Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400601

भिवंडी महापौर-उपमहापौर उम्मीदवार विलास पाटील ने दाखिल किया आवेदन

UJUmesh Jadhav
Feb 17, 2026 01:16:34
Thane, Maharashtra
विलास पाटील यांनी भरला महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भिवंडी पालिका महापौर पदाच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत. कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांनी पोलीस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. त्यामुळे भिवंडी पालिका मुख्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूप निर्माण झाले होते. महापालिकेच्या प्रवेशद्वारापासून तळमजल्यावर तसेच नगरसचिवांच्या कार्यालयात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. कारण विलास पाटील यांना फसवणुकी प्रकरणे ठाणे गुन्हे शाखेने अटक करत १४ फेब्रुवारी रोजी भिवंडी न्यालयात हजर केले होते. न्यालयाने पाटील यांना पाच दिवसांची १८ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज १६ रोजी महापौर उपमहापौर पदाचे अर्ज दाखल करण्यासाठी विलास पाटील यांनी न्यालायाकडे विनंती केली असता न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करत महापालिकेत अर्ज दाखल करण्याची परवानगी दिली.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Feb 17, 2026 03:01:31
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेत शिवसेना-भाजप युतीचा अध्यक्ष होणार आहे. मात्र पहिल्यांदा अध्यक्ष कुणाचा करायचा याचा निर्णय झाला नाही. सोमवारी झालेल्या उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेत पालकमंत्री संजय शिरसाट तसेच खासदार संदिपान भुमरे यांनी शिवसेनेची बाजू मांडली. तसेच किती सदस्यांच्या पाठिंबा शिवसेनेकडे आहे त्याची आकडेवारी सादर केली. छत्रपती संभाजीनगरात मनपात भाजपचा महापौर आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत शिवसेनेचा अध्यक्ष दिसल्यास युतीत सत्तेचे समान वाटप झाल्याचे दिसेल असा आग्रह धरलाय.. सुरुवातीला अडीच वर्षांसाठी अध्यक्ष पद हे शिवसेनेला मिळायला हवं तर महत्त्वाचे सभागृहही शिवसेनेला हवे अडीच वर्षानंतर हे सगळं भाजपाला देऊन आता जी भाजपाला मिळालं ते शिवसेनेला घेऊ अशा पद्धतीचे सत्ता नियोजन असेल अशीही चर्चा झाल्याचं कळतंय..
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 17, 2026 03:01:18
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरात निवडून आलेल्या नगरसेवक आणि त्यांचे नातेवाईक अधिकाऱ्यांच्या दालनात घुसणे, दरवाजाला लाथ मारणे, शिवीगाळ करणे, दादागिरी करणे असे प्रकार करत आहेत. अनेकजण तुम्हाला सभागृहात पाहून घेईन अशा धमक्याही देत आहेत, अशी तक्रार अधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे केलीय, याची दखल घेत अशा व्यक्तींवर थेट फौजदारी गुन्हा दाखल करा, असे आदेश महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी विभागप्रमुख्यांच्या बैठकीत दिले आहेत.. साडेपाच वर्षांच्या खंडानंतर मनपा निवडणूक झाली. त्यात निवडून आलेल्या ११५ नगरसेवकांत ५८ महिला आहेत. या सर्वांचा व त्यांच्या नातेवाइकांचा पुन्हा मनपा कामकाजात हस्तक्षेप वाढला आहे. काहीजण अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत कर्मचाऱ्यांवर ओरडणे, धमकावणे, टेबलावर हात आपटणे, असे प्रकार करत आहेत अशा तक्रारी आहेत...
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 17, 2026 03:00:58
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 17, 2026 03:00:24
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 17, 2026 02:48:38
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजी नगरात शिवसेनेच्या गटनेतेपदी त्र्यंबक तुपे यांचे नाव निश्चित मानले जले होते. खुद्द पालकमंत्री संजय शिरसाट यांनीही तुपे यांच्या निवडीचे संकेत माध्यमांना दिले होते. मात्र, अनपेक्षितपणे राजकीय चक्रे फिरली आणि गटनेतेपदी किशोर नागरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत नागरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून यामुळे स्थानिक राजकारणात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे. किशोर नागरे हे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या जवळचे मानले जाते. जैस्वाल यांनीच त्यांना उद्धवसेनेतून शिवसेनेत प्रवेश दिला होता. त्यामुळं पुन्हा एकदा पालकमंत्री संजय शिरसाठ समर्थकांना शह दिल्याची चर्चा सुरू आहे...
