Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

नामांकन आखिरी दिन: वाशिम में नगरपरिषदों के उमेदवारों की रिकॉर्ड भीड़

GMGANESH MOHALE
Nov 17, 2025 03:00:46
Washim, Maharashtra
जिल्ह्यात चार नगरपरिषद आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी नामांकन प्रक्रियेचा आज शेवटचा दिवस आहे.आज सकाळपासूनच नामांकन केंद्रांवर उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे. जिल्ह्यात एकूण १२४ नगरसेवक पदांसाठी कालपर्यंत 645 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.त्यात वाशिममध्ये 196, कारंजा मध्ये 143, रिसोडमध्ये 135, मंगरुळपीरमध्ये 114 आणि मालेगाव नगरपंचायतीत 58 अर्ज दाखल झाले आहेत.तसेच नगराध्यक्ष पदासाठी वाशिममध्ये 11,रिसोड आणि मंगरुळपीरमध्ये प्रत्येकी 10, मालेगावात 6 आणि कारंजा नगरपरिषदेत 3 अर्ज दाखल झाले आहेत.आज शेवटचा दिवस असल्याने अर्जांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे。 *जिल्ह्यात नगरसेवक उमेदवारी अर्ज* वाशिम – 196 कारंजा – 143 रिसोड – 135 मंगरुळपीर – 114 मालेगाव – 58 *नगराध्यक्ष पदासाठी अर्ज* वाशिम – 11 रिसोड – 10 मंगरुळपीर – 10 मालेगाव – 6 कारंजा – 3
234
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ADANIRUDHA DAWALE
Nov 17, 2025 05:24:39
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 17, 2025 05:24:13
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - मोहोळ तालुक्यातील अनगर ग्रामपंचायतीला पोलीस छावणीचे स्वरूप - मोहोळ तालुक्यातील अनगर ग्रामपंचायतच्या नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उज्वला थिटे दाखल - भाजपाचे नेते राजन पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते उमेश पाटील यांचा वाद विकोपाला - अनगर ग्रामपंचायतसाठी उमेदवारी अर्ज भरू देत नसल्याचा आणि पोलीस संरक्षण मिळत नसल्याचा उज्वला थेटे यांनी केला होता आरोप - वर्षानुवर्षे अनगर नगरपंचायतीची बिनविरोध होणाऱ्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायत कार्यालय बाहेरील परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी
0
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 17, 2025 04:49:45
Nagpur, Maharashtra:नागपूर - कामठीत काँग्रेसला मोठा धक्का देत माजी नगराध्यक्ष शहाजाह शफाहत अन्सारी यांनी काँग्रेसला रामराम देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला. त्यांच्या सोबत माजी नगराध्यक्ष प्रमोद मानवटकर, शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश. - १५ नोव्हेंबरला झालेल्या उमेदवारी निवड बैठकीत अनुभवी नेत्यांना डावलून नवीन लोकांना संधी दिल्यानं नाराजी समोर आली.. - २०१७ मध्ये काँग्रेसला एकहाती सत्ता मिळवून देणारे आणि १६,६३० मतांनी विजय मिळवणारे अन्सारी हे पक्षाचे सर्वात प्रभावी चेहरे होते. त्यांनी आता राष्ट्रवादीत प्रवेश केला. - प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा स्वीकारल्यानंतर अन्सारी यांनी नगराध्यक्ष पदासह सर्व ३४ वार्डांतून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा केली.
