Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421506

अंबरनाथ की गैस उत्सर्जन से शहर में धुआँ, MPCB पर सवाल

CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Oct 08, 2025 01:00:29
Ambernath, Maharashtra
अंबरनाथ के मोरीवली एमआईडीसी से गैस उत्सर्जन: मंगलवार रात फिर बड़ा गैस उत्सर्जन हुआ जिससे शहर में धुआँ फैल गया; रेल्वे ट्रैक पर भी धुआँ छाया रहा, दृश्यता कम हो गई. पहले शुक्रवार को भी गैस उत्सर्जन हुआ था और सोमवारी को भी जारी रहा; इस बार गैस ने पहले से सभी सीमाओं को पार कर दिया, तीखा एसिड-सदृश्य दुर्गंध आया. गैस जाने से आसपास के क्षेत्र—निसर्ग ग्रीन, मोरीवली पाडा, ग्रीन सिटी, बी केबिन, पाठारे पार्क, मोतिराम पार्क, बुवापाडा, लादीनाका—में सांस लेना कठिन हो गया. मोरीवली एमआयडीसी के कारखानों के प्रतिनिधि अशोक वाळुंज ने स्थिति का आकलन कर एमपीसीबी अधिकारियों से संपर्क किया और दोषी कंपनियों पर कड़ी कार्रवाई की मांग की. मौके पर 4–5 कंपनियाँ स्क्रबर नहीं उपयोग कर रहीं थीं, जिससे लगातार गैस उत्सर्जन हो रहा है; किंतु एमपीसीबी अधिकारी बार‑बार नजरअंदाज कर रहे हैं, पूछा जा रहा है कि अंततः कब जागेंगे?
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
Oct 08, 2025 04:20:22
Parbhani, Maharashtra:हिंगोली - शिक्षण अधिकाऱ्यावर उपोषणाला बसण्याची वेळ, मुख्याध्यापक दिलेली कामे पूर्ण करीत नसल्याने शिक्षणाधिकारी त्या शाळेसमोर उपोषणाला बसणार,लेखी पत्र आलं समोर,शिक्षणाधिकाऱ्यांची गांधीगिरी की ढिसाळपणा.... हिंगोलीत शिक्षणाधिकाऱ्यालाच शाळेसमोर उपोषण करण्याची वेळ आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलााय. हिंगोली येथील अंतुलेनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शासन आणि शिक्षण विभागाने आखून दिलेली कामे पूर्ण करून माहिती ऑनलाइन करीत नसल्याने त्रस्त झालेल्या शिक्षणाधिकार्यांनी कारवाई ऐवजी गांधीगिरी करीत थेट उपोषण करणार असल्याचे पत्र मुख्याध्यापकाच्या नावाने काढलंय. सदर पत्र समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. निपुण महाराष्ट्र मधील प्रगती असमाधानकारक असणे, माहिती अपूर्ण ठेवणे, एक पेड माँ के नाम, SHVR, विद्यार्थी सुरक्षा समिती आणि इतर अशा कोणत्याच उपक्रमाची माहिती आपण लिंक द्वारे भरलेली नाही किंवा सादर केलेली नाही. सदर उपक्रमाची जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी होत असतांना आपल्या शाळेत मात्र सदर उपक्रमांची अंमलबजावणी होताना दिसत नाहीये असा ठपका अंतलेनगर येथील शाळेच्या मुख्याध्यापकावर ठेवण्यात आलाय. आपल्या या दुर्लक्षाची जाणीव होण्यासाठी मी प्रशांत दिग्रसकर प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद हिंगोली आपल्या शाळेसमोर दिनांक 11/10/2025 रोजी लक्षवेधी उपोषणास बसत आहे असे पत्रात म्हटलं आहे. शिक्षणाधिकार्यांच्या या गांधीगीरीची एकीकडे चर्चा होत असतांना शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारपणा ही_chव्हाट्यावर आलाय...
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Oct 08, 2025 04:20:06
Pimpri-Chinchwad, Maharashtra:राज्यतील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला पिंपरी चिंचवड पोलिस सरसावले आहेत. पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला तब्बल 43 लाख 95 हजार रुपयाच्या धनादेश दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनयकुमार चौबे यांनी हा धनादेश सुपुर्द केला आहे. अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा त्याचबरोबर मराठवाड्यातील जालना, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे. Shेतकऱ्यांच्या मदतीसाठी समाजातील वेगवेगळ्या घटकांनी पुढाकार घेतला आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी देखील आपलं सामाजिक जाणीवेच भान जपत अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी तब्बल 43 लाख 95 हजार रुपयाची अर्थिक मदत केली आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना केलेल्या मदतीमुळे मराठवाड्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना आसमानी संकटातून सावरण्यास मोठा आधार मिळणार आहे.
