Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

आज रथसप्तमी पर रुक्मिणी माता के सोने के आभूषण पहनाए गए

SKSACHIN KASABE
Jan 25, 2026 13:50:17
Pandharpur, Maharashtra
आज रथसप्तमी निमित्त श्री रूक्मिणी मातेस सोन्याचे मौल्यवान अलंकार परिधान करण्यात आले श्री रुक्मिणी मातेस सोने मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, तांबडी चिंचपेटी, जवमनी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मी हार, मोहरांची, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा इत्यादी अलंकार परिधान करण्यात आले होते.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Jan 25, 2026 17:15:59
Kalyan, Maharashtra:आरपीएफ हेड कॉन्स्टेबल शरद घरटे ने कर्करोगग्रस्त प्रवासी का प्राण बचाया. कोच और प्लेटफॉर्म के बीच फँसे प्रवासी ने यह घटना कल्याण प्लेटफॉर्म क्रमांक 4-5 पर घटित बताई. उत्तर प्रदेश के झाँसी निवासी राजेंद्र शुक्ला को कर्करोग हुआ था, उन्हें उपचार के लिए थाने स्थित मेडिसिटी अस्पताल ले जाना था. वे कल्याण स्टेशन पर उतर रहे थे. उनकी पत्नी और बेटा उनके साथ थे. उन्होंने एसी कोच में कुछ सामान रखे थे, इसलिए वे उसे लेने अंदर गए. उसी समय राजधानी एक्सप्रेस आगे बढ़ने लगी. उतरने के समय झुककर शुक्ला फूटबोर्ड पर पकड़े रहे और कोच और प्लेटफॉर्म के बीच फँस गए. ड्यूटी पर तैनात आरपीएफ हेड कॉन्स्टेबल शरद घरटे ने दौड़कर प्रवाशे को बाहर निकाल दिया.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Jan 25, 2026 16:45:59
Pandharpur, Maharashtra:Anchor - स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच तमाशा क्षेत्रातील लोककलावंत रघुनाथ खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्राची लोककला म्हणजे तमाशा आहे. या लोककलेलातून फक्त मनोरंजन होत नाही तर त्यातील कलाकार अत्यंत शालीन भाषेत समाजनप्रबोधन सुद्धा करतात. या तमाशा क्षेत्रात अनेक मोठ्या कलावंतांनी आपली कला दाखवली त्या कलेने ओळख दिली. याच याच तमाशा क्षेत्रात काम करणाऱ्या रघुवीर खेडकर यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. आज मनोरंजन आणि समाज प्रबोधनाची माध्यमे बदलेली असली तरी आजही ही तमाशा लोककला टिकून आहे. पद्मश्री पुरस्कार प्राप्त रघुवीर खेडकर यांच्याशी संवाद साधला आहे झी 24तास प्रतिनिधी सचिन कसबे यांनी...
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Jan 25, 2026 15:31:14
Kalyan, Maharashtra:मधुर म्हात्रे बेपत्ता प्रकरणी गुन्हा दाखल; “पोस्टर लावून आमची बदनामी” — वडिलांचा आरोप. मधुर मात्रे निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच मधुर मात्रे यांचे वडील माध्यमांच्या समोर.. मधुर मात्रे यांच्या वडिलांवरती कोणाचा दवा होता का? मधुर म्हात्रे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी पदाधिकाऱ्यांसमोर का येत नाही? कल्याण पूर्वेत ठाकरे गट नगरसेवक मधुर म्हात्रे बेपत्ता असल्याच्या पोस्टरमुळे निर्माण झालेल्या वादाला आता कायदेशीर वळण मिळालं आहे. मधुर म्हात्रे यांच्या वडिलांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत पोस्टरमुळे आमची व कुटुंबाची बदनामी होत असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. आज ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण पूर्वेत नगरसेवक मधुर म्हात्रे बेप्ता असल्याचे पोस्टर लावले होते. या पोस्टरविरोधात मधुर म्हात्रे यांच्या वडिलांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. माझा मुलगा बेपत्ता नसून देवदर्शनासाठी गेलेला असून लवकरच परत येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पोस्टर लावणं म्हणजे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी ठाकरे गटावर केला आहे. “मुलगा व्यवस्थित असून कालच त्याच्याशी संपर्क झाला होता,” असंही त्यांनी सांगितलं. ठाकरे गटाच्या या कृत्यामुळे आमचं कुटुंब मानसिक त्रासात असल्याचं म्हणत त्यांनी कारवाईची मागणी केली आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Jan 25, 2026 14:51:03
:अँकर:विदर्भाची प्रती पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील डव्हा येथील नाथनगरीत श्री नाथ नंगे महाराज यांच्या ७६ व्या यात्रा महोत्सवाचा मोठ्या उत्साहात समारोप झाला.१९ जानेवारीपासून सुरू झालेल्या या यात्रेचा समारोप आज राप्तसप्तमीच्या पवित्र दिवशी भव्य महाप्रसाद वितरणाने करण्यात आला.यंदाच्या यात्रेनिमित्त तब्बल २२१ क्विंटल महाप्रसादाची तयारी करण्यात आली होती.यामध्ये १०० क्विंटल पुरी,४१ क्विंटल बुंदी आणि ६० क्विंटल भाजी असा महाप्रसादाचा समावेश होता.आज दुपारी एक लाखाहून अधिक भाविकांना महाप्रसादचे वाटप करण्यात आले.व्हीओ:महाप्रसाद वितरणासाठी ५१ ट्रॅक्टरच्या साहाय्याने नियोजनबद्ध पद्धतीने महाप्रसाद पोहोचवण्यात आला.विशेष म्हणजे, एकाच वेळी एकाच पंगतीत लाखो भाