Back
नाशिकमध्ये 23 किलो गांजा जप्त, आरोपी अनिकेत खैरनारला अटक!
PPINEWZ
Jun 25, 2025 13:42:58
Pimpalgaon Baswant, Maharashtra
अँकर:-नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखा नाशिक यांनी जिल्हाभरात अमली पदार्थ विरोधी कारवाई सुरू केले आहे
दरम्यान पिंपळगाव बसवंत येथून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा घालून अनिकेत खैरनार या आरोपीला अटक केली असून त्याच्या ताब्यातील 23 किलो 610 ग्रॅम बाजार किंमत 4 लाख 72 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे आरोपी विरोधात पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ADANIRUDHA DAWALE
FollowAug 21, 2025 09:37:56Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_POLA_SAJAVAT तीन फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
बैलपोळा निमित्त अमरावतीत सजली बैलांच्या साजांची बाजारपेठ; बाजारपेठेत शेतकऱ्यांची रेलचेल
अँकर :- वर्षभर शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या बैलांचा उद्या शेतकऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा असलेला बैलपोळा सण संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा होत असताना अमरावती मध्ये बैलांना सजवण्यासाठी लागणाऱ्या साजांनी बाजारपेठ सजली आहे. बैलपोळ्यानिमित्त बैल सजावटीसाठी लागणारे साहित्य गोंडे, झुल, हार, रंग, घंटा, माळा यांची मोठी खरेदी केली जाते. यासाठी अमरावतीतील इतवारा बाजार परंपरेप्रमाणे सजून तयार झाला आहे. रस्त्यावर रंगीबेरंगी झुल, काचमणींच्या माळा, चमकदार कापडं, घंटा यांची रेलचेल दिसत आहे. दुकानदारांनी वेगवेगळी नवी डिझाईनची साहित्य बाजारात आणली आहेत. मात्र यांत्रिकीकरणामुळे बैलांची संख्या कमी होत असल्याने या बाजारात शेतकऱ्यांची संख्या आता कमी झाली आहे.
0
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 21, 2025 09:37:00Ratnagiri, Maharashtra:
मुंबई : गोवा महामार्गावरील खड्ड्यांचे ड्रोन
मुंबई गोवा महामार्ग आणि खड्डे हे समीकरण अनेक वर्षांपासून पहायला मिळत आहेत. पावसाला सुरू झाला की ही समस्या अधिक गडद होताना दिसते. मागील चार ते पाच दिवसा कोकणात मुसळधार पाऊस सुरू असताना खड्यांची ही समस्या अधिक गंभीर झाल्याचे पाहायला मिळत आहे.... ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण वाशिष्ठी नदीच्या पुलापासून शहरात जाताना रस्त्यावर पडलेले भले मोठे खड्डे वाहन चालकांसाठी डोके दुखी ठरत आहेत.
या खड्ड्यांचे ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही दृश्य पाहिलीत की खड्ड्यांची समस्या किती गंभीर आहे याचा अंदाज येईल.... हे खड्डे बुजविण्यासाठी प्रशासन जागे होईल का ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
सौजन्य : चिराग मोरे (चिपळूण)
सूचना - सौजन्य कंपल्सरी लावणे
0
Report
JJJAYESH JAGAD
FollowAug 21, 2025 09:34:00Akola, Maharashtra:
Anchor : अकोला जिल्ह्यातील चोंढी, पिंपळडोळी, अंधार सावंगी, चारमोळी आणि आलेगाव परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या भागातील तूर, मूग यांसह इतर पिके पावसाच्या तडाख्याने उध्वस्त झाली आहेत..या नुकसानीची पाहणी करण्यासाठी काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन वास्तव परिस्थिती जाणून घेतली.यावेळी शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडताना पंचनामे करताना कुठलाही भेदभाव न करता सर्व नुकसानग्रस्त गावांचा समावेश करावा, अशी मागणी केली.काँग्रेसचे नेते प्रकाश तायडे यांनीही शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा देत प्रशासनाने तातडीने व निष्पक्षपणे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.
Byte : प्रकाश तायडे, काँग्रेस नेते.
