Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nanded431604

नांदेड के धर्माबाद और मुखेड नगरपालिका में आज मतदान शुरू

SMSATISH MOHITE
Dec 20, 2025 03:32:25
Nanded, Maharashtra
नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद आणि मुखेड या दोन नगरपालिकाsाठी आज मतदान होत आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालीये. धर्माबाद मध्ये एकूण 27 हजार 256 मतदार आहेत. मुखेड नगरपालिकाsाठी एकूण 25 हजार 656 मतदार आहेत. धर्माबाद आणि मुखेड नगरपालिकाs सोबतच कुंडलवाडी, भोकर आणि लोहा नगरपालिकाेतील प्रत्येकी एका जागेसाठी मतदान प्रक्रिया होत आहे. न्यायालयाच्या निकालामुळे धर्माबाद आणि मुखेड या दोन नगरपालिकाेची निवडणूक ढकलण्यात आली होती. उद्या एकूण 12 नगरपालिका आणि एका नगर पंचायतीचा निकाल लागणार आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
Dec 20, 2025 04:32:14
Bhandara, Maharashtra:भंडाऱ्यात नगरपरिषदेच्या दोन प्रभागासाठी मतदानाला सुरुवात... Anchor ;- भंडारा नगरपरिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १२ (अ) आणि प्रभाग क्रमांक १५ (अ) या दोन प्रभागांसाठी मतदानाला आज सकाळ पासून सुरवात झाली आहे. ८,१०७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावून आठ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ आणि राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने जारी केलेल्या सुधारित निवडणूक वेळापत्रकानुसार आज मतदान होत आहे.दोन्ही जागांसाठी एकूण ८ उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक १२ (अ) मध्ये ५ उमेदवार तर प्रभाग क्रमांक १५ (अ) मध्ये ३ उमेदवारांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक १२ (अ) मध्ये १,७०९ पुरुष आणि १,७४५ महिलांसह एकूण ३,४५४ मतदार मतदान करतील. १५ (अ) मध्ये, २,१९६ पुरुष आणि २,४५७ महिलांसह एकूण ४,६५३ मतदार मतदान करतील.ज्यामुळे आठही उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. दोन्ही प्रभागांमधील निवडणुकीची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे.९ मतदान केंद्रांवर १ झोनल अधिकाऱ्यासह ४५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती तर पोलिस कर्मचाऱ्याची सुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 20, 2025 04:30:41
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे मतदान केंद्रावर सन्नाटा मोहोळ नगर परिषदेच्या दो प्रभागासाठी आज मतदानाची प्रक्रिया सुरू थंडीमुळे सकाळच्या टप्यात मतदारांचा ओघ कमी, सोलापूर शहर आणि जिल्ह्यात थंडीचा पारा घसरला मोहोळमध्ये 11 ते 12 अंश तापमान असल्याने प्रचंड थंडी जाणवतेय मतदान केंद्रांवर ती मतदार राजा संख्येने कमी, सकाळचे ९ वाजले तरी मतदानाला कमी प्रतिसाद दुपारून मतदारांची गर्दी वाढण्याची शक्यता, सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढाच्या नगरध्यक्षसह 31 जागा, मोहोळ नगरपरिषदच्या दोन प्रभाग, मैंदर्गी आणि पंढरपूर नगरपरिषदेच्या एक प्रभागच्या जागेसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडतेय मोहोळमध्ये मतदान प्रक्रिया कशी सुरूय अढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी....
