Back
पवना धरणातील 2800 क्युसेक पाण्याचा विसर्ग: गावांना सतर्कतेचा इशारा!
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJul 07, 2025 02:00:43
Pune, Maharashtra
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File name : 0707ZT_MAVAL_PAVANA_DAM
Total files : 01
-पवना धरणा च्या सांडव्यावरून 2800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू
-नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Anchor :
पिंपरी-चिंचवडसह मावळ तालुक्याला पाणीपुरवठा करणारा पवना धरण हे 76.22 टक्के भरल्याने आणि पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा होत असल्याने पवना नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सांडव्याद्वारे 2800 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून हा विसर्ग 15 जुलैपर्यंत सुरू राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गात वाढ किंवा कपात केली जाऊ शकते असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. यामुळे पवना नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीपात्रात कुणीही उतरू नये तसेच शेती अवजारे पाण्याचे पंप जनावरे तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावीत असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे..
4
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 08, 2025 11:12:28Dhule, Maharashtra:
Anchor -७ महिन्यापूर्वी घरफोडी करणाऱ्या दिपक कोळी या संशयिताला शिरपूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चांदीचे दागिने आणि रोकड जप्त करण्यात आले आहे. शिरपूर तालुक्यातील टेकवाडे येथे सात महिन्यापू्वी घरफोडीची घटना घडली होती.त्या घटनेनंतर संशयिताचा शोध सुरु असतांना संशयित दिपक टोळीला ताब्यात घेतले आहे. त्यांनी अन्य ठिकाणी कुठे चोरी केली आहे का याचा तपास पोलीस करीत आहेत.
Byte सुरेश सिरसाठ पोलीस उपनिरीक्षक
प्रशांत परदेशी, धुळे.
12
Share
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 08, 2025 11:11:13Dhule, Maharashtra:
anchor - राज्यातील प्रस्तावित वीज दरवाढीच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक, व्यापारी, नवीकरणीय ऊर्जा आणि ग्राहक संघटनांच्या वतीने धुळ्यात आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांना संयुक्त निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र वीज वितरण कंपनी यांच्याकडून MERC (महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग) येथे दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. MERC ने पारित केलेला मूळ आदेश सर्व ग्राहक वर्गांनी स्वागतार्ह मानला होता. मात्र, केवळ काही दिवसांतच MSEDCL ने पुनर्विचार याचिका दाखल करून, त्यात आर्थिक आकड्यांत बदल करत टॅरिफ पुन्हा वाढवण्याचा प्रस्ताव दिला. दुर्दैवाने MERC ने कोणतीही जनसुनावणी न घेता टॅरिफमध्ये अचानक बदल करत नविन आदेश जारी केला. यांला सर्व स्तरातून विरोध केला जात आहे. या नविन आदेशामुळे प्रत्येक ग्राहक वर्गावर आर्थिक बोजा वाढला असून वीज दर देशातील सर्वात जास्त दरांपैकी ठरले आहेत. सरकारकडून उत्पादन खर्च कमी करण्याचा दावा केला जात असताना, प्रत्यक्षात ग्राहकांच्या वीज बिलात मोठी वाढ दिसून येत आहे.
byte - नितीन बंग, व्यापारी
प्रशांत परदेशी, धुळे.
12
Share
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJul 08, 2025 11:10:58Pune, Maharashtra:
अहिल्यानगर
नगर पुणे महामार्गावर अपघात एक दुचाकी स्वार ठार...
नितीन शेळके असे अपघातात मयत झालेल्या दुचाकीस्वराचे नाव..
रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान घडला अपघात..
आष्टी मतदार संघाचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर सुरेश धस याच्या चारचाकी वाहनाने दिली धडक...
दुचाकीस्वार जातेगाव फाट्याकडून येत असताना सागर धस याने दिली मागून जोराची धडक..
सुपा पोलीस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल...
