Back
अंबरनाथ नगरपालिका चुनाव: तेजश्री करंजुले भाजपा का उम्मीदवार घोषित
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 05, 2025 17:15:57
Ambernath, Maharashtra
अंबरनाथ नगरपालिकाेवर एक लाख टक्के कमळच फुलणार! भाजपाचा जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी रणशिंग फुंकलं. किंवा भाजपाचा स्वबळाचा नारा ? Amb bjp अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून तेजश्री विश्वजीत करंजुले यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. तेजश्री विश्वजीत करंजुले यांच्या सोबत अंबरनाथमधून एकूण चार इच्छुकांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर अंबरनाथमध्ये भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. जिल्हाध्यक्ष नंदू परब, कल्याण लोकसभा समन्वयक शशिकांत कांबळे, माजी आमदार नरेंद्र पवार, आमदार कुमार ऐलानी, प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्यात थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून तेजश्री विश्वजीत करंजुले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. आता हे नाव भाजपाच्या कोअर कमिटीकडून लवकरच अधिकृतपणे जाहीर केलं जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी दिली. यावेळी बोलताना अंबरनाथ नगरपालिकाेवर एक लाख टक्के कमळच फुलणार, असा विश्वास भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी व्यक्त केला असून त्यामुळे भाजपा स्वबळावरच लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowNov 05, 2025 17:38:100
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 05, 2025 17:16:210
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 05, 2025 17:01:090
Report
JMJAVED MULANI
FollowNov 05, 2025 16:27:380
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 05, 2025 16:27:150
Report
ABATISH BHOIR
FollowNov 05, 2025 16:26:530
Report
KJKunal Jamdade
FollowNov 05, 2025 15:39:370
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 05, 2025 15:39:010
Report
SKShubham Koli
FollowNov 05, 2025 15:38:440
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 05, 2025 15:17:210
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 05, 2025 15:16:370
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 05, 2025 15:01:480
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 05, 2025 14:51:370
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 05, 2025 14:18:250
Report