Back
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते अशोक सराफ आणि अच्युत पालवचा नागरी सत्कार!
Navi Mumbai, Maharashtra
story slug - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे च्या हस्ते जेष्ठ कलाकार अशोक सराफ आणि सुलेखनकार अच्युत पालव यांचा नागरी सत्कार
अभिनेता अशोक सराफ का सन्मान
FTP slug - nm akhil bhartiy naty parishad
byet- vijay chogule
shots-
reporter- swati naik
navi mumbai
Anchor -: मराठी रंगभूमीची मध्यवर्ती संघटना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नवी मुंबई शाखेतर्फे महाराष्ट्र भूषण अभिनेते अशोक सराफ आणि सुलेखनकार अच्युत पालव यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल नागरी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ऐरोली येथे पार पडलेल्या या नागरिक सन्मान सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अशोक सराफ आणि अच्युत पालव यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी इतका भव्य सत्कार पहिल्यांदाच करण्यात आल्याचे पद्मश्री अशोक सराफ यांनी सांगितले तर अच्युत पालव यांनी नवी मुंबईत कला दालन करण्याची मागणी केली जी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ मान्य केल्याचे जाहीर केले.
बाईट- विजय चोगुले - शिवसेना उपनेते
-----------
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Pandharpur, Maharashtra:
07072025
Slug - PPR_KARKAMB_CRIME
feed on 2c
file 01
------
Anchor - पंढरपूर तालुक्यातील करकंब गावात हादरवून टाकणारी घटना घडली आहे. पत्नीला कलाकेंद्रावर नाचण्यासाठी पाठविल्याचा गैरसमज करून घेत सावत्र दीर, सावत्र सासू आणि सासरा यांनी कुऱ्हाडीने वार करून सावत्र भावजयीचा खून केला आहे. हेमा आकाश काळे असं खून झालेल्या महिलेचे नाव आहे. मुकुंदराजा याची पत्नी मागील एक महिन्यापासून जामखेड येथे कलाकेंद्रावर नाचण्याकरिता जात होती. तिला सावत्र जाऊ मयत हेमा हिने शिकवून पाठविल्याचा संशय मुकुंदराजाच्या मनात होता. सावत्र दीर मुकुंदराजा आणि सावत्र सासू, सासरा हे सारेजण आकाश आणि त्याची पत्नी हेमावर चिडून होते. याच रागातून मुकुंदराजा याने सावत्र भावजय हेमा हिच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घातला त्यात ती मृत झाली. करकंब पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
0
Share
Report
Thane, Maharashtra:
ठाण्यात शिवसेनेकडून लावण्यात आले शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला डीवचनारे बॅनर..
मराठी माणसाची एकजूट अशीच राहू द्या असा बॅनर वर मजकूर लिहत.. बॅनरच्या एका बाजूला एक खुर्ची दाखवत त्या खुर्चीवर मुंबई महापौर तर खुर्चीच्या पायाच्या बाजूला एक तिजोरी दाखवत उद्धव ठाकरे यांचं एक व्यंगचित्र काढण्यात आले आहे..
ठाण्यातील टेंभी नाका या परिसरात शिवसेनेच्या वतीने हा बॅनर लावला असल्याने बॅनर ची चर्चा सध्या शहरात सुरू आहे..
0
Share
Report
Shirdi, Maharashtra:
Anc_ अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे.. अकरा टिएमसी क्षमता असलेले भंडारदरा धरण 75 टक्के भरले असून पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाच्या गेटमधून जवळपास दहा हजार क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आलेले आहे.. हे पाणी दरीत कोळताना तयार झालेले विहंगम दृष्य पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत..
0
Share
Report
Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_School
Feed on - 2C
------------------------
Anchor - तब्बल तीस वर्षानंतर वर्गमित्रांची पुन्हा शाळा भरली. राज्याबाहेरून आणि परदेशातूनही आपल्या मित्रांना भेटण्यासाठी अनेकांनी हजेरी लावली. नांदेडमध्ये वर्गमित्रांचे हे गेट टुगेदर झाले. जुन्या नांदेड शहरातील प्रतिभा निकेतन आणि प्रज्ञा निकेतनच्या 1994 बॅच ने गेट टुगेदर करण्याचे ठरवले. महिनाभरापासून तयारी सुरु झाली. एक एक करत सर्व मित्रांशी संपर्क करण्यात आला. चाळीस मैत्रिणी आणि पसतीस मित्र गेट टुगेदरसाठी आवर्जून आले. बासमधून सर्व मित्र आपल्या शाळेत दाखल झाले. पुन्हा वर्गात बसून मित्राणी शाळेच्या आठवणी ताज्या केल्या. त्यानंतर गेट टुगेदर कार्यक्रमात त्या बॅचला शिकवणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तब्बल तीस वर्षांनी भेटल्याचा आनंद सर्व मित्रांच्या चेहऱ्यावर बघायला मिळाला.
