Back
छत्रपती संभाजीनगरमध्ये 207 नशेच्या गोळ्या जप्त, एकाला अटक!
NMNITESH MAHAJAN
Aug 27, 2025 10:45:46
Jalna, Maharashtra
FEED NAME : 2708ZT_JALNA_MEDICINE(2 FILES)
छत्रपती संभाजीनगर: मिसरवाडीत अमली पदार्थ प्रतिबंधक पथकाची कारवाई,207 नशेच्या गोळ्यांसह एक जण अटकेत
अँकर : छत्रपती संभाजीनगर शहरात पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी स्थापन केलेल्या अमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने शहरातील मिसरवाडी परिसरात छापा टाकून 207 नशेच्या गोळ्या जप्त करत एकाला अटक केली आहे. शेख आसिफ शेख जिलानी उर्फ जोहरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून सिडको पोलिसात त्याच्या विरोधात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowAug 27, 2025 14:46:37Shirdi, Maharashtra:
Shirdi News Flash
जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या भेटीला...
शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहात भेट...
*दोघांचीही बंद दाराआड चर्चा सुरू...*
सध्या मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षावरून आंदोलनावर ठाम...
यासंदर्भात चर्चेची शक्यता...
0
Report
SKSACHIN KASABE
FollowAug 27, 2025 14:18:08Pandharpur, Maharashtra:
27082025
slug - PPR_CHATURTHI_ALNKAR
file 01
----
Anchor - श्री गणेश चतुर्थी निमित्त श्री विठ्ठलास सोने मुकुट, नाम हि-याचा, कौस्तुभ मणी, दंडपेट्या जोड, हि-याचा कंगण जोड, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी, शिरपेच, मत्स्य जोड, तोडे जोड, तुळशीची माळ, जवेची माठ तसेच श्री रूक्मिणी मातेस सोने मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड तोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, कंबरपट्टा इत्यादी अलंकार परिधान करण्यात आले होते.
3
Report
JMJAVED MULANI
FollowAug 27, 2025 14:02:39Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 2708ZT_INDAPURBHARNE
FILE 5
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी गणरायाचं मंगल आगमन…
Anchor :— महाराष्ट्रात सर्वत्र लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचा उत्साह ओसंडून वाहतोय. त्यातच राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी गणेश बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करून मोठ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात आलं. यावेळी भरणे यांचा संपूर्ण परिवार एकत्रितपणे सहभागी झाला होता. विशेष म्हणजे बाप्पाच्या समोर शेतात पिकवलेल्या विविध भाज्या, फळं आणि कडधान्यांची आकर्षक आरास सजवण्यात आली आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या निमित्ताने गणरायाच्या चरणी प्रार्थना केली..
2
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 27, 2025 13:15:23Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 2708ZT_GAD_FLOOD_RESCUE
( single file sent on 2C)
टायटल:-- गणेश चतुर्थीच्या दिवशीच भामरागडात पुराचे संकट, शंभर गावांचा संपर्क तुटला, गर्भवती महिलेसाठी प्रशासनाचे सफल अभियान
अँकर:-- गडचिरोली जिल्ह्यात सीमावर्ती भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. या दरम्यान भामरागड तालुक्यातील पामुलगौतम नदीपलीकडील हिंदेवाडा येथील एका गर्भवती महिलेला अचानक प्रसुतीच्या वेदना झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. मात्र पर्लकोटासह पामुलगौतम नदी देखील तुडुंब भरून वाहत असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे झाले होते. आज पहाटे चार वाजता च्या सुमारास एसडीआरएफ टीमच्या मदतीने बोटीद्वारे पामुल गौतम नदीतून रेस्क्यू करत त्या गर्भवती महिलेला पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले. सौ. अर्चना विकास तिम्मा असे त्या गर्भवती महिलेचे नाव असून तिला भामरागड तालुका मुख्यालयातील ग्रामीण रुग्णालयात प्रसुती करिता दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात सफल प्रसूती होत टिनर कन्येला जन्म दिलाय. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या सूचनेनुसार तहसीलदार किशोर बागडे यांनी संपूर्ण यंत्रणा सतर्क केली. भामरागडच्या मुख्य बाजारपेठेत पर्लकोटा नदीचे पाणी शिरले असून सुमारे ३० ते ३५ दुकानांत पाणी शिरले आहे. प्रशासनाच्या सूचनेनुसार व्यापाऱ्यांनी काल रात्रीच आपले साहित्य सुरक्षित स्थळी हलविल्याने मोठे नुकसान टळले आहे.लगतच्या भागात पावसाचे प्रमाण सुरू असल्याने जिल्हाधिकारी यांनी सर्व विभागांना सज्ज राहण्याच्या तसेच आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
गडचिरोली
4
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 27, 2025 13:04:03Jalna, Maharashtra:
FEED NAME : 2708ZT_CSN_ACCIDENT(2 FILES)
छत्रपती संभाजीनगर :ब्रेकिंग
छत्रपती संभाजीनगर शहरातील जालना रोडवर भीषण अपघात
अँकर : छत्रपती संभाजीनगर शहरातील जालना रोडवर भीषण अपघात झालाय.या अपघातात चार चाकी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या अपघातात चारचाकी वाहनाचा चालक किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे
5
Report
TTTUSHAR TAPASE
FollowAug 27, 2025 12:50:17Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -SAT_RAJE_SON
साताऱ्यात मोठ्या जल्लोषात गणेशाचे आगमन होत असून राजघराणातील छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस या ठिकाणी देखील श्री गणेशाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील थेट 14 वे वंशज खा.उदयनराजे भोसले यांचे पुत्र छत्रपती वीरप्रतापराजे भोसले यांच्या हस्ते गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी उदयनराजे यांच्या पत्नी छत्रपती दमयंती राजे भोसले यांनी गणेशाचे पूजन करून उत्साहात गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. त्यावेळी जलमंदिर पॅलेस या ठिकाणी असणारे सर्व घरातील सदस्य उपस्थित होते.
11
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 27, 2025 12:48:25Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 2708ZT_GAD_4_NAX_DEAD
( single file sent on 2C)
टायटल:-- गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील छत्तीसगड सीमेवर पोलीस- नक्षल चकमक, 4 नक्षली टिपले, 1 पुरुष आणि 3 महिला नक्षलींचा समावेश, ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू
अँकर:- गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील छत्तीसगड राज्याच्या नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात गडचिरोली विभागाचे नक्षल गट्टा दलम, कंपनी क्रमांक 10 व इतर नक्षली दबा धरून बसले असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर C-60 ची 19 पथके आणि CRPF क्विक एक्शन टीमची 02 पथके या जंगल परिसरात रवाना करण्यात आली होती. या भागात सुरू असणाऱ्या प्रचंड पावसादरम्यान दोन दिवसानंतर पोलीस पथकानी आज सकाळी जंगल परिसरात पोहोचून शोध मोहीम राबविली. नक्षल्यानी पोलीस पथकांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. पोलीस पथकाने प्रभावी प्रत्युत्तर दिले. सुमारे आठ तास चाललेल्या चकमकीनंतर शोध घेतला असता एकूण 04 जहाल नक्षल्यांचे मृतदेह (01 पुरुष आणि 03 महिला) सापडले आहेत. याशिवाय घटनास्थळावरून 01 SLR रायफल, 02 INSAS रायफल व 303 रायफल जप्त करण्यात आली आहे. या भागात उर्वरित नक्षल्यांचा शोध घेण्यासाठी विरोधी अभियान सुरू करण्यात आले आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
गडचिरोली
11
Report
DPdnyaneshwar patange
FollowAug 27, 2025 12:04:40Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव:
DHARA_GANPATI
धाराशिवच्या तुळजापुरात पुरातन विहिरीत गणेशाची स्थापना
40 ते 50 फुटी दगडी विहिरीच्या दगडी कमानीत गणराय विराजमान
ऐतिहासिक पुरातन विहिरीच्या संवर्धनासाठी गणेश मंडळाचा पंधरा वर्षापासून उपक्रम
Anc: राज्यभरात गणरायाचा मोठ्या जल्लोषात स्वागत होत आहे. धाराशिव चा तुळजापुरात आगळावेगळा पद्धतीनं गणरायांचं स्वागत केलं जातं. तुळजापुरातील साळुंखे गल्लीत असलेल्या ऐतिहासिक पुरातन विहिरीत गणरायांची प्राणप्रतिष्ठा केली जाते. जय भारत गणेश मंडळाकडून गेल्या पंधरा वर्षांपासून हा उपक्रम राबवला जातो. पुरातन दगडी विहिरीच्या दगडी कमानीत गणराय विराजमान होतात. ऐतिहासिक विहिरीच्या संवर्धनासाठी आम्ही विहिरीत गणपती बसवण्याचा निर्णय घेतलाच गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. या आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्राणप्रतिष्ठा केलेली गणरायाला पाहण्यासाठी जिल्हाभरातून गणेश भक्त गर्दी करतात.
