Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421505

बदलापूर पालिकेची प्रभाग रचना जाहीर, निवडणूक प्रक्रिया सुरू!

CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Aug 18, 2025 11:33:33
Ambernath, Maharashtra
बदलापूर पालिकेची प्रभाग रचना जाहीर 24 पॅनेलच्या द्विसदस्यीय पद्धतीने होणार निवडणूक File name - bdl ward Anchor : बदलापूर पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा आज जाहीर झाला आहे. यामध्ये एकूण 24 पॅनेलच्या द्विसदस्यीय पद्धतीने आगामी 49 प्रभागांसाठी ही निवडणुका होणार आहेत.  Vo : बदलापूर नगरपालिकेची मुदत एप्रिल २०२० मध्ये संपली असून कोरोनामुळे निवडणुका होऊ न शकल्यानं गेल्या 5 वर्षांपासून पालिकेवर प्रशासकीय राजवट आहे. यात बदलापूरमध्ये 49 प्रभाग तयार करण्यात आले असून 24 पॅनेलच्या माध्यमातून द्विसदस्यीय पद्धतीने निवडणुका घेतल्या जाणार आहेत. 23 पॅनल हे 2 सदस्यांचे, तर एक पॅनल हा तीन सदस्यांचा असेल. या प्रारूप प्रभाग रचनेवर येत्या 31 ऑगस्ट पर्यत पालिकेत हरकती आणि सूचना नोंदवता येणार असून त्यावर सुनावणी होऊन त्यानंतर अंतिम आराखडा जाहीर होण्याची शक्यता आहे.  चंद्रशेखर भूयार ( बदलापूर)
11
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SRSHRIKANT RAUT
Aug 18, 2025 13:15:45
Yavatmal, Maharashtra:
यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी विद्यार्थ्यांनी भव्य मोर्चा काढत विशेष परभणी पदभरती व रिक्त पदे भरण्यासाठी धडक दिली. आदिवासींची १२५२० विशेष पदभरती व ८५,००० रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली. यावेळी "नोकरी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची”, “आदिवासी एकता जिंदाबाद” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. संतप्त विद्यार्थ्यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी केली.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Aug 18, 2025 13:03:16
Kalyan, Maharashtra:
कल्याण न्यूज फ्लॅश.. कल्याण पूर्व नेतीटली टेकडी परिसरातील जय भवानी नगर या ठिकाणी टेकडीवरील तीन घरांवरती दगड आणि मातीचे ढीग खाली आल्याने तीन घरांचे नुकसान.. मुसळधार पावसामुले टेकडी वरील पाण्यासॊबत दरड आणि मातीचे ढीग घरांवर.. सकाळ पासून कल्याण डोंबिवली परिसरत मुसळधार मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवली सखल भागात पाणी साचले तिघांच्या घरामध्ये कोणी नसल्याने जीवित आणि नाही.. महानगरपालिकेच्या अग्निशामक दल घटनास्थळी. byte.. नागरिक byte.. सुधीर दुष्णन अग्निशमन अधिकारी
1
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Aug 18, 2025 13:03:08
Raigad, Maharashtra:
स्लग - माणगावमध्ये मुंबई गोवा महामार्गावर पाणी ....... रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक कोंडी ...... महामार्गालगतच्या घरांमध्ये पाणी शिरले ...... महामार्ग विभागाच्या हलगर्जी पणाचा फटका ..... अँकर - रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे. माणगाव इथं जुने माणगाव परिसरात मुंबई गोवा महामार्गावरून गुडघाभर पाणी वाहत आहे . त्यातूनच वाट काढत वाहने पुढे सरकत आहेत. रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्गालगत असलेल्या घरांमध्ये पाणी शिरल्याने तेथील रहिवाशांचे हाल होत आहेत. 2005 मध्ये झालेल्या अतिवृष्टीत अशी पूरस्थिती निर्माण झाली होती त्यानंतर प्रथमच असं पाणी बघितल्याचं तिथले रहिवासी सांगतात. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या हलगर्जी पणामुळे ही स्थिती ओढवल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. बाईट 1 - स्थानिक रहिवासी बाईट 2 - स्थानिक रहिवासी
1
comment0
Report
AAASHISH AMBADE
Aug 18, 2025 12:45:34