0
Report
PNPratap Naik1
FollowAug 21, 2025 09:33:43Kolhapur, Maharashtra:
Kop Flood Update WT
Feed :- Live U
Anc :- कोल्हापूरच्या पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, पण दुसरीकडे पावसाने सकाळपासून उघडीत दिल्याने समाधान व्यक्त होत आहे. असं असलं तरी जिल्ह्यातील अनेक मार्गावर पूरस्थिती जैसे थे आहे. कोल्हापुरातील बावडा - शिये मार्गावर पुराचे पाणी आले असून या मार्गावरची वाहतूक देखील पूर्णपणे बंद आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.
Play WT
0
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowAug 21, 2025 09:06:02Parbhani, Maharashtra:
अँकर - बीडच्या वडवणी न्यायालयात सरकारी वकिल विनायक चंदेल यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आत्महत्याग्रस्त चंदेल हे परभणीच्या इंदेवाडी या गावचे रहिवासी होते. या घटने नंतर इंदेवाडी गावावर शोककळा पसरलीय. तर त्यांचे कुटुंबीय अबोल झालीयेत. त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुले असा परिवार आहे. मोठ्या मेहनतीच्या जोरावर विनायक चंदेल हे 5 महिन्यांपूर्वीच सरकारी अभियोक्ता बनले होते, त्यांना सामाजिक जाण होती,शिवाय ते खूप नैतिक होते अस गावकरी सांगतायेत, घरातील कमावत व्यक्ती गेल्याने कुटुंब अडचणीत सापडलंय. बीडच्या वडवणी येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात काल सकाळी साडे दहा वाजता कक्षातील खिडकीच्या गजाला सत्कार स्वीकारलेल्या शालने ऍड. चंदेल यांनी गळफास लावून घेत आत्महत्या केलीय. त्यांच्या खिशात चिठ्ठी सापडली असून सदर चिठ्ठी मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या त्यांच्या कुटुंबियांना पोलिसांनी हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगत चिठ्ठी दडवल्याचा आरोप कुटुंबीयांनी केलाय. त्यांना घरगुती कुठली ही चिंता नव्हती मग त्यांनी कार्यालयीन कामकाजाच्या ताण तणावातून आत्महत्या केली असावी अस कुटुंबियांच म्हणणं आहे. पोलिसांनी चिठ्ठीतील माहिती दडवल्याने या प्रकरणात आता संशय व्यक्त होत आहे. ही चिठ्ठी तर बदलली तर जाणार नाही ना असा संशय ग्रामस्थ व्यक्त करतायेत तर चिठ्ठीत जे काही लिहल आहे,त्याप्रमाणे कारवाई व्हावी यासाठी या प्रकरणाचा तपास सीआयडी किंवा उच्चस्तरीय कमीटीच्या माध्यमातून व्हावा अशी मागणी मयत वकील यांचे भाऊ मुरलीधर आणि मुलगा विश्वजित यांनी केलीय...
- १२१ with family
बाईट- सुरेखा चंदेल- पत्नी
बाईट- मुरलीधर चंदेल- मयताचा भाऊ
बाईट- विश्वजीत चंदेल- मयताचा मुलगा
बाईट- रंगनाथ कच्छवे- ग्रामस्थ
4
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 21, 2025 09:03:48Nashik, Maharashtra:
nsk_sinhasthpkg
feed by 2C
दुपारी अडीच वाजता बैठक आहे बैठक झाल्यानंतर त्यावरचे अपडेट देईन ते यामध्ये ऍड करावे
Anchor सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कोट्यावधी रुपयांच्या कामांवरून दांडगाई केली जात असल्याने महायुतीमध्ये संघर्ष निर्माण झालाय.नाशिक पालकमंत्रिपदापाठोपाठ आता कुंभमेळ्याच्या कामांच्या बाबतीतही छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत. त्यामुळे कुंभमेळ्यावर आता आरोप प्रत्यारोपांचा आखाडा महायुतीमध्येच रंगणार आहे
