Back
पालघरमध्ये विठ्ठल-रखुमाईच्या गजरात भव्य दिंडी निघाली!
Palghar, Maharashtra
पालघर _
वाड्यातील गालतरे विठ्ठलनामाच्या गजरात न्हाऊन
निघालं. टाळ मृदूंग आणि विठ्ठल रखुमाईच्या जयघोषात येथे भव्य दिंडी निघाली. विठ्ठल-रखुमाई, राधा-कृष्ण आणि शिव-पार्वतीच्या वेशभूषेतील भाविक दिंडीचे प्रमुख आकर्षण ठरले होतें
आषाढी एकादशीच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने मुंबईतील मागाठाणे ते वाडा तालुक्यातील गोवर्धन इको व्हिलेज पर्यंत वृंदावन यात्रा आयोजित करण्यात आली होती.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Yeola, Maharashtra:
अँकर:-
बदलते वातावरण व सतत पडणाऱ्या पावसामुळे कोबी पिकावर किडीसह रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत असल्याने अक्षरशा महागडी औषधे फवारण्याची वेळ कोबी उत्पादक शेतकऱ्यावर आली आहे. तरी सरकारने भाजीपालाचे दर स्थिर ठेवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडे होत आहे. याच कोबी उत्पादक शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
१२१
0
Share
Report
Yeola, Maharashtra:
अँकर :
येवला तालुक्यात तसेच येवला शहराच्या परिसरात रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. सतत चालणाऱ्या या पावसामुळे नक्कीच कोळपणी झालेल्या पिकांना हा पाऊस लाभदायक असला तरी देखील रोगाचा प्रादुर्भाव देखील पिकांवर वाढणार आहे. निफाडच्या चांदोरी येथे गोदावरी नदीला पूर आला असून नदीपात्राच्या बाहेर पाणी आल्याने खंडेराव मंदिराला पाण्याने वेढा देखील घातला आहे.
दरम्यान सततच्या संतधारेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे
0
Share
Report
Nandgaon Rural, Uttar Pradesh:
अँकर :-नांदगावं भागात असलेल्या गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सलग दमदार पाऊस होत असल्यामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत झपात्याने वाढ होत असून जून महिन्यात धरणात फक्त 26.51 टक्के इतकाच पाणी साठा शिल्लक होता त्या 14.67 टक्क्याने वाढ होऊन आज धरणातील पाणी साठा 41.18 टक्के इतका झाला आहे. या धरणाच्या पाण्यावर मालेगाव, नांदगावं सह जळगाव जिल्ह्यातील अनेक गाव आणि शेतीचे सिंचन अवलंबून आहे. धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ़ होत असल्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
0
Share
Report
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 0707_BHA_BOY_DEATH
FILE - 5 IMAGE
व्हिडीओ बनविण्याच्या नादात गेला युवकाचा जीव
Anchor :- पवनी तालुक्यातील अड्याळ जवळील सोनेगाव शिवारात काल सायंकाळी दुर्दैवी व धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्हिडीओ बनविण्याच्या नादात झाडावरुन तलावात उडी घेणाऱ्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तिर्थराज धनपाल बारसागडे (१८) रा. सोनेगाव, असे मृतकाचे नाव आहे.
Vo :- सोनेगाव येथील तिर्थराज बारसागडे हा कोंढा येथील जागृती कनिष्ठ महाविद्यालयात बाराव्या वर्गात शिकत होता. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने तो गावातील दोघा मित्रांना घेऊन शेतात गेला. शेताजवळील बोडीच्या पाळीवर असलेल्या झाडावर चढला. आपल्या मित्रांना सेल्फी काढून व्हिडीओ बनविण्यास सांगितले. त्यावेळी त्याने झाडावर चढून तलावाच्या पाण्यात उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा प्रयत्न विफल ठरला. पाण्यात उडी मारताच त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. त्यातच त्याचा मृत्यू झाला. सोबत असलेल्या त्याच्या मित्रांनी याची माहिती गावकऱ्यांना दिली. पाहता-पाहता घटनास्थळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती अड्याळ पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रेत पाण्याबाहेर काढले. घटनेचा पंचनामा करुन प्रेत शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आले. त्याचेवर स्थानिक स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडला. मृतक तिर्थराज हा एकुलता एक असून त्याचे मृत्यूपश्चात आई, दोन बहिण, असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
0
Share
Report
Raigad, Maharashtra:
स्लग - कोरलई येथील संशयित बोट प्रकरण ....... रायगड जिल्ह्यात पोलिस बंदोबस्तात वाढ ...... ठिकठिकाणी नाकाबंदी, वाहनांची तपासणी .......
अँकर - मुरूड तालुक्यातील कोरलई येथील संशयित बोट प्रकरण समोर आल्यानंतर रायगडची पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्ह्यात पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. विशेषतः किनारपट्टीच्या भागात अधिक सतर्कता बाळगली जात आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. संशयास्पद वाहनांवर पोलिसांची नजर आहे.
