Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400601

आदिवासी आंदोलन: मुख्यमंत्री से बैठक का आश्वासन, मांगों के समाधान की उम्मीद

SKShubham Koli
Nov 05, 2025 15:38:44
Thane, Maharashtra
श्रमजीवी संघटनेतर्फे त्याचे संस्थापक लढाऊ नेते विवेक पंडित यांनी आदिवासींच्या करता सर्व पाड्या पाड्यावर राहणाऱ्या लोकांकरिता आत्मक्लेषातून निर्धाराकडे अशा प्रकारचा आंदोलन धरणे आंदोलन मौन व्रत धरून आणि उपोषण करून आज दिवस भर या आंदोलन आदिवासी बांधव सहभागी आहेत शासनाने अतिशय चांगला प्रतिसाद दिलाय माननीय मुख्यमंत्र्यांनी यादी देखील बैठका घेऊन काही प्रश्न सोडवण्यात परंतु काही जे प्रश्न राहिलेले आहेत त्या संबंधांमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी एका बैठकीचे आयोजन करण्याचा आश्वासन दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे सगळ्याच लोकांनी त्यांना विनंती केली की आमचे आमदार आहेत निरंजन डावखरे आहेत की त्यांनी उपोषण सोडावं आत्मा कलश आणि निर्धार जो आहे. हे आंदोलन चालू असेल आणि त्याला बैठक होईल आणि त्या निमित्ताने विनंतीला मान देऊन आजचा उपोषण जे आहे ते सोडलेला आहे आदिवासींचे अनेक गंभीर विषय आहेत मला खात्री आहे शासन याच्यामध्ये सकारात्मक आहे आणि उरलेले जे विषय आहे ते देखील अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि ते देखील सोडवण्यासाठी शासन निश्चित कटिबद्ध आहे. आधार कार्ड संबंधातला निर्णय शासनाने घेणे ते देखील सकारात्मक आहे देवेंद्रजींनी अनेक कठीण प्रश्न देखील मार्गी लावलेत केवळ नाही तर प्रत्यक्ष त्याच्यात अंमलबजावणी केले आणि या शासनाच्या माध्यमातून हा देखील प्रश्न सोडवले जातील आज आम्ही दीप प्रज्वलन करून या समाजाला अंधारातून उजेडाकडे नेल्याच पाहिजे आणि त्याकरता शासन कटिबद्ध आहे आणि शासनाचा तो निर्धार आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRAFULLA PAWAR
Nov 05, 2025 17:16:21
Chendhare, Alibag, Maharashtra:दिवे, मशालींच्या प्रकाशात न्हाऊन निघाली स्वराज्याची राजधानी ....... त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त किल्ले रायगडावर दीपोत्सव ....... मावळा प्रतिष्ठान कडून दीपोत्सवाचे आयोजन ........ अत्र त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडच्या पायथ्याशी चित्त दरवाजाजवळ दीपोत्सव sाजरा करण्यात आला. या दीपोत्सवाला हजारो मशाली, पणत्या, प्रज्वलित करण्यात आल्या. त्यामुळे किल्ले रायगड प्रकाशात उजळून निघाला. यावेळी शिवभक्तांनी शोभेच्या फटाक्यांची आतषबाजी केली. किल्ल्याची तटबंदी फुलांच्या माळांनी सजवण्यात आली होती. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मावळा प्रतिष्ठान कडून हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. शिवरायांच्या आरतीने दीपोत्सवाची सांगता झाली. या दीपोत्सवासाठी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 05, 2025 17:15:57