Vo 1 नाशिकचा कुंभमेळा गिरीश महाजन यांच्या माध्यमातून भाजपने हायजॅक केलाय. सिंहस्थासाठी महापालिकेने १५ हजार कोटी, तर अन्य विभागांनी ९ हजार कोटी असा २४ हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. कुंभमेळा नियोजनाच्या सर्व बैठका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाल्या आहेत.नाशिक मध्ये राष्ट्रवादीचे सहा आमदार तर शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनाही विचारले जात नाही. त्यामुळे छगन भुजबळ ने थेट जिल्हाधिकाऱ्यांना सांगून आज कुंभमेळा बैठक बोलावली आहे. माझ्या नाशिक मध्ये कुंभमेळ्यात नेमकं काय काम सुरू आहे याची चाचपणी मी करणार असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे
Byte 1 छगन भुजबळ
Vo 2 स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले जात नसल्याने सिंहस्थ कामांसाठी भुजबळ यांच्यासोबत शिंदे गट दोन्ही आक्रमक झालेय. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नगरविकास विभागाने सिंहस्थाच्या कामांबावत माहिती दिली जात नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. प्राधिकरणाची स्थापना, कायदा निर्मिती, टप्यातील कामांना मंजुरी, वित्तीय तरतुदी यासंदर्भात फेरअहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे एकाच वेळी भुजबळ आणि शिंदे सिंहस्थाबाबत सक्रिय झाल्यामुळे आता प्रशासनाची कोंडी होणारे
Byte 2 अजित पवार उपमुख्यमंत्री नाना पटोले माजी प्रदेशाध्यक्ष काँग्रेस
Vo 3 सिंहस्थ अवघ्या दीड वर्षांवर येऊन ठेपला असताना सिंहस्थासाठी पुरेसा निधी मिळत नसल्याने यंत्रणेत अस्वस्थता आहे. त्यातील काही त्रुटींवर बोट ठेवून आता भुजबळ सरकारला अडचणीत आणू शकतात. आता सिंहस्थ वरून रणकंदन होणार हे निश्चित
3
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 21, 2025 09:00:25Nashik, Maharashtra:
nsk_godavridrone
feed by 2C
anchor कालपासून गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने गोदावरी दुथडी भरून वाहत आहे दुतोंड्या मारुतीच्या पाणी आल्याने रामकुंडावर पुन्हा पूरसदृश्य परिस्थिती दिसत आहे. सध्या पावसाने उसंत घेतल्याने ड्रोन च्या माध्यमातून चित्रित करण्यात आलेली काही दृश्य झी 24 तास च्या प्रेक्षकांसाठी
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 21, 2025 08:49:44Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - वराह जयंतीची सुरुवात नितेश राणे यांनी स्वतःच्या घरापासून करावी - आ. अमोल मिटकरी
*आमदार अमोल मिटकरी ऑन राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस भेट*
आता ते कोणा कोणाची भेट घेतात तो त्यांच्या प्रश्न आहे
शेवटी बेस्ट मध्ये जो पराभव झाला त्यामुळे त्यांना भविष्यातले संकेत काही मिळाले असावेत
त्यामुळे त्यांनी भेट घेतल्याची नकारता येत नाही
*ऑन बेस्ट निवडणूक*
बेस्ट ही एक घटक चाचणी आहे. महायुती यामध्ये उत्तमरित्या पास झाली आहे
यावरच मुबंई पालिकेचे भविष्य ठरल आहे
जे सुज्ञ असतील त्यांनी समजून जावं, महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज निवडणुकीत महायुवतीचा बाजूनी जनमत आहे हे समजून जावं
तुम्ही कितीही मोठ्या आघाडी केल्या तरी जनतेला जे योग्य वाटतील ते करतील
*ऑन राज ठाकरे प्रेस*
लोकशाही मध्ये कोणतीही निवडणूक लहान नसते किंवा मोठी नसते
लोकसभा आणि विधानसभा जरी महत्वाचा असला तरी बेस्ट आणि स्थानिक निवडणुका महत्वाचा आहेत
कदाचित राज ठाकरे यांना मोठे आकडे आणि मोठा निवडणुका जिंकण्यासाठी स्वप्न पाहत आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी स्वप्न पाहिले असेल.