0
Share
Report
Pandharpur, Maharashtra:
07072025
Slug - PPR_KARKAMB_CRIME
feed on 2c
file 01
------
Anchor - पंढरपूर तालुक्यातील करकंब गावात हादरवून टाकणारी घटना घडली आहे. पत्नीला कलाकेंद्रावर नाचण्यासाठी पाठविल्याचा गैरसमज करून घेत सावत्र दीर, सावत्र सासू आणि सासरा यांनी कुऱ्हाडीने वार करून सावत्र भावजयीचा खून केला आहे. हेमा आकाश काळे असं खून झालेल्या महिलेचे नाव आहे. मुकुंदराजा याची पत्नी मागील एक महिन्यापासून जामखेड येथे कलाकेंद्रावर नाचण्याकरिता जात होती. तिला सावत्र जाऊ मयत हेमा हिने शिकवून पाठविल्याचा संशय मुकुंदराजाच्या मनात होता. सावत्र दीर मुकुंदराजा आणि सावत्र सासू, सासरा हे सारेजण आकाश आणि त्याची पत्नी हेमावर चिडून होते. याच रागातून मुकुंदराजा याने सावत्र भावजय हेमा हिच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घातला त्यात ती मृत झाली. करकंब पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
0
Share
Report
Thane, Maharashtra:
ठाण्यात शिवसेनेकडून लावण्यात आले शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला डीवचनारे बॅनर..
मराठी माणसाची एकजूट अशीच राहू द्या असा बॅनर वर मजकूर लिहत.. बॅनरच्या एका बाजूला एक खुर्ची दाखवत त्या खुर्चीवर मुंबई महापौर तर खुर्चीच्या पायाच्या बाजूला एक तिजोरी दाखवत उद्धव ठाकरे यांचं एक व्यंगचित्र काढण्यात आले आहे..
ठाण्यातील टेंभी नाका या परिसरात शिवसेनेच्या वतीने हा बॅनर लावला असल्याने बॅनर ची चर्चा सध्या शहरात सुरू आहे..
0
Share
Report
Shirdi, Maharashtra:
Anc_ अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे.. अकरा टिएमसी क्षमता असलेले भंडारदरा धरण 75 टक्के भरले असून पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाच्या गेटमधून जवळपास दहा हजार क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आलेले आहे.. हे पाणी दरीत कोळताना तयार झालेले विहंगम दृष्य पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत..
0
Share
Report
Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_School
Feed on - 2C
------------------------
Anchor - तब्बल तीस वर्षानंतर वर्गमित्रांची पुन्हा शाळा भरली. राज्याबाहेरून आणि परदेशातूनही आपल्या मित्रांना भेटण्यासाठी अनेकांनी हजेरी लावली. नांदेडमध्ये वर्गमित्रांचे हे गेट टुगेदर झाले. जुन्या नांदेड शहरातील प्रतिभा निकेतन आणि प्रज्ञा निकेतनच्या 1994 बॅच ने गेट टुगेदर करण्याचे ठरवले. महिनाभरापासून तयारी सुरु झाली. एक एक करत सर्व मित्रांशी संपर्क करण्यात आला. चाळीस मैत्रिणी आणि पसतीस मित्र गेट टुगेदरसाठी आवर्जून आले. बासमधून सर्व मित्र आपल्या शाळेत दाखल झाले. पुन्हा वर्गात बसून मित्राणी शाळेच्या आठवणी ताज्या केल्या. त्यानंतर गेट टुगेदर कार्यक्रमात त्या बॅचला शिकवणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तब्बल तीस वर्षांनी भेटल्याचा आनंद सर्व मित्रांच्या चेहऱ्यावर बघायला मिळाला.
-----------------------------
0
Share
Report
Beed, Maharashtra:
बीड : "मी आत्महत्या करीन... तुझ्या आईवडिलांनाही मारीन" म्हणतं शाळकरी मुलीचा विनयभंग, गुन्हा दाखल
Anc : केज तालुक्यातील एका गावात 9 वी च्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत, "तू माझ्याशी बोलली नाहीस तर मी आत्महत्या करीन" तुझ्या आई-वडिलांनाही मारीन अशी धमकी देणाऱ्या तरुण निखिल कांबळे वर आता विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अल्पवयीन शालकरी मुलीचा मागील १५ दिवसांपासून त्या तरुणांकडून दुचाकीवरून पाठलाग सुरू होता, आणि शेवटी ४ जुलै रोजी त्याने धमक्यांचं टोक गाठलं. इतकंच नाही, तर मुलीच्या घरचे त्याला जाब विचारण्यासाठी गेले असता एका महिलेला देखील त्याने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे, या आरोपी निखिल कांबळेचे वडील बाळासाहेब कांबळे याच्या विरोधात देखील २ दिवसांपूर्वीच एका युवतीच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता.
0
Share
Report