Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Gadchiroli442605

गणेश चतुर्थीच्या दिवशी भामरागडात पुराचे संकट, गर्भवती महिलेचा अद्भुत रेस्क्यू!

AAASHISH AMBADE
Aug 27, 2025 13:15:23
Gadchiroli, Maharashtra
Feed slug :--- 2708ZT_GAD_FLOOD_RESCUE ( single file sent on 2C)  टायटल:-- गणेश चतुर्थीच्या दिवशीच भामरागडात पुराचे संकट, शंभर गावांचा संपर्क तुटला, गर्भवती महिलेसाठी प्रशासनाचे सफल अभियान      अँकर:-- गडचिरोली जिल्ह्यात सीमावर्ती भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. या दरम्यान भामरागड तालुक्यातील पामुलगौतम नदीपलीकडील हिंदेवाडा येथील एका गर्भवती महिलेला अचानक प्रसुतीच्या वेदना झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. मात्र पर्लकोटासह पामुलगौतम नदी देखील तुडुंब भरून वाहत असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे झाले होते. आज पहाटे चार वाजता च्या सुमारास एसडीआरएफ टीमच्या मदतीने बोटीद्वारे पामुल गौतम नदीतून रेस्क्यू करत त्या गर्भवती महिलेला पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले. सौ. अर्चना विकास तिम्मा असे त्या गर्भवती महिलेचे नाव असून तिला भामरागड तालुका मुख्यालयातील ग्रामीण रुग्णालयात प्रसुती करिता दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात सफल प्रसूती होत टिनर कन्येला जन्म दिलाय. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या सूचनेनुसार तहसीलदार किशोर बागडे यांनी संपूर्ण यंत्रणा सतर्क केली. भामरागडच्या मुख्य बाजारपेठेत पर्लकोटा नदीचे पाणी शिरले असून सुमारे ३० ते ३५ दुकानांत पाणी शिरले आहे. प्रशासनाच्या सूचनेनुसार व्यापाऱ्यांनी काल रात्रीच आपले साहित्य सुरक्षित स्थळी हलविल्याने मोठे नुकसान टळले आहे.लगतच्या भागात पावसाचे प्रमाण सुरू असल्याने जिल्हाधिकारी यांनी सर्व विभागांना सज्ज राहण्याच्या तसेच आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.  आशीष अम्बाडे झी मीडिया गडचिरोली
13
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKShubham Koli
Aug 27, 2025 16:16:02
Thane, Maharashtra:
ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे प्रथमच ठाणे दौऱ्यावर.. येत्या 30 तारखेला ठाण्यातील सीकेपी हॉल येथे असणार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ठाणे शहरात मेळावा.. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्ते व नेत्यांना देणार ठाण्यातून कानमंत्र..
11
comment0
Report
SKShubham Koli
Aug 27, 2025 16:15:56
Thane, Maharashtra:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले भाजप आमदार निरंजन डावखरे यांच्या घरातील बाप्पाचे दर्शन.. भाजपा आमदार निरंजन डावखरे यांच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाचे दर्शन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले आहे.. आज सायंकाळी फडणवीस यांनी आमदार निरंजन डावखरे यांच्या राहत्या घरी हे बाप्पाचे दर्शन घेतले आहे..
