Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane410210

नवी मुंबई: रुपाली भगत को महापौर-उपमहापौर मतदान में भाग लेने की अनुमति मिली

SNSWATI NAIK
Feb 05, 2026 06:00:57
Navi Mumbai, Maharashtra
नवी मुंबई महानगरपालिकेत भाजपाला दिलासा मिळालाय. भाजपच्या प्रभाग क्रमांक 23ब च्या नगरसेवक पदाला न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यानुसार नगरसेविका रुपाली भगत यांना महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत सहभाग घेता येणार नव्हता. याविरोधात रुपाली भगत यांनी न्यायालयात दाद मागितली असता स्थगितीचा निर्णय मागे घेत महापौर निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याची परवानगी देण्यात आलेय. न्यायालयाच्या या निर्णयामुळे भाजपाला मोठा दिलासा मिळालाय.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSATISH MOHITE
Feb 15, 2026 16:33:24
Nanded, Maharashtra:बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिर परिसरात महाशिवरात्री निमित्त ड्रोन लेझर शो सादर करण्यात आला. हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा भव्य ड्रोन शो भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरला. दोनशे ड्रोनच्या माध्यमातून आकाशात साकारण्यात आलेल्या या लेझर शोमध्ये नागनाथ मंदिराचा इतिहास, त्याची आध्यात्मिक ओळख आणि धार्मिक परंपरा प्रभावीपणे उलगडून दाखवण्यात आली. ड्रोनच्या माध्यमातून भगवान शंकरांची भव्य प्रतिमा, त्रिशूळ, शिवलिंग, औंढ़ा नागनाथ मंदिराची रचना तसेच संत परंपरेचे प्रतीक असलेल्या प्रतिमा आकाशात साकारण्यात आल्या. या नयनरम्य आणि मनमोहक सोहळ्याला पाहण्यासाठी हिंगोलीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 15, 2026 16:31:51
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 15, 2026 14:45:44
Akola, Maharashtra:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या तुलना केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज अकोल्यात भाजपातर्फे तीव्र आंदोलन झाले. नवीन बस स्टँडसमोर झालेल्या या आंदोलनात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. या आंदोलनात भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार वसन्त खंडेलवाल यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. भाजप महानगर सरचिटणीस ॲड. देवाशीष काकड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. महाराष्ट्राच्या अस्मितेचा अवमान सहन केला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला. आंदोलनादरम्यान काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 15, 2026 14:31:09
Akola, Maharashtra:राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत गंभीर शंका उपस्थित करत सखोल आणि निपक्ष चौकशीची मागणी केली आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मेल करून चौकशीची मागणी करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. अजित दादांच्या विमानात स्फोटके होती का ? असा सवाल आता मिटकरींनी उपस्थित केला आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताला १६ दिवस उलटूनही ब्लॅक बॉक्सचा डेटा अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. केंद्रीय उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोल यांनी पत्रकार परिषदेत लवकरच डेटा प्रसिद्ध करू असे सांगितले होते. मात्र तो अद्याप समोर न आल्याने संशय अधिकच वाढत असल्याचे मिटकरी यांनी म्हटले आहे. रोहित पवार यांनी यापूर्वीच अमित शहा यांना मेल करून चौकशीची मागणी केली होती. त्याचप्रमाणे आपणही मेल करून स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशीची मागणी करणार असल्याचे मिटकरी यांनी स्पष्ट केले. मिटकरी यांनी पुढील मुद्दे उपस्थित केले आहेत: ब्लॅक बॉक्स डेटा जाहीर करण्यास विलंब का? अपघातस्थळाचे सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक का केले जात नाही? सीआयडी चौकशीवरही त्यांनी संशय व्यक्त केला. संबंधित धावपट्टीवर यापूर्वी नऊ वेळा अपघात झाल्याचा दावा. स्फोटाचा संशय ? अपघातानंतर सर्व काही बेचिराख झाल्यानंतरही स्फोट झाल्याचा दावा करत मिटकरी यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. विमान जमिनीला स्पर्श करण्यापूर्वीच स्फोट झाला होता का? विमानात स्फोटक पदार्थ किंवा जिलेटीन ठेवण्यात आली होती का? त्यापूर्वी बजरंग सोनवणे यांनीही अशाच प्रकारची शंका व्यक्त केली होती. अपघाताचा एक व्हिडिओ १५ दिवसांनी समोर आल्याने आणखी काही व्हिडिओ असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे अपघाताचे गूढ अधिक भयावह असू शकते, असे मिटकरी म्हणाले. “ज्यांना वाटतं हा अपघात आहे, त्यांनी ते सिद्ध करून दाखवावं,” असे आव्हानही त्यांनी केले आहे..
