष्णामाई महोत्सवाचा आयोजन करण्यात आलं होतं.या आयोजनासाठी पालिकेकडुन निधीची तरतूद देखील करण्यात आली होती,मात्र उत्सव होऊन चार महिने उलटून देखील संबंधित ठेकेदारांची बिले महापालिकेकडून अदा करण्यात आलेली नाहीत,वारंवार मागणी करून देखील पालिकेकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप करत शिवसेनेच्यावतीने महापालिकेचा निषेध म्हणून थेट कृष्णा नदीच्या काठावरच आंदोलन करण्यात आले आहे,कृष्णा नदीच्या पात्रामध्ये उतरत पाण्यात उभे राहून महापालिके विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
बाईट - महेंद्र चांडाळे - जिल्हाध्यक्ष - शिवसेना शिंदे गट,सांगली.
0
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 11, 2025 07:30:17Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1107ZT_CHP_RESULT_START
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 13 वर्षानंतर झाली निवडणूक, कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात सुरू झाली मतमोजणी, पहिले दोन निकाल काँग्रेसच्या बाजूने
अँकर:-- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची संचालक पदाची निवडणूक 13 वर्षानंतर काल पार पडली. चंद्रपूर शहरातील चांदा इंडस्ट्रियल इस्टेट परिसरातल्या मतमोजणी केंद्रावर कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात आज मतमोजणीचा प्रारंभ झाला. यातील पहिले दोन निकाल काँग्रेसच्या बाजूने लागले आहेत. काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. एकूण 21 संचालकांपैकी 17 संचालक निवडून आणत या बँकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा निर्धार करण्यात आला होता. दिनेश चोखारे आणि जयंत टेमुर्डे यांनी पहिल्या टप्प्यात विजय संपादन केलाय. फटाके फोडून या विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला
बाईट १) दिनेश चोखारे, नवनिर्वाचित संचालक
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
SGSagar Gaikwad
FollowJul 11, 2025 07:04:01Nashik, Maharashtra:
Feed send by TVU 51
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_missing
नाशिकच्या बालसुधारगृहातुन मुलगी बेपत्ता
अँकर
नाशिकच्या उंटवाडी परिसरात असलेल्या बालसुधागृहातून 16 वर्षीय मुली बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे... मुलीच्या नातेवाईकांनी शहरातील मुंबई नाका पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी आले आहे... जिल्ह्यातील वावी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे कुटुंब राहत या कुटुंबातील सोळा वर्षाच्या मुलीला एका तरुणाने 16 जूनला फूस लावून पळून नेण्याची घटना घडली होती... याबाबत वावी पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला होता... यानंतर 26 तारखेला या मुलीच्या नातेवाईकांनी नाशिकच्या उंटवाडी परिसरात असलेल्या बालसुधागृहांमध्ये या मुलीला महिनाभरासाठी ठेवलं होतं... मात्र तेथून ही मुलगी गायब झाली आहे... या मुलीच्या कुटुंबातील व्यक्तीने मुलगी विकल्याचा आरोप बालसुधारगृहावर लावला असून , बालसुधागृहात सीसीटीव्ही कॅमेरा असताना मुलगी गायब झालीच कशी असा देखील प्रश्न विचारला आहे.... यानिमित्ताने नाशिकच्या बाल सुधार गृह च्या सुरक्षा वरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे....
बाईट- मुलीचे वडील
0
Share
Report
PPPRANAV POLEKAR
FollowJul 11, 2025 07:02:16Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी- समुद्राच्या पाण्याजवळ गाडी नेणे आले अंगलट
भाट्ये समुद्रकिनारी थार गाडी रुतली वाळूत
पोर्णिमेच्या भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने घटना
थार गाडी समुद्राच्या वाळूत रुतल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल
स्थानिकांच्या मदतीने वाळूत रुतलेली थार गाडी काढली बाहेर
समुद्रकिनाऱ्यांवर गाडी भरधाव वेगाने नेऊन स्टंटबाजी करण्याचे प्रमाण वाढले
0
Share
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 11, 2025 07:01:24Dhule, Maharashtra:
ANCHOR - धुळे शहरातील विश्राम गृहात एक कोटी 84 लाख रुपयांचे रोकड सापडल्या प्रकरणी न्यायालयाने गंभीर दखल घेत, कठोर कलम लावत, गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी दिलेली आहे. सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणांमध्ये दखल पात्र गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली. मात्र यात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेले नाही. या विरोधात न्यायालयात दाद मागण्यात आली. न्यायालयाने या प्रकरणी गंभीर स्वरूपाची कलम लावत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी कारण्यात आली होती. त्यावरती न्यायालयाने निकाल देत आता गंभीर स्वरूपाच कलम लावून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आदेश दिल्याची माहिती अनिल गोटे यांनी दिलेली आहे. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सरकारी वकिलांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला आहे.
byte - अनिल गोटे,माजी आमदार
प्रशांत परदेशी धुळे.
