Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Parbhani431401

बीडच्या वडवणी न्यायालयात सरकारी वकिलाची आत्महत्या, कुटुंबावर शोककळा!

GDGAJANAN DESHMUKH
Aug 21, 2025 09:06:02
Parbhani, Maharashtra
अँकर - बीडच्या वडवणी न्यायालयात सरकारी वकिल विनायक चंदेल यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आत्महत्याग्रस्त चंदेल हे परभणीच्या इंदेवाडी या गावचे रहिवासी होते. या घटने नंतर इंदेवाडी गावावर शोककळा पसरलीय. तर त्यांचे कुटुंबीय अबोल झालीयेत. त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुले असा परिवार आहे. मोठ्या मेहनतीच्या जोरावर विनायक चंदेल हे 5 महिन्यांपूर्वीच सरकारी अभियोक्ता बनले होते, त्यांना सामाजिक जाण होती,शिवाय ते खूप नैतिक होते अस गावकरी सांगतायेत, घरातील कमावत व्यक्ती गेल्याने कुटुंब अडचणीत सापडलंय. बीडच्या वडवणी येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात काल सकाळी साडे दहा वाजता कक्षातील खिडकीच्या गजाला सत्कार स्वीकारलेल्या शालने ऍड. चंदेल यांनी गळफास लावून घेत आत्महत्या केलीय. त्यांच्या खिशात चिठ्ठी सापडली असून सदर चिठ्ठी मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या त्यांच्या कुटुंबियांना पोलिसांनी हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगत चिठ्ठी दडवल्याचा आरोप कुटुंबीयांनी केलाय. त्यांना घरगुती कुठली ही चिंता नव्हती मग त्यांनी कार्यालयीन कामकाजाच्या ताण तणावातून आत्महत्या केली असावी अस कुटुंबियांच म्हणणं आहे. पोलिसांनी चिठ्ठीतील माहिती दडवल्याने या प्रकरणात आता संशय व्यक्त होत आहे. ही चिठ्ठी तर बदलली तर जाणार नाही ना असा संशय ग्रामस्थ व्यक्त करतायेत तर चिठ्ठीत जे काही लिहल आहे,त्याप्रमाणे कारवाई व्हावी यासाठी या प्रकरणाचा तपास सीआयडी किंवा उच्चस्तरीय कमीटीच्या माध्यमातून व्हावा अशी मागणी मयत वकील यांचे भाऊ मुरलीधर आणि मुलगा विश्वजित यांनी केलीय... - १२१ with family बाईट- सुरेखा चंदेल- पत्नी बाईट- मुरलीधर चंदेल- मयताचा भाऊ बाईट- विश्वजीत चंदेल- मयताचा मुलगा बाईट- रंगनाथ कच्छवे- ग्रामस्थ
8
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Aug 21, 2025 11:35:09
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2108ZT_CHP_TALAV_BREAK ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील सावंगी -बडगे तलाव फुटल्याने हजारों हेक्टर शेतजमीन पाण्याखाली, प्रशासनाची धावाधाव, निकृष्ट बांधकामाची नागरिकांची तक्रार      अँकर:-- गेल्या काही दिवसातील संततधार पावसामुळे नागभीड तालुक्यातील सावंगी- बडगे तलाव फुटल्याने हजारों हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली आहे. यामुळे धान पीक आणि मासेमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लघुसिंचन विभाग विभागाने सावंगी- बडगे येथिल तलावाचे बांधकाम नुकतेच केले. कंत्राटदारांचे हलगर्जीपणामुळे बांधकाम जुन महिन्या पर्यंत सुरू होते.  यावर्षीच करण्यांत आलेले बांधकाम असल्यामुळे तलावांची पाळ फुटल्याने हजारों हेक्टर शेतजमीन खरखडुन वाहुन गेल्याने शेतकऱ्यांचे मोठें नुकसान झाले. या तलावांतील लाखों रुपयांचे मासे वाहुन गेल्याने मच्छीमार संस्थेचेही मोठें नुकसान झाले आहे. कंत्राटदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पिडीत शेतकरी व मच्छीमारांनी केली आहे. बाईट १) स्थानिक नागरिक आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Aug 21, 2025 11:33:49
Buldhana, Maharashtra:
लवकरच बुलढाणेकरांची तहान भागणार; दिवाळीपूर्वी पाणीपुरवठा योजना पूर्ण होणार Anchor - बुलढाणा शहरासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली पाणीपुरवठा योजना दिवाळीपूर्वीच पूर्ण होणार असल्याचं दिसत आहे. यामुळे यंदाची दिवाळी बुलढाणेकरांसाठी गोड ठरेल. शहराच्या पाणीपुरवठा योजनेचं काम अंतिम टप्प्यात असून, नगरपालिका प्रशासनाने कंत्राटदाराला दिवाळीपूर्वी हे काम पूर्ण करण्याचा अल्टिमेटम दिला आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत ही नवीन पाणी योजना राबवण्यात येत आहे. या योजनेत एकूण १७० किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकण्यात येत आहे. पाच टप्प्यांपैकी चार टप्प्यांचं काम पूर्ण झालं आहे. सध्या वेगवेगळ्या ठिकाणी पाईपलाईनची टेस्टिंग सुरू आहे आणि खोदकाम केलेल्या रस्त्यांची दुरुस्तीही वेगात सुरू आहे. पाणी योजनेचं काम पूर्ण झाल्यानंतर शहराला नियमित आणि मुबलक पाणीपुरवठा होईल. त्यामुळे वर्षानुवर्षे पाण्याची समस्या भोगणाऱ्या बुलढाणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. Byte - गणेश पांडे , मुख्याधिकारी, नगर परिषद बुलढाणा
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Aug 21, 2025 11:32:55
Kalyan, Maharashtra:
कल्याण पूर्वेतील रस्त्यांवरील खड्ड्यांप्रश्नी महेश गायकवाड आक्रमक गणेशोत्सवापूर्वी रस्ते सुस्थितीत करा अन्यथा अधिकाऱ्यांचेच विसर्जन करू.. Anchor :- कल्याण पूर्व येथील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी आक्रमक पवित्रा घेतला आज त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेत गणेश उत्सवापूर्वी रस्ते सुस्थितीत करा अन्यथा गणेशोत्सवात अधिकाऱ्यांचेच विसर्जन करू असा इशारा दिला vo..कल्याण पूर्व येथील कोळशेवाडी ,काटेमानवली कल्याण पूना लिंक रोड, चिंचपाडा ,नांदिवली ,भाल परिसरातील रस्त्यांवर रस्ता नाही तर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल आहे. महापालिकेला अनेकदा निवेदन देऊन देखील केडीएमसीकडून ही कामे संथ गतीने सुरू आहेत याचा नाहक त्रास वाहनचालकांना तसेच नागरिकांना सहन करावा लागतोय .माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत आक्रमक पवित्रा घेतला. आज त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले आहे. रस्त्यांवरील खड्डे गणेश उत्सवापूर्वी सुस्थितीत करा अन्यथा गणेशोत्सवात एकाही अधिकाऱ्याला केबिनमध्ये बसून देणार नाही व खड्ड्यांमध्येच अधिकाऱ्यांचे विसर्जन करू असा इशारा केडीएमसीला दिलाय . byte... महेश गायकवाड माजी नगरसेवक
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Aug 21, 2025 11:32:48
Pandharpur, Maharashtra:
Slug - PPR_KHOT_BYTE file 03 ---- Anchor - तथाकथित गोरक्षकांनी शेतकऱ्यांना त्रास दिला तर त्यांच्या ढुंगणात नांगराचा फाळ घालू, गोरक्षकाना इशारा देताना आमदार सदाभाऊ यांची जीभ घसरली गोरक्षकांच्या विरोधात मी भूमिका घेतली शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहिलो. मला त्यांच्या कडून धमक्या यायला लागल्या. पण माझा वाटेला जाऊ नका गेला तर अवघड होईल असा इशारा दिला आहे. गोरक्षकांच्या नावाखाली गब्बर सिंग यांच्या टोळ्या तयार झाल्या असल्याचा आरोप आमदार खोत यांनी केला. गोरक्षक आणि पोलिस मिळून शेतकऱ्याच्या घरावर दरोडा टाकत असल्याचा आरोप आमदार खोत यांनी केला. ---- साउंड बाईट - सदाभाऊ खोत
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Aug 21, 2025 11:17:43
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 3 FILES SLUG NAME _SAT_DESAI_PAHNI सातारा - साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कराड येथील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी केली. त्याचबरोबर तांबवे आणि कराड येथील पूलांची देखील पाहणी करून अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला. गेली दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात पाऊस झाल्याने कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला होता. यामुळे पाटण आणि कराड येथील अनेक पूल पाण्याखाली गेले होते. या पूरग्रस्त भागाची आणि उपाययोजनांची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी त्या ठिकाणी भेट देऊन केली.यानंतर अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या byte - शंभूराज देसाई
1
