Back
बारू तलाव फुटला; गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान!
ADANIRUDHA DAWALE
Sept 03, 2025 04:46:56
Amravati, Maharashtra
Feed slug :- AMT_BARU_DAM दहा फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
मेळघाटातील बारू तलाव फुटला; रस्ते बंद, गावांचा संपर्क तुटल, शेतीचेही मोठे नुकसान, बारु गावातील धक्कादायक घटना
अँकर :- मेळघाट मधील धारणी तालुक्यातील बारू गावातील सिंचन विभागाच्या तलावाची भिंत फुटल्यामुळे मोठ्या स्वरूपात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. या पाण्यामुळे बारू–बीजू धावडी हा मुख्य रस्ता पाण्याखाली गेला असून वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. तर पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेल्याने शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेमुळे बारू, बीजू धावडी, ढाकणा, अकोट व परतवाडा मार्गावरील संपर्क पूर्णपणे खंडित झाला आहे. हे तलाव 1977-78 मध्ये बांधण्यात आले होता. त्याची दुरुस्ती 2013-14 मध्ये करण्यात आल्याचे सिंचन विभागाचे अधिकारी यांनी सांगितले. पालकमंत्र्यांच्या बैठकीत या तलावाच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र 2014 पासून या तलावाची देखभाल न केल्याने अखेर हा तलाव अखेर फुटला आहे. त्यामुळे मेळघाट मधील नागरिकांना मोठा फटका बसला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
13
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowSept 05, 2025 03:03:17Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn maha palika av
Feed attached
आगामी महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभागरचनेच्या प्रारूप आराखड्यावर नागरिकांनी मोठ्या संख्येने आक्षेप दाखल केले आहेत. आक्षेप दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, गुरुवारी १९३ तक्रारी सादर करण्यात आल्या. यामुळे आतापर्यंत दाखल झालेल्या एकूण आक्षेपांची संख्या ५५२ वर पोहोचली आहे, अशी माहिती उपायुक्त, निवडणूक यांनी दिली. राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, महापालिका प्रशासनाने प्रभागरचनेचा आराखडा तयार करून २२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री संकेतस्थळावर प्रसिद्ध केला होता. त्यानंतर २३ ऑगस्टपासून नागरिकांना हरकती आणि सूचना दाखल करण्याची मुदत देण्यात आली. सर्व आक्षेप आता शासन नियुक्त अधिकाऱ्यांपुढे सुनावणीसाठी ठेवण्यात येणार आहे. संबंधित अधिकारी आक्षेप दाखल करणाऱ्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेणार आहे. आक्षेपामध्ये तथ्य आढळून आल्यास बदल केला जाणार आहे.
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 05, 2025 03:03:09Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - गेल्या 17 दिवसांपासून कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरूच ( WKT )
- सोलापुरात गेल्या 17 दिवसांपासून कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन
- जिल्ह्यातील अडीच हजार पेक्षा अधिक कंत्राटी आरोग्य कर्मचारी आंदोलनात सहभागी
- सर्वच कंत्राटी आरोग्य कर्मचारी संपावर गेल्याने आरोग्य सेवेवर मोठा परिणाम
- जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा इशारा
याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी... ( WKT )
0
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 05, 2025 03:02:06Nashik, Maharashtra:
feed send by 2c
reporter-sagar gaikwad
slug-nsk_fire
*नाशिक ब्रेकिंग*
- *नाशिकच्या मुंबई नाका परिसरात बर्निंग कार चा थरार*
- *एका चालत्या कार ला अचानक लागली आग*
- कार मध्ये असलेले दोन व्यक्ती वेळीच कारमधून उतरल्याने मोठी दुर्घटना टळली
- कारमधून धूर येत असल्याचे लक्षात येताच कार मध्ये असलेले दोन जण लगेच कार मधून पडले बाहेर
- स्थानिक लोकांनी आग वीजवण्यासाठी केली मदत
0
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 05, 2025 03:01:57Raigad, Maharashtra:
स्लग - घरगुती गणेशोत्सवातून ' खेड्याकडे चला ' चा संदेश ...... अलीबागच्या रमेश धुमाळ यांच्या घरी देखावा .......
अँकर - अलिबाग तालुक्यातील नांगरवाडी येथील रमेश धुमाळ यांनी यांनी आपल्या घरगुती गणेशोत्सवातून खेड्याकडे चला हा संदेश दिला आहे. नोकरीनिमित्त कोकणी माणूस शहराकडे धाव घेतोय गावे ओस पडत आहेत परंतु शहरातील जीवन धकाधकीचं आणि प्रदूषित झालंय. या तुलनेत ग्रामीण भागात शुद्ध हवा, आरोग्यदायी जीवन निसर्ग सौंदर्य अनुभवायला मिळते. यात कोकणातील ग्रामीण संस्कृती, शेती यांचे दर्शन चलतचित्राच्या माध्यमातून मांडले आहे. महत्वाचं म्हणजे हा संपूर्ण देखावा पर्यावरण पुरक आहे.