13
Share
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 08, 2025 11:09:34Dhule, Maharashtra:
Anchor :- नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील दापूर धबधबा प्रवाहित झाला असून, या धबधबाच्या आनंद घेण्यासाठी आलेले पर्यटक पाहण्यात अडकले, अडकलेल्या पर्यटकांना स्थानिकाकडून मदत केली जात आहे. अचानक दापूर धबधब्यात पाणी वाढल्याने पर्यटक अडकले नवापूर तालुक्यातील काकड पाडा येथील पर्यटक होते सध्या नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे अनेक धबधबे प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे पर्यटक धबधब्याच्या आनंद घेण्यासाठी जात आहेत. परंतु काही अति उत्साहिक पर्यटक पाण्याच्या प्रवाहात जाताना देखील दिसून येत आहेत. दापूर धबधब्यात अडकलेल्या पर्यटकांचे स्थानिकांकडून मदत करून वाचावंन्यात आले.
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
13
Share
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJul 08, 2025 11:03:47Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- बनावट शासन निर्णय
फीड 2C
अँकर:- अहिल्यानगर जिल्ह्यात बनावट शासन निर्णय तयार करून करोडो रुपयांची कामे केल्याचा समोर आला आहे विशेष म्हणजे या कामाच्या निविदा आणि कार्यारंभ आदेश देखील प्रशासकीय पातळीवरून देण्यात आले आहेत राज्य सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर, पारनेर, श्रीगोंदा आणि नेवासा या चार तालुक्यातील तब्बल ४५ विकासकामांचे हे बनावट शासन निर्णय उजेडात आले आहेत. या बनावट शासन निर्णयांच्या आधारे अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, अहिल्यानगर या यंत्रणेमार्फत बहुतांश विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत. कामे पूर्ण झाल्यानंतर ठेकेदारांना पैसे देण्याच्या टप्प्यावर हे शासन निर्णयच बोगस असल्याचे ग्रामविकास विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदारही हवालदिल झाले आहेत. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी बोलण्यास नकार देत आहेत तर ज्या गावात ही कामे झाली आहेत त्या गावातील ग्रामस्थ मात्र या सर्व प्रकारापासून अनभिज्ञ आहेत नगर शहरापासून जवळच असलेल्या देऊळगाव सिद्धी येथे अशा बनावट जीआर च्या माध्यमातून रस्त्याची काही कामे झाले आहेत मात्र ग्रामस्थांना प्रकाराबद्दल काही सांगता येत नाही आपल्या गावात रस्त्याची कामे झाले याचाच समाधान आहे
बाईट:- संजय वाघमोडे, काम झालेल्या गावातील ग्रामस्थ
14
Share
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowJul 08, 2025 11:03:19Latur, Maharashtra:
लातूर पिक पाणी साठी....
स्किप्ट ::- बोगस बियाणांमुळे जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांवर ओढवले दुबार पेरणीचे संकट... बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करावी आणि दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, या मागण्यांसाठी छावा संघटनेचे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
AC ::- बोगस बियाणांमुळे लातूर जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्या आणि विक्रेत्यांवर कारवाई करावी आणि दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, या मागण्यांसाठी छावा संघटनेच्या वतीने आज लातुरातील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले....यावेळी कृषी विभागाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली... महिनाभरापासून पावसाने ओढ दिल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत असताना जिल्ह्यातील जवळपास अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.. याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.. येत्या आठवडाभरात मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी छावा संघटनेने दिला..
