Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442401

बच्चू कडू का चेतावनी: भाव नहीं मिले तो नेपाल जैसे घर में घुसेंगे!

AAASHISH AMBADE
Sept 23, 2025 16:04:50
Chandrapur, Maharashtra
Feed slug:-- 2309ZT_CHP_KADU_NEPAL ( single file sent on 2C) टायटल : वेळ आली तर नेपाळ सारखे घरात घुसू ,  बच्चू कडू यांचा चंद्रपुरातून सरकारला इशारा  अँकर:---जोपर्यंत भाव मिळत नाही तोपर्यंत सरकारला स्वस्त बसू देणार, वेळ आली तर नेपाळ सारखे घरात घुसू असा बच्चू कडू यांनी सरकारला इशारा दिला चंद्रपूर जिल्ह्यातील पाथरी येथे आयोजित जनसभेत बोलताना त्यांनी सरकारला इशारा दिलाय. चंद्रपूर जिल्ह्यात बच्चू कडू यांनी आज आंदोलन आणि जनसभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये 28 तारखेच्या त्यांच्या आंदोलनासाठी भूमिका तयार केली सावली तालुक्यातील पाथरी या अतिशय दुर्गम भागातील गावात त्यांनी जनसभा घेत सरकार विरोधात जोरदार टीका केली यावेळी बोलताना त्यांनी सरकार आम्हाला सातत्याने लुटत असून वेळ पडली तर आम्ही नेपाळ सारखे घरात घुसू, आम्हाला पेटवणं जमणार नाही पण घरात बांधून ठेवू असा इशारा त्यांनी सरकार ला दिला साऊंड बाईट १) बच्चू कडू, माजी राज्य मंत्री आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Sept 23, 2025 18:01:59
Jalna, Maharashtra: FEED NAME | 2309ZT_JALNA_ARREST(FEED SEND ON WHATSAPP) जालना : ब्रेकिंग ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंची गाडी जाळणाऱ्या आरोपीला अटक 38 वर्षीय विश्वंभर तिरुखेला अटक कदीम जालना पोलिसांची कारवाई सीसीटीव्ही फुटेज वरून पोलिसांनी आरोपी केल निष्पन्न दरेगाव रोडवर पोलिसांची कारवाई आरोपी हा कट्टर जरांगे समर्थक वाघमारे यांचा आरोप,वाघमारे यांनी दाखवले आरोपीचे जरांगे यांच्यासोबत फोटो जरांगेवर गुन्हा दाखल करा-वाघमारे यांची मागणी तिरुखे हा माझा मेहुणा आहे का? वाघमारे यांचा सोशल मीडियावरसवाल अँकर :ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची स्कॉर्पिओ गाडी जाळून गाडीचे नुकसान करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.विश्वंभर तिरुखे असं पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीच नाव आहे.दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची स्कॉर्पिओ गाडी पार्किंगमध्ये उभी असताना अज्ञात आरोपीने ही गाडी जाळली होती.शहरातील निलमनगर भागात ही घटना घडली होती.दरम्यान ही सर्व घटना पार्किंग मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.या सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी आरोपीचा तपास सुरू केला होता.दरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर ही गाडी जरांगे समर्थक असलेल्या विश्वंभर तिरुखे याने जाळल्याचं निष्पन्न झाल्यानंतर कदीम जालना पोलिसांनी आज तिरुखे याला अटक केली.नेमक्या कोणत्या कारणावरून तिरुखे याने वाघमारे यांची गाडी जाळली याचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही.विश्वंभर तिरुखे हा कट्टर जरांगे समर्थक मानला जातो.अँड गुणरत्न सदावर्ते दोन दिवसांपूर्वी जालन्यात येत असताना शहरातील नागेवाडी टोलनाक्याजवळ तिरुखे याने सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला होता.या घटनेनंतर देखील पोलिसांनी तिरुखे याला नजर कैदेत ठेवलं होतं.दरम्यान ज्या दिवशी सदावर्ते यांच्या गाडीवर तिरुखे याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याच दिवशी रात्री त्याने वाघमारे यांची गाडी जाळण्याचा प्रयत्न केला.दरम्यान तिरुखे याला कदीम पोलीसांनी अटक केली आहे दरम्यान आरोपीच्या अटकेनंतर वाघमारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.या घटनेचा कर्ता करविता जरांगे असून जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे. बाईट :नवनाथ वाघमारे, ओबीसी नेते,
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 23, 2025 18:01:51
Jalna, Maharashtra: FEED NAME | 2309ZT_JALNA_LITTLE_DEATH(FEED SEND ON WHATSAPP) जालना:ब्रेकिंग जालन्यात नदीला पूर आल्यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने चिमुकल्याचा मृत्यू. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या रुई तांड्यावर ची घटना. पावसामुळे नदीला आलेला पुरामुळे रस्ता आणि पूल पाण्याखाली गेल्याने वेळेवर उपचार न मिळाल्याने बालकाचा मृत्यू. वेळेवर उपचार न मिळाल्याने आजीच्या खांद्यावरच चिमुकल्याने सोडले प्राण. ANC:पावसामुळे नदीला पूर आला आणि गावातील रस्ता आणि पूल पाण्यात बुडाल्याने, वेळेवर दवाखान्यात नेता न आल्यामुळे उपचारा अभावी 3 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आलीय, जालन्यातील रुई तांड्यावरील ही घटना असून प्रथमेश पवार अस या चिमुकल्याचे नाव आहे.जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या रुई तांड्यावर दोन दिवसापासून सातत्याने पाऊस बरसत असून यामुळे गावाजवळील भद्रायणी नदीला पूर आला,त्यामुळे तांड्याबाहेर जाणारा रस्ता आणि पूल पुरात बुडाल्याने या चिमुकल्याला दवाखान्यात नेता आले नाही परिणामी वेळेवर उपचार न मिळाल्याने आजीच्या खांद्यावरच चिमुकल्याने प्राण सोडले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.. बाईट:प्रेमदास पवार ( मयत चिमुकलेचे वडील) बाईट:शोभा पवार (मयत चिमुकल्याची आजी )
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 23, 2025 18:01:42
Jalna, Maharashtra: FEED NAME : 2309ZT_JALNA_GRAPHES_WKT(FEED SEND On WHATSAPP) जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागांना फटका वाक थ्रू द्राक्षबागा 25 दिवसांपासून पाण्यात असल्यानं मुळया सडल्या नुकसान भरपाई द्या-द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची मागणी अँकर : जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाचा द्राक्ष बागांना देखील फटका बसला आहे गेल्या 25 दिवसांपासून द्राक्ष बागा पाण्यात असल्यानं द्राक्षांच्या मुळ्या सडल्या आहेत.त्यामुळे यंदाच्या हंगामात द्राक्ष बागायतदारांना लाखोंचा फटका बसलाय आणि द्राक्ष बागांच्या नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नीतेश महाजन यांनी बाईट सुभाष चौरे,आजोबा बाईट सचिन चव्हाण,नीळा शर्ट
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 23, 2025 17:48:40
Jalna, Maharashtra: FEED NAME | 2309ZT_JALNA_MARHAN(8 FILES) जालना :बंद करण्यात आलेला पाणंद रस्ता सुरू करण्यावरून दोन गटात बेदम मारहाण भोकरदन तालुक्यातील चोऱ्हाळा येथील घटना महिला सरपंचांनाही बेदम मारहाण तहसीलदार, मंडळाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मारहाण महिला सरपंचांच्या फिर्यादीवरून 16 जणांविरोधात गुन्हा दाखल अँकर : बंद करण्यात आलेला पाणंद रस्ता मोकळा करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार,मंडळाधिकारी यांच्या उपस्थितीत महिला सरपंचाला बेदम मारहाण करण्यात आलीय.दोन गटात झालेल्या या मारहाणी प्रकरणी महिला सरपंचांच्या फिर्यादीवरून 16 जणांवर भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जालन्यातील चोऱ्हाळा गावात ही घटना घडली आहे. चोऱ्हाळा गावातील गट नंबर 115 आणि 120 मधून चोऱ्हाळा-गारखेडा रस्ता जातो.हा रस्ता आधी सुरू होता मात्र गावातील रामसिंग शिंदे आणि गजानन शिंदे यांनी हा रस्ता बंद केल्यानं महिला सरपंचांनी या प्रकरणी भोकरदन तहसीलदारांकडे तक्रार केली होती. त्यानंतर तहसीलदार, मंडळाधिकारी आणि तलाठी चोऱ्हाळा गावात रस्ता मोकळा करण्यासाठी गेलेले असताना हा रस्ता सुरू करण्यावरून दोन गटात वाद झाला आणि नंतर मारहाण झाली.यात महिला सरपंचांचा विनयभंग करण्यात येऊन मारहाण करण्यात आली.दरम्यान या मारहाणीत काही पुरुष देखील जखमी झाले असून जखमींवर उपचार सुरू आहेत.या प्रकरणी भोकरदन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करतायत.
