Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400601

भिवंडी में भीषण आग: सावद नाका के Shadow Fox गोदाम में लगी आग, करोड़ों का नुकसान

UJUmesh Jadhav
Oct 06, 2025 01:16:15
Thane, Maharashtra
भिवंडीमें भीषण आग.. सावद नाका येथील शॅडो फॅक्स कुरिअर कंपनीच्या गोदामात लागली आग... या आगीमुळे कोट्यवधींचे झाले नुकसान... भिवंडी तालुक्यातील सावद नाका येथील जानवळ गावाजवळ प्यारेमॅन लॉजिस्टिक्स पार्कमध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. ऑनलाइन उत्पादनांचा मोठा साठा असलेल्या शॅडो फॅक्स कुरिअर कंपनीच्या गोदामात ही आग लागली. आगीचे कारण अद्याप समजलेले नाही. आग इतकी भीषण होती की काही वेळातच तिने जवळच्या एका मोठ्या गोदामाला वेढले. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आकाशात उडणारा धूर आणि ज्वाळा अनेक किलो मीटरपर्यंत दिसत होत्या. घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाचे जवान दोन अग्निशमन गाड्या आणि एका टँकरसह घटनास्थळी पोहोचले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने, सुट्टीचा रविवार असल्याने गोदाम बंद होते. यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी सध्या अग्निशमन दलाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Oct 06, 2025 04:03:04
Dhule, Maharashtra:नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयाच्या नाव महानायक बिरसा मुंडा देण्यात आलं आहे. बिरसा मुंडा यांच्या नाव दिल्याने बिरसा मुंडा यांच्या कार्याला उजाळा देण्याचं काम राज्य सरकारने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं असल्याने, फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसीन मुश्रीफ यांच्या आभार आमदार राजेश पाडवी यांनी मानला, नंदूरबार वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावात रूपांतर करण्यात आल्याने महाविद्यालयासाठी ही अभिमानाची बाब असून आरोग्य सेवा आणखीन बळकट होण्यास मोठी मदत होणार आहे. बिरसा मुंडा यांनी इंग्रजांविरुद्ध लढा लढला होता यामुळे गेल्या दोन महिन्यापूर्वी मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री असून यांच्याकडे बिरसा मुंडा यांच्या नाव देण्याची मागणी केली होती आज अखेर ही मागणी मान्य झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि महायुती सरकारचं आभार आमदार राजेश पाडवी यांनी मानले,
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Oct 06, 2025 04:02:54
Amravati, Maharashtra:संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिसभेच्या झालेल्या बैठकीत एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व विद्यापीठाला संलग्न महाविद्यालयांना आपले नामफलक फक्त मराठी भाषेतच लावणे बंधनकारक केलं आहे. अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये हा नियम सक्तीने लागू होणार आहे. या निर्णयामुळं विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व महाविद्यालयांच्या नामफलकांवरून इंग्रजी किंवा इतर भाषांचे वर्चस्व संपुष्टात येणार असून मराठी भाषेचे स्थान अधिक दृढ होईल. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या या उपक्रमामुळं मराठी भाषा संवर्धनाच्या दिशेने एक भक्कम टप्पा गाठला गेला आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Oct 06, 2025 03:47:10
Satara, Maharashtra:सातारा:फलटण येथील राजकारणात माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपचे माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. विकासाच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये कायम आरोप प्रत्यारोप होतात मात्र मागील दोन दिवसापूर्वी दोघांच्या मनोमिलनाच्या चर्चेवर रामराजे यांनी आपली प्रतिक्रिया देत मनोमिलन हे एकतर्फी प्रेमातून होत नाही विकासाचे राजकारण करायचं असेल तर मनोमिलन होईल राजकारण करायचं असेल तर विचार करावा लागेल. हा निर्णय लोकांच्या हातात आहे. असं त्यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती यावर फलटण येथील एका कार्यक्रमात भाजपचे माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांनी आज त्याला प्रत्युत्तर दिलय.... शेतकऱ्याला नडणाऱ्या व्यक्ती सोबत दोस्ती करायची नाही. तुमच्या सर्वांच्या साक्षीने या तालुक्यात अनैसर्गिक युती मनोमिलन होणार नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. यामुळे यापुढील काळातही माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांच्यातील राजकीय वैर कायम राहणार असल्याचे पाहायला मिळते...
