Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिम जिल्हाधिकारी ने आदिवासी छात्राओं-छात्राओं के लिए शिक्षा सुधार के लिए स्कूलों का दौरा किया

GMGANESH MOHALE
Oct 02, 2025 04:16:04
Washim, Maharashtra
वाशिम: अँकर: वाशिम जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सेवा पांधरवाडा अभियानांतर्गत मालेगाव तालुक्यातील आदिवासीबहुल व दुर्गमभागात असलेले मुसळवाडी येथील आश्रमशाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडीला भेट दिली. त्यांनी वर्गखोल्या, स्वच्छता व्यवस्था, शैक्षणिक साधने व लहानग्यांच्या सोयीसुविधांची पाहणी केली तसेच पोषण आहाराची माहिती घेतली. विद्यार्थ्यांना वृत्तपत्र वाचन, शिष्यवृत्ती, नवोदय व स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचा सल्ला देत आत्मविश्वासाने मेहनत केल्यास उज्ज्वल भविष्य घडते असे ते म्हणाले. शिक्षकांना शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी पुढाकार घेण्याचे व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे निर्देश दिले. ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण व आवश्यक सुविधा देणे हे प्रशासनाचे प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SRSHRIKANT RAUT
Oct 02, 2025 06:31:19
Yavatmal, Maharashtra:यवतमाळात नवरात्री उत्सव सर्वत्र भक्तीमय वातावरणात पार पडल्यानंतर दुर्गामातेच्या विसर्जनाला सुरवात झाली. सहा ऑक्टोबर पर्यंत जिल्ह्यात विसर्जन मिरवणुका चालणार आहेत. बालाजी चौक दुर्गोत्सव मंडळाने जल्लोषात विसर्जन मिरवणूक काढली ज्यात सर्वच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. तत्पूर्वी नवमीला आठवडी बाजार येथील ग्रामदैवत आई दुर्गेची मूर्ती गंगाजल मध्ये भक्तीभावाने विसर्जित करण्यात आली. नवमीला मिरवणुकीसाठी रात्री दहा वाजेपर्यंतच परवानगी दिल्याने देवी भक्तांचा हिरमोड झाला. कुठेही अनुचित घटना घडू नये, यासाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 02, 2025 06:06:23
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दसर्‍यानिमित्त फुलबाजार तेजीत असला तरी पावसामुळे फुलांची आवक घटली आहे। दरवर्षीच्या तुलनेत झेंडूच्या गाड्यांची संख्या निम्म्यावर आल्याने दर वाढले आहेत। बाजारात झेंडू १०० ते १५० रुपये किलो, तर शेवंती ३०० रुपये किलोने विकली जात आहे। मोगरा, जुई, चाफा, गुलाब, सोनचाफा, जरबेरा यांसारख्या फुलांना देखील मागणी आहे। झेंडूच्या हाराला ४० ते ६० रुपये, तोरणाला ३० ते ५० रुपये दर असून, पूजेसाठी लागणारे बेलपान, तुळस व दुर्वा ५ ते १० रुपये जुडीप्रमाणे उपलब्ध आहेत। आपट्याच्या पानांनी सजलेल्या फुलबाजारात नागरिकांची मोठी गर्दी झाली असून, रंगीबेरंगी फुलांनी बाजारपेठ दसर्‍याच्या उत्साहात नटली आहे।
4
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Oct 02, 2025 06:03:47
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Oct 02, 2025 05:52:49
Mumbai, Maharashtra:संजय राऊत ऑन मनसे- मनसे आणि सेने मध्ये बैठका सुरु झाल्या आहेत, पत्रकारांनी माहिती घ्यावी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांचा बोलणं सुरु आहे ९० दिवस निवडणुकीला राहिलेले आहेत चर्चा दोन नेत्यात सुरु आहे मीडियाला वाटतं कीं लगेच युती जाहीर केली पाहिजे पण युती कधी जाहीर करायची ही उद्धव ठाकरे राज ठाकरे हे दोनेते ठरवतील कुठलेही संभ्रम नाही सगळं उद्धव ठाकरे बोलतील ऑन संघ दसरा मेळावा त्यांचा दसरा मेळावा नागपुरात होतो संचलन करतात काठ्या हातात असतात बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की काठ्यांनी राष्ट्राचे संरक्षण होणार नाही शिवसैनिकांना एके-47 द्या सत्तेचा तेज त्यांच्याकडे आहे १०० वर्ष त्यांच्या संघाला होताय महान राष्ट्र कार्य त्यांनी केलाय हिंदू साठी महान कार्य त्यांनी केलं राष्ट्रासाठी कठोर भूमिका घ्यायच्या असतात त्या भूमिका त्यांनी घेतल्या नाही गांधी आणि आंबेडकर यांनी कधीही संघाचा समर्थन केलं नाही संघ हा विष आहे असा आंबेडकर म्हणाले होते कमाल ताई गवई यांचा अभिनंदन करतो, ते या ट्रॅप मध्ये अडकले नाहीत त्या चंद्रचूड सारखा वागल्या नाहीत शरद पवार त्यांच्या हयातीत धर्माथ शक्ती सोबत जाणार नाहीत