*ऑन आनलाईन गेम विधायक*
केंद्र सरकारचा या निर्णयचं स्वागत केलं पाहिजे
ऑनलाईन गेमिंग मुळे विद्यार्थी यांचं आर्थिक शोषण होत आहे
*ऑन अजित पवार टीका धर्मेंद्र यादव*
जेव्हा समाजवादीचे लोक लाल टोपी घालून बोलत असतात. त्यावेळेस त्यांचा टीका करणे हा उद्योग बनलेला असतो
*उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत जो निर्णय घ्यायचा आहे तो पंतप्रधान मोदी यांनी घेतला आहे*
यामध्ये आता धर्मेंद्र यादव यांनी हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही
जे आरोप झाला तो सिद्ध झाला नाही आणि हा राहतो उत्तर प्रदेश मध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणाचा धर्मेंद्र यादव यांना गंध नाही.
अजितदादांवर बोलताना आपली टोपी आणि आपलं तोंड पाहिलं पाहिजे
*ऑन सुनीत्रा पवार आरएसएस कार्यालय भेट*
मला त्या बद्दल काही माहिती नाही. मात्र आदरणीय वहिनी यांना विचारतो
*ऑन रोहित पवार सहकार बँक घोटाळा*
रोहित पवार हे उदयनमुक्त नेतृत्व म्हणून महाराष्ट्राला लाभले आहेत
संजय राऊत यांना ऐकून ऐकून लोक कंटाळल्यामुळे महाविकास आघाडी करून रोहित पवार यांना पुढे केले जात आहे
एका मोठ्या उंचीचा वक्ती महत्वाकडे रोहित पवार यांची वाटचाल सुरु आहे.
मात्र त्याच्यावर असलेल्या आरोपाच निरंकार करावं, त्या नंतर नेत्या बनाव
नेत्या बनाव एवढं सोपं नसतं शरद पवार यांची कार्यकीर्द एकदा तपासावी, नवीन ऍडमिन झाल्यासारखं मी पुढं बसतो अशी त्यांची अवस्था झाली आहे
*ऑन नगर मोर्चा*
अशी व्यक्ती कीर्तनकार असू शकत नाही
कीर्तनकाराच्या नावाला कलंक असणारी ती व्यक्ती आहे
तुमच्या कीर्तनातून बिश्नोई आणि नथुराम गोडसे नावाचा जर जयजयकार होत लोकांवर देशद्रोहाचे खटले चालले पाहिजेत.
महात्मा गांधीजींना गोळ्या घालून ठार करताना नथुराम गोडसे अशा कीर्तनकारांचा जर हिरो असू शकतो ही लोकं किती विध्वंस निर्माण करू शकतो
महाराष्ट्राला वारीला सर्वधर्मसमभावाची परंपरा आहे. त्यामुळे मी त्याला कीर्तनकार म्हणणार नाही मात्र कीर्तनकार यांच्या वेशात जर तू गँगस्टर असेल. त्यामुळे त्याच्यात आणि दाऊद मध्ये फरकच नाही.
त्याचे समर्थन करणारा जो आघाडी बिघाडीचे कोण अध्यक्ष असेल ते पण तितकेच बदमाश आहे...
सामाजिक वातावरण खराब करणाऱ्या अशा प्रवृत्ती आहेत त्यांच्यावरही मकोका अंतर्गत कारवाई केली पाहिजे..
*नथुराम गोडसे यांचा समर्थन करणारा व्यक्ती हा महाराज नसून त्याला लागलेला कलंक आहे*
तुषार भोसले आणि वारकरी संप्रदायाचा काय संबंध.
महायुतीचा घटक असला तरी जे चूक आहे ते चूक आहे..
नथुराम गोडसे समर्थन करणारी अवलाद वारकरी असू शकत नाही..
*ऑन नितेश राणे वराह जयंती*
*वराह जयंतीची सुरुवात नितेश राणे यांनी स्वतःच्या घरापासून करावी*
काही वराह असतील तर त्यांनी ते पकडून आणवीत आणि त्याची पूजा करावी
वराह जयंती म्हणजे पोस्टर ची पूजा नाही.. प्रत्यक्ष वराह पकडून आणायचं आणि त्याची पूजा करायची..