Ambernath, Maharashtra:अंबरनाथ नगरपालिकाेवर एक लाख टक्के कमळच फुलणार! भाजपाचा जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी रणशिंग फुंकलं. किंवा भाजपाचा स्वबळाचा नारा ? Amb bjp अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून तेजश्री विश्वजीत करंजुले यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. तेजश्री विश्वजीत करंजुले यांच्या सोबत अंबरनाथमधून एकूण चार इच्छुकांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर अंबरनाथमध्ये भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. जिल्हाध्यक्ष नंदू परब, कल्याण लोकसभा समन्वयक शशिकांत कांबळे, माजी आमदार नरेंद्र पवार, आमदार कुमार ऐलानी, प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्यात थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून तेजश्री विश्वजीत करंजुले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. आता हे नाव भाजपाच्या कोअर कमिटीकडून लवकरच अधिकृतपणे जाहीर केलं जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी दिली. यावेळी बोलताना अंबरनाथ नगरपालिकाेवर एक लाख टक्के कमळच फुलणार, असा विश्वास भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी व्यक्त केला असून त्यामुळे भाजपा स्वबळावरच लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 05, 2025 16:27:38
Baramati, Maharashtra:श्रीक्षेत्र निरा नरसिंहपुर येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव लक्ष लक्ष दिव्यांची आरास. त्रिपुरारी यात्रेनिमित्त निरा आणि भीमा नद्यांच्या पवित्र संगमावरील पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र निरा नरसिंहपुर येथील लक्ष्मी नरसिंह मंदिराच्या परिसरात मोठ्या उत्साहात यावेळी मंदिराच्या गाभार्‍यासह संपूर्ण परिसर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत असलेल्या या मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ही आरास करण्यात आली होती. मंदिरात गाभाऱ्यास संपूर्ण परिसरात दीपोत्सवासह दीपदान करण्यासाठी तसेच लक्ष्मीचे नृसिंहाचे दर्शन घेण्यासाठी भाविकाकांसह महिल वर्गाने गर्दी केली होती.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 05, 2025 16:27:15
Jalna, Maharashtra:जालना | अंबडच्या मत्स्योदरी देवीला 11 हजार दिव्यांची आरास त्रिपुरारी पौर्णिमेच्या पावन दिनानिमित्त मंदिर दिव्यांनी उजळलं दीपमाळांनी परिसर उजळून निघाला अँकर-त्रिपुरारी पौर्णिमेच्या पावन दिनानिमित्त जालन्यातल्या अंबड येथील माता मत्स्योदरी देवीला तब्बल 11 हजार दिव्यांची आरास करण्यात आलीये. लक्ष्मीकांत देशमुख मित्रमंडळाच्या वतीने हा दीपोत्सव सलग २३ व्या वर्षी आयोजित करण्यात आलाय. यावेळी आमदार नारायण कुचे आणि तहसीलदार विजय चव्हाण यांनी दर्शन घेत देवीची आरती केलीये.. यावेळी अकरा हजार दिव्यांच्या दीपमाळांनी परिसर उजळून निघाला होता. मनमोहक दृश्य पाहण्यासाठी अंबड शहर व परिसरातील हजारो भक्त आजच्या दिवशी मोठ्या संख्येने दर्शनासाठी हजेरी लगावतात. त्याचबरोबर आजच्या दिवशी परदेशी पाहुणेही देवीच्या दर्शनाला येत असतात..