बाईट ::- दीपक नरवडे, जिल्हाध्यक्ष, छावा संघटना
14
Share
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJul 08, 2025 11:02:54Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- तहसील कार्यालयात भजन आंदोलन
फीड 2C
अँकर:- अहिल्यानगर शहरातील तहसील कार्यालयात सामाजिक कार्यकर्त्यांनी तहसीलदारांच्या दालनातच भजन आंदोलन केल आहे नगर तालुक्यातील तलाठी आणि मंडळ अधिकारी सातबाराच्या नवीन नोंदी घेण्यासाठी दिरंगाई करत आहेत शिवाय ज्या नोंदी तलाठ्याकडूनच चुकल्या आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी देखील विलंब करत आहेत हा सगळा प्रकार चिरीमिरी साठी केला जात असल्याचा आरोप या सामाजिक संघटनांनी केला असून याबाबत वारंवार तहसीलदारांना सांगूनही कसलाही फरक पडत नसल्याने वेगवेगळ्या या सामाजिक संघटनांनी एकत्र येत नागरिकांसाठी तहसीलदारांच्या दालनातच भजन आंदोलन सुरू केला आहे जोपर्यंत दोषी असलेल्या तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत ते भजन आंदोलन सुरूच राहणार असल्याचे या आंदोलकांनी म्हटला आहे
बाईट:- श्याम आसावा सामाजिक कार्यकर्ते
14
Share
Report
UPUmesh Parab
FollowJul 08, 2025 11:02:28Oros, Maharashtra:
अँकर ---- मालवण समुद्रात मासेमारीसाठी गेलेली नौका उलटल्याने एक मच्छीमार बेपत्ता झालाय. तर दोन मच्छीमार सुदैवाने बचावलेत. मालवण समुद्रात सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तीन मच्छीमार आपली छोटी पात घेऊन समुद्रात गेले असता अचानक मोठी लाट आली आणि पात पलटी झाली. यात तिन्ही मच्छीमार समुद्रात फेकले गेले आणि त्यातील एक मच्छीमार बराच दूर फेकला गेला मात्र दोघांनी आपला जीव वाचवला. बेपत्ता असलेल्या जितेश वाघ यांचा शोध सुरू असून एन डी आर एफ चे पथक दाखल झालेय.
Byte --- बचावलेल्या मच्छीमार
14
Share
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 08, 2025 11:02:17Dhule, Maharashtra:
ANCHOR - नागपूर सुरत या राष्ट्रीय महामार्गवर कोंडाईबारी घाटात दरड कोसळली, त्याने वाहतूक ठप्प झाली. पर्यायी मार्गावर एकतर्फी वाहतूक सुरू असल्याने वाहनांची मोठी कोंडी निर्माण झाली आहे. दरड कोसळल्यामुळे दहिवेलहून विसरवाडी कडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. मोठ्या प्रमाणात दगड व माती रस्त्यावर आल्याने वाहने अडकली होती , रस्त्यावर वाहनांची लांबच लांब रांग लागली. जिल्हा प्रशासनाने तत्काळ परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दहिवेलकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गावर एकतर्फी वाहतूक सुरू केली आहे. मात्र, या मार्ग दोन्ही बाजुचे वाहने जात असल्याने वाहनांची गती अत्यंत मंदावली आहे. दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, महामार्ग प्राधिकरण विभाग महसूल व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आहे का? असा सवाल वाहनधारक यांनी उपस्थित केला आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही . पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महामार्गाची बिकट अवस्था असल्याने यां मार्गांवर अपघातांचे सत्र सुरूच आहे. या भागात सतत अपघात, दरडी कोसळणे, रस्त्याला मोठाले खड्डे पडणे, पुलांमध्ये भगदाड निर्माण होणे व रस्त्याच्या मधोमध चिरा पडणे यामुळे लहान-मोठे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. स्थानिक नागरिक व वाहनचालकांच्या तक्रारीनंतर देखील या घाटाच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
14
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 08, 2025 10:38:15Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0807ZT_WSM_ASHASEVIKA_MORCHA
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:आशा सेविकान व गट प्रवर्तक यांना मानधनात वाढ करण्यात यावे,आशा सेविकाना कायमस्वरूपी शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावे,ऑनलाइन कामे देऊ नये,दिवाळीत एका महिन्याचे वेतन बोनस देण्यात यावा,जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तकाचा मागील आठ महिन्याचा रखडलेला थकीत मोबदला देण्यात यावा, सहा महिन्याची प्रसुती पगारी रजा देण्यात यावी,दर महिन्याला वेळेवर दहा तारखेच्या आत मानधन देण्यात यावे, जन सुरक्षा कायदा मागे घ्यावा,या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यासाठी आज आशा सेविकांनी व गट प्रवर्तक यांनी आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून भव्य मोर्चा काढत वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने आशा सेविका व गटप्रवर्तक धडकल्या.मोर्चामध्ये वाशिम जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
14
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 08, 2025 10:31:11Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदावर कार्यरत असणाऱ्या तरुणाला बिहारच्या गया मध्ये वीरमरण..