-----------------------------
0
Share
Report
Beed, Maharashtra:
बीड : "मी आत्महत्या करीन... तुझ्या आईवडिलांनाही मारीन" म्हणतं शाळकरी मुलीचा विनयभंग, गुन्हा दाखल
Anc : केज तालुक्यातील एका गावात 9 वी च्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत, "तू माझ्याशी बोलली नाहीस तर मी आत्महत्या करीन" तुझ्या आई-वडिलांनाही मारीन अशी धमकी देणाऱ्या तरुण निखिल कांबळे वर आता विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अल्पवयीन शालकरी मुलीचा मागील १५ दिवसांपासून त्या तरुणांकडून दुचाकीवरून पाठलाग सुरू होता, आणि शेवटी ४ जुलै रोजी त्याने धमक्यांचं टोक गाठलं. इतकंच नाही, तर मुलीच्या घरचे त्याला जाब विचारण्यासाठी गेले असता एका महिलेला देखील त्याने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे, या आरोपी निखिल कांबळेचे वडील बाळासाहेब कांबळे याच्या विरोधात देखील २ दिवसांपूर्वीच एका युवतीच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता.
0
Share
Report
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0707ZT_CHP_RAIN_ALERT
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवस पावसाचा 'ऑरेंज अलर्ट',हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा
अँकर:-- चंद्रपूरसह विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्यामुळे नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने ६ ते ८ जुलै या कालावधीत दोन दिवस चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे नदी, नाले व तलाव काठावरील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहे.विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान काल रात्रभर शहर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू होती. आतापर्यंत जिल्ह्यात।वार्षिक सरासरीच्या 23 टक्के एवढाच पाऊस नोंदविला गेला आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0707ZT_WSM_WILD_ANIMALS_PROBLEM
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर: वाशिमच्या मंगरूळपीर व मानोरा तालुक्यातील शेतकरी वन्य प्राण्यांच्या हैदोसांमुळे त्रस्त झाले आहेत.४०-५०रोहीं व नीलगाईचे कळपांनी शेतात घुसून सोयाबीन, तूर,उडीद, कापसासारखी खरीपची पिकं चरून व तुडवून मोठं नुकसान केलं आहे.काही शेतांतील पिकं पूर्णतः नष्ट झाली आहेत.शेतकरी हवालदिल असून वन विभागाकडे तातडीने वन्य प्राण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे.
0
Share
Report
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_POLICE
दुचाकी चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या म्होरक्याला अटक.
पाच दुचाकी जप्त.
धाराशिव च्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
अँकर
धाराशिव= धाराशिव जिल्ह्यात सह परराज्यातून दुचाकी चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या मोडक्याला धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्याने या गाड्या महाराष्ट्रासह कर्नाटकच्या भागातून चोरल्याचं तपासात उघड झाला आहे. महादेव उर्फ गगन अरुण शिंदे असं अटक केलेल्या अट्टल चोरट्याचं नाव आहे. त्याने कळंब तालुक्यातील मस्सा गावामध्ये एका शेडमध्ये चोरलेल्या गाड्या लपून ठेवल्याचं देखील उघड झाल आहे. महादेव शिंदे यांच्या अटकेमुळे दुचाकी चोरणाऱ्या आंतरराज्य टोळी उघड होईल असा दावा पोलिसांनी केलाय.
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम :
File:0707ZT_WSM_DOG_DIES_ELECTROCUTED
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:वाशिम नगरपालिका क्षेत्रात पथदिवा आणि हायमास्ट खांबांमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने एका भटक्या कुत्र्याचा मृत्यू झाला. नागरिकांनी वेळेवर माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पाहणी करण्यात आली, तेव्हा खांबामध्ये विद्युत प्रवाह असल्याचे स्पष्ट झाले.
गेल्या वर्षीही अशाच प्रकारची घटना घडली होती, मात्र प्रशासनाने कोणतीही दुरुस्ती न केल्यामुळे यावर्षी पावसाळ्यात पुन्हा अपघात घडला.त्यामुळे नागरिकांमध्ये संताप असून, प्रशासन मानवी जीवाला धोका झाल्यावरच जागं होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.तत्काळ उपाययोजना करून अशा धोकादायक घटनांना आळा घालावा,अशी नागरिकांकडून मागणी केली जात आहे.
0
Share
Report
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_HULLADBAJ तीन फाईल आहे
रिपोर्टर :- अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
धक्कादायक, चिखलदऱ्यात पर्यटकांची जीवघेणी फोटोग्राफी; नुसतं धाडस कशाला
अँकर :- गेल्या आठ ते दहा दिवसांपासून चिखलदर्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे त्यामुळे पर्यटक चिखदऱ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. सध्या चिखलदरा पर्यटकांनी हाऊसफुल झालं असून काही पर्यटक हुल्लडबाजी करत असल्याच पाहायला मिळत आहे तर काही अती उत्साही पर्यटक या चिखलदऱ्यातील गावीलगड शेजारी असलेल्या पॉईंटवर बॅरिकेट नसलेल्या ठिकाणी टेकडीच्या काठावर जाऊन आपला जीव धोक्यात टाकून जीवघेणी फोटोग्राफी करत आहे. तर काही पर्यटक किल्ल्याच्या भिंतीवर अगदी काठावर जाऊन फोटो काढत आहे त्यामुळे हे नुसतं धाडस कशाला असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी
WKT
0
Share
Report