बाईट - रमेश धुमाळ
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 05, 2025 02:47:05Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Shirur Bajari Story
File:01
Rep: Hemant Chapude(Shirur)
Anc: उत्तर पुणे जिल्ह्यात पावसाने उघडीक दिल्याने शेतकऱ्यांची पावसाळी बाजरी काढण्याची लगबग सुरू असून मजूर टंचाई अभावी शेतकऱ्यांना बाजारी काढणी च्या कामाला विलंब होतोय, मात्र पावसाने उघडीक दिल्याने सध्या शेतकरी बाजरी पिकाच्या कामात व्यस्त पाहायला मिळत असून यंदा चांगला पाऊस झाल्यानंतर बाजरीच्या पिकातून चांगलं उत्पन्न मिळेल असा विश्वास सध्या शेतकऱ्यांना आहे..
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया शिरूर पुणे...
2
Report
ABATISH BHOIR
FollowSept 05, 2025 02:46:53Kalyan, Maharashtra:
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर 264 हरकती,11 सप्टेंबर रोजी होणार सुनावणी
Anc...कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या आगामी पालिका निवडणुकीच्या चार सदस्यीय १२२ सदस्य निवडीसाठी ३२ पॅनल च्या
प्रारूप प्रभाग रचनेवर एकूण २६४ हरकती दाखल झाल्या आहेत. त्या हरकतींवर सुनावणी ११ सप्टेंबर ला होणार आहे.सबधीत हरकत घेतलेल्या नागरिकांनी ११ सप्टेंबर रोजी हजर राहण्याचे आवाहन या वेळी पालिकेकडून करण्यात आले आहे. ३ ते ६ आक्टोंबर पर्यंत अंतिम प्रभाग जाहीर होणार असल्याची माहिती रमेश मिसाळ निवडणूक अधिकारी कल्याण डोंबिवली महानगर पालिका यांनी दिली आहे .यानंतर या प्रभाग रचना नगरविकास विभागाकडे सादर केल्या जाणार आहेत. नगरविकास विभाग राज्य निवडणूक आयोगाला त्या सादर करणार असून आयोगाच्या मान्यतेने अंतिम प्रभाग रचना जाहीर करणार आहेत.कल्याण डोंबिवली महानगरपालिकांतील 32प्रभाग रचनांवर एकूण 264 हरकती आल्या आहेत. सर्वाधिक हरकती प्रभाग रचनेबाबत आल्या आहेत.
बाईट - रमेश मिसळ/ कल्याण डोंबिवली निवडणूक अधिकारी
1
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 05, 2025 02:45:11Pune, Maharashtra:
शिक्षक दिन - विशेष स्टोरी
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File name : 0509ZT_MAVAL_GERMAN
Total files : 08
Headline -मावळ मधील सुदुंबरे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत तिसरीतील विद्यार्थी गिरवत आहे जर्मन भाषेचे धडे
अ, आ, इ, ई… बरोबरच आता ‘गुटन मॉर्गन’!
Anchor:
मावळ तालुक्यातील सुदुंबरे गावाशेजारील संत तुकारामनगरवाडीतील जिल्हा परिषद शाळेत, विद्यार्थ्यांना अ, आ, इ, ई… या अक्षरमालेसोबतच आता जर्मन भाषेचेही धडे दिले जात आहेत. ठाकर भाषेत संवाद साधणाऱ्या या मुलांना परकीय भाषेतील प्राथमिक शब्दसंग्रह, संवाद आणि योग्य उच्चार शिकवण्याचा अभिनव उपक्रम सुरू झाला आहे.
Vo :
शिक्षिका कालिंदी कस्पटे यांनी हा प्रयोग राबवला असून, ‘गुड मॉर्निंग’, ‘थँक यू’, ‘गुड नाईट’, ‘हाऊ आर यू’ अशा शब्दांचा वापर आता वर्गखोल्यांपासून मुलांच्या घरापर्यंत पोहोचू लागला आहे. तिसरी-चौथीच्या वीस विद्यार्थ्यांनी एकमेकांशी जर्मनमध्ये बोलण्यास सुरुवात केली असून, वाचन, लेखन आणि ऐकण्याचा सरावही सुरू आहे. या उपक्रमाचे कौतुक सर्वच स्तरातून होत आहे. ग्रामस्थांच्या मते, हा केवळ भाषाशिक्षणाचा प्रयत्न नसून मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया आहे, जो त्यांना भविष्यात परदेशी शिक्षण आणि रोजगाराच्या संधींकडे नेईल..
बाईट : विद्यार्थी (file no.04,05,06)
बाईट : कालिंदी कस्पटे, शिक्षिका (file no.07)
End Vo :
तिसरीतील छोटी मुलं जर्मन भाषेचे धडे गिरवत भविष्यात मोठ्या पदांवर जाण्याचे देखील स्वप्न पाहत आहेत. याच सुदुंबरे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी..
Wkt Chaitralli (file no.08)
0
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 05, 2025 02:30:52Parbhani, Maharashtra:
अँकर-हिंगोली येथील कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असुन जिल्हा उपनिबधंक सुरेखा फुपाटे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. सिरसम कृषि उत्पन्न बाजार समितीच्या विलिनीकरणाच्या प्रक्रियेमुळे ही कारवाई झाली असल्याचे जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी सांगितले. सिरसम बु. बाजार समिती स्थापनेपासुन आजपर्यंत प्रशासक कारभार पाहत आहेत. प्रशासकांनी ही बाजार समिती कार्यान्वित करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. परंतु गावातील व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. बाजार समितीकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे बाजार समितीची निवडणुकही घेता आली नाही. तसेच भविष्यात सुध्दा निधी उपलब्ध होऊ शकत नसल्याने सिरसम बाजार समितीचे विलीनीकरण हिंगोली बाजार समितीमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे हिंगोलीचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
4
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 05, 2025 02:16:17Beed, Maharashtra:
बीड: अंबाजोगाई तालुक्यातील मांडवा परिसरात बिबट्याची दहशत
Anc- बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील मांडवा परिसरात बिबट्याच्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरातील शेतकऱ्यांच्या गुरांवर बिबट्याचे हल्ले होत असून आतापर्यंत तब्बल 11 शेतकऱ्यांच्या गुरांचा फडशा पाडण्यात आला आहे.
रात्रीच्या वेळी विशेषतः संध्याकाळी सातनंतर कोणीही घराबाहेर पडण्यास धजावत नाही. काही शेतकरी रात्री शेतात जात असताना त्यांच्या नजरेस बिबट्या पडला. या घटनेमुळे भीतीचे वातावरण अधिकच दाट झाले आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी धाडस करून मोबाईल कॅमेरात बिबट्याचे दृश्य कैद केले असून, तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओनंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट अधिकच गडद झाले आहे.
दरम्यान, ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे. वनविभागाने तातडीची कारवाई करावी, अन्यथा आणखी मोठे नुकसान होऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.
2
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 05, 2025 02:15:37Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_RANA_DHOL तीन फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
माझी खासदार नवनीत राणा यांच्याकडून गणपती आरतीवेळी तुफान ढोल वादन;
अँकर :- माजी खासदार नवनीत राणा यांना आपण आतापर्यंत अनेक कारणांनी चर्चेत पाहिला आहे. मात्र आता नवनीत राणा यांनी बाप्पाच्या आरती वेळी चक्क ढोल वाजवला आहे. त्यामुळे नवनीत राणा पुन्हा चर्चेत आल्या आहे. राणा यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत असून नेटकरी नवनीत राणांच्या या व्हिडिओला चांगली पसंती देत असल्याचं पाहायला मिळत आहे. राणा यांनी नवसारी जवाहर नगर अमरावती येथे अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ येथे गणरायाचे दर्शन घेऊन ढोल वाजवण्याचा आनंद घेतला.
7
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 05, 2025 01:33:14Ambernath, Maharashtra:
चिखलोली धरणात रासायनिक सांडपाणी सोडणं सुरूच!
या प्रदूषणाशी आमचा संबंध नाही - डीजी केम कंपनीचं स्पष्टीकरण
Amb water pollution
Anchor : अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीतील रासायनिक कंपन्या त्यांचं रासायनिक सांडपाणी थेट चिखलोली धरणाच्या उगम स्थानावरून येणाऱ्या ओढ्यात सोडत असल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. हे सांडपाणी डीजी केम कलर कंपनीतून सोडलं जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता. मात्र हे आरोप डीजी केम कंपनी व्यवस्थापनाने फेटाळले असून हा ओढा आणि आमची कंपनी यात एक ते दीड किलोमीटरचं अंतर असल्याचं स्पष्टीकरण कंपनीने दिलं आहे. त्यामुळे हा ओढा नेमका कोणत्या कंपनीतून येतोय? याचा शोध घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
Byte : गोरक्ष लोणकर, प्रमुख, डीजी केम कंपनी
चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
10
Report
ABATISH BHOIR
FollowSept 05, 2025 01:33:04Kalyan, Maharashtra:
कल्याण डोंबिवलीतील गणपती विसर्जन खड्यातूनच होणार...