वराहची पूजा त्यांनी घरी करावी यासाठी त्यांना शुभेच्छा..
शेतकऱ्यांवर पुराचं सावट आहे आणि उद्या शेतकऱ्यांच्या काळजातला सण बैलपोळा आहे
शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे हे राहिलं बाजूला आणि काहीतरी दिशाभूल करायची..
वराह जयंती आम्ही कधी पाहिली नाही.
कृष्णाची जन्माष्टमी आपण साजरी केली. त्यांच्या मूर्तीची पूजा केली कारण कृष्ण हे पुराण पुरुष आहेत..
रामाची रामनवमी करतो कारण ते पुराणपुरुष आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करतो ते इतिहास पुरुष आहे.. आज ते हयात नाही.
विष्णूच्या बारा अवतारांमध्ये वराह अवतार आहे का तर ते आहे.
वराह जयंती साजरा करताना पूजा झाली पाहिजे. हे मी म्हणत नाही तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या पुस्तकात म्हटला आहे..
त्यालाच फक्त आमचे परममित्र नितेश राणे यांनी फॉलो केलं पाहिजे.
वराह पूजनाची सुरुवात स्वतःपासून त्यांनी करावी..
बाईट : -
अमोल मिटकरी, आमदार राष्ट्रवादी अजित पवार पक्ष
5
Report
KPKAILAS PURI
FollowAug 21, 2025 08:46:50Pimpri-Chinchwad, Maharashtra:
pimpri fraud
kailas puri Pune 21-8-25
feed by 2c
Anchor - हिंजवडी आय टी पार्क मध्ये कंपनीचे गोपनीय सोर्स कोड आणि सॉफ्टवेअर सोल्यूशन चोरून नवीन कंपनी स्थापन करून ८२ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी तिघांना पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी अटक केली आहे. बिश्वजीत मिश्रा, नयुम शेख, सागर विष्णू अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी दत्तात्रय प्रभाकर काळे यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ही घटना एप्रिल २०२४ पासून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत हिंजवडी मधल्या फ्युचरिइम टेक्नॉलॉजीज कंपनीत घडली. फिर्यादी काळे यांची हिंजवडी मध्ये आयटी कंपनी आहे. त्यामध्ये आरोपी काम करत होते. आरोपींनी संगनमत करून कंपनीसोबत केलेल्या कराराचा भंग केला. फिर्यादीच्या कंपनीतील गोपनीय आणि कॉपीराईट संरक्षित सोर्स कोड आणि सॉफ्टवेअर सोल्यूशनची चोरी केली. तसेच, १०० बेकायदेशीरपणे विकसित केलेल्या वेबसाइटचा मोबदला, अपॉर्च्युनिटी लॉस आणि इतर सेवांच्या माध्यमातून कंपनीचे ८२ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान केले. आरोपींनी नवीन कंपनी स्थापन करून स्वतःच्या फायद्यासाठी फिर्यादीच्या कंपनीतील सॉफ्टवेअर सोल्यूशन आणि सोर्स कोडचा वापर केला. अखेर या तिघांना अटक करण्यात आली.
8
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 21, 2025 08:35:30Nashik, Maharashtra:
nsk_khaddeprotest
feed by 2C
Anchor :- नाशिकच्या चांदवडमध्ये रस्ते खड्डेमय होऊन दुरावस्था झाली आहे.त्यातच पावसाचे पाणी खड्ड्यात साचल्याने नागरिकांना रस्त्यावर चालतांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.वारंवार मागणी करूनही नगर परिषद प्रशासन दखल घेत नसल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे नेतृत्वाखाली रस्त्यांवरील खड्ड्यांतील पाण्यात कागदी होड्या सोडत गांधीगिरी करत आंदोलन करीत नगरपरिषद प्रशासनाचा निषेध केला.तातडीने नवीन रस्ते बांधण्याची आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
4
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 21, 2025 08:34:59Raigad, Maharashtra:
स्लग - पर्यावरण पूरक मखरांना गणेश भक्तांची पसंती .... पुठ्ठा, स्पंज, लाकडी पट्ट्या, प्लायवूड याचा मखरांमध्ये वापर ......