91
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 17, 2025 04:49:12
Satara, Maharashtra:सातारा - सातारा जिल्ह्यातील 9 नगरपालिका आणि 1 एका नगरपंचायतीसाठी निवडणुका होत असून सातारा नगरपालिकेत दोन्ही राजेंकडून नगराध्यक्ष पदासाठी रस्सीखेच सुरू आहे.50 नगरसेवक पदावर दोन्ही राजेंचे मनोमिलन झालं असले तरी नगराध्यक्ष पदाचा तिढा कायम असून तो भाजपच्या वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे.या 50 जागांपैकी 22 जागा खा.उदयनराजे आणि 22 जागा शिवेंद्रसिंहराजे आणि 6 जागा या मूळ भाजप ला दिल्या जाणार असल्याचे बोलले जात आहे मात्र जर नगराध्यक्ष पदाचा तिढा सुटला नाही तर मात्र या दोन्ही राजेंनी एकमेकांचा विरोधात नगरसेवक पदासाठी 50 जागांवर आपल्या कार्यकर्त्यांना उमदेवारी अर्ज भरायला लावले आहे त्यामुळे आज नेमकं काय होते आहे हे पहावे लागणार आहे.याचा आढावा घेतला आहे
195
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 17, 2025 04:48:54
Shirdi, Maharashtra:कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे सोनेवाडी परीसरात बिबट्याचा मुक्त संचार. सोनेवाडी येथील शेतकऱ्याने दूध डेअरीकडे जात असताना बिबट्याचा मुक्त संचार स्वतःच्या कॅमेऱ्यात केला कैद. कोपरगाव तालुक्यात वन विभागाकडून एका बिबट्याला मारण्यात यश मात्र तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्यांचा मुक्त संचार सुरू. वाड्यावस्त्यांवर जाणाऱ्या रस्त्यांवरून प्रवास करणं बनलय जीवघेणं. शालेय विद्यार्थी देखील धास्तावले. अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांची वाढती संख्या बनला चिंतेचा विषय. अनेक भागात बिबटे आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण. वनविभागाने कोपरगाव तालुक्यातील प्रत्येक गावात शोध घेऊन बिबटे जेरबंद करण्याची ग्रामस्थांची मागणी.
122
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 17, 2025 04:48:40
Chakan, Maharashtra:Chakan Ubt Shinde Shivsena Ekatra File:03 Rep: Hemant Chapude(Chakan) Anc: राज्याच्या दृष्टीने सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी आता आम्ही घेऊन आलोय, कारण राज्यात कुठंच एकत्र न आलेली ठाकरे अन शिंदेंची शिवसेना चाकणमध्ये एकत्र आलीय. शिंदे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनिषा सुरेश गोरे यांचा अर्ज भरायला स्वतः ठाकरेंचे स्थानिक आमदार बाबाजी काळे आणि शिंदेचे आमदार शरद सोनवणे उपस्थित होते.तर याबाबत बोलताना आमदार बाबाजी काळे यांनी खेड-आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरेंच्या पश्चात ही पहिली निवडणूक पार पडतीये अन त्यांच्या पत्नी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदी उभ्या राहिल्यात. अशा प्रसंगी राजकारण बाजूला ठेऊन, दिवंगत आमदार गोरेंना आदरांजली म्हणून आम्ही केवळ नगराध्यक्ष पदासाठी मनीषा गोरेंना पाठिंबा दिलाय. त्यामुळं ही युती म्हणता येणार नाही. उद्धव ठाकरे असो वा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर निवडणूक घेण्याच्या सूचना दिल्यात. त्यामुळं हा चाकण पुरता तो ही नगराध्यक्ष पदापुरता निर्णय आहे. तालुक्यातील राजगुरुनगर आणि आळंदीत ही आम्ही स्वबळावर लढतोय,असं आमदार बाबाजी काळे यांनी म्हटलंय Byte' बाबाजी काळे (आमदार ) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया चाकण पुणे...
70
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 17, 2025 04:32:27
154
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 17, 2025 04:21:51
Latur, Maharashtra:लातूर जिल्ह्यात तापमानात मोठी घसरण होत असून, हिवाळ्याची चाहूल आता स्पष्टपणे जाणवू लागली आहे. त्यात आता दोन दिवसांत थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सकाळी आणि संध्याकाळ नागरिक शेकोट्यांचा आधार घेताना दिसत आहेत. यंदा पावसाने अक्षरशः कहर केल्यामुळे थंडीचे आगमन साधारण महिनाभर उशिरा झाले आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांत अचानक वाढलेल्या गारठ्यामुळे तापमान १४ ते १५ अंशांवर गेल्याने गारवा प्रकर्षाने जाणवतोय. त्यामुळे नागरिकांनी थंडीपासून काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केला आहे. गावोगावांत रस्त्याच्या कडेला, चौकांत शेकोट्या पेटून उबेचा आसरा घेत असलेल्या नागरिकांची दृश्यं हिवाळ्याची नांदी देत आहेत.
120
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Nov 17, 2025 04:21:21
134
comment0
Report
Advertisement
Back to top