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Sept 23, 2025 17:30:17
Buldhana, Maharashtra:बुलढाणा ब्रेकिंग बुलढाण्यात रिपाई आठवले गटात तुफान हाणामारी... अध्यक्षपदाच्या निवडीवरून निरीक्षकासमोरच राडा... होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष सरसावले आहेत, त्याचं पार्षवभूमीवर बुलढाणा जिल्ह्या रिपाई अध्यक्ष पदाची निवड करण्याच्या दृष्टीने राज्यस्तरीय पक्षाचे निरीक्षक बुलढाण्यात आले होते , बुलढाणा येथील विश्राम गृह येथे जिल्ह्याच्याच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती त्यानुसार जिल्ह्याभरातून असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते, जिल्ह्यातून सात ते आठ जण अध्यक्ष पदासाठी इच्छूक होते त्यानुसार प्रत्येकाशी निरीक्षक चर्चा करीत असताना काहीमध्ये निरीक्षकासमोरच बाचबाची झाली.. त्याचे रूपांतर तुफान हाणामारी मध्ये झाले रिपाई पक्षाची बेशिस्त पाहायला मिळाली.. निरीक्षकाासमोरच रिपाई कार्यकर्त्याची हाणामारी झाल्याने जिल्ह्यात सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे....
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Sept 23, 2025 17:16:50
Vasai-Virar, Maharashtra:फोटो जोडला आहे. Date-23sep2025 Rep-prathamesh tawade Loc-nalasopara Slug-nalasopara update Feed send by 2c Type-AVB Slug- नालासोपाऱ्यातील ट्रान्सफॉर्मर स्फोट प्रकरण आगीत होरपळलेल्या सहा वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू अँकर - सोमवारी रात्री नालासोपारा पश्चिमेच्या डांगेवाडी येथे महावितरणच्या रोहित्राला आग लागली. या दुर्घटनेत सहा वर्षीय मुलगी होरपळून गंभीर जखमी झाली होती. आज मंगळवारी त्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री या परिसरातील ट्रान्सफॉर्मर चा अचानक स्फोट होऊन भीषण आग लागली.... या घटनेमुळे आजूबाजूच्या परीसरात खळबळ उडाली आहे. या आगीत तीन जण होरपळून जखमी झाले होते. त्यात नसरीन परवीन शेख या सहा वर्ष बालिकेचा ह समावेश होता. सुरुवातीला नसरीन हिला काल पालिकेच्या बोळींज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांनतर तिला मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आज मंगळवारी सकाळी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. असे नालासोपारा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनिल जायभाये यांनी सांगितले आहे. या मुलीच्या झालेल्या मृत्यू नंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना झाली असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. बाईट- सुनिल जायभाये, सहाय्यक पोलिस आयुक्त.
2
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 23, 2025 16:46:01
Pandharpur, Maharashtra:23092025 Slug - PPR_FADNVIS_DANDIYA file 04 ----- Anchor - नवरात्रीच्या निमित्ताने ग्रामीण भागातील महिलांना दांडिया खेळाचा आनंद घेता यावा यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार यांनी आयोजित केलेल्या दांडिया नाईट या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आज हजेरी लावली. प्रथमच मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ग्रामीण भागातील अशा दांडिया नाईट कार्यक्रमाला हजेरी लावल्यामुळे उपस्थित हजारो महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं ग्रामीण भागातील महिलांना घराबाहेर पडता येत नाही त्यामुळे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आयोजन सांगोल्यामध्ये केलं. यावेळी गुलाबी साडी आणि ओठ लाल लाल या गाण्यावर उपस्थित महिला सह सर्वांनी थिरकत आनंद घेतला
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 23, 2025 16:30:52
Pandharpur, Maharashtra:Anchor - अमृत फडणवीस यांचे दुर्गा मातेला साकडे , राज्यातील अतिवृष्टी संकटातून राज्य सावरू दे , सांगोला येथील दांडिया नाईट कार्यक्रमास आल्यानंतर साधला संवाद राज्यात अनेक जिल्ह्यात सध्या अतिवृष्टी होत आहे. शेतीचे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यातून मार्ग काढून शेतकऱ्यांना दिलासा देत आहेत. पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे हे बघूनच मी आज येथे आली आहे. महिलांचे काही इशू असतील तर तेही समजून घ्यावेत म्हणून मी आज सांगोला दांडिया नाईट कार्यक्रमास आली आहे. असे अमृता फडणवीस म्हणाल्या राज्यावर जे नैसर्गिक आपत्ती आली आहे ती दूर होऊ दे असे मी दुर्गा मातेला साकड घातलं आहे. सत्ताधारी असो वा विरोधक सर्वांनी बाहेर निघावं परिस्थितीचा विश्लेषण करावं. परिस्थिती सुधारण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा. मी उद्धव ठाकरे बद्दल बोलणार नाही. देवेंद्रजी चांगलं काम करत आहेत. देवेंद्र फडणवीस सर्वांना लवकरात लवकर दिलासा मिळावा यासाठी प्रयत्न करत आहे. प्रत्येक तालुक्याला फंडस दिले आहेत त्याचे वाटप देखील चालू झालेला आहे असा दावाही अमृता फडणवीस यांनी केला आहे. ---- Byte - अमृता फडणवीस,
