Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाल के खेतों में पानी से सोयाबीन फसल बर्बाद, किसान राहत मांग रहे हैं

SRSHRIKANT RAUT
Oct 05, 2025 03:00:25
Yavatmal, Maharashtra
यवतमाळ जिल्ह्यातील शेतशिवारात पाणी साचून असल्याने सोयाबीन पिक सडत आहे. प्रचंड मेहनत व खर्च करून शेतकऱ्यांनी लागवड केलेले सोयाबीन पीक यंदा पावसाच्या सततच्या माऱ्यामुळे उध्वस्त झाले आहे. शेतातील पाण्याचा निचरा मग आल्यामुळे शेंगा लगडलेले सोयाबीन जागेवरच पिवळे काळे पडले आहे, काही शेंगा फुटून त्याला कोंब फुटली आहेत. एकूणच शेतकऱ्यांच्या हातचे सर्व पीक वाया गेले आहे. दरम्यान शेतपंचनामा देखील झालेली नाही. अतिवृष्टी व पुराचा फटका बसल्याने शेतकऱ्यांना सरसकट भरीव मदत द्यावी अशी मागणी होत आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Oct 05, 2025 05:03:00
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत हंगामातील नव्या सोयाबीनची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या नव्या सोयाबीनला शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३८०० इतका दर मिळत आहे. तर जुन्या सोयाबीनला ३८०० ते ४४०० असा दर मिळत आहे. मात्र हा दर हमीभावापेक्षा कमी असून, उत्पादन खर्चाच्या तुलनेत समाधानकारक नाही. त्यामुळे अनेक शेतकरी निराश आहेत. गेल्या दोन महिन्यांतील मुसळधार पावसामुळे सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्याने शेंगा काळ्या पडल्या, दाण्यांचा आकार लहान राहिला, तर काही ठिकाणी अंकुर फुटल्याने मालाचा दर्जा खालावला. या प्रतिकूल हवामानाचा परिणाम बाजारभावावर झाला असून, सोयाबीनचे दर घसरले आहेत. अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामात तोटा सहन करावा लागत आहे.
0
comment0
Report
UPUmesh Parab
Oct 05, 2025 04:48:54
Oros, Maharashtra:कुडाळ तालुक्यातील घावनळे (वायगंणवाडी) येथील दोन ऑगस्टपासून बेपत्ता असलेल्या १७ वर्षीय दीक्षा तिमाजी बागवे या अल्पवयीन मुलीचा घातपात करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी कुणाल कृष्णा कुंभार याला कुडाळ तालुका न्यायालयाने सहा ऑक्टोबरपर्यंत सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तब्बल दोन महिन्यानंतर दीक्षा बागवे यांच्या बेपत्ता प्रकरणाचा छडा अखेर कुडाळ पोलिसांनी आज लावला आहे. या निर्घृण खूनामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मात्र पोलिस प्रशासनाने या घटनेबद्दल कमालीची गुप्तता बाळगून ही कारवाई केली आहे. घावनळे गावातील ही मुलगी दोन ऑगस्टला कॉलेजला जायला निघाली ती बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून कुडाळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. दोन महिन्यापासून पोलीस आणि नातेवाईक तिचा शोध घेत होते. मात्र, तब्बल दोन महिन्यानंतर पोलिसांच्या तपासात या मुलीचा खून कुणाल कुंभार याने केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या प्रकरणातील संशयित कुणाल कुंभार कडून अजून काय काय माहिती येते यावर याखूनाची व्याप्ती अवलंबून असणार आहे. माणगाव खोऱ्यातील गोठोस गावातील जंगलातील एका मांगरात नेऊन गळा दाबून या अल्पवयीन मुलीचा खून कुणालने केल्याची कबूली दिली आहे. प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी वर्तवला आहे. आरोपी कुणाल कृष्णा कुंभार याला सहा ऑक्टोबरपर्यंत सहा दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलीसांनी पत्रकार परिषदेत दिली.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Oct 05, 2025 04:30:23
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Oct 05, 2025 04:19:50
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 'देवपुष्प' चा हात, जीवनावश्यक वस्तूंसह शालेय साहित्यांचे करण्यात येतेय वाटप Anc : सीना नदीला आलेल्या महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यातील शेतीपिकांबराेबरच घरांचेही नुकसान झाले आहे. पूरग्रस्त परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले असून. सोलापुरातील देवपुष्प फाउंडेशनने पूरग्रस्त लोकांना मदतीसाठी एक हात पुढे केला आहे. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव ओ.बी. सी मोर्चाचे राहुल काटकर यांनी तिर्हे, पाथरी, तेलगांव, नंदूर, डोणगांव यासह अन्य गावांना जीवनाश्यक, अन्नधान्य, तांदूळ, तूरदाळ, साखर, चहापती, कोलगेट, मीठ, लाल तिखट, कांदा, लसूण आदी साहित्यांचे किट दिले आहे. शेकडो लोकांचे समुपदेशन करीत धीर देण्याचा प्रयत्नही देवपुष्प फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Oct 05, 2025 03:46:25