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 05, 2025 15:39:37
Shirdi, Maharashtra:ऑन उध्दव ठाकरे मराठवाडा दौरा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 32 हजार कोटींचे मोठे पॅकेज जाहीर केलंय... शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होताय... उद्धव ठाकरे केवळ कोरडे आश्वासन देत फिरताय... यापूर्वी मराठवाड्यात जाऊन 50 हजार एकरी देण्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली होती... अडीच वर्ष मुख्यमंत्री रहाणारा माणूस घराबाहेर पडला नाही... जनता बेहाल होती... मुख्यमंत्री झाल्यावर 50 हजार मदतीच्या घोषणेचा विसर पडला... जनतेने नाकारल्याने आता वैफल्यातून विधानं सुरू आहेत... पक्षाच्या भूमिकेमुळे देवेंद्र फडणवीस बिहारला प्रचाराला गेलेत... तुम्हांचा पक्षच शिल्लक राहिला नाही, त्यामुळे तुम्ही काय भूमिका घेणार?... ऑन उध्दव ठाकरे गृहकलह मंत्री टिका - सत्ता गेल्याचे वैफल्य... पक्ष संपला.. जो थोडाफार शिल्लक आहे तो पालिका, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकीत संपणार आहे... भितीपोटी और वैफल्यातून टिका सुरू.. फार लक्ष देण्याची गरज नाही... ऑन राहुल गांधी वोटचोरी - आशिष शेलार यांनी वोट जिहाद संदर्भात जो मुद्दा मांडलाय आधी त्याचे उत्तर द्या... वोट जिहादच्या माध्यमातून वाढलेल्या दुबार मतदानावर तुम्ही बोलत नाही... मतदार यादी जाहीर झाल्यानंतर हरकती घेण्याची मुभा असते... त्या वेळी तुम्ही झोपा काढल्या... जनता तुम्हाला नाकारलं.. आता फक्त राजकारण सुरू... वोटचोरी हा मतदारांचा अपमान... बिहारची जनता तुम्हाला धोबीपछाड करणार... ऑपरेशन सिन्दुर नंतर प्रधानमंत्र्यांचे अभिनंदन करण्याऐवजी तुम्ही सैन्य दलाच्या हेतूवर तुम्ही शंका घेता?... तुमची बौद्धिक दिवाळखोरी उघड झाली... वोटचोरीच्या आरोपाला जनता भुलणार नाही... येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये जनता राहुल गांधी आणि त्यांच्या पिळवळींना जागा दाखवणार...
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 05, 2025 15:39:01
Dhule, Maharashtra:भाजपने जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक प्रभारींची नियुक्ती केलेले आहे. धुळे जिल्ह्याची जबाबदारी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे सोपवण्यात आलेले आहे, तर धुळे ग्रामीणची जबादारी आश्चर्यकारक पद्धतीने कुणाल पाटील यांना सोपवण्यात आली आहे. धुळे शहराची जबाबदारी आमदार अनुप अग्रवाल यांना सोपवण्यात आलेली आहे. धुळे ग्रामीणची जबाबदारी कुणाल पाटील यांना सोपवण्यात आल्यामुळे भाजपच्या काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. तर काँग्रेसमधून भाजपात आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र उत्साह दिसून येत आहे. कुणाल पाटील यांना पक्ष महत्त्व देत असल्याचा यातून संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. भाजपचे तरुण आमदार राम भदाणे यांना डावलून कुणाल पाटील यांना जबाबदारी देण्यात आल्यामुळे पक्षातील निष्ठावंतांमध्ये कुजबूज सुरू झाली आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 05, 2025 15:17:21
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 05, 2025 15:16:37
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - से विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्काराने नीना कुलकर्णी सन्मानित, शानदार सोहळ्यात पुरस्कार प्रदान. अँकर - मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार प्रदान सोहळा मोठ्या थाटात सांगलीत पार पडला. जेष्ठ अभिनेत्री, और नाटककार नीना कुलकर्णी यांना विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे जब्बार पटेल यांच्या हस्ते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विष्णुदास भावे गौरव पदक, २५ हजार रोख रुपये, शाल श्रीफळ, सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर सांगलीच्यावतीने गेल्या ५७ वर्षा पासून रंगभूमीवरील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रंगकर्मींना विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतय.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 05, 2025 14:51:37
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 05, 2025 14:18:25
Chendhare, Alibag, Maharashtra:एलईडी दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघाले मंदिर. चौल येथील रामेश्वर मंदिरात दीपोत्सव. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त विद्युत रोषणाई. दिव्यांचा सोहळा अनुभवण्यासाठी नागरिकांची गर्दी. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अलीबागच्या चौल येथील श्री रामेश्वर मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. मंदिरावर एलईडी दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. विद्युत दिव्यांच्या विविधरंगी प्रकाशात मंदिर आणि मंदिराचा परिसर न्हाऊन निघाला. मंदिरासमोरील पुष्करणीत या विद्युत रोषणाईचे पडणारे प्रतिबिंब अधिकच खुलून दिसत होते. यावेळी शोभेच्या फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. हा दिव्यांचा नयनरम्य सोहळा डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top