comment0
Report
GMGANESH MOHALE
Aug 21, 2025 11:07:18
Washim, Maharashtra:
वाशिम: File2:2108ZT_WSM_ANGANWADI_MORCHA रिपोर्टर: गणेश मोहळे,वाशिम अँकर: वाशिममध्ये आज अंगणवाडी सेविका जिल्हा परिषद कार्यालयावर आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून धडकल्या, FRS ची सक्ती बंद करावी, मातृत्व वंदना योजनेची कामे आंगणवाडी कर्मचाऱ्यांना देवू नये,लाडकी बहिण योजनेची कामे आंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात देवू नये,यात मालेगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका दमयंती पाखरे यांना कामावर रुजू करून घेण्यात यावे, या मागण्यांना घेऊन आज अंगणवाडी सेविका आणि बालवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध घोषणाबाजी करत जिल्हा परिषद धडकल्या.मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
1
comment0
Report
ABATISH BHOIR
Aug 21, 2025 11:05:03
Kalyan, Maharashtra:
बारवे येथे सापडलेले ते नवजात अर्भक अनैतिक संबंधातून जन्मलेले 22 वर्षीय तरुणाला बेड्या , अल्पवयीन आईवर रुग्णालयात उपचार सुरू Anc कल्याण पश्चिमेकडील बारावे परिसरात दोन दिवसांपूर्वी सकाळच्या सुमारास कचराकुंडीलगत कचऱ्यातून लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येत होता .काही नागरिकांच्या लक्षात आल्याने निरखून पाहिले असता एका गोणीत एक दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक असल्याचे आढळले.नागरिकांनी या बाळाला उचलून घेत खडकपाडा पोलिसांना याबाबतची माहिती दिली .पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बाळाला बालसंगोपन केंद्रात पाठवत तिला कचऱ्यात फेकणाऱ्या आई-वडिलांचा शोध सुरू केला होता. आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तसेच परिसरात चौकशी केल्यानंतर समोर आलेलं सत्य पाहून पोलीसाना धक्का बसला.या बाळा 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने जन्म दिला होता . अल्पवयीन मुलीला आई-वडील नसून ती घरात एकटीच राहत होती तर तिच्या आजी आजोबा गावी राहतात. एकटी असल्याची संधी साधत एका 22 वर्षीय तरुणांनी तिच्याशी मैत्री वाढवली यातून ती गर्भवती राहताच नऊ महिने तिला घराबाहेर पडण्यास मज्जाव केला. नऊ महिन्यानंतर घरातच त्याने मुलीला जन्म देण्यासाठी या मुलीला मदत करत जन्माला येताच हे बाळ कचराकुंडीत फेकून दिले होते. यानंतर तो निघून गेला होता . कडकडे पोलिसांनी या 22 वर्षीय तरुणाला टिटवाळा परिसरातून बेड्या ठोकण्यात . तर या पंधरा वर्षे अल्पवयीन मुलीचे प्रकृती ठीक नसल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे खडकपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांनी सांगितले Byte कल्याणजी घेटे ( ACP कल्याण)
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Aug 21, 2025 11:00:35
Nashik, Maharashtra:
नाशिक ब्रेक - nsk_kumbhmeet feed by live u 51 - मंत्री छगन भुजबळ सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आखाड्यात - छगन भुजबळांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आढावा बैठकीला सुरुवात - बैठकीला सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित - पालकमंत्री नसलो तरी जिल्ह्यातील मंत्री म्हणून बैठक घेण्याचा अधिकार, भुजबळांचं स्पष्टीकरण - कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यानंतर ६ दिवसातच भुजबळांकडून कुंभमेळ्याचा आढावा - १५ ऑगस्टला कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली होती आढावा बैठक - सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या काही महिन्यांवर आल्यानंतर देखील अजून सिंहस्थांच्या कामांना प्रारंभ नाही - परराज्यातील ठेकेदारांना सिंहस्थाच्या कामात पर राज्यातील ठेकेदारांना कामं दिल्याचा देखील होतोय आरोप - सिंहस्थ ची कामे सुरू होत नसल्याने भुजबळ यांनी देखील व्यक्त केली नाराजी - या सर्व पार्श्वभूमीवर भुजबळांच्या संस्था आढावा बैठकीला महत्व
