Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिम: 81 मतदान केंद्रों में ईवीएम बंद, निर्वाचन विभाग बदली करने में जुटा

GMGANESH MOHALE
Dec 20, 2025 06:01:05
Washim, Maharashtra
वाशिम: शहरात 81 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू असून प्रभाग 10 मधील मतदान केंद्रावर मतदान मशीन गेल्या 30 मिनिटेपासून बंद पडली असल्यामुळे मतदान ठप्प झाले होते. त्यामुळे मतदारांची तारांबळ उडाली आहे. मतदारांच्या रांग लागण्याच दिसून आले आहे. निवडणुकी विभागाकडून ईव्हीएम बदलण्याचे काम सुरू आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Dec 20, 2025 07:50:15
kolhapur, Maharashtra:बाईट विजय वडे्टीवार, काँग्रेस नेते (On किडनी रॅकेट ) * त्या शेतकऱ्याला फसवून लाओस ला नेत त्याचा पासपोर्ट जप्त करून घेतला होता, त्याला लाओसला घेऊन गेले होते.. मी मुख्य सचिव आणि सरकारला सांगून त्याला सोडवून आणले.. पोलीस अधीक्षकांना फोन करून सर्वकष चौकशीसाठी विनंती केली.. माझ्या सूचनेनुसारच हे सर्व कारवाई सुरू झाली आहे.. अनेक आणखी तरुण याच अडकले असल्याची शक्यता आहे.. सावकारांचा खूप मोठा नेटवर्क आहे.. या शेतकऱ्याने 1 लाख कर्ज घेतल्यावर 74 लाख सावकारांनी वसूल केले आणि तरीही सोडले नव्हते.. SiT च्या माध्यमातून सत्य बाहेर येईल.. शेतकऱ्यांना किडनी विकावी लागत आहे, ही लाजिरवाणी बाब आहे.. राज्यातील शेतकरी उध्वस्त झाला आहे.. हे सरकार शेतकरी विरोधी आहे.. * आणखी चार ते पाच शेतकऱ्यांसोबत अशीच फसवणूक करण्याचे प्रयत्न होते, ते कोलकात्यावरून ते परत आले अशी माहिती आहे.. सावकारांच्या बाबतीत गृह विभाग निद्रावस्थेत आहे.. या शेतकऱ्याला मी अनेक वेळा आर्थिक मदतही केली, आत्महत्येपासून परावृत्त करत धीर दिले.. * SIT च्या माध्यमातून राज्यभर शोध घेऊन असे फसवणूक झालेले शेतकरी व तरुण शोधून काढावे.. * या प्रकरणात डॉक्टर, एजंट ही सहभागी असू शकतात. एसआयटी च्या माध्यमातून ते शोधून काढावे.. * प्रत्येक जिल्ह्यात अशा अवैध सावकारांबद्दल विशेष पथक नेमावे... (On नांदेड (धर्माबाद), अंबरनाथ बोगस मतदान) * सर्वच ठिकाणी बोगस मतदान आहे.. काल एक माजी केंद्रीय मंत्री म्हणाले मी 2700 मतांनी हरलो होतो, मात्र तिथल्या डीएम ने मला जिंकून दिले.. अनेक ठिकाणी असेच घडत असते.. * भिंड (मध्य प्रदेश) मध्ये एक लाखाने पराभूत झालेल्या भाजपच्या उमेदवाराला डीएम वर बंदुका रोखून त्यांच्या शेकडो समर्थकानी जिंकून आणले होते.. * ब्रह्मपुरी मध्ये ही बोगस मतदार आयडी मिळाले.. * बेईमानी करून निवडणुंक जिंकण्याचा एकमेव धंदा भाजपचा सुरू आहे.. * पराभव दिसला तर ते कुठल्याही स्तरावर जातील.. * राज्य निवडणूक आयोग कुठे आहे?? हे प्रकार सुरू असताना निवडणुका कुठेही दिसून येत नाही.. * निवडणूक आयोग भाजपची बी टीम आहे हे लपून राहिलेले नाही... (On अजित पवार तटकरे मीटिंग) * रोज सकाळी उठून एकमेकांचा मुका घ्यायचा आणि मग दोन पक्षांनी आम्ही हिंदुत्ववादी म्हणायचे.. नंतर अजित पवारांनी वेगळी निवडणूक लढवायची.. *काँग्रेसच्या मतांना छेद देण्यासाठी, काँग्रेसच्या मतांचा विभाजन करण्यासाठी अजیت पवारांना महायुतीमध्ये समाविष्ट करून घेतले नाही आहे आणि ते वेगळे लढत आहे..* * *मात्र अजित पवार स्वतः जातीय आणि धर्मांध पक्षासोबत असताना धर्मनिरपेक्ष कसे??? हे मतदार विचार करतील...