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Oct 02, 2025 05:03:31
Shirdi, Maharashtra:Shirdi News Flash माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पुण्यतिथीच्या निमित्ताने घेतले साई समाधीचे दर्शन.... बाईट पॉईंटर्स - उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे किंवा नाही हा त्यांचा प्रश्न... दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही दसरा मेळावा साजरा करतोय आमचा मेळावा हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा मेळावा... महाविकास आघाडीने बाळासाहेबांच्या विचारांना कितपत मान्यता दिली याची कल्पना नाही... आमच्या मेळाव्यात बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटले जाते... अतिवृष्टीच्या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आमचे कार्यकर्ते पुरग्रस्त भागात हजर राहतील... सरकार आणि केंद्र सरकार भरीव मदतीची मागणी... ऑन उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हटल्यावर प्रतिक्रिया देताना लोकशाहीत खरा राजा मतदार मतदारांचा कौल अंतिम असल्याचे केसरकर म्हणालेत... राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना बिनशर्ती पाठिंबा दिला होता पण त्यांनी स्वीकारला नाही... युती झाली तरी विचारांची युती होणे आवश्यक... आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनीच चालणार... दोन्ही ठाकरे एकत्र आले तरी आमच्यावर त्याचा काही परिणाम होणार नाही... मुंबईत विकासकामांवर मतदान होईल असा विश्वासही केसरकर यांनी व्यक्त केलाय...
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Oct 02, 2025 05:01:42
Shirdi, Maharashtra:दसरा अर्थात विजयादशमीच्या दिवशी दुपारी अडीच वाजता साईबाबांचं महानिर्वाण झालं होतं. त्यामुळे साईभक्तांसाठी या दिवसाचं अनन्यसाधारण महत्त्व असून साईनगरीत दरवर्षी दसरा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येतो. साईबाबा दररोज पाच घरी जाऊन भिक्षा मागायचे आणि जमा झालेल्या भिक्षेतून गोरगरीब आणि भुकेल्यांना अन्नदान करायचे. १९१८ साली दसऱ्याच्या दिवशीच साईबाबांनी आपला देहत्याग केला होता. साई संस्थानने आजही भिक्षाझोळीची परंपरा जपलीय. दसऱ्याच्या दिवशी साई संस्थानच्या वतीने परंपरेप्रमाणे शिर्डी गावातनं साईबाबांचं निशाण आणि भिक्षा झोळी समकालीन भक्तांच्या घरांसह शिर्डी गावातून फिरवली जाते..यावेळी शिर्डी ग्रामस्थ ठिकठिकाणी पूजा करत भिक्षा झोळीत धान्य स्वरूपात भिक्षा जमा करतात. याच भिक्षेतून साई प्रसादालयात भाविकांना अन्नदान केलं जातं.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 02, 2025 04:46:34
Nashik, Maharashtra:महापालिका पिंजरे लावून मोकाट मांजरांना पकडणार श्वानांपाठोपाठ आता नाशिक शहरातील भटक्या आणि मोकाट मांजरामुळे होणारा उपद्रव रोखणे तसेच संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत त्यांचे निर्बिजीकरण केले जाणार आहे.... प्रति मांजरामागे दोन हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यासाठी पुढील पंधरा दिवसांत मक्तेदार निश्चित केला जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या विभागाकडून देण्यात आलीये...शहरात मोकाट व भटक्या श्वानांवर गेल्या अनेक वर्षांपासून निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया केली जाते. त्याच धर्तीवर अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाने (एडब्ल्यूबीआय) दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आता भटक्या व मोकाट मांजरांना पकडून त्यांच्यावर निर्बीजीकरण केले जाणार आहे. यासाठी मांजरामागे दोन हजार रुपये इतका खर्च अदा केला जाणार आहे. निर्बीजीकरणासाठी सुमारे २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आलीये....
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Oct 02, 2025 04:45:31
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 02, 2025 04:16:21
0
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top