Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशीम में जल जीवन मिशन की जल सप्लाई अधूरी, ग्रामवासी पेयजल के लिए परेशान

GMGANESH MOHALE
Mar 19, 2026 05:33:01
Washim, Maharashtra
वाशीम जिल्ह्यातील मधील अनेक गावांमध्ये जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या नळ पाणीपुरवठा योजना अद्याप अपूर्ण आहेत. काही ठिकाणी पाईपलाईनचे काम अर्धवट असून तर काही गावांत पाण्याच्या टाक्या बांधूनही वितरण व्यवस्था सुरू झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना अजूनही विहीर, बोअरवेल आणि टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. उन्हाळा तीव्र होत असताना पाण्याची मागणी वाढली असून नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे त्यामुळे जलजीवन मिशन च्या कामांना गती देण्याची आवश्यकता है.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 19, 2026 06:05:36
Ambernath, Maharashtra:बदलापुरात नववर्ष स्वागत यात्रेचा उत्‍साह ढोलताशांच्या गजरात दुमदुमली निघाली नववर्ष स्‍वागत यात्रा; आज बदलापुरात सकाळ पासूनच नववर्ष स्वागत यात्रेचा मोठा उत्साह पाहायला मिळाला , महिलांच्या ढोल पथकांचा गजर, जोडीला भगव्या ध्वज पथाकांची साथ, त्याला लहानग्यांची लेझीमची जोड, सोबत दुचाकीवर पारंपरिक पैठणी परिधान केलेला महिला वर्ग आणि विविध विषयांवरील सामाजिक संदेश देणारे चित्ररथ असे आनंददायी वातावरण निर्माण झाले होते. या स्वागत यात्रेत लहानग्यांसोबत वृद्ध आणि महिलांचा सहभाग लक्षणीय होता. बदलापुर कात्रप परिसरातील श्रीराम प्रतिष्ठान यांनी कात्रप परिसरात तर हनुमान मारूती देवस्थान यांच्या वतीने गांधी चौकात ही स्वागत यात्रा काढण्यात आली होती या स्वागत यात्रेत बदलापुरातील विविध सामाजिक संस्था आणि मंडळांनी चित्ररथही साकारले होते. या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यात आले ,
949
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 19, 2026 06:02:12
Navi Mumbai, Maharashtra:साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये आंब्याच्या दहा हजार पेट्यांची आवक झालेय. गुढीपाडव्यानिमित्त घरात गोडधोड करण्यासाठी नागरिक आंबा खरेदी करत असतात आणि व्यापारी देखिल आपल्या हंगामाची सुरुवात आजपासून करत असतो. आंब्याची विधिवत पूजा करुन आंब्याच्या विक्रीला सुरुवात करण्यात आली असून 5 हजार ते 10 हजार रुपये पेटी असा भाव आंब्याला मिळत आहे. यंदा हवामानाचा मोठा फटका आंब्याला बसला असून आवक मोठ्या प्रमाणावर घटलेय तर दुसरीकडे आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे निर्यात 50 टक्क्यानी घटल्याचे समोर आलेय. याविषयी आंबा व्यापारी आणि निर्यातदार यांच्याशी सविस्तर चर्चा केलेय आमचे प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी.
834
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 19, 2026 06:00:38
837
comment0
Report
KPKAILAS PURI
Mar 19, 2026 05:48:36
Pimpri-Chinchwad, Maharashtra:आखाती देशांतील युद्धामुळे घरगुती आणि कमर्शियल गॅसचा तुटवडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. अमेरिका, इजराइल आणि इराण यांच्यातील तणावामुळे गॅसचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे गॅस टंचाई निर्माण झाली आहे. या परिस्थितीत घरगुती गॅसचा काळाबाजार होऊ नये यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. घरगुती गॅसचा साठा करून किंवा जास्त दराने विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड यांनी दिला आहे. तसेच, अशा प्रकारांमध्ये आढळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कठोर पावले उचलली जातील, वेळप्रसंगी मकोका लावण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
1042
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 19, 2026 05:33:16
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली गणपती पंचायतन संस्थानचा गुढीपाडवा उत्साहात साजरा, शोभायात्रा आणि गुढी उभारणीचा सोहळा पार पडला. सांगली मध्ये गणपती पंचायतन संस्थानकडून गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. या निमित्ताने संस्थानच्या मालकीच्या जुन्या वाहनांची रॅली व शोभायात्रा आणि गुढी उभारणीचा सोहळा देखील पार पडला. गणपती पंचायतन संस्थानचे राजे विजयसिंह पटवर्धन आणि आदित्यराजे पटवर्धन यांच्या उपस्थितीमध्ये पारंपारिक वाद्यांच्या गजरात आणि पारंपारिक वेशभूषेमध्ये शोभायात्रा काढण्यात आली. सांगली नगरीचे आराध्य दैवत गणपती मंदिरापर्यंत काढण्यात आलेल्या या शोभायात्रा मध्ये सांगलीकरांनी देखील मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता, त्यानंतर गणपती मंदिराच्या परिसरामध्ये पंचायत संस्थांची पारंपारिक गुढी उभारणीचा दिमाखदार सोहळा देखील पार पडला.