अँकर - गणेशोत्सव अगदी तोंडावर येवून ठेपला आहे. गणरायाच्या स्वागताची तयारी सर्वत्र सुरू आहे. सजावटीसाठी बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे आणि आकाराचे मखर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पर्यावरण पूक मखरांना गणेशभक्तांची अधिक पसंती आहे. रायगडच्या बाजारात मारूया फेरुटका
व्हिओ 1 – थर्माकोलचा वापर पर्यावरणासाठी घातक असल्याने त्यांच्या वापरावर काही वंर्षांपूर्वी बंदी आणण्यात आली. त्यामुळे कलाकारांनी थर्माकोलच्या वस्तूंमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी थर्माकोलला पर्याय असलेल्या वस्तूंचा वापर करीत पर्यावरण पूरक मखरांची निर्मिती सुरू केली. सध्या बाजारात पर्यावरण पूरक मखर पहायला मिळतात. थर्माकोल ऐवजी. फोम, रबरशीट, लाकूड, प्लायवूड , स्पंज याचा वापर करून बनवलेली मखरे गणेशभक्तांच्या पसंतीला उतरत आहेत.
बाईट – सुहास पाटील, व्यावसायिक
व्हिओ 2 – गणपती सजावटीत वेळ जावू नये यासाठी गणेशभक्त रेडीमेड मखर वापरणे पसंत करतात. दीड फुटांपासून चार फुट आकाराच्या मखरांवर थर्माकोल सारखी किंबहुना त्याहून अधिक आकर्षक कलाकुसर आणि रंगकाम केलेली मखरे सध्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. थर्माकोल मखरांपेक्षा किंमती थोडया जास्त असल्या तरी ही मखरे टिकावू असल्याने गणेशभक्त त्याला पसंती देत आहेत.
बाईट 2 – अखिल कोळगावकर , गणेश भक्त
व्हिओ – आपला गणेशोत्सव पर्यावरण पूरक व्हावा याकडे गणेशभक्तांचा कल दिसून येतो आहे.
फायनल वॉक थ्रू – प्रफुल्ल पवार
8
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 21, 2025 08:32:40Nashik, Maharashtra:
Anc: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन द्यावे आणि चायनीज वस्तूंना बहिष्कार करावा असे आवाहन केल्यानंतर मालेगावात व्यावसायिकांनी चायना मालाची होळी केली.
या होळीत लाखो रुपयांच्या चायना वस्तू जाळण्यात आल्या.
विनोद कुचोरिया या व्यावसायिकाने आपल्या दुकानातून चायनीज वस्तू बाहेर काढून त्यांची होळी केली आणि "आता कधीही चायना वस्तू खरेदी किंवा विक्री करणार नाही" असा ठाम निर्धार व्यक्त केला.
यावेळी इतर व्यावसायिकांनीही स्वदेशी वस्तूंवर भर देत चायना मालावर बहिष्काराचे आवाहन केले.
1
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 21, 2025 08:32:21Ratnagiri, Maharashtra:
अँकर- कोकणी माणूस आणि विशेषतः चाकरमानी ज्या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात, तो गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणरायाचे आगमन होणार आहे. त्यामुळेच जिल्ह्यातल्या सर्वच मूर्तिशाळांमध्ये लगबग वाढलेली दिसून येत आहे.
व्हीओ-कोकणात गौरी-गणपतीचा सण अगदी घराघरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक कोकणी कुटुंबात या सणाबद्दल एकप्रकारचा व्यक्तिगत मनोभाव तयार झालेला आहे. त्यामुळे 4 महिने अगोदरच कोकणात या सणाची लगबग सुरू होते. आपल्याला मूर्ती यावर्षी कशी हवी आहे इथपासून ते मूतीशाळेत पाट देण्यापर्यंत लगबग असते. हा गणेशोत्सव सण अवघ्या 6 दिवसांवर येऊन ठेपला आहे. दरम्यान त्यामुळे गुणेशमुर्तीशाळांमध्ये लगबग दिसू लागली आहे. विविध आकारातील सुबक गणेशमुर्ती घडवण्याची कामं सध्या सुरु आहे.