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Aug 21, 2025 10:46:14
Ambernath, Maharashtra:
अंबरनाथमध्ये दुचाकीने घेतला पेट निसर्ग ग्रीन रिलायन्स मार्ट समोरील घटना अग्निशमन दलाने आग विझवली Amb bike fire Anchor : अंबरनाथमध्ये एका दुचाकीने अचानक पेट घेतला. निसर्ग ग्रीन संकुलाजवळ रिलायन्स मार्ट समोर ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत ही आग विझवली. सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास एक दुचाकीस्वार या रस्त्याने जात असताना अचानक त्यांच्या गाडीला आग लागली. ही आग काही क्षणातच भडकली आणि संपूर्ण दुचाकी आगीत जळून खाक झाली. ही आग नेमकी कशामुळे लागली? हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
1
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Aug 21, 2025 10:17:24
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara Slug - 2108_BHA_AGITATION FILE - 6 VIDEO भंडारा जिल्ह्यातील एएनएम, जेएनएम आरोग्य सेविका बेमुदत संपावर.... Anchor :- भंडारा जिल्ह्यातील एएनएम, जेएनएम आरोग्य सेविका बेमुदत संपावर गेलेले आहेत मागील 15 ते 20 वर्षापासून सेवा देऊन देखील त्यांना शासनाने शासकीय सेवेत सामावून घेतलेला नाही. अद्यापही या परिचारिका कंत्राटी पद्धतीनेच आरोग्य विभागात सेवा देत आहेत. या विषयाला घेऊन अनेकदा शासन स्तरावर बैठका सुद्धा झाल्या मात्र त्यावर अद्यापही तोडगा निघाला नाही. म्हणून जो पर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करत नाही तो पर्यंत बेमुदत संप सुरू राहील अशी भूमिका घेतली आहे. BYTE :- 2
4
comment0
Report
PNPratap Naik1
Aug 21, 2025 10:16:10
Kolhapur, Maharashtra:
हिंदुस्तानी भाऊच सोशल मिडियावरील अकाऊंट कायमस्वरूपी बंद करा मुंबईच्या संतोष घोलप यांची कोल्हापूरच्या सायबर पोलिसांत तक्रार कोल्हापूर सायबर पोलिसांनी संतोष घोलप यांचा नोंदवला जबाब तब्बल दोन तास नोंदवला सायबर पोलिसांनी जबाब हिंदुस्तानी भाऊ उर्फ विकास पाठक यांने कोल्हापूरकरांविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची घोलप यांची मागणी जबाबात तक्रारदार संतोष घोलप यांनी हिंदुस्तानी भाऊचे सोशल अकाउंट कायमस्वरूपी बंद करण्याचा नोंदवला जबाब घोलप यांच्या जबाबा नंतर कोल्हापूरचे सायबर पोलीस कारवाई करणार
7
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Aug 21, 2025 10:15:29
Ratnagiri, Maharashtra:
रामदास कदम यांचा राज ठाकरे यांच्यावर घणाघात रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे बोलताना माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. कदम म्हणाले की, राज ठाकरे यांनी नुकतीच वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि मुंबईच्या विकासाचा आराखडा त्यांच्याकडे सुपूर्द केला. या भेटीवरून कदमांनी शंका उपस्थित करत म्हटले की, दोन भाऊ एकत्र आल्यावर ठाकरे ब्रँड तयार होईल आणि महाराष्ट्राची सत्ता तुमच्या हातात येईल अशा मोठमोठ्या घोषणा झाल्या होत्या. पण त्या आणाभाका आता हवेतच विरल्या आहेत, हे महाराष्ट्राने पाहिले पाहिजे. कदमांनी पुढे सांगितले की, नुकत्याच झालेल्या BEST निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा अक्षरशः ‘भोपळा’ वाजला असून एकही जागा मिळवता आली नाही. निवडणुकीत असा अपयश मिळाल्यानंतर लगेचच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन विकासाचा आराखडा दिला, यावरून हे स्पष्ट होते की आता मुंबई महानगरपालिकेतही मनसेला तसाच शून्याचा आकडा गाठावा लागेल. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच राज ठाकरे यांनी हे अप्रत्यक्षपणे कबूल केले आहे, असे रामदास कदम यांनी ठामपणे सांगितले. खेडमध्ये दिलेल्या या विधानामुळे ठाकरे ब्रँड आणि मनसेच्या राजकीय भवितव्याबद्दल पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली असून राज्याच्या राजकारणात यामुळे खळबळ माजली आहे.
7
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Aug 21, 2025 10:06:23
Chakan, Maharashtra:
Feed 2C Slug: Chakan Traffic File:02 Rep: Hemant Chapude(Chakan) ब्रेकींग न्युज चाकण पुणे... पुणे नाशिक चाकण तळेगाव महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी... चाकणमध्ये वाहनांच्या पाच किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा... वाहतूक कोंडीने सर्वसामान्य प्रवाशांसोबत कामगारही त्रस्त.... चाकणची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आठवडाभरापूर्वीच पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता चाकणचा दौरा....अजित पवारांच्या दौऱ्यानंतर चाकणची वाहतूक कोंडीची परिस्थिती जैसेथेच... नित्याच्या वाहतूकंडीने सर्वसामान्य प्रवासी आणि कामगारही बेजार प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया चाकण पुणे...
6
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Aug 21, 2025 10:05:54
Bhandara, Maharashtra:
चितळाने घेतला सीआरपीएफ जवानाचा बळी.... कारधा- पवनी मार्गावर दवडीपार (बा.) जवळ घडला अपघात Anchor : कारधा- पवनी मार्गावर दवडीपार (बा.) जवळ धावत्या मोटारसायकल समोर चितळ आडवा आल्याने झालेल्या अपघातात सीआरपीएफ जवानाचा मृत्यू झाला. दयाल क्षीरसागर (४७) रा. शहापूर असे मृतकाचे नाव आहे. Vo :- भंडारा तालुक्यातील शहापूर येथील दयाल क्षीरसागर हे गडचिरोली येथे सीआरपीएफ मध्ये कार्यरत होते. सुट्टीवर शहापूर येथे आले होते. आपल्या दुचाकीने पवनी- भंडारा मार्गे जात असतांना दवडीपार (बा.) जवळ धावत्या मोटारसायकल समोर अचानक चितळ आडवा आल्याने अपघात घडला. त्यात दुचाकीस्वार जवान रस्त्यावर पडून जखमी झाला. अपघाताची माहिती पोलीस व वनविभागाला मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने जखमीला नागपूरला हलवित असतांना वाटेतच जखमीची प्राणज्योत मालवली. त्याच्या अपघाती मृत्यूने शहापूरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
5
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Aug 21, 2025 09:37:56
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_POLA_SAJAVAT तीन फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 बैलपोळा निमित्त अमरावतीत सजली बैलांच्या साजांची बाजारपेठ; बाजारपेठेत शेतकऱ्यांची रेलचेल अँकर :- वर्षभर शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या बैलांचा उद्या शेतकऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा असलेला बैलपोळा सण संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा होत असताना अमरावती मध्ये बैलांना सजवण्यासाठी लागणाऱ्या साजांनी बाजारपेठ सजली आहे. बैलपोळ्यानिमित्त बैल सजावटीसाठी लागणारे साहित्य गोंडे, झुल, हार, रंग, घंटा, माळा यांची मोठी खरेदी केली जाते. यासाठी अमरावतीतील इतवारा बाजार परंपरेप्रमाणे सजून तयार झाला आहे. रस्त्यावर रंगीबेरंगी झुल, काचमणींच्या माळा, चमकदार कापडं, घंटा यांची रेलचेल दिसत आहे. दुकानदारांनी वेगवेगळी नवी डिझाईनची साहित्य बाजारात आणली आहेत. मात्र यांत्रिकीकरणामुळे बैलांची संख्या कमी होत असल्याने या बाजारात शेतकऱ्यांची संख्या आता कमी झाली आहे.
7
comment0
Report
Advertisement
Back to top