0
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 06, 2025 03:46:18
Nagpur, Maharashtra:Ngp Pankaj Bhoyar live u ने फीड पाठवले नागपूर पंकज भोयर, गृहराज्यमंत्री. On परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी - ज्या ठिकाणावर मागणी पूरग्रस्त भागात असले, त्या ठिकाणी वर्ग पूर्ण होऊ शकले नाही, किंवा अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकला नाही. त्या ठिकाणाहून मागणी आल्यास, तिकडल्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या त्या संदर्भात सजारत्मक निर्णय घेतला जाईल. On 12 परीक्षा फॉर्म भरण्याची तारीख बारावीच्या परीक्षा फॉर्म भरण्याची पद्धत, होईल, दहावीची तशी मागणी नसल्यामुळे त्या अनुषंगाने निर्णय झाला आहे. On विधिमंडळ समिती दौरे रद्द - मराठवाड्याच्या अनेक भागात पूरग्रस्त परिस्थिती पुढे रस्त्या बंद झाले होते अतिवृष्टीमुळे पाण्याचा वेळा होता त्यामुळे काही दिवस विधिमंडळ समितीचे दौरे काही दिवस रद्द केले होते परिस्थिती नियंत्रणात आली असल्याने आता पुढील दौरे सुरू होईल. - विधिमंडळ समितीतील सर्वे सदस्य आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असतात सर्व सदस्यांची प्रायोरिटी ही आपला मतदारसंघ असतो त्यामुळे त्यांची मागणी होती की आमच्या भागात आम्हाला दौरे करू द्या. On आनंदाची शिधा - यासंदर्भात उचित निर्णय घेतील आणि निश्चित निर्णय वरिष्ठ मंडळी घेतील. On नवीन कोर्स - महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकासद्वारे अनेक प्रोग्राम राबवण्यात येते..सीएम शॉर्ट स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू करण्यात आला आहे.. त्यामध्ये पोलीस विभागातील पोलीस कुटुंबातील पाल्यांना आणि पोलीस पाटलाच्या पाल्यांना सीएम शॉर्ट स्किल डेव्हलपमेंट प्रशिक्षण देण्यात येणार आहे. On गौतमी पाटील - गौतमी पाटील प्रकरणात जे कोणी दोषी असेल त्या सगळ्या संदर्भात चौकशी करेल...त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. जितेंद्र आव्हाड यांच वैयक्तिक मत काहीही असलं तरी मात्र कायदा कायद्याच्या पद्धतीने काम करेल. On राज ठाकरे - उद्धव ठाकरे - निवडणुकीच्या अनुषंगाने भेटी वाढल्या आहे. पण महाराष्ट्राची जनतेला हे माहित आहे, महायुती सरकारने हे विकासाची कामे केलेले आहे...त्यामुळे महायुतीकडेच जनतेचा कल असणार आहे. On पुणे ड्रग न्यायाधीश बडतर्फ - मादक पदार्थांच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन अतिशय गंभीर आहे. मुख्यमंत्री यांच्या स्पष्ट सूचना आहे. त्या प्रकरणात कुठल्याही निष्काजीपणा करू नये या संदर्भात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. - tet अनुषंगाने शिक्षक संघटनेची बैठक घेतली, त्यांच्या मागणीनुसार सुप्रीम कोर्टात पुनर्विलोकन याचिका सरकारच्या वतीने टाकण्यात येईल.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Oct 06, 2025 03:46:02
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Oct 06, 2025 03:45:07
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Oct 06, 2025 03:42:45
Bhandara, Maharashtra:साखर कारखान्याच्या उदासीन धोरणामुळे भंडाऱ्यात ऊस उत्पादन कोसळलं.... 50 टक्के पेक्षा उसाची लागवड कमी.... वेळेवर पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन घेणे केलं कमी.... भंडारा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आज अक्षरशः हतबल झाले आहेत. साखर कारखान्यांच्या उदासीन धोरणामुळे आणि शासनाच्या निष्क्रियतेमुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादन 50 टक्क्यांपेक्षा कमी झालं आहे. दहा-दहा महिने ऊसाचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांनी ऊस लागवड करणेच बंद केलं आहे. एकीकडे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना ऊसाला 3400 रुपये दर मिळतो, तर विदर्भातील शेतकऱ्यांना केवळ 2500 रुपयांवर समाधान मानावं लागतं. या दरातील फरकामुळे विदर्भातील शेतकरी शासनावर “दूजाभाव” केल्याचा आरोप करत आहेत..... यातच पाणीटंचाई, वेळेवर न मिळणारी वीज, आणि वन्य प्राण्यांचे सतत हल्ले, या सर्वांनी शेतकऱ्यांना आणखी हतबल केलं आहे. ऊसासारखं दीर्घकालीन पिक सतत काळजी घेणारं असतं, पण जेव्हा शेतकऱ्याला ना पाणी मिळतं, ना दर मिळतो, तेव्हा तो शेवटी ऊसापासून हात झटकतो. जिल्ह्यातील अनेक शेतकरी आता हरभरा आणि भात पिकांकडे वळत आहेत. पण ऊस हा रोजगारनिर्मितीचा मोठा स्रोत असल्याने कारखाने बंद पडल्यास शेकडो मजुरांचे रोजगार धोक्यात येऊ शकतो. “साखर कारखान्यांची उदासीनता, शासनाची निष्क्रियता आणि निसर्गाची अवकळा या तीन गोष्टींनी मिळून भंडाऱ्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आयुष्य अक्षरशः साखरेऐवजी कडू झालं आहे. समान दर, वेळेवर पैसे आणि योग्य धोरण हेच त्यांच्या जगण्याचं औषध ठरू शकतं.”