7
Report
SNSWATI NAIK
FollowAug 27, 2025 11:51:56Navi Mumbai, Maharashtra:
story slug - सीबीडीत मिरवणुकीत हाणामारी
गणपती मिरवणूक मे हाणामारी
FTP slug- nm cbd fighting
shots- video
reporter- swati naik
navi mumbai
anchor - गणपतीच्या आगमनावेळी दोन मंडळाच्या पथकात लागलेल्या चुरशीचा शेवट हाणामारीने झाला. सीबीडी सेक्टर ८ येथे मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. यात रस्त्यालगतच्या काही दुकानांचे देखील नुकसान झाल्याचे समजते.
सीबीडी येथील दोन मंडळाच्या श्रीगणेशाची आगमन मिरवणूक सुरू होती. सेक्टर ८ येथे दोन्ही मंडळ समोरासमोर आले असता त्यांच्या बँड पथकात वाजवण्याची चुरस लागली होती. यातूनच त्यांच्यात वाद झाला असता त्याचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. यामध्ये रस्त्यालगत असलेल्या काही दुकानांची नुकसान झाले पोलीसानी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाद मिटवला ।
gf-
-----
6
Report
JJJAYESH JAGAD
FollowAug 27, 2025 11:51:47Akola, Maharashtra:
Anchor : अकोला जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. तर अकोट तालुक्यातील मुंडगाव येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रिका नदीला पूर आला आहे. नदी ओसंडून वाहत असून मुंडगाव गावातील रस्त्यांवरही पाणी साचलेले दिसत आहे.या पावसामुळे मुंडगाव, वनी, वारुळा आणि लोहारी परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.तर प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
9
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 27, 2025 11:33:51Junnar, Maharashtra:
Feed 2C
Slug: Junnar Jarange Welcome Tayari
File:05
Rep: Hemant Chapude(Junnar)
Anc: मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले असून जरांगे पाटील यांचा आजचा मुक्काम पुणे जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नर शहरात असणार आहे, यावेळी जरांगे पाटील यांचं शिवजन्मभूमीत जंगी स्वागत केलं जाणार आहे,आजच्या मुक्कामानंतर जरांगे पाटील उद्या सकाळी किल्ले शिवनेरी वरती नतमस्तक होऊन जन्मस्थळावरील माती आपल्या कपाळी लावून मुंबईच्या दिशेने रवाना होतील नक्की जरांगे पाटील यांचा दौरा कसा असणार आहे याच बाबत मराठी समन्वयकांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
Wkt+121: प्रतिनिधी हेमंत चापुडे To मराठा समन्वयक
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया जुन्नर पुणे...
10
Report
SKSudarshan Khillare
FollowAug 27, 2025 11:33:13Yeola, Maharashtra:
अँकर
येवला शहरात आज गणेशोत्सवाच्या स्वागताला उत्साहाची झळाळी लाभली. सकाळपासूनच रस्त्यांवर भक्तांची वर्दळ, मंगल धून आणि सजावट यामुळे वातावरण गणेशमय झाले. स्वामी मुक्तानंद विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून झांज व लेझीम पथकासह भव्य प्रात्यक्षिक सादर केले. ढोल-ताशांच्या गजरात, लेझीमच्या तालावर आणि टाळ-झांजांच्या निनादात शहर दुमदुमून गेले. “गणपती बाप्पा मोरया”च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले.
9
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 27, 2025 11:32:55Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2708ZT_CHP_SUDHIR_GANESH
( single file sent on 2C)
टायटल:-- राज्याचे माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या घरी देखील श्री गणेशाचे आगमन, मुनगंटीवार यांनी स्वहस्ते शाडूच्या मूर्तीला केले सिंदूरलेपन, महाराष्ट्र कुटुंबावर कुठलेही संकट येऊ देऊ नको सिद्धिविनायका चरणी केली प्रार्थना
अँकर:-- राज्याचे माजी अर्थमंत्री व बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर येथील घरी देखील आज श्री गणेशाचे थाटात आगमन झाले. अत्यंत मनमोहकरीत्या सजविलेल्या फुलांच्या गाभाऱ्यात शाडूची मूर्ती स्थापन करण्यात आली. तिला मुनगंटीवार यांनी स्वतः सिंदूरलेपन केले. पत्र्यांची माळ वाहत, अलंकार घालून त्यांनी या मूर्तीची यथासांग पूजा केली. महाराष्ट्ररुपी कुटुंबावर कुठलेही संकट येऊ देऊ नको, आम्हाला जनतेच्या कल्याणासाठी कार्य करण्याची शक्ती दे अशा मनोकामना त्यांनी सिद्धिविनायका चरणी व्यक्त केल्या.
बाईट १) सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
12
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowAug 27, 2025 11:32:42Bhandara, Maharashtra:
गोंदियात भीषण अपघात! बस आणि ट्रकच्या धडकेत सहा प्रवासी गंभीर, सहा महिन्यांच्या बालिकेलाही दुखापत
Anchor : गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर मृत्यूचा थरार पाहायला मिळाला. सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली गावाजवळ खासगी बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण धडकेत सहा प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यात सहा महिन्यांच्या बालिकेचाही समावेश आहे.
Vo : पुष्पराज ट्रॅव्हल्सची बस (क्रमांक CG 08 BB 3720) हैद्राबादहून रायपूरकडे प्रवासी घेऊन जात असताना हा अपघात घडला. बसमध्ये मोठ्या प्रमाणात मजुर वर्ग प्रवास करत होता आणि बस ओव्हरलोड भरली होती, अशीही माहिती समोर आली आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली गावाजवळ ट्रकला ओव्हरटेक करताना बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस ट्रकवर आदळली. धडकेचा आवाज एवढा जबरदस्त होता की बसच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. डुग्गीपार पोलिस आणि 108 रुग्णवाहिका तात्काळ दाखल झाली. जखमींना सडक अर्जुनी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गोंदियाच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
9
Report
SMSATISH MOHITE
FollowAug 27, 2025 11:32:13Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Protest
Feed on - 2C
---------------------------
Anchor - अवैध्य दारुमुळे संसार उध्वस्त होत असलेल्या महिलांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी धरणे आंदोलन केले. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील नारनाळी गावातील महिलांनी अवैधपणे होणाऱ्या दारूविक्रीच्या विरोधात आंदोलन सुरू केलय. ऐन गणेश चतुर्थीच्या दिवशी महिलांनी एकत्रित येत आंदोलनाला सुरुवात केली आहे. गावातील अवैधपणे होणारी दारूची विक्री थांबेपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार महिलांनी केलाय. पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षाने या गावात अवैध्य दारूचा सुळसुळाट झाल्याचे चित्र आहे. दारूमुळे गावातील तरुनपिढी उध्वस्त होत असल्याने दारू विक्री बंद करावी अशी मागणी महिलानी केलीये.
Byte - गावकरी महिला.
Byte - गावकरी महिला.
Byte - गावकरी महिला.
------------------------
10
Report