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1808ZT_CHP_ROAD_CLOSE_1 ( single file sent on 2C) टायटल:-- वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील  इरई आणि झरपट नदीच्या पाणीपातळीतही वाढ, हडस्ती-चोरगाव रस्ता वाहतुकीसाठी बंद अँकर:--वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने चंद्रपूर शहराजवळील इरई आणि झरपट नदीच्या पाणीपातळीत देखील वाढ झाली आहे. यामुळे चंद्रपूर कडून हडस्ती आणि चोरगाव कडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पश्चिम विदर्भात झालेल्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा आणि वर्धा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ईसापुर आणि सातनाला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने पैनगंगा आणि वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने या नदीच्या उपनद्या असलेल्या इरई आणि झरपट या नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळेच चंद्रपूर कडून हडस्ती आणि चोरगावकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. मात्र या सर्व परिस्थितीमध्ये दिलासादायक बाब ही आहे की इरई धरणातून पाण्याचा विसर्ग सध्या बंद आहे. त्यामुळे चंद्रपूर शहरात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता सध्या तरी कमी आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
7
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Aug 18, 2025 12:35:51
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 3 FILES SLUG NAME -SAT_URMODI सातारा - साताऱ्यातील उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणाचे चार दरवाजे उचलून 1131 क्युसेक विसर्ग उरमोडी नदी पात्रात सुरू करण्यात आला आहे. धरणातून जलविद्युत प्रकल्पासाठी 450 क्युसेक विसर्ग सुरू आहे.असा उरमोडी नदीमध्ये एकूण 1581 क्युसेक विसर्ग उरमोडी नदीमध्ये सुरू आहे. धरणामधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे उरमोडी नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या परिसरात सध्या पावसाची संततधार सुरूच आहे.
9
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Aug 18, 2025 12:34:03
Ratnagiri, Maharashtra:
कशेडी घाटात ट्रक उलटला; चालक जखमी पोलादपूर : मुंबई–गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या कशेडी घाटात पोलादपूरजवळ अपघाताची घटना घडली आहे. चिपळूणवरून गुजरातकडे पेपरचा माल घेऊन जाणारा ट्रक घाटाच्या वळणावर नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. या अपघातात ट्रकचालकाला दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळी पोलादपूर पोलीस दाखल झाले असून अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवर काही काळासाठी अडथळा निर्माण झाला. दरम्यान, अपघातग्रस्त ट्रक बाजूला करण्यात येत असल्याने वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुसळधार पाऊस व निसरड्या रस्त्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
8
comment0
Report
SMSarfaraj Musa
Aug 18, 2025 12:33:34
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
Sng_bibtya स्लग - घरात शिरलेल्या बिबट्याला वन विभागाने केले जेरबंद.. अँकर - सांगलीच्या शिराळा तालुक्यातील माळेवाडी-कोकरूड मध्ये एका घरामध्ये बिबट्या शिरल्याचा प्रकार घडला होता. बिबट्या घरात शिरलेला पाहताच घराला बाहेरून कडी घालत बिबट्याला घरात कोंडण्यात आले.घरात शिरलेल्या बिबट्याला अखेर वन विभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे.गोसावी वस्तीतील अरुण गोसावी यांच्या घरात हा बिबट्या रात्रीच्या सुमारस शिरला आणि घरातल्याच कॉटच्या खाली जाऊन लपून बसला होता.गोसावी कुटुंबातील अश्विनी गोसावी यांना गुरगुरण्याचा आवाज आला,त्यानंतर त्यांनी कुत्रा असल्याचा समजून हुसकवण्याचा प्रयत्न केला,तसा आवाज आणखी वाढला, काही क्षणात त्यांना हा बिबट्या असल्याची बाब लक्षात आली,मग त्यांनी धावत घराच्या बाहेर जाऊन घराला कडी लावली. कुठे गेले याची माहिती आजूबाजूचीची नागरिकांना दिली.यानंतर काही वेळात वन विभाग व पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत,घरात शिरलेल्या बिबट्याला जरबंद केले,या बिबट्याला चांदोली अभयारण्यात सोडण्यात येणार आहे. घरात बिबट्या शिरल्याच्या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली होती.