2
Share
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 11, 2025 07:00:58Parbhani, Maharashtra:
सोबत- मयताचा फोटो आणि डीआर जोडला आहे...
पूर्णा पोलीस ठाण्याचे व्हिडीओ पाठवले आहे...
अँकर- परभणीच्या झिरो फाटा परिसरात असलेल्या हायटेक रेसिडेंशीयल स्कुलच्या संस्थाचालक दाम्पत्याने स्कुल मध्ये आपली मुलगी निवासी वसतिगृहात राहत नसल्याने टीसी आणि फी परत मागण्यासाठी आलेल्या पालकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून या मारहाणीमुळे या पालकाचा मृत्यू झालाय. परभणी तालुक्यातील उखळद येथील 42 वर्षीय जगन्नाथ हेंडगे यांची मुलगी पल्लवी ही झिरो फाटा येथील प्रभाकर चव्हाण यांच्या हायटेक रेसिडेनशियल स्कुल मध्ये निवासी होती. पण ती लहान असल्याने आई वडिलांना सोडून निवासी वसतिगृहात करमत नव्हते,त्यामुळे पल्लवीला वडील जगन्नाथराव घरी घेऊन गेले होते, काल जगन्नाथ हेंडगे परत शाळेत येऊन आपल्या मुलीची टीसी आणि ऍडव्हान्स भरलेले पैसे शाळा व्यवस्थापणाकडे परत मागत होते, अजित पवार गटाचे नेते तथा शाळेचे संस्थाचालक प्रभाकर चव्हाण आणि त्यांच्या पत्नी हिंगोली जिल्हा परिषदेच्या माजी शिक्षण सभापती रत्नमाला चव्हाण या दोघांनी पालक जगन्नाथ हेंगडे यांना बेदम मारहाण केली. यात पालक हेंगडे यांचा मृत्यू झाल्याचा गुन्हा पूर्णा पोलीस ठाण्यात मुंजाजी हेंगडे यांच्या तक्रारी वरून दाखल झालाय, या घटनेने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ माजलीय,परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निवासी गुरुकुल शिक्षण पद्धती निर्माण झाल्या असून अनेक शाळा पालकांची पैश्यासाठी पिळवणूक करीत असल्याचा घटना नेहमीच घडत असतात, पण ही आजची घटना शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी असून सध्या तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे, पूर्णा पोलिस या घटनेचा सखोल तपास करीत असून शाळा परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय...
3
Share
Report
VKVISHAL KAROLE
FollowJul 11, 2025 07:00:49Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
csn digital arrest av
feed attached
ANCHOR : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दहशतवाद्यांच्या खात्यावरून तुमच्या बँक खात्यात २० लाख जमा झाल्याचा बनाव रचत सेवानिवृत्त अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी ६ दिवस डिजिटल अरेस्ट करत तब्बल ७८ लाख ६० हजारांना लुटले. या दरम्यान आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीने व्हिडीओ कॉल करून वृद्धाला विश्वास ठेवण्यासाठी भाग पाडले. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे यापूर्वी देखील विश्वास नागरे पाटील यांच्या नावाने अशाच पद्धतीने फसवणूक करण्यात आली आहे
byte प्रशांत स्वामी. dcp
0
Share
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 11, 2025 06:36:57Pandharpur, Maharashtra:
11072025
slug - PPR_EXTORTION_CCTV
feed on 2c
file 01
-----
Anchor - सोलापूर जिल्ह्यातील शरद पवारांच्या आमदाराला 1 कोटी रुपयाची खंडणी मागून , 10 लाख रुपये घेताना एका तरुणाला अटक पंढरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल
माढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी एसपी पक्षाचे आमदार अभिजित पाटील यांची आणि त्यांच्या श्री विठ्ठल साखर कारखान्याबद्दल बदनामी न करण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील अनवली येथील तरुण किरण घोडके याला पंढरपूर मधील हॉटेल राधेश येथे 10 लाख रुपयांची खंडणी घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे.
किरण घोडके हा वारंवार आमदार पाटील आणि साखर कारखाना विरोधात आंदोलन करून बदनामी करत होता. ती थांबवण्यासाठी त्याने 1 कोटी रुपये मागणी केली होती
2
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 11, 2025 06:30:23Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - खडे मुक्त रस्ते व नागरी सुविधांसाठी काँग्रेसच्या आजी-माजी नगरसेवकांचा रस्ता रोको आंदोलन..
अँकर - खड्डेमुक्त रस्ते करा यासह नागरी सुविधांसाठी सांगलीमध्ये काँग्रेसच्यावतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
शहरातल्या आंबेडकर रोडवर रास्ता रोको करत पालिकेच्या कारभारा विरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले.काही दिवसांपूर्वी खड्ड्यांमुळे आणि रस्त्याच्या दुरावस्थेमुळे एका तरुणीचा मृत्यू देखील झाला होता, वारंवार प्रशासनाकडे रस्त्याच्या दुरुस्तीची आणि नागरी सुविधांचे मागणी करून देखील पालिका प्रशासना कडून दुर्लक्ष करण्यात येत,असल्याचा आरोप करत प्रशासनाच्या निषेधार्थ काँग्रेसच्या आजी-माजी नगरसेवकांसह नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केलं,त्यामुळे आंबेडकर रोड ते एसटी स्टँड मार्गावरील वाहतूक तब्बल एक तास ठप्प झाली होती.तातडीने पालिका प्रशासनाकडून नागरी सुविधा आणि खड्डे मुक्त रस्ते न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी दिला आहे.