14
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Aug 27, 2025 16:15:36
Palghar, Maharashtra:
पालघर जिल्ह्यात 1912 सार्वजनिक तर  9776 घरगुती बाप्पा विराजमान झालेत. त्यामुळे संपूर्ण पालघर जिल्ह्यात सध्या आनंद आणि उत्साहाच वातावरण पाहायला मिळत आहे. गणेशोत्सव काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता एक अप्पर पोलीस अधीक्षक, चार पोलीस उपाधीक्षक, 67 पोलीस अधिकारी, 732 पोलीस अंमलदार, 500 होमगार्ड अश्या प्रकारे चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
11
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Aug 27, 2025 15:36:54
Akola, Maharashtra:
Anchor : अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू वॉर्ड क्रमांक २९ जवळील इलेक्ट्रिक रूममध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. अग्निशामक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वॉर्डाच्या बाहेर असलेल्या इलेक्ट्रिक डीपीमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही घटना घडली.घटनेच्या वेळी उपस्थित सुरक्षा रक्षकांनी तत्परता दाखवत आग पसरू नये यासाठी प्रयत्न केले. तत्काळ अग्निशमन दलाला कळविण्यात आलं आणि त्यांच्या हस्तक्षेपामुळे आग आटोक्यात आली. या घटनेमुळे रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
13
comment0
Report
AKAMAR KANE
Aug 27, 2025 15:36:36
kolhapur, Maharashtra:
Ngp Gadkari aarti live u ने फीड पाठवले ---------- नागपूर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी गणरायाची स्थापना झाल्यानंतर आता सायंकाळची गडकरी कुटुंबाने आरती केली.. ( पत्नी, मुलं, स्नुषा, नातवंड उपस्थित आहे ) ------ नागपूर नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री.. आज देशभरात गणेशोत्सव उत्साहात साजरा करत आहे, बुद्धी दैवता गणेश आहे, त्यामुळे भविष्यात ज्ञानाच महत्व आहे, पुढील काळात ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात पुढे जावो, आणि गरीब भूकमारी पासून दूर होऊन, समाज सुखी संपन्न व्हाव, *सर्वच क्षेत्रात ज्ञानाच महत्व आहे, आपल्या देशाची प्रगती होवो अशी प्रार्थना करू.. भारत विश्व गुरू होवो अस आशीर्वाद गणपती बाप्पा आपल्याला देवो अशीच प्रार्थना करू.*
10
comment0
Report
AKAMAR KANE
Aug 27, 2025 15:30:50
kolhapur, Maharashtra:
नागपूर बबनराव तायवाडे, अध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महासंघ Ngp Taywade byte लाइव U ने फीड पाठवले आहे -=------ ( उद्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाची नियोजन बैठक) -- राष्ट्रीय ओबीसी महासंघाची उद्या तातडीची नियोजन बैठक -- आरक्षण वाचवण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने तातडीने ही नियोजन बैठक बोलावली आहे --- जरांगे पाटील मुंबईकडे रवाना झाले असताना सरकारच्याही हालचाली सुरु झाल्या आहेत ---त्यामुळे आम्ही पुढे काय पाऊल उचलायचे यादृष्टीने राष्ट्रीय ओबीसी महासंघाने ही बैठक बोलवली आहे
12
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Aug 27, 2025 15:16:02
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- जरांगे आंदोलन नगर सहभाग wkt फीड 2C Anc:- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील obc प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीच्या आंदोलनासाठी अंतरवली सराटी येथून मुंबईकडे निघाले आहेत या आंदोलनात हजारो मराठा तरुण सहभागी झाले आहेत ठीक ठिकाणाहून त्यांच्या आंदोलनात मराठा तरुण सहभागी होत आहेत अहिल्यानगर येथे जरांगे यांच्या स्वागतासाठी आणि आंदोलनात सहभागी होण्यासाठी हजारो तरुण नगर कल्याण मार्गावर त्यांची वाट पाहत आहेत. अहिल्यानगरच्या बाह्य वळण रस्त्यावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी Wkt :- लैलेश
10
comment0
Report
AKAMAR KANE
Aug 27, 2025 15:01:23
kolhapur, Maharashtra:
2c ला व्हिडिओ जोडले आहे (video assingment नंबर वर पाठवला) ------ नागपूर - नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील धापेवाडा येथे वीज पडून दोघां मायलेकाचा मृत्यू, सोबतच शेतात काम करणाऱ्या मजुरांचा मृत्यू - यात मायलेकाचा मृत्यू, शेतात काम करत असतानाच वीज पडून दुर्दैवी घटनेत मृत्यू, - ओमप्रकाश पाटील वय 18 वर्षीय मुलगा तर वंदना प्रकाश पाटील अस महिलेचा नाव आहे. - नागपूर जिल्ह्यातील काही भागात दुपारी विजांचा कडकडाटसह पाऊस झाला, - यात वीज पडल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. - पोलिसानी घटनास्थळी पोहचत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाससाठी पाठवले आहे.. -
12
comment0
Report
GMGANESH MOHALE
Aug 27, 2025 15:01:11
Washim, Maharashtra:
वाशिम : File:2708ZT_WSM_VIGHNAHARTA_GANESH_MANDAL रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशीम अँकर:गणरायाच्या आगमनावेळी वाशिमच्या कारंजा येथील विघ्नहर्ता गणेश मंडळा तर्फे पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या बैलगाड्यांचा वापर करण्यात आला.या बैलगाड्यांवर शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी विविध मागण्या व्यक्त करणारी पोस्टर्स लावण्यात आली होती.या पोस्टर्सवर "शेतात सोनं पिकू दे","शेतकऱ्यांच्या संकटाचा अंत होऊ दे" अशी शेतकऱ्यांच्या भावनांना स्पर्श करणारी संदेश लिहिलेले होते.गणरायाच्या स्वागताबरोबरच शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यात समृद्धी यावी,यासाठी मंडळातर्फे प्रार्थना करण्यात आली.