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 20, 2025 04:30:23
Dhule, Maharashtra:धुळे महानगरपालिकेमध्ये 19 मधून 74 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी महानगरपालिकेने सहा ठिकाणी निवडणूक कार्यालय उभारले आहेत. 19 प्रभाग या सहा निवडणूक कार्यालयांमध्ये विभागण्यात झाले आहेत. या माध्यमातून एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये, इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज सहज भरता यावेत तसंच निवडणुका निपक्षपातीपणे संपन्न व्हावी या दृष्टिकोनातून हे सहा निवडणूक कार्यालय सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी हे प्रमुख असणार आहेत. या कार्यालयांच काम सुरळीत सुरू झाले असून, 23 तारखापासून अर्ज विक्रेला सुरुवात होणार असल्याचे माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिलेली आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 20, 2025 04:07:50
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 20, 2025 04:00:23
Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे पालकांच्या 'ठिय्या' आंदोलनानंतर पिंपळनेर पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले असून, मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांची कॉलेज समोरच धिंड काढली आहे. शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्या टवाळखोरां विरुद्ध तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याने संतप्त पालकांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर खडबडून जागी झालेल्या पिंपळनेर पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकत भर रस्त्यात धिंड काढली. गेल्या काही दिवसांपासून कॉलेज समोर या टवळाखोरांनी उच्छाद मांडला होता. कॉलेजमधून बाहेर येणाऱ्या मुलींची दिवसाढवळ्या छेड काढत होते. या कारवाईत दोघाजणांच्या मूसक्या आवळण्यात पिंपळनेर पोलिसांना यश आले असून, एक संशयित अद्यापही फरार आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 20, 2025 03:54:04
Dhule, Maharashtra:धुळे शहरात मी चांद के 5.3° c तापमानाची नोंद झालेली आहे. यंदाच्या हंगामातील हे सर्वाधिक कमी तापमान नोंदवला गेला आहे. गेल्या पंधरा दिवसापासून शहरासह जिल्हा मध्ये शीतलहरीचा प्रकोप सुरू आहे. शीतलहरी मुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सायंकाळी सहा वाजेपासून तर सकाळी आठ वाजेपर्यंत घराबाहेर पडणं कठीण झालेला आहे. या परिस्थितीमध्ये नागरिकांनी काळजी घेण्याचा आवाहन प्रशासनाने केलेला आहे. कडाक्याच्या थंडीचा जनावरांची ही विशेष काळजी घ्यावी लागत आहे. पशुपालकांनी गोणपाटाच्या मदतीने जनावरांचे थंडीपासून संरक्षण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गोठ्यांमध्ये गोंणपाट लावण्यात आलेले आहेत. तर अनेक ठिकाणी शेकोटी पेटवून जनावरांना ऊब देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 20, 2025 03:31:15
Satara, Maharashtra:सातारा: साताऱ्यातील फलटण आणि महाबळेश्वर या दोन नगरपालिका साठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. फलटण नगरपालिका निवडणुकीच्या नगराध्यक्षपदासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये थेट लढत पहायला मिळत आहे. फलटणमध्ये नगराध्यक्ष पदासाठी रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेतराजे नाईक निंबाळकर हे शिवसेनेच्या चिन्हावर तर माजी खा. रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू भाजपच्या चिन्हावर समशेर सिंह नाईक निंबाळकर या दोघांमध्ये थेट लढत होते आहे. फलटण मध्ये 27 जागांसाठी 75 उमेदवार रिंगणात आहेत. एकूणच फलटण नगरपालिकेसाठी रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजीत नाईक निंबाळकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर महाबळेश्वर नगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या पुरस्कृत उमेदवाराच्या मध्ये महत्वपूर्ण लढत होत आहे. महाबळेश्वर मध्ये नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर सुनील शिंदे तर शिवसेनेचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार कुमार शिंदे यांचे मध्ये महत्त्वपूर्ण लढत. महाबळेश्वर मध्ये 20 जागांसाठी 61 उमेदवार रिंगणात आहेत. महाबळेश्वर नगरपालिकेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री मकरंद पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी...
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Dec 20, 2025 03:30:40
Nashik, Maharashtra:ब्रेकिंग न्यूज साधूंविषयी वक्तव्यावरून नि तेश कराळे (कराळे मास्तर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल कुंभमेळ्याच्या २५ हजार कोटी खर्चावर ‘फालतू’ अशी टीका केल्याने वाद “कुंभमेळ्यातील साधू गांजा पितात” या वक्तव्याने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेची तक्रार; अजामीनपात्र गुन्ह्याची नोंद कराळे मास्तर कोणत्याही क्षणांची अटकेची शक्यता साधू संत नसून गांजा पिणारे असल्याचा दावा; १० लाखांची पैज लावण्याची तयारी कुंभमेळ्यासाठी होणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीला तीव्र विरोध “कुंभमेळ्याच्या नावाखाली जमीन उद्योगपतींना देण्याचा कट” असा आरोप वर्धा येथे विश्व हिंदू परिषदेची पोलिसात तक्रार ,
0
comment0
Report
Advertisement
Back to top