आगमन ही खड्यातून आणि विसर्जन देखील खड्यातून..
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील अनेक रस्त्यावर खड्ड्यांच विघ्न काही संपत नाही.बाप्पाचं आगमन खड्डयातून झालं, आता विसर्जन देखील खड्यातूनच होत आहे.या आधी दीड दिवसाचे, पाच, आणि नंतर सात दिवसाच्या गौरी गणपतीचे विसर्जन देखील खड्यातून झाले,आता आता शनिवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी पण गणपती बाप्पाचे विसर्जन खड्यातूनच होणार असल्याचे चित्र कल्याण डोंबिवली दिसत आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी
Wkt... आतिश भोईर
कल्याण
11
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 05, 2025 01:32:46Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - लाडक्या गणेश बाप्पांना निरोप देण्यासाठी मिरजेत भव्य दिव्य स्वागत कमानी सजल्या..मनसेच्या कमानीवर ठाकरे बंधूंची प्रतिकृती..
अँकर - आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप देताना सांगलीच्या मिरजेत भव्य दिव्य कमानी उभारण्याची परंपरा आहे.अनंत चतुर्थीच्या दिवशी पार पडणाऱ्या ऐतिहासिक मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर निरोध शहरात 80 ते 100 फुटी उंच कमानी उभारण्यात आल्या आहेत.वेगवेगळे सामाजिक संदेश आणि पौराणिक देखावे कमानीवर साकारण्याची परंपरा असून यंदाच्या कमानींमध्ये मनसेची राज आणि उद्धव ठाकरे बंधूंची साकारण्यात आलेली कमान लक्षवेधी ठरली आहे.मराठी माणसासाठी अशा खालील मनसेकडून राज आणि उद्धव ठाकरेंचे एकत्रित असलेली भव्य प्रतिकृती यंदा उभारण्यात आली आहे,याशिवाय अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ प्रतिकृती,त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाचे कमानीवर महाराणा प्रताप यांच्या हल्दीघाटीतील मुगल सैन्यांबरोबर झालेला रणसंग्राम,तर गुगल वरती मराठा महासंघाच्या स्वागत कमानीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायदळ प्रमुख यसाजी कंक व हत्ती मधील लढाईचा प्रसंग साकारण्यात आला आहे.
बाईट - विठ्ठल शिंगाडे - शहराध्यक्ष,मनसे, मिरज.
7
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 04, 2025 15:01:49Nashik, Maharashtra:
Nsk_halganesh
Feed by mojo
Anchor देशाची हवाई सुरक्षा सांभाळणाऱ्या तसेच मी सुख होईल यांचं देखभाल दुरुस्ती करणाऱ्या ओझरच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ने सुद्धा गणेशोत्सवात भाग घेतला आहे नाशिक शहरात भालेकर मैदानावर त्यांनी पहेलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचं प्रतिनिधिक नाट्य सादर केल आहे. हे करताना हवाई दलाने कशा पद्धतीने याचा सामना केला हे दाखवत सिंदूर मोहिमेची प्रात्यक्षिकच सादर करण्याचा प्रयत्न यामधून केला आहे. थेट मिग विमान आणून लोकांना लष्करी ताकद दाखवत देश लष्करी सामर्थ्यामध्ये बळकट होत असल्याचे प्रचिती यामध्ये येतेदाखवण्याचा प्रयत्न केला आहे . संपूर्ण नाशिक मध्ये त्यामुळे हा देखावा देशभक्ती शी संबंधित असल्याने लोकांचा आकर्षण ठरला आहे.
14
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 04, 2025 15:01:44Nashik, Maharashtra:
Nsk_mumbainakaganesh
Feed by mojo
Anchor नाशिक शहरात मुंबई नाका या सर्कलवर युवक गणेशोत्सव मंडळाने जयपुर मंदिराचा देखावा साकारला आहे. जयपुर वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. विविध प्रकारचे मंदिर किल्ले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात तशीच वास्तू महिनाभर काम करून उभारण्याचं कलाकुसर आपल्याला इथे पाहायला मिळते. यामध्ये गणेशाची मूर्तीही आकर्षक पद्धतीने सजावट करण्यात आलेली आहे. एकूणच इथे करण्यात आलेली दिव्यांची रोषणाई सर्वच नाशिककरांची येताना जाताना लक्ष वेधून घेत आहे. गेल्या चौपन वर्षापासून प्रत्येक वर्षी वेगवेगळी सजावट या ठिकाणी केली जाते इतकच नाही तर वर्षभर विविध सामाजिक कार्यामांद्वारे युवक मित्र मंडळ सातत्याने कार्यरत असतं.
14
Report