* (On लाडकी बहीण हप्ता ) * निवडणूक आहे म्हणून हे होत आहे.. भाजपचे हेच धंदे आहे निवडणुकीच्या आधी सरकारी तिजोरीची लूट करून सरकारी पैशावरून निवडणुका जिंकण्याचा भाजपचा फंडा आहे.. (On मतमोजणी अंदाज) * बावनकुळे यांचा विजयाचा दावा दोन गोष्टीवर आधारलेला असावा एक पैसा आणि दुसरा बोगस मतदान.. * कुंभमेळा आहे म्हणून त्र्यंबकेश्वरची नगरपरिषद ताब्यात घेण्यासाठी एका मतदानासाठी पन्नास हजार रुपये देण्यात आले... * उलट बावनकुळेंनी उद्याच्या निकालाची वाट न पाहता मतमोजणी आधीच आम्ही जिंकलो आहो म्हणून गुलाल उधळावे.. (On अमेरिका फाईल्स) * भारत आणि अमेरिकेत 24 तासांचा फरक आहे. त्यामुळे अजून तिथे 19 डिसेंबरच आहे. त्यामुळे अजून वाट पाहिली पाहिजे.. * पृथ्वीराज बाबा म्हणाले त्यामुळे त्यात सत्य असेलच.. * काल एका मोठ्या व्यक्तीचे फाईल ओपन होण्यास सुरुवात झाली आहे. आता केव्हा कुणाचा नंबर लागतो हे पाहिले पाहिजे... * भारतामध्ये जे काही घडलं अमेरिकन पार्लमेंट कोणालाही सोडणार नाही.. * हे प्रकरण केव्हाचे आहे याला महत्त्व नाही, फक्त केव्हा उघड होत आहे हे महत्त्वाचे आहे.. * एखाद्या व्यक्ती संदर्भात असे पुरावे असतील तर हा मोठा भूकंप ठरेल.. (On मुंबई महायुती) * अमित शाह जसे म्हणतील तसेच होईल, हे (शिंदे गट) फक्त भाजपच्या दावणीला बांधलेले घोडे आहेत.. यांचा स्वतःचा काहीही आवाज नाही.. (On काँग्रेस बैठक ) * आज काँग्रेसची मुंबईत बैठक आहे, चेनिथल्ला साहेब आले आहे, मी पण जाणार होतो, मात्र काही वैयक्तिक कामामुळे जाऊ शकलो नाही.. नेते आजच्या बैठकीत ठरवतील..
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 20, 2025 07:17:07
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Dec 20, 2025 07:16:45
Beed, Maharashtra:बीड जिल्ह्यातील चार नगरपरिषदांच्या दहा जागांसाठी आज मतदान, परळीत मुंडे, बीडमध्ये क्षीरसागर यांच्यासह अजित पवार आणि पंकजा मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला..! सकाळपासून मतदानाला शांततेत सुरुवात. बीड जिल्ह्यातील चार नगरपरिषदा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यात बीडमध्ये 1, परळीत 4, धारूरमध्ये 1 आणि अंबाजोैगाईमध्ये 4 अशा एकूण 10 जागांसाठी आज निवडणूक मतदान होत आहे. तब्बल आठ वर्षानंतर होत असलेल्या या नगरपरिषद निवडणुकीसाठी अनेक मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बीडमध्ये सध्या मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी महेंद्रकुमार मुधोळकर यांनी
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Dec 20, 2025 06:31:12
Baramati, Maharashtra:माझे लग्न असल्याने मला निवडणूक लांबलीवर पडल्याचा फायदा झाला युगेंद्र पवार ... निवडणुका लांबल्या त्यामुळे मला प्रचार केला हा हे माझं नशीब युगेंद्र पवार बारामती पुन्हा पवार विरुद्ध पवार सामना... पुण्याच्या बारामती नगर परिषदेसाठी आज मतदान होत आहे . राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी मतदान केंद्रांवर भेटी देत त्या ठिकाणच्या परिस्थितीची पाहणी केलीय. यावेळी झी 24 तासशी बोलताना निवडणुका पुढे गेल्याचा फायदा मला झाला कारण माझे लग्न होते त्यामुळे मला प्रचारासाठी वेळ मिळाला नसता मात्र जवळपास वीस दिवस निवडणुका लांबल्यामुळे मला प्रचारासाठी वेळ मिळाला हे माझं नशीब मी समजतो असे मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी व्यक्त केले. युगेंद्र पवार यांनी विजयाचा गुलाल आम्हीच उधळू असा दावा केलाय. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी यांनी
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Dec 20, 2025 05:45:37
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 20, 2025 05:19:05
Shirur, Maharashtra:हवेली/पुणे लोणी काळभोर पोलिसांची कारवाई कवडीपाट टोलनाक्यावर हॉटेलमध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोन आरोपी ताब्यात, दोन पिडीत महिलांची सुटका पुणे–सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर येथील कवڈیपाट टोलनाक्याजवळील हॉटेल जयश्री एक्झिक्यूटिव्ह रेस्टॉरंट बार अ‍ॅण्ड लॉजिंग येथे लोणी काळभोर पोलिसांनी छापा टाकत वेश्या व्यवसायावर मोठी कारवाई केली .या कारवाईत हॉटेलचा मॅनेजर मोहन राठोड व वेटर गणेश चिलकेवार यांना ताब्यात घेण्यात आले असून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी ८४,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top