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 17, 2026 02:48:11
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:महानगरपालिका निवडणुकीत मालेगावमध्ये सत्ता स्थापन करून चर्चेत आलेल्या इस्लाम पार्टीने एमआयएमचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एन्ट्री केली आहे. मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत अनपेक्षित आणि घवघवीत यश मिळवल्यानंतर इस्लाम पार्टीचा आत्मविश्वास वाढला आहे. याच 'मालेगाव पॅटर्न'च्या धर्तीवर आता संभाजीनगर शहरात आपला विस्तार वाढविण्यासाठी पार्टीने कंबर कसली आहे. जलील यांच्या गटातील नाराजांना सोबत घेऊन पार्टी शहरात आपले बळ वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे इस्लाम पार्टीचे प्रमुख असिफ शेख यांनी संभाजीनगरमध्ये एक बैठक देखील घेतली आहे. मागील काही निवडणुकांमध्ये संभाजीनगरमधील मुस्लिमबहुल भागात एमआयएमला मोठा प्रतिसाद मिळत असतानाच, एमआयएमला रोखण्यासाठी आता इस्लाम पार्टी मैदानात उतरली आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 17, 2026 02:30:43
Kalyan, Maharashtra:डोंबिवलीत घरफोडी, 40 तोळे सोने आणि 50 हजारांची रोकड लंपास. मानपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा परिसरातील आर.पी. रेसीडेन्सी येथे राहणारे अशिष यादव हे आपल्या कुटुंबासह उत्तर प्रदेश येथे लग्नसमारंभासाठी गेले होते. जाताना त्यांनी घराची चावी तिची बहीनी कडे देऊन गेले होते. 9 फेब्रुवारी रोजी घरात पेस्ट कंट्रोलचे काम करण्यात आले होते. त्यानंतर घर व्यवस्थित लॉक करून बंद करण्यात आले होते. तसेच 15 तारखेला वॉटर फिल्टर दुरुस्तीसाठी तंत्रज्ञ येणार असल्याने मायादेवी व त्यांचे पती दुपारी सुमारे 1 वाजता घरात गेले असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला. घराचे सेफ्टी डोअर व मुख्य दरवाजाची कडी तुटलेली होती. आत प्रवेश करून पाहणी केली असता दोन्ही बेडरूममधील कपाटे उघडी व लॉकर तोडलेले आढळले. घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिले होते. घटनेची माहिती तात्काळ अशिष यादव यांना देण्यात आली. प्राथमिक चौकशीत घरातील सुमारे 50 हजार रुपयांची रोकड तसेच अंदाजे 40 तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून पोलिसांनी संभाव्य संशयितांचा शोध सुरू केला आहे. मात्र अलीकडील काळात डोंबिवलीत घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सुट्टी किंवा लग्नसराईच्या काळात गावी जाणाऱ्या कुटुंबांच्या घरांवर चोरट्यांचा डोळा असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी घर बंद ठेवताना अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना कराव्यात असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 17, 2026 02:30:18
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर महापालिकेत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एकमेव नगरसेवकासोबत भाजपची युती सोलापूर महापालिकेत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एकमेव नगरसेवकासोबत भाजपची युती स्वीकृत नगरसेवक निवडताना एक जागा कमी होऊ नये म्हणून भाजपची राजकीय चाल सोलापूर महापालिका निवडणुकीत विजयी झालेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एकमेव नगरसेवक वैभव हत्तुरे सत्तेत सहभागी सोलापुरात भाजपाचे 102 पैकी 87 नगरसेवक निवडून आले आहेत तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एकच उमेदवार निवडून आला आहे संख्या बळानुसार भाजपचे 9 स्वीकृत नगरसेवक होणार आहेत मात्र जर शिवसेना आणि काँग्रेसची युती झाल्यास भाजपचा एक स्वीकृत नगरसेवक कमी होऊ शकतो हीच बाब लक्षात घेत भाजपचे राजकीय चाल खेळत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवक वैभव हत्तुरे यांना सत्तेत सहभागी करून घेतलंय
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Feb 17, 2026 01:16:19
Thane, Maharashtra:भिवंडी महापालिका महापौर पदासाठी ९ तर उपमहापौर पदासाठी ६ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल.. अँकर... भिवंडी महापालिका महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज नामनिर्देशन अर्ज करण्यात आले.यामध्ये महापौर पदासाठी ९ तर उपमहागौर पदासाठी ६ जणांनी अर्ज दाखल केले.यामध्ये राजकीय पक्षाच्या ५ जणांनी तर इतर ४ अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.तसेच उपमहापौर पदासाठी ६ जणांनी अर्ज दाखल केला असून त्यापैकी ४ जण राजकीय पक्ष वाले तर इतर पक्षाच्या २ जणांनी उपमहापौर पदासाठी अर्ज भरला असून विशेष म्हणजे महापौर पदासाठी प्रबळ दावेदार मानले जाणारे काँग्रेसचे तारिक मोमिन यांनी महापौर आणि उपमहापौर दोन्हीसाठी नामनिर्देशन दाखल केल्याने काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. बाईट- सर्वपक्षीय नेते
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 17, 2026 01:16:03
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगलीत राज्यस्तरीय 65 व्या कला महोत्सवाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते उद्घाटन संपन्न. राज्य सरकारच्या कला विभागाकडून सांगलीत राज्यस्तरीय 65 वे कला महोत्सव आयोजित करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले आहे, सांगलीतील शांतीनिकेतन विद्यापीठ येथे या प्रदर्शनात महत्त्वाचा आयोजन करण्यात आले आहे, या महोत्सवामध्ये राज्यातल्या विविध कला महाविद्यालयातील विद्यार्थी व कलाकारांच्याकडून साकारण्यात आलेल्या कलाकृती महोत्सवामध्ये सादर करण्यात आले आहेत, पाच दिवस पार पडणारया महोत्सवाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आयोजन देखील करण्यात आले आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top