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 15, 2026 14:18:49
Navi Mumbai, Maharashtra:पनवेल मधील करंजाडे येथे रिक्षा चालकाने निर्जनस्थळी रिक्षा बंद पडल्याचे सांगून रिक्षा मधील महिला प्रवश्याला चाकूचा धाक दाखवत चाकूने गंभीर वार करत अंगावरील सोन्याचे दागिने चोरी करुन घटनास्थळा वरून पळ काढला था. याप्रकरणी महिला प्रवाश्याने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली होती. कोणीही प्रत्यक्षदर्शी नसल्याने सदर गुन्ह्याचा उकल करणे पोलिसांसमोर आव्हानात्मक होते. अखेर फक्त रिक्षाच्या 4 क्रमांकाची माहिती पोलीसांना मिळाली आणि त्यावरून सर्व रिक्षाची तपासणी करुन आरोपी अक्षय बागडे याच्या मुसक्या पोलीसांनी आवळल्या. आरोपीवर मोठ्या प्रमाणात कर्ज झाले होते आणि याच कर्जाची परतफेड करण्यासाठी सदर आरोपीने गुन्हेगारी मार्गाचा अवलंब केल्याची कबुली दिलेय. पोलीसांनी सदर रिक्षा आणि चोरी केलेले दागिने हस्तगत केले असून अधिक तपास करण्यात येतोय.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Feb 15, 2026 13:47:35
Ambernath, Maharashtra:पूरपरिस्थिती पासून होणार बदलापूरकरांची सुटका 230 कोटी रुपयांच्या स्ट्रॉंम वॉटर प्रकल्पाचे भूमिपूजन बदलापूर शहरातील स्ट्रॉम वॉटर प्रकल्पाचं भूमिपूजन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पार पाडलं. साडेचारशे कोटीं रुपयांचा या प्रकल्पाच्या 230 कोटींच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला आजपासून सुरुवात झाली. या प्रकल्पात बदलापूर शहरातील 10 किलोमीटर लांबीच्या मुख्य नाल्याच्या बाजूला बांधकाम करून त्यांचं खोलीकरण करण्यात येणार आहे, त्यामुळे पावसाळ्यात येणाऱ्या पाण्याचं योग्य नियोजन होऊन ते उल्हास नदीला सोडण्यात येणार आहे, त्यामुळे बदलापूर शहरात पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीपासून सुटका होणार आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 15, 2026 12:20:02
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Feb 15, 2026 12:19:43
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 15, 2026 12:17:52
Kalyan, Maharashtra:रेल्वे गर्दीवर उपाययोजना वेगात — प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू : डॉ. श्रीकांत शिंदे Anchor :- :- वाढत्या रेल्वे गर्दीमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असताना यावर ठोस उपाययोजना सुरू असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आणि त्यांना गती देण्यासाठी केंद्र व रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाचवी आणि सहावी रेल्वे लाईनचे काम पूर्ण झाल्याने कल्याण परिसराला अतिरिक्त लोकल सेवा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच कल्याणच्या पुढील तिसरी व चौथी लाईनचे काम सध्या सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतर आणखी गाड्या वाढवता येतील, असे त्यांनी सांगितले. केंद्र शासनाचा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पही या मतदारसंघातून जात असून तो पूर्ण झाल्यानंतर मालगाड्या मुख्य लाईनवरून कमी होतील आणि त्यामुळे प्रवासी गाड्यांसाठी अधिक मार्ग उपलब्ध होतील, असे त्यांनी नमूद केले. याशिवाय मेट्रो प्रकल्प, रिंग रोड, बायपास रस्ते आणि समांतर मार्ग यांसारख्या पर्यायी वाहतूक सुविधा विकसित करण्याचे कामही वेगात सुरू असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे त्यांनी सांगितले. बाईट श्रीकांत शिंदे खासदार
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 15, 2026 12:16:26
Kalyan, Maharashtra:डोंबिवली एमआयडीसी परिसरातील पिंपळेश्वर मंदिर रस्त्यालगत असलेल्या नाल्यातून रासायनिक मिश्रित हिरवट पाणी थेट रस्त्यावर वाहत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिकांच्या मते, नाल्यातून येणारे पाणी हिरव्या रंगाचे असून त्यातून रासायनिक वास येत आहे. हे पाणी रस्त्यावर साचत असल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. काही नागरिकांनी या पाण्यामुळे आरोग्याच्या त्वचेच्या तक्रारी उद्भवण्याची भीती व्यक्त केली आहे. या परिसरात अनेक रासायनिक व लघुउद्योग कार्यरत असल्याने सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली जाते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित उद्योगांकडून प्रक्रिया न करता सांडपाणी नाल्यात सोडले जात असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त करत आहे.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Feb 15, 2026 12:16:06
Baramati, Maharashtra:महाशिवरात्रीनिमित्त इंदापूरच्या इंद्रेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी...\n\nANCHOR महाशिवरात्रीनिमित्त पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे ग्रामदैवत असणाऱ्या इंद्रेश्वर मंदिर येथे भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. तालुक्यासह परिसरातून हजारो नागरिक इंद्रेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी मंदिरात दाखल झाले आहेत. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने नटलेला आहे.याचबरोबर मंदिरात आसलेल्या वीर श्री मालोजीराजे भोसले यांच्या पादुकांचेही भाविकांकडून दर्शन घेतले जात असून, दर्शनासाठी रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत...
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 15, 2026 12:15:49
Kalyan, Maharashtra:“माझ्या नादाला लागू नका!” — खासदार श्रीकांत शिंदे यांचे मंत्री गणेश नाईक यांना थेट खुलं आव्हान. भाजपचे मंत्री गणेश नाईक सातत्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत असल्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. आज महाशिवरात्री निमित्त डोंबिवली पिंपळेश्वर मंदिरात खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाजप मंत्री गणेश नाईक यांच्यावर जोरदार टीका करत थेट आव्हान दिले आहे. “ज्यांच्या घरात तीन माजी आहेत त्यांनी टीका करू नये. इतकीच खुमखुमी असेल तर कल्याण किंवा ठाणे येथील कोणत्याही लोकसभेत उभे रहा, श्रीकांत शिंदे तुमच्या समोर उभा राहील,” असा इशारा त्यांनी दिला. पुढे बोलताना शिंदे म्हणाले, नाईक यांना वाढत्या वयामुळे स्मृतीभ्रंश झाला आहे ..हा आजार बरा होत नाही पण कंट्रोल करू शकतो ..त्याचा उपचार बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात आहे .त्यांच्या घरात तीन माजी आहेत हे ते विसरले आहेत .“शिंदे साहेबांच्या नादाला लागा, मात्र डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या नादाला लागू नका,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले असून दोन्ही नेत्यांमधील वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या विधानानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या असून समर्थक आणि विरोधक यांच्यात सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 15, 2026 10:34:57
Bhandara, Maharashtra:महाशिवरात्री यात्रे निमित्त भंडारा जिल्ह्यातील शिवभक्तांसाठी परिवहन विभाग सज्ज झाला आहे आणि एसटी महामंडळाने विशेष बससेवेचे नियोजन केले आहे. १७ फेब्रुवारी पर्यंत गायमुख, प्रतापगड आणि आंभोरा या प्रमुख शिवतीर्थांसाठी १२९ ‘यात्रा स्पेशल’ सुरू करण्यात आले असून भाविकांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून फेऱ्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे. सुरक्षित, सोयीस्कर और किफायतशीर प्रवासासाठी भाविकांची पसंती एसटीला असल्याने अतिरिक्त नियोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या काळात गर्दीनुसार तत्काळ अतिरिक्त बसेस सोडण्यात येत असल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top