4
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Aug 18, 2025 12:19:03
Raigad, Maharashtra:
स्‍लग – यंदाही चाकरमान्‍यांच्‍या प्रवासात खड्डयांचे विघ्‍न ......... 14 वर्षे रखडलेल्‍या मुंबई गोवा महामार्गाची यंदाही दुरवस्‍था ........ गणेशोत्‍सवाच्‍या तोंडावर महामार्गावर खडडयांचे साम्राज्‍य .......... कोकणवासियांचया दुर्दैवाचे दशावतार केव्‍हां संपणार .......... अँकर – गणेशोत्‍सव तोंडावर आला आहे. चाकरमान्‍यांना कोकणात आपल्‍या गावी जायचे वेध लागले आहेत. परंतु मुंबई गोवा महामार्गाची झालेली रखडपटटी आणि रस्‍त्‍यावरील खडडे यामुळे यंदाही चाकरमान्‍यांची कोकणची वाट बिकट असल्‍याचे चित्र सध्‍यातरी दिसते आहे. व्हिओ 1 – कोकणातील सर्वांत मोठा उत्‍सव असलेला गणेशोत्‍सव अवघ्‍या 8 दिवसांवर येवून ठेपला आहे. मात्र यंदाही कोकणात गणेशोत्‍सवासाठी येणारया चाकरमान्‍यांना खडडयातूनच प्रवास करावा लागणार आहे. गणेशभक्‍तांच्‍या मार्गात यंदाही खडडयाचे विघ्‍न कायम आहे. गणेशोत्‍सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गावरील खडडे बुजवून चाकरमान्‍यांनाचा प्रवास सुखकर करण्‍याचे प्रयत्‍न सुरू असले तरी सध्‍या कोसळणारया मुसळधार पावसात हे खडडे कसे बुजवणार असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. बाईट 1 – प्रवासी बाईट 2 – वाहनचालक (रिक्षा) व्हिओ 2 – मुंबई गोवा महामार्गाच्‍या चौपदरी करणाचे काम 2011 साली हाती घेण्‍यात आले. परंतु आज 14 वर्षे झाली तरी याचे काम पूर्ण झालेले नाही. या अर्धवट अवस्‍थेतीत रसत्‍याने हजारो जीव घेतलेत. अनेक ठिकाणी रस्‍ता सुस्थितीत असला तरी कोलाड, नागोठणे आणि लोणेरे येथील उडडाणपूलांची कामं अर्धवट अवस्‍थेत आहेत. जिथं रस्‍त्‍याचे काम झालेले नाही तिथं मोठमोठे खडडे आहेत. या खडडयांचा प्रवाशांना तर त्रास होतोच पण वाहनंही नादुरूस्‍त होत असतात. आता सर्व्‍हीस रोडवर पेव्‍हर ब्‍लॉक टाकून तात्‍पुरती मलमपटटी केली जात आहे. दरवर्षी गणेशोत्‍सव आला की मंत्री महामार्गाचा दौरा करतात. यंदाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी महामार्गाचा पाहणी दौरा केला आणि गणेशोत्‍सवापूर्वी रस्‍ता खडडेमुक्‍त करण्‍याचे आश्‍वासन दिलंय. बाईट 3 – शिवेंद्रराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री व्हिओ 3 – मुंबई गोवा महामार्गावरची आणखी एक मोठी समस्‍या म्‍हणजे वाहतूक कोंडी. रस्‍त्‍यावरी खडडे वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरताहेत. यामुळे प्रवाशांची तासनतास रखडपटटी होतेय. माणगाव आणि इंदापूर इथंली कोंडी कोकणवासियांच्‍या पाचवीलाच पुजलेली आहे. या कोंडीतून मार्ग काढण्‍यासाठी अनेकदा प्रयत्‍न झाले. दोन्‍ही ठिकाणी बायपासची कामे अर्धवट आहेत. तीनवेळा टेंडर काढूनही उरलेलं काम अजूनही सुरू झालेलं नाही. सरकारने या महामार्गाच्‍या पूर्ततेसाठी अनेक वायदे केले. प्रत्‍येकवेळी तारीख पे तारीखच्‍या आश्‍वासनांना कोकणवासीयदेखील वैतागले आहेत. बाईट 4 – शिवेंद्र राजे भोसले , सार्वजनिक बांधकाम मंत्री बाईट 5 – वाहनचालक (रूग्‍णवाहिका) बाईट 6 - एसटी चालक फायनल व्हिओ – मुंबई गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण होवू दे आणि या जीवघेण्‍याप्रवासातून मुक्‍ती मिळू दे असं साकडं कोकणवासी दरवर्षी गणरायाला घालतात. आता कोकणवासीयांच्‍या दुर्दैवाचे दशावतार केव्‍हा संपणार हे विघ्‍नहर्ताच जाणो. प्रफुल्‍ल पवार, झी 24 तास रायगड
9
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Aug 18, 2025 12:18:42
Yavatmal, Maharashtra:
AVB विदर्भ मराठवाडा सीमेवर असलेल्या यवतमाळच्या ईसापुर धरणाचे तेरा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला असून, अनेक शेतांमध्ये पाणी शिरले आहे. ईसापुर धरणाचे पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडण्यात येत असून पुरामुळे पैनगंगा नदीने रौद्ररूप घेतले आहे. पुरामुळे विदर्भ मराठवाड्याचा संपर्क तुटला आहे. पुसद-हिंगोली राज्य मार्ग बंद असून, नदीच्या पुलावर पाच ते सहा फूट पाणी आहे. धरण पातळी नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने सांडव्याची तेरा वक्रद्वारे उघडून ७१ हजार ३०६ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठावरील हजारो हेक्टर शेती जलमय झाली असून, तूर, हळद, सोयाबीन, कापूस, उडीद, ऊस या पिकांचे नुकसान झाले आहे.  बाईट : प्रकाश बुटले : शेतकरी
10
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Aug 18, 2025 12:16:18
Beed, Maharashtra:
बीड: परळी तालुक्यातील लिंगा नदीला पूर – कार वाहून गेली; तिघांचा जीव वाचला, एकाचा मृत्यू Anc- परळी तालुक्यातील सिरसाळा परिसरातील हुडा कोडगाव येथे मध्यरात्री ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे लिंगा नदीला अचानक मोठा पूर आला. या पुराचा अंदाज न आल्याने एक चारचाकी वाहन नदीत वाहून गेले. या दुर्दैवी अपघातात चार जणांपैकी तिघांचा जीव वाचला, तर एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. कारमध्ये चार जण प्रवास करत होते. पूराच्या प्रचंड प्रवाहात वाहन अडकल्याचे लक्षात येताच सिरसाळा पोलिसांनी तातडीने धाडस दाखवत पाण्यात उतरून तिघांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र, या अपघातात विशाल बल्लाळ या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचा मृतदेह शोधमोहीम राबवल्यानंतर दुपारी सापडला. दरम्यान, लिंगा नदीला आलेल्या पुरामुळे आसपासच्या पाच गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाने तातडीने घटनास्थळी मदतकार्य सुरू केले असून NDRF चे पथक पाचारण करण्यात आले आहे. नागरिकांनी नदीकाठच्या भागात न जाण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
8
comment0
Report
GMGANESH MOHALE
Aug 18, 2025 12:01:44
Washim, Maharashtra:
वाशिम: File:1808ZT_WSM_AGRI_MINISTER रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर: वाशिम जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असून गेल्या चाळीस वर्षानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून यामध्ये शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. या पावसात अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. असल्याची माहिती कृषी मंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. तर पंचनामे करून तत्काळ मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. घाबरून जाण्याचं कारण नाही शासन प्रशासन नागरिकांच्या सोबत असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचेही लक्ष वाशिम जिल्ह्याकडे असल्याचेही मंत्री भरणे यांनी सांगितले. बाईट: दत्तात्रय भरणे, कृषी मंत्री तथा पालकमंत्री वाशिम जिल्हा
12
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Aug 18, 2025 11:50:59
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- आमदार जगताप ऑन संग्राम भंडारे कीर्तनात हल्ला फीड 2C Anc:- हिंदुत्ववादी कीर्तनकार हभप संग्रामबापू भंडारे यांच्यावर संगमनेर येथे झालेल्या हल्ल्याचा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी निषेध केलाय...ही घटना संगमनेर येथे घडल्याने यामध्ये राजकीय वास येत असल्याचा आरोप जगताप यांनी केलाय...घटनेच्या एक दिवस सोशल मीडियावर काही पोस्ट फिरत होत्या ज्यात असा हल्ला करणार असल्याचा उल्लेख असल्याची चर्चा सुरू होती असं जगताप यांनी म्हंटलंय...सोबतच या प्रकरणाचा पोलीस प्रशासनाने सखोल तपास करायला हवा, संग्राम बापू यांच्याबाबत घडलेला प्रकार आम्ही खपवून घेणार नाही असं आमदार संग्राम जगताप यांनी म्हंटलंय. बाईट:- संग्राम जगताप, आमदार राष्ट्रवादी (AP)
14
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Aug 18, 2025 11:47:58
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- आमदार जगताप ऑन मुस्लिम मोर्चा फीड 2C Anc:- अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे गोवंश हत्या बंदी कायदा सुधारणा व्हावी आणि संघटनांकडून होणाऱ्या त्रासाविरुद्ध मुस्लिम समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता, यावर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी निशाणा साधला आहे. तुम्हाला भारतात राहायचं असेल तर भारताचा कायदा पाळावा लागेल असं संग्राम जगताप यांनी म्हटलं आहे. जर कोणी गोवंश हत्या विरोधात कायदा पाळत नसेल तर तुम्ही स्वतः फिर्याद द्यावी अस देखील त्यांनी म्हटलंय. तसेच आमचा कुठलाही गोरक्षक गैर कृत्य करत नाही पोलिसांना मदत करतात. मात्र वारंवार गो हत्या करत असेल तर त्याच्यावर मोकोका सारखे कलम लावून कारवाई करावी, आम्ही तर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करणार असल्याच संग्राम जगताप यांनी म्हटलं आहे. बाईट:- संग्राम जगताप, राष्ट्रवादी AP
14
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Aug 18, 2025 11:35:10
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- मुस्लिम मोर्चा फीड 2C Anc:- अहिल्यानगर शहरात समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला होता.. खाटीक समाजाचे प्रश्न तसेच जळगाव येथील सुलेमान पठाण हत्येच्या निषेधार्थ मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.. खाटीक समाजावर काही विशिष्ट संघटनांकडून होणाऱ्या अन्यायाला आळा घालावा, गोवंश हत्या बंदी कायद्यात तातडीने सुधारणा करावी या प्रमुख मागणी सह इतर मागण्या करण्यात आल्या. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम समाज मोर्चात सहभागी झाला होता. शहरातील आंबेडकर पुतळ्यापासून या मोर्चाला सुरवात झाली होती. तसेच गोवंश हत्या कायद्यानुसार देशी गायी वगळता इतर जनावरांच्या कत्तलीला सूट द्यावी तसेच जनावरांच्या वाहतुकीदरम्यान पोलिस संरक्षण उपलब्ध करून द्यावे. एवढेच नव्हे तर महापालिकेने पारित केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करून शहरात मान्यता प्राप्त कत्तलखाने सुरू करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले, तर मागण्यांवर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, असे समाजाच्या वतीने सांगण्यात आले. बाईट:- मुजाहिद कुरेशी, व्यापारी
12
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Aug 18, 2025 11:34:49
Akola, Maharashtra:
Anchor : आज सारं अकोला शहर 'हर-हर महादेव', ,बम-बम भोले'च्याच्या गजराने दुमदुमून गेलं होतंय.निमित्त होतंय स्वातंत्रपूर्व काळाची पार्श्वभूमी असलेल्या देशातील अकोल्याच्या प्रसिद्ध कावड यात्रेचे... 81 वर्षांची परंपरा असलेली ही यात्रा श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी असतेय. अकोल्याचं ग्रामदैवत असलेल्या राज राजेश्वराला 17 कि.मी. अंतरावरील गांधीग्राम येथील पुर्णा नदीच्या पाण्याचा जलाभिषेक केला जातोय....अकोलेकरांचा सर्वात मोठा सोहळा असणाऱ्या या महोत्सवाला सर्व-धर्म समभावाची किनार लाभली आहेय. Vo 1 : आज संपूर्ण अकोला शहर एका वेगळ्या आनंद आणि उत्साहात न्हाऊन निघालं होतंय....संपूर्ण भारतात आपल्या वेगळ्या वैशिष्टांनी प्रसिद्ध असलेली अकोल्याची कावड यात्रा आज संपन्न झालीय. स्वातंत्र्याची चळवळ ऐन भरात असतांना शहरात या नवीन परंपरेचा जन्म झालाय...श्रावण महिन्याचा शेवटच्या सोमवारी या कावड यात्रेचा उत्सव आणि प्रसिद्ध कावड यात्रेचा असतोय..या कावडयात्रेची सुरुवात होण्याची गोष्टही तेवढीच रोचक आहेय.1944 च्या सुमारास स्वतंत्र चळवळ भरात असतांना अकोला शहराला भीषण पाणी टंचाईला समोर जाव लागलं होतं. यावेळी काही युवकांनी पुढाकार घेवून अकोल्याचे ग्रामदैवत राजेश्वराला जलाभिषेकाचा संकल्प केला होताय..यासाठी 17 कि.मी.अंतरावरील गांधीग्रामहून पुर्णा नदीचे जल आणून राजेश्वराला अभिषेक करण्यात आला आणि अकोल्यात पाऊस पडला, अशी आख्यायिका आहेय..तेंव्हापासून या कावडयात्रेची परंपरा सुरु झालीय.राजेश्वरभक्त जलाभिषेक करून त्याच्याकडे उत्कर्षासाठी साकडं घालतात... यात्रेत विविध देखावे ही सदर केल्या जातात... या कावड यात्रेत सर्वधर्मीय लोक उत्साहाने सहभागी होतात.ही यात्रा पाहण्या साठी इतर जिल्ह्यासह राज्यातील शिव भक्त ही यात्रा पाहण्या साठी इथे येतात...त्यामुळे या यात्रेत अनेक मनोरंजनासाठी खेळ लावण्यात येतात ..तर भाविक दुरून हि यात्रा पाहण्यासाठी येथे येतात..या वर्षी या यात्रेत मोठे - लहान कावड सुमारे 200 वर आहेत तर लहान मोठे 150 वर पालखीनचा समावेश आहे... Byte : अक्षय देशमुख, भाविक
15
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top