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Oct 08, 2025 04:02:15
Wardha, Maharashtra:वर्ध्याच्या आर्वीत प्रेम प्रकरणातून युवकाची हत्या एकाच मुलीवर दोघेही प्रेम करीत असल्याची माहिती आर्वीतील गांधी चौकात घडलीय घटना शहरात वाढवलाय पोलिस बंदोबस्त वर्ध्याच्या आर्वी शहरातील गांधी चौकात एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना प्रेमसंबंधातून उभ्या राहिलेल्या वादातून घडली आहे. या निर्घृण हत्येनंतर शहरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे नाव सलीम सबदर शाह (वय ३०, रा. संजय नगर, आर्बी) असे आहे.या हत्येप्रकरणी निखिल बुरे (रा. हरदोली) या तरुणास अटक करण्यात आली आहे. व्हिओ - सलीम आणि निखिल यांच्यात काही काळापासून एका तरुणीवरून वाद सुरू होता. त्याचे पर्यवसान आज गांधी चौकात हाणामारीत झाले. त्या दरम्यान निखिलने धारदार Shस्त्राने सलीमवर वार करून त्याला गंभीर जखमी केले. सलीमला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच आर्वी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी निखिल बुरे यास अटक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेमुळे आर्वी शहरात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गांधी चौक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 08, 2025 03:47:10
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 08, 2025 03:45:13
Nashik, Maharashtra:वयोवृद्ध आईची मनोरुग्ण मुलाने गळा दाबून केली हत्या स्वतःहून पोलीस ठाण्यात झाला हजर आणि दिली हत्येची कबुली अँकर नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेलरोड शिवाजीनगर येथील अष्टविनायक नगर येथे अरविंद मुरलीधर पाटील वर्ष याने त्याची वृद्ध आई यशोदाबाई मुरलीधर पाटील वय 86 यांची गळा दाबून हत्या केल्याची घटना घडलीये...आरोपी मुलगा अरविंद पाटील हत्या करून स्वतःच नाशिकरोड पोलीस ठाण्यात हजर झाला व मी माझ्या वयोवृद्ध आईच्या वृद्धपणाला कंटाळून तिची गळा दाबून हत्या केली आहे मला अटक करा असे सांगितल्याने त्याला ताब्यात घेत त्याच्या राहत्या घरी पोलिसांनी पाहणी केली असता घरात त्याची वयोवृद्ध आई यशोदाबाई पाटील यांचा मृतदेह आढळून आला. आरोपी मुलाविरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा केला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अरविंद उर्फ बाळू पाटील हा मनोरुग्ण असल्याचे समोर आले आहे तो विवाहित असून त्याच्या या मानसिक आजाराला कंटाळून त्याची पत्नी देखील त्याला सोडून गेलेली असल्याने आई आणि हे दोघंच या ठिकाणी राहत होते या घटनेची माहिती कळताच सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, नाशिक रोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आदींसह अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. मुलानेच केलेल्या वयोव वृद्ध आईच्या हत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती...
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 08, 2025 03:19:12
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:महापालिकेने विकास योजनेतील रस्त्यांवर रुंदीकरणासाठी टप्प्याटप्याने कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार औरंगपुरा भागातील महात्मा फुले चौक ते जुन्या मोंढ्यातील हरी मशीददरम्यानच्या ६० फूट रुंदीच्या रस्त्यावर टोटल स्टेशनद्वारे मोजणी करून मार्किंग पूर्ण करण्यात आले. या मोहिमेमुळे सुमारे १२५ मालमत्ता बाधित होणार असल्याचे प्राथमिक अंदाजातून स्पष्ट झाले आहे. व्यापारी पट्टा आणि वाहतुकसाठी महत्त्वाचा रस्ता आहे, महात्मा फुले चौक, गुलमंडी चौक, दिवाण देवडी आणि अंगुरीबागमार्गे जाणा-या हा रस्ता शहरातील एक महत्त्वाचा व्यापारी पट्टा मानला जातो. रस्त्याच्या अरुंदतेमुळे येथे नेहमीच वाहतूक कोंडी निर्माण होत होती.
7
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 08, 2025 03:16:12
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:दिवाळीचा सण जवळ आल्याने रेल्वेने गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी मोठी वाढली आहे. रेल्वे प्रशासनाने काही गाड्यांचे डबे वाढवूनही रिझव्हेशन मिळवणे प्रवाशांसाठी कठीण झाले आहे. १४ ते २० ऑक्टोबरपर्यंत मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि अमृतसरसारख्या प्रमुख शहरांकडे जाणाऱ्या बहुतेक महत्त्वाच्या गाड्यांची तिकिटे वेटिंग लिस्ट आहेत. दिवाळीच्या सुट्यांचे नियोजन खूप आधीच करत असल्याने अनेक जण रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. तर दिवाळीपूर्वी उत्तर भारताकडे, तर दिवाळीनंतर दक्षिणेकडील धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्यांची गर्दी वाढते, त्यामुळं दिवाळी विशेष रेल्वे सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे...
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 08, 2025 03:15:56
Nashik, Maharashtra:रशियन तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार होणारी एसयू ५७ ईही विमाने नाशिकच्या HAL कारखान्यात तयार होण्याची शक्यता अँकर ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय हवाई दलानेच वर्चस्व गाजवल्यानंतर आता आणखी एक आनंदाची बातमी आहे.... रशियाशी मोठा शस्त्र करार करण्याच्या तयारीत असलेल्या भारताने आता याच देशाच्या तंत्रज्ञानाच्या सहकाऱ्याने पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थातच, रशियन तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार होणारी एसयू ५७ ईही विमाने नाशिकच्या HAL कारखान्यात तयार होण्याची शक्यता आहे..... ओझर येथील हा विमानांचा कारखाना १९६४ साली सुरू झाला. त्यावेळी रशियाच्या मदतीने येथे मिग लढाऊ विमानांचे उत्पादन करण्यात आले. अनेक युद्धात भारताला उपयुक्त ठरलेली ही मिग विमाने नुकतीच निवृत्त केली आहे. मात्र, त्या आधीच HAL मध्ये सुखोई-३० MKI या लढाऊ विमानांची निर्मिती केली. सुमारे ३०० विमानांच्या निर्मितीनंतर याच कारखान्यात या विमानांच्या देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात आले. आता, पाचव्या पिढीची लढाऊ विमाने देखील तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top