11
comment0
Report
MKManoj Kulkarni
Aug 27, 2025 15:00:31
Mumbai, Maharashtra:
अँकर -- मुंबईत अगदी पहिल्या दिवसापासून गणरायाच्या दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.गिरगावच्या राजाच यावर्षी ९८ व वर्ष आहे येथेही भाविकांची गर्दी झाली आहे.गेल्या काही वर्षात  गिरगाचा राजा पर्यावरण पूरक मूर्तीची स्थापना करतात तसेच देखावाही पर्यावरण पूरकच करतात.यावर्षी बांबू पासून तयार केलेल्या वस्तू आणि मंडप तयार केला आहे तसेच ८५१ किलोचा मोदकहि तयार केला आहे.याचा आढावा घेतला तसेच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज कुळकर्णी यांनी  Wkt n tiktak  गणेश लिंगायत पदाधिकारी गिरगावचा राजा  मनोज कुळकर्णी  Feed send TVU 53 Slug-- Giragabacha Raja
11
comment0
Report
KJKunal Jamdade
Aug 27, 2025 14:46:37
Shirdi, Maharashtra:
Shirdi News Flash जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या भेटीला... शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहात भेट... *दोघांचीही बंद दाराआड चर्चा सुरू...* सध्या मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षावरून आंदोलनावर ठाम... यासंदर्भात चर्चेची शक्यता...
10
comment0
Report
SKSACHIN KASABE
Aug 27, 2025 14:18:08
Pandharpur, Maharashtra:
27082025 slug - PPR_CHATURTHI_ALNKAR file 01 ---- Anchor - श्री गणेश चतुर्थी निमित्त श्री विठ्ठलास सोने मुकुट, नाम हि-याचा, कौस्तुभ मणी, दंडपेट्या जोड, हि-याचा कंगण जोड, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी, शिरपेच, मत्स्य जोड, तोडे जोड, तुळशीची माळ, जवेची माठ तसेच श्री रूक्मिणी मातेस सोने मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड तोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, कंबरपट्टा इत्यादी अलंकार परिधान करण्यात आले होते.
14
comment0
Report
JMJAVED MULANI
Aug 27, 2025 14:02:39
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 2708ZT_INDAPURBHARNE FILE 5 राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी गणरायाचं मंगल आगमन… Anchor :— महाराष्ट्रात सर्वत्र लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचा उत्साह ओसंडून वाहतोय. त्यातच राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी गणेश बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करून मोठ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात आलं. यावेळी भरणे यांचा संपूर्ण परिवार एकत्रितपणे सहभागी झाला होता. विशेष म्हणजे बाप्पाच्या समोर शेतात पिकवलेल्या विविध भाज्या, फळं आणि कडधान्यांची आकर्षक आरास सजवण्यात आली आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या निमित्ताने गणरायाच्या चरणी प्रार्थना केली..
14
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 27, 2025 13:04:03
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 2708ZT_CSN_ACCIDENT(2 FILES) छत्रपती संभाजीनगर :ब्रेकिंग छत्रपती संभाजीनगर शहरातील जालना रोडवर भीषण अपघात अँकर : छत्रपती संभाजीनगर शहरातील जालना रोडवर भीषण अपघात झालाय.या अपघातात चार चाकी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात चारचाकी वाहनाचा चालक किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे
14
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top