957
comment0
Report
YKYOGESH KHARE
Mar 19, 2026 05:17:56
Nashik, Maharashtra:अँकर - कैप्टन अशोक खरातच्या शिवनिक संस्थानची स्थापना झाल्यानंतर सिन्नर तालुक्यातील व काही बाहेर जिल्ह्यातील प्रतिष्ठित या संस्थानचे संचालक होते मात्र दोन वर्षापूर्वी तिन संचालकांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते, राजीनाम्याचे कारण अस्पष्ट होते मात्र तेव्हाच संस्थानमध्ये काहीतरी गडबड असल्याची चर्चा सुरू झाली होती. नवीन ट्रस्टची स्थापना करण्यात आल्यानंतर खरात यांच्या पत्नीला सरचिटणीस बनविण्यात आले होते. विशेष म्हणजे नविन ट्रस्टमध्ये काही जुने संचालक कायम ठेवण्यात आले होते यात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचाही समावेश होता. एकंदरीतच काय तर महिलांचे शोषण करणाऱ्या हायप्रोफाईल खरातच्या शिवनिका संस्थानच्या जून्या आणि नव्या अशा दोन्ही कार्यकारणीत रुपाली चाकणकर यांचा सहभाग असल्याचं आता समोर आलं आहे.
1095
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 19, 2026 05:16:08
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिकेच्या एका शाळेमध्ये पाडव्याच्या मुहूर्तावर ऍडमिशन करण्यासाठी पालकांनी आदल्या दिवसापासून रांगा लावल्या आहेत. शहरातील जरगनगर इथल्या लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर मध्ये ह्या रांगा पाहायला मिळत आहेत. महानगरपालिकेच्या या नामवंत शाळेमध्ये ऍडमिशन मिळावे यासाठी पालक दर पाडव्याला मोठी गर्दी करतात... शिष्यवृत्ती परीक्षेत अव्वल असलेल्या या जरग नगर शाळेमध्ये ऍडमिशन मिळावे यासाठी प्रत्येक पालक धडपडत असतो. त्यामुळे आज देखील सुमारे चारशेहून अधिक पालक रांगेत उभे आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून या शाळेमध्ये पाडव्याच्या मुहूर्तावर प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. नीता ठोंबरे, केंद्र मुख्याध्यापिका, लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर शिवाजी पाटील उप–मुख्याध्यापक, लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर अमर पाटील, पालक सलीम पठाण, पालक रोहित घोरपडे, पालक
1053
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 19, 2026 05:02:45
Malegaon, Maharashtra:विशाल मोरे, मालेगाव -- मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेने गुढीपाडव्यानिमित्त उभारली अनोखी शैक्षणिक गुढी.... मालेगावाच्या दापूरे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचा उपक्रम... विद्यार्थ्यांनी गावातून काढली जनजागृती रॅली... गुढी पाडवा पट वाढवा' मोहिमेअंतर्गत मालेगावच्या दापूरे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत 'संविधान' व शिक्षणासाठी कार्य करणाऱ्या राष्ट्र पुरूषांच्या प्रतिमांची मांडणी करून शाळेच्या संत तुकाराम मंचावर 'शैक्षणिक गुढी' उभारून विद्यार्थ्यांची पटनोंदणी करण्यात आली. यावेळी नव्या शैक्षणिक सत्रात दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. गावातुन जनजागृती प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी संविधान प्रतिमा, डॉ बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी व पालक उपस्थित होते.
1004
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 19, 2026 04:47:44
1015
comment0
Report
SMSATISH MOHITE
Mar 19, 2026 04:31:46
Nanded, Maharashtra:आजारावर उपचारासाठी असणाऱ्या गोळ्यांचा वापर चक्क नशेसाठी केला जातोय. अश्या गोळ्या डाक्टरांच्या चिठ्ठी शिवाय देणाऱ्या मेडिकलवर पोलिसांनी नांदेडमध्ये कारवाई केली. नांदेड शहरातील राज कॉर्नर येथील एका औषधी दुकानातून पोलीसांनी 1600 गोळ्या जप्त केल्या. जय हनुमान मेडिकल येथे ह्या गोळ्या विक्री केल्या जात असल्याची गोपनीय माहिती भाग्यनगर पोलिसांना मिळाली. पोलीसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा लावला. पोलीसांनी पाठवलेल्या बनावट ग्राहकाने नशेनाची दहा गोळ्या मागितल्या. डॉक्टरांची चिट्टी नसतांना मेडिकल चालकाने त्याला pregabalin capsules या गोळ्या दिल्या. या गोळ्याचा वापर नशेसाठी केला जात असल्याच पोलिसांनी सांगितलं. या मेडिकल मध्ये 1600 गोळ्यांचा साठा पोलिसाना आढळला. गोळ्या खरेदीची कुठलीही रितसर पावती मेडिकल चालकाकडे नव्हती. त्यामुळे मेडिकल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
1068
comment0
Report
Advertisement
Back to top