अँकर - भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदावर असणाऱ्या सांगलीच्या तरुणाला बिहारच्या गया येथे वीरमरण आले आहे.अथर्व संभाजी कुंभार वय 26 असे या लेफ्टनंट तरुणाचे नाव असून प्रशिक्षणावेळी 20 किलोमीटर अंतरचा टप्पा पार करताना अथर्वचा आकस्मिक निधन झाला आहे.अथर्व हा सांगलीच्या पलूस गावचा सुपुत्र आहे.अवघ्या 26 व्या वर्षी अथर्व याची लेफ्टनंट या महत्त्वाच्या पदावर निवड झाली होती,विशेष म्हणजे अथर्वने आयटी कंपनीतील नोकरी सोडून सैन्य दलात भरती होण्याचा निर्णय घेतला, अथर्वचे बिहार इथल्या गयामध्ये प्रशिक्षण सुरू होता,यावेळी त्याचे आकस्मिक निधन झाले,या घटनेने कुंभार कुटुंबासह पलूस तालुक्यावर शोककळा पसरली आहे.शासकीय इतमामात पलूस मध्ये अथर्वच्या पार्थवीवर अंत्यसंस्कार पार पडले,यावेळी अथर्वला अखेरचा निरोप देण्यासाठी पलूसकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
14
Share
Report
ABATISH BHOIR
FollowJul 08, 2025 10:07:30Kalyan, Maharashtra:
मानपाडा पोलिसांची मोठी कारवाई...
डोंबिवली निळजे परिसरातील एका हाय प्रोफाईल कॉम्प्लेक्स मध्ये एम ड्रग्स विकण्यासाठी येत असल्याची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी आरोपली सापळा रचून आरोपलीला केली अटक
डोंबिवली खोणी पळावा मध्ये काही दिवसापूर्वी एका फ्लॅट मधील जवळपास दोन कोटीचे एमडी ड्रग्स केले होते जप्त
काल देखिल निळजे परिसरात एक आफ्रिकेन नागरिक एम डी ड्रग्स विकण्या करात येणार असल्याची पोलीसना माहिती.
आठवडाभरात ४ कोटीपेक्षा जास्त किमतीचे एमडी जप्त
याप्रकरणी एका आफ्रिकन देशातील नागरिकाला अटक करून पंधराशे ग्राम असे दोन कोटीचे एम डी ड्रग्स केले हस्तगत.
आरोपीचे नाव इशा बकायोका
कल्याण परिमंडल तीन पोलिसांनी एका आठवड्यात दोनदा कारवाई करून चार कोटीचे एम ड्रग्स हस्तगत
दोन कारवाई मध्ये पाच आरोपींना अटक
नक्की ड्रग्स कोण पुरवतोय आणि कोणाला पुरवला जातोय याचा पोलीस तपास सुरू
बाईट अतुल झेंडे. डीसीपी कल्याण परिमंडल 3
14
Share
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 08, 2025 10:05:21Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0807ZT_JALNA_PKG_AC(28 FILES)
जालना :एसीच्या व्यसनापोटी महापालिका अधिकाऱ्यांचा महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला,सामाजिक कार्यकर्त्यांकडून कारवाईची मागणी
अधिकाऱ्यांना कोर्टात खेचण्याचाही ईशारा
जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांकडेही केली अधिकाऱ्यांची तक्रार
(PKG)
अँकर : जालना महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी एसीच्या हव्यासापोटी महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारल्याच माहिती अधिकारातून समोर आलंय.त्यामुळे अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी दंड थोपटत अधिकाऱ्यांना कोर्टात खेचण्याचा ईशारा दिलाय.जालना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी काय प्रताप केलाय त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट
व्हिओ :०१: एसीच्या हव्यासापोटी जालना महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी थेट महानगरपालिकेच्या तिजोरीवरच 4 लाख 7 हजारांचा डल्ला मारलाय.जालना महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त,मुख्य लेखा अधिकारी,मुख्य लेखा परीक्षक,महापालिका सहाय्यक आयुक्त या 5 जणांच्या दालनात 5 एसी बसवलेत.विशेष म्हणजे राज्य सरकारनं अधिकाऱ्यांना त्यांच्या दालनात एसी बसवण्याबाबत राज्य सरकारने काढलेल्या आदेशातील नियमांचं महापालिकेतील सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उल्लंघन केल्यानं या अधिकाऱ्यांविरोधात सामाजिक कार्यकर्त्यानी दंड थोपटलेत.