Bhandara, Maharashtra:भंडारा जिले में 165 अनुकंपा धारक उम्मीदवारों को नियुक्ति पत्र वितरित. नियुक्ति मिलने वाले उम्मीदवारों में आनंद का माहौल बना हुआ है. शासन की अनुकंपा नियुक्ति योजना के तहत पात्र वारसों को शासकीय सेवाओं में शामिल करने की प्रक्रिया पूरी हो चुकी है और भंडारा जिले में 165 अनुकंपा धारक समेत जिला परिषद के सीधे सेवा से नियुक्त उम्मीदवारों को नियुक्ति पत्र वितरित किए गए. इस कार्यक्रम का आयोजन पुलिस मुख्यालय के पुलिस बहु Zweck सभागृह में बड़ा आयोजन में किया गया. इस कार्यक्रम में आमदार नरेंद्र भोंडेकर, जिलाधिकारी सावन कुमार, पुलिस अधीक्षक नुरूल हसन, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे, उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव तथा निवासी उपजिल्हाधिकारी लिना फलके (ढेंगे) आदि वरिष्ठ अधिकारी मौजूद थे.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 05, 2025 03:33:48
2
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 05, 2025 03:32:33
Nashik, Maharashtra:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर शिवसेना पक्षातर्फे बूथप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे... यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख उपस्थिती असणार आहे.. नाशिकच्या डेमोक्रेसी हॉटेलमध्ये ही बूथ प्रमुखांचा मेळावा पार पडतोय... दोन दिवस शिवसेनेच्या बुद्धप्रमुखांचे दोन दिवशी शिबिर या ठिकाणी पार पडलं... स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टिकोनातून ही शिबिर महत्त्वाचं मानलं जात आहे... याचाच समारोप करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नाशिक दौऱ्यावर येणार आहे.. या मेळाव्यात एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात याकडे पक्ष कार्यकर्त्याचे लक्ष लागून आहे. नाशिक मनपात पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. हन्ड्रेड प्लस'चा नारा पक्षाने दिला आहे. महायुती एकत्रित निवडणूक लढणार किंवा नाही हे स्पष्ट नसताना भाजपाने अशी घोषणा दिल्याने अप्रत्यक्षरीत्या स्वबळावर भाजपाचे शंभर नगरसेवक निवडणूक आणण्याची तयारी केली आहे....
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Oct 05, 2025 03:31:51
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 05, 2025 03:17:38
Nashik, Maharashtra:अट्टल घरफोड्या करणाऱ्या संशयताला पोलिसांनी केली अटक नाशिकच्या पळसे, फुलेनगर व चेहेडी पंपिंग भागात घरफोडी करणाऱ्या अट्टल घरफोड्यास नाशिक रोड पोलिसांनी पकडून चोरलेल्या दोन्ही सोन्याच्या चैन जप्त करण्यात आल्या आहेत. चेहेडी पंपिंग येथील विश्वेश्वराय अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या स्नेहा किशोर पाटेकर यांच्या घरी चोरट्याने सोन्याची एक तोळ्याची एक लाख वीस हजार रुपये किमतीची चैन चोरून नेली होती. त्यानंतर पळसे फुले नगर येथील शीतल रेसिडेन्सीमध्ये सुप्रिया रावसाहेब विघे यांच्याही घराही चोरी केली होती. गुन्हे शोधपथक शुक्रवारी रात्री गस्तीवर असताना सिन्नरफाटा येथील सिटी लिंक बस डेपोजवळ संशयित सागर गरड हा संशयास्पदरीत्या वावरताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केला असता त्याने पाटेकर व विघे यांच्या घरी घरफोडी केल्याची कबुली दिली... या संशयताकडून तब्बल दोन लाख 43 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय...
1
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Oct 05, 2025 03:17:26
Amravati, Maharashtra:अमरावतीच्या मोझरी गुरुकुंजात आज सकाळी 5 वाजता तीर्थ स्थापनेने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या 57 व्या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ अमरावतीच्या मोझरी गुरुकुंजात आज सकाळी 5 वाजता तीर्थ स्थापनेने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या 57 व्या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. तीर्थ स्थापनेला हजारो गुरुदेव भक्त उपस्थित होते. सामुदायिक ध्यानानंतर गुरूकुंज नगरी मधून श्री तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर योगदान होते. तुकडोजी महाराजांनी लिहिलेली ग्रामगीता ही शेतकऱ्यांना अर्पण करण्यात आली होती. सर्वधर्म समभावाची शिकवण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या भजनातून समाजाला दिली आहे. 11 ऑक्टोंबर ला तुकडोजी महाराजांना देश-विदेशातील लाखो गुरुदेव भक्त मौन श्रद्धांजली वाहणार असून 5 ऑक्टोंबर ते 12 ऑक्टोंबर पर्यंत तुकडोजी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव चालणार आहे. पुण्यतिथी महोत्सवात विविध धार्मिक, सामाजिक, प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन केले जात असून 12 ऑक्टोबरला गोपाल काल्याने पुण्यतिथी महोत्सवाची सांगता होणार आहे。
2
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top