बाईट- असुतोष कोतवडेकर,मूर्तिकार
व्हिवो - अनेक गणेशमुर्ती शाळांमध्ये मूर्तिकाम जवळपास पूर्ण झालं आहे. जिल्ह्यात अनेक मूर्तिशाळांमध्ये प्रामुख्याने शाडूच्या मातीपासून मूर्ती बनवल्या जातात. या शाडू मातीच्या मूर्तींना चांगली मागणी आहे. पर्यावरणपूरक मूर्ती असल्याने अनेकांची पसंती शाडू मातीच्या मूर्तींना असते. सध्या मूर्तीकाम झाले आहे, रंगकाम सुरू आहे.
बाईट- जयसिंग पेंडामकर, मूर्तिकार
बाईट- कल्पना पेंडामकर, महिला मूर्तिकार
बाईट-उमेश पेंडामकर, कलाकार
बाईट- राकेश पेंडामकर, मूर्तिकार
व्हीओ-परंपरेसाठी कोकणातल्या गणेशोत्सवाला आजही महत्व आहे. त्यामुळे किती फँन्सी आकारातल्या गणेशाच्या मुर्ती आल्या तरी कोकणी माणुस गणपतीच्या मुर्तींबाबतची आपली परंपरा काही सोडणार नाही. आजही पारंपारीक गणेशमूर्तींना मोठी मागणी आहे. त्यामुळेच गणेशमूर्ती शाळांमध्ये लालबागच्या राजाप्रमाणेच बालरुपातील, आसनावर बसलेला, वाघावर बसलेला, टिटवाळ्याच्या प्रतिकृती असलेला याच प्रमाणे उजवापाय पुढे असलेला, उजवा हातांनी आर्शिवाद देतानाच्या गणपती मूर्तींना कोकणात विशेष मागणी आहे.
प्रणव पोळेकर झी मीडिया रत्नागिरी
1
Report
DPdnyaneshwar patange
FollowAug 21, 2025 08:31:26Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_YATRA
मराठा आरक्षण तीर्थक्षेत्र रथयात्रा तुळजापुरातून सुरू
मराठा आरक्षण 29 तारखेला दिलं नाही तर येणाऱ्या कार्तिकीला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अडवणार
आरक्षण दिलं नाही तर येणाऱ्या काळात मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येऊ देणार नाही
मराठा समाजाची दहशत संपूर्ण देशाला माहित आहे एकदा येऊ देणार नाही म्हटलं की देणार नाही
मराठा आरक्षणासाठी तीर्थक्षेत्रांवर रथयात्रा घेऊन निघालेल्या रामभाऊ गायकवाड यांचा तुळजापुरात तुळजाभवानीला साकडं घातल्यानंतर सरकारला इशारा
पंढरपुरातून विठ्ठल दर्शनाने रथयात्रेला सुरुवात, त्र्यंबकेश्वर येथे होणार शेवट
यापूर्वी रामभाऊ गायकवाड यांनी मराठा आरक्षण प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना पंढरपुरात अडवलं होतं
आरक्षण प्रश्नावर लढा देताना गायकवाड यांच्या वारीत साप सोडण्याच्या वक्तव्यावरूनही झाला होता वाद
Byt: रामभाऊ गायकवाड, मराठा कार्यकर्ते
2
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 21, 2025 08:31:16Jalna, Maharashtra:
FEED NAME : 2108ZT_JALNA_KUCHE(9 FILES)
जालना : बदनापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान
आमदार नारायण कुचेंनी केली नुकसानग्रस्त भागात पाहणी
गेवराई बाजार,दुधनवाडी, सोमठाणा भागात पाहणी
कृषी विभागाकडून पंचनामे सुरु
अँकर : जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात गेल्या चार दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्य पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. कपाशी, तूर, मका, सोयाबीन,मुग, उडीद हे पाण्याखाली गेल्याने पीकं चार दिवसात सडलीय.दरम्यान आज बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी नुकसान ग्रस्त गेवराई बाजार, दूधनवाडी, सोमठाणा भागात जाऊन पाहणी केली.तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला.दरम्यान शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं कुचे यांनी म्हटलं आहे.
बाईट: नारायण कुचे, आमदार,बदनापूर
3
Report