0
Share
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 11, 2025 06:04:34Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
3 FILES
SLUG NAME -SAT_BHAT_LAGAN
साताऱ्याच्या पश्चिम भागात दमदार पावसामुळे भात लागवडीस सुरुवात झाली आहे. वेळेकामथी आणि कण्हेर परिसरात शेतकरी गारवा, चिखल आणि पावसाची तमा न बाळगता भात लावण्यात मग्न आहेत. वाफेतील भाताची रोपे काढून त्याच्या जुड्या तयार केल्या जात असून बैल आणि यंत्राच्या सहाय्याने चिखल करून ओळीने भात रोपण होत आहे. काही शेतकरी पेरणी करतात, तर अनेकजण लागवडीवर भर देतात. शेतकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहतोय आणि सामूहिक कामाच्या जोरावर भात लावणी सुरू आहे.
3
Share
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 11, 2025 06:03:35Raigad, Maharashtra:
स्लग – रायगडच्या किनारयांवर हजारो अनधिकृत बोटी ........ पोलीसांच्या सर्च ऑपरेशनमध्ये धक्कादायक बाब उघड .......... बोटींची मत्स्यव्यवसाय विभागाकडे नोंदणीच नाही ....... कोर्लई संशयित बोट प्रकरणामुळे बाब उघडकीस ....... मत्स्यव्यवसाय विकास विभाग करतंय काय ? ...........
अँकर – रायगडच्या कोर्लई समुद्रकिनारी संशयित पाकीस्तानी बोट प्रकरणावर पडदा पडला असला तरी पोलीसांच्या तपासात एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. या घटनेदरम्यान पोलीसानी राबवलेल्या सर्च ऑपरेशन मध्ये रायगडच्या किनारयांवर हजारो अनधिकृत बोटी असल्याचे निष्पन्न झाले आहे. या बोटींची मत्स्य व्यवसाय विभागाकडे नोंदणीच नाही. संशयित बोट प्रकरणामुळे ही बाब उघडकीस आली आहे. आता याबाबत पोलीसांनी एक अहवाल मत्स्यव्यवसाय विभागाला सादर केलाय. यामुळे रायगडच्या किनारयांवर बेकायदा मासेमारी होत असून त्यावर मत्स्यव्यवसाय विभागाचा कुठलाच वचक नसल्याचे दिसून येते. आधीच मासळीचा दुष्काळ, एलईडी, पर्सनेट फिशींगमुळे पारंपारीक मच्छीमार संकटात असताना बेकायदा बोटींचे संकट समोर आलंय.
बाईट – आंचल दलाल .... पोलीस अधिक्षक रायगड
0
Share
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 11, 2025 06:02:44Nashik, Maharashtra:
nsk_abhona
फीड by 2C
Anchor नाशिकच्या कळवण तालुक्यातील आभोणा शहरात गेल्या कित्येक वर्षांपासून सुमारे 100 ते 150 मोकाट गायी,गुरे मुख्य रस्त्यावर व बाजारपेठेत फिरत असुन,त्यांचा मोठा उपद्रव व्यापारी,ग्राहक आणि नागरिकांना सहन करावा लागत आहे.या मोकाट जनावरांमुळे रोज छोट्या मोठ्या अपघाताच्या घटणा घडत आहेत.तरी ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधित गायी,गुरांच्या मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. भाजीपाला विक्रेते तर अक्षरशः वैतागले असुन,ही जनावरे अचानक येऊन विक्रेत्यांचा भाजीपाला,फळे,फस्त करीत आहेत.त्यामुळे विक्रेत्यांना गुरांना हाकलावे की व्यवसाय करावा हेच कळत नाही.शहरी भागातील सुशिक्षित गोमालक मात्र आपल्या गायी गुरांना वाऱ्यावर सोडून देतात ही लाजिरवाणी आणि खेदजनक बाब आहे.
1
Share
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 11, 2025 06:01:24Chandwad, Maharashtra:
अँकर :-चांदवडच्या राहूडगाव,कळंधरी आणि घाट परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्याला जे्रबंद करण्यात वन विभागाला यश आले असून एका पोल्ट्री फार्म जवळ लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या आज सकाळी अडकला. गेल्या आठवड्या या बिबटयाने एका महिलेवर हल्ला करून तीला गंभीर जखमी केले होते शिवाय काही जनावरांचा देखील बळी घेतला होता त्यामुळे ग्रामस्थ भयभीत होते मात्र आज बिबट्याला पकडण्यात आल्याचे पाहून त्यांनी सुटकेचा निश्वास घेतला.
2
Share
Report