Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Satara415001

आषाढी एकादशी: २५६ बसेसने १ लाख वारकऱ्यांना विठ्ठलाचे दर्शन!

TTTUSHAR TAPASE
Jul 15, 2025 04:33:51
Satara, Maharashtra
TUSHAR TAPASE 1 FILE slug name -SAT_BUS_profit सातारा - पंढरपूर येथील आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील ११ आगारातील २५६ बसेसच्या माध्यमातून १ लाख १३ हजार ८७९ वारकऱ्यांना विठ्ठलाचे दर्शन घडवले, १ कोटी ३२ लाख ४२ हजार २७० रुपयांचा विक्रमी महसूल मिळाला आहे. पंढरपूर येथील आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त एसटी महामंडळाच्या सातारा विभागाने जादा बसेसचे नियोजन केले होते. दि. २ ते १३ जुलैअखेर साताराकराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, पारगाव-खंडाळा, फलटण, कोरेगाव, मेढा, दहिवडी, वडूज या ११ आगारातून भाविक व वारकऱ्यांच्या सोयीसाठी सोडण्यात आल्या. तसेच पंढरपूरहून थेट गावी जाण्यासाठी ४० अथवा त्यापेक्षा जास्त वारकऱ्यांनी एकत्रित मागणी केली होती.यानुसार १० ठिकाणी बसेस सोडण्यात आल्या, सातारा विभागातील ११ आगारातील २५६ बसेसचे २ लाख २८ हजार ७८४ किलोमीटर झाले. तर १ हजार ३७७फेऱ्यांमधून १ लाख १३ हजार ८७९ भाविक वारकऱ्यांची सेवा करण्यात आली. या वाहतुकीमधून सातारा विभागास १ कोटी ३२ लाख ४२ हजार २७० रुपयांचा महसूल मिळाला.या उल्लेखनीय सेवेमुळे हजारो वारकऱ्यांचा पंढरपूर प्रवास सुखकर आणि सुरक्षित झाला असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड यांनी दिली.
4
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top