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 23, 2025 16:30:35
Jalna, Maharashtra: FEED NAME : 2309ZT_JALNA_CRIME(7 FILES) जालना : मित्राला वाचवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांला बेदम मारहाण करून चाकूने भोसकले जैत कुरेशी मन्सूर कुरेशी हा विद्यार्थी जखमी महाराष्ट्र स्कुलच्या बाहेर घडली घटना अँकर : मित्राला काही जण मारहाण करण्यासाठी गेलेले असताना त्याला मारहाण करणाऱ्या मुलांच्या तावडीतून वाचवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांला बेदम मारहाण करून चाकूने भोसकण्यात आलं आहे .या घटनेत शाळकरी विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे.12 वर्षीय जैत कुरेशी मन्सूर कुरेशी असं विद्यार्थ्यांचं नाव आहे.त्याच्या डोक्याला, हाताला आणि पोटाला गंभीर जखमा झाल्या असून 13 टाके देण्यात आले आहेत.सध्या जालन्यातील शासकीय जिल्हा रुग्णालयात जखमी विद्यार्थ्यावर उपचार सुरू असून सदर बाजार पोलीसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. बाईट : जखमीचे नातेवाईक
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Sept 23, 2025 16:00:13
Wardha, Maharashtra:वर्धा ब्रेकिंग* SLUG- 2309_WARDHA_INCOMETAX - वर्ध्याच्या हिंगणघाट इथल्या सगुना फुड्सवर आयकर विभागाचा छापा - आयकर विभागाचे 25 अधिकारी कर्मचारी कारवाईत सहभागी असल्याची माहिती - सगुणाच्या सर्वच फर्मवर एकाच वेळी कारवाई - विदर्भातली सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती - सकाळी 10 वाजता पासून कारवाई सुरू असल्याची सूत्रांची माहिती - कारवाई अद्याप गुलदस्त्यात - अजूनही आयकर विभागाची कारवाई सुरू असल्याची माहिती अँकर  : हिंगणघाट येथील सगुणा फूड्स या कंपनीवर मंगळवारी सकाळी आयकर विभागाने छापा टाकत कारवाई सुरू केल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे. 10 चाललेल्या कारवाईत नेमके काय समोर आले याबाबत अद्याप तपशील समोर आला नाही. कारवाई ही अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली आहे.  व्हिओ - हिंगणघाट येथील सोयाबीन प्रक्रिया करणाऱ्या सगुना फुड्स  कंपनीवर मंगळवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या कारवाईत वीस ते पंचवीस आयकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी असून, कंपनीतील विविध विभागांची तपासणी सुरू आहे. अद्याप अधिकृतरीत्या कुठलीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे कारवाई नेमकी कोणत्या कारणासाठी करण्यात आली आहे, याबाबत अद्यापही अनिश्चितता आहे. या घटनेनंतर परिसरात उत्सुकता आहे.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 23, 2025 15:46:22
Navi Mumbai, Maharashtra:story slug - वाशीत स्कुल व्हॅनवरील चालकाचे नियंत्रण सुटून अपघात, दोन विद्यार्थी जखमी   vashi school van accident FTP slug - nm school van accident shots- school van reporter- swati naik navi mumbai anchor : खाजगी स्कुल व्हॅनवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात सदर स्कुल व्हॅन रस्त्यालगत असलेल्या गाडी तसेच झाडावर धडकल्याने स्कुल व्हॅन मधील 10 विद्यार्थ्यापैकी 2 विद्यार्थी व व्हॅन चालक जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी वाशी सेक्टर-9 मध्ये घडली. वाशी पोलिसांनी या अपघाताप्रकरणी स्कुल व्हॅन चालकाविरोधात गुन्हा दाखल करुन, त्याच्याविरोधात कारवाई सुरु केली आहे. जखमी विद्यार्थी वर उपचार करून घरी सोडण्यातले आहे. तर स्कुल व्हॅनचे स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे सदरचा अपघात घडल्याचे स्कुल व्हॅन चालकाचे म्हणणे आहे. त्यानुसार स्कुल व्हॅनची आरटीओकडुन तपासणी करण्यात येणार  आहे। gf-
3
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top