Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिम नगरपालिका चुनाव में मारपीट और जीवन धमकी, मतदान प्रक्रिया पर तनाव

GMGANESH MOHALE
Dec 20, 2025 02:15:33
Washim, Maharashtra
अँकर :व Washim नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार व Washimच्या लाखाळा परिसरात रात्री दीड वाजेच्या सुमारास घडलाय दोन्ही गट समोरा समोर आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. Washim शहर पोलिसात या प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार गुड्डू उर्फ प्रवीण इढोळे यांच्या तक्रारी नंतर भाजप उमेदवार सतीश उर्फ गल्ला वानखडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सतीश वानखडे फरार असून पोलीस शोध घेताहेत दरम्यान कोणत्याही प्रकारच्या दहशतीला किंवा आमिषाला बळी न पडता मतदारांनी आपल्या मतदानचा हक्क बजावावा असं आवाहन पोलिसानी केलं असून कुणी प्रयत्न केला तर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याच आवाहन ही पोलिसांनी केलं आहे..
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Dec 20, 2025 04:00:23
Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे पालकांच्या 'ठिय्या' आंदोलनानंतर पिंपळनेर पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले असून, मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांची कॉलेज समोरच धिंड काढली आहे. शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्या टवाळखोरां विरुद्ध तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याने संतप्त पालकांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर खडबडून जागी झालेल्या पिंपळनेर पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकत भर रस्त्यात धिंड काढली. गेल्या काही दिवसांपासून कॉलेज समोर या टवळाखोरांनी उच्छाद मांडला होता. कॉलेजमधून बाहेर येणाऱ्या मुलींची दिवसाढवळ्या छेड काढत होते. या कारवाईत दोघाजणांच्या मूसक्या आवळण्यात पिंपळनेर पोलिसांना यश आले असून, एक संशयित अद्यापही फरार आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 20, 2025 03:54:04
Dhule, Maharashtra:धुळे शहरात मी चांद के 5.3° c तापमानाची नोंद झालेली आहे. यंदाच्या हंगामातील हे सर्वाधिक कमी तापमान नोंदवला गेला आहे. गेल्या पंधरा दिवसापासून शहरासह जिल्हा मध्ये शीतलहरीचा प्रकोप सुरू आहे. शीतलहरी मुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सायंकाळी सहा वाजेपासून तर सकाळी आठ वाजेपर्यंत घराबाहेर पडणं कठीण झालेला आहे. या परिस्थितीमध्ये नागरिकांनी काळजी घेण्याचा आवाहन प्रशासनाने केलेला आहे. कडाक्याच्या थंडीचा जनावरांची ही विशेष काळजी घ्यावी लागत आहे. पशुपालकांनी गोणपाटाच्या मदतीने जनावरांचे थंडीपासून संरक्षण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गोठ्यांमध्ये गोंणपाट लावण्यात आलेले आहेत. तर अनेक ठिकाणी शेकोटी पेटवून जनावरांना ऊब देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Dec 20, 2025 03:32:25
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 20, 2025 03:31:15
Satara, Maharashtra:सातारा: साताऱ्यातील फलटण आणि महाबळेश्वर या दोन नगरपालिका साठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. फलटण नगरपालिका निवडणुकीच्या नगराध्यक्षपदासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये थेट लढत पहायला मिळत आहे. फलटणमध्ये नगराध्यक्ष पदासाठी रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेतराजे नाईक निंबाळकर हे शिवसेनेच्या चिन्हावर तर माजी खा. रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू भाजपच्या चिन्हावर समशेर सिंह नाईक निंबाळकर या दोघांमध्ये थेट लढत होते आहे. फलटण मध्ये 27 जागांसाठी 75 उमेदवार रिंगणात आहेत. एकूणच फलटण नगरपालिकेसाठी रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजीत नाईक निंबाळकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर महाबळेश्वर नगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या पुरस्कृत उमेदवाराच्या मध्ये महत्वपूर्ण लढत होत आहे. महाबळेश्वर मध्ये नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर सुनील शिंदे तर शिवसेनेचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार कुमार शिंदे यांचे मध्ये महत्त्वपूर्ण लढत. महाबळेश्वर मध्ये 20 जागांसाठी 61 उमेदवार रिंगणात आहेत. महाबळेश्वर नगरपालिकेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री मकरंद पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी...
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Dec 20, 2025 03:30:40
Nashik, Maharashtra:ब्रेकिंग न्यूज साधूंविषयी वक्तव्यावरून नि तेश कराळे (कराळे मास्तर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल कुंभमेळ्याच्या २५ हजार कोटी खर्चावर ‘फालतू’ अशी टीका केल्याने वाद “कुंभमेळ्यातील साधू गांजा पितात” या वक्तव्याने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेची तक्रार; अजामीनपात्र गुन्ह्याची नोंद कराळे मास्तर कोणत्याही क्षणांची अटकेची शक्यता साधू संत नसून गांजा पिणारे असल्याचा दावा; १० लाखांची पैज लावण्याची तयारी कुंभमेळ्यासाठी होणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीला तीव्र विरोध “कुंभमेळ्याच्या नावाखाली जमीन उद्योगपतींना देण्याचा कट” असा आरोप वर्धा येथे विश्व हिंदू परिषदेची पोलिसात तक्रार ,
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Dec 20, 2025 03:18:57
Pune, Maharashtra:अहिल्यानगरच्या पाथर्डी नगरपरिषद साठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे 20 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष पदासाठी ही मतदान प्रक्रिया पार पडणार असून यासाठी शहरामध्ये 27 मतदान केंद्र आहेत सकाळी साडेसात वाजेपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे या निवडणुकीत भाजपकडून अभय आव्हाड आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून बंडू बोरुडे हे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत सकाळपासून मतदानाला शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे प्रचाराला 18 दिवस जास्त मिळाल्याने उमेदवारांमध्ये देखील उत्साह आहे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभय आव्हाड यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी 121:- अभय आव्हाड,भाजप उमेदवार
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 20, 2025 03:18:32
Washim, Maharashtra:वाशिम नगरपरिषद निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून यासाठी १६ प्रभागांमध्ये एकूण ८१ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे.एका नगराध्यक्ष पदासाठी ८ उमेदवार तर १६ प्रभागांतील 32 नगसेवक पदासाठी १७२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत नगरपरिषदेसाठी एकूण ७५,०७० मतदार असून त्यामध्ये ३८,५२२ पुरुष व ३६,५४१ महिला मतदारांचा समावेश आहे.मतदान शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावे यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.यात एक पोलीस उपविभागीय अधिकारी, दोन पोलीस निरीक्षक, १३ सहाय्यक व उपनिरीक्षक, १७९ पोलीस कर्मचारी,१६० होमगार्ड आणि एसआरपीएफ च्या दोन तुकड्यांचा समावेश आहे.वाशिम शहरातील मतदान केंद्रांचा आढावा घेतला आमचे वाशिमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी..
0
comment0
Report
Advertisement
Back to top