बाईट :साद बिन मुबारक, सामाजिक कार्यकर्ते
ग्राफिक्स व्हिओ:2:राज्य सरकारनं 25 मे 2022 रोजी अधिकाऱ्यांनी त्यांच्या दालनात एसी बसवण्याबाबत एक अध्यादेश काढत एसी बसवण्याबाबत अधिकाऱ्यांसाठी नियम ठरवून दिलेत.या नियमानुसार ज्या अधिकाऱ्यांचा पगार 7 व्या वेतन आयोगानुसार 1 लाख 44 हजार 200 ते 2 लाख 18 हजार 200 रुपयांदरम्यान किंवा यापेक्षा अधिक आहे तेच अधिकारी त्यांच्या दालनात एसी बसवू शकतात.पण एवढा पगार असणारा जालना महानगरपालिकेत एकही अधिकारी नसल्याचं एका माहिती अधिकारात समोर आलंय.शिवाय 5 एसी बसवण्यासाठी आलेला 4 लाख 7 हजारांचा खर्च अधिकाऱ्यांनी महापालिकेच्याच तिजोरीतून खर्च केल्याचंही माहिती अधिकारातून उघड झालं.महापालिका राखणाऱ्या अधिकाऱ्यांनीच नियम बाह्य काम केल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि एसीच्या खर्चासह वीजबिलाचा खर्च अधिकाऱ्यांकडूनच वसूल करावा अन्यथा अधिकाऱ्यांना कोर्टात खेचण्याचा ईशारा सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांनी दिलाय
बाईट : साद बिन मुबारक,सामाजिक कार्यकर्ते
व्हिओ:३: आधीच जालना महापालिकेची कर वसुलीबाबत दयनीय अवस्था आहेत.त्यात अधिकाऱ्यांनाच एसीची हवेचे व्यसन लागल्यानं या अधिकाऱ्यांच्या एसीच्या व्यसनापासून रोखणार कोण असा प्रश्न निर्माण झालाय
END P 2C -नितेश महाजन,प्रतिनिधी, जालना
14
Share
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJul 08, 2025 09:36:59Yavatmal, Maharashtra:
AVB
Anchor : केंद्रात भाजप, राज्यात भाजप आणि जिकडे तिकडे भाजपचाच प्रचार होत आहे, घरावरही भाजपचे झेंडे त्यामुळे शेतच कशाला शिल्लक ठेवता, तसंही शेती पेरून काही फायदा नाही असे सांगत प्रहार चे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सातबारा कोरा या पदयात्रेदरम्यान एका नापिक शेतात भाजपचे झेंडे रोवले, शेतीत लागवड खर्च अधिक आणि शेतमालाला भाव कमी असे चित्र असल्यामुळे आता भाजपचे झेंडे शेतात लावले आहे, त्याला कमळ लागले तर ते भाजपवाल्यांनी घेऊन जावे असा उपहासात्मक टोला बच्चू कडू यांनी लगावला.
बाईट : बच्चू कडू
14
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 08, 2025 09:07:46Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - तासगावच्या गव्हाण मध्ये शक्तिपीठ महामार्गाची मोजणी शेतकऱ्यांनी रोखली, सरकार विरोधात निदर्शन करत शक्तिपीठ रद्दची मागणी..
अँकर - सांगलीमध्ये शक्तिपीठ विरोधात आंदोलन करण्यात येत आहे तासगाव तालुक्यातल्या गव्हाण येथे शेतकरी व शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीने एकत्रित येत शक्तीपीठ महामार्गासाठी करण्यात येणारी मोजणी रोखली आहे.सांगली जिल्ह्यामध्ये नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी मोजणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे,मात्र याला ठिकठिकाणी शेतकऱ्यांकडून विरोध करण्यात येत आहे.तासगाव तालुक्यातील गव्हाण येथे प्रशासनाकडून मोजणी करण्याची प्रक्रिया आज राबवण्यात येत होती.पण शेतकऱ्यांनी याला तीव्र विरोध केला आहे,सकाळपासून शेतकरयांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे,अशी भूमिका घेत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे.
14
Share
Report