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 06, 2025 03:17:07
Nashik, Maharashtra:खड्यांनी घेतला निवृत्त शिक्षकाचा बळी; मनपाऐवजी मृतावरच दाखल केला गुन्हा... नातेवाईकांमध्ये संताप नाशिकच्या तारवालानगर-अमृतधाम लिंकरोडवरील खड्ड्यांनी आणखी एक जीव घेतल्यानंतर गुन्हा मात्र अपघातात मृत झालेल्या निवृत्त शिक्षकावरच पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. मनपा प्रशासन मात्र या प्रकरणातून मुक्तच राहिले. त्यामुळे नागरिकांकडून पोलिसांच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त करण्यात आलाय..वाहनचालक मृत्यूस स्वतःच कारणीभूत असल्याची नोंद पंचवटी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यामुळे मनपा प्रशासनासह पोलिसांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. १३ सप्टेंबरला अपघाताची घटना घडली होती. दिनकर पांडुरंग झेटे असे अपघातात मृत्यू झालेल्या निवृत्त शिक्षकाचे नाव आहे.. ते येवला येथील वीरभद्र माध्यमिक विद्यालयातून निवृत्त झाले होते. त्यानंतर ते नाशिकला मखमलाबाद शिवारातील उदयनगर येथे स्थायिक झाले. दुचाकीने जात असताना अमृतधाम लिंकरोडवरील खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांच्या तोल गेला अन् ते डोक्यावर पडले. त्यांनी डोक्यावर हेल्मेट घातले नव्हते, असे तपास करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने सांगितले. दुसऱ्याच दिवशी दिनकर झेटे यांचा मृत्यू झाला. तर १ ऑक्टोबरला त्यांच्याविरुद्ध स्वतःच्या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आलाय.. ह्या गुन्हा दाखल झाल्याबद्दल त्यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे त्याचबरोबर हा गुन्हा चुकीचा असून याबाबत तक्रार करणारा असून जे दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांनी केलीये...
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Oct 06, 2025 03:15:28
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील संस्थान श्री देव गणपतीपुळे देवस्थान समितीकडून महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे नुकसान झालेल्यांना मदतीचा हात देण्यात आला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २१ लाख आणि सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र या संस्थेला २१ लाखांची मदत चेकद्वारे पाठवण्यात आली आहे. गणपतीपुळे देवस्थान समिती नेहमीच सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन सामाजिक स्वरूपाचे काम करत असते. सामाजिक काम डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना, सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात देण्यात वाया या मूळ उद्देशाने गणपतीपुळे देवस्थान समितीकडून मदतीचा धनादेश पाठवण्यात आला आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 06, 2025 03:05:38
1
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 06, 2025 03:01:15
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 06, 2025 03:01:02
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जायकवाडी सोडून मराठवाड्यातील नांदेड, परभणी शॉट्स वापरा, आले असतील... छत्रपती संभाजीनगर विभागातील   तीन वर्षांनंतर यंदा प्रथमच मराठवाड्यातील मोठी, मध्यम आणि लघु प्रकल्प भरली आहेत. सन २०२३ व २०२४ मध्ये मध्यम व लघु प्रकल्पात सरासरी केवळ ३१ टक्के जलसाठा होता तो यंदा ९३ टक्के आहे. दुष्काळवाडा, टँकरवाडा अशी दूषणे मराठवाड्याच्या माथी लागलेली आहे. यंदा मात्र मराठवाड्यात सर्वदूर मुबलक पाऊस पडला आहे, मराठवाड्यातील गोदावरी नदीवरील १३ बंधारे ओसंडून वाहत आहेत. एवढेच नव्हे तर जायकवाडी प्रकल्प १०० टक्के भरला आहे, ७५ मध्यम प्रकल्पांत आज सरासरी ९३ टक्के जलसाठा आहे. लघु प्रकल्पांची स्थितीही चांगली असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. मराठवाड्यातील ७५४ लघू प्रकल्पांत सरासरी ९३ टक्के पाणी आहे. यंदाचा जलसाठा मागील दोन वर्षाच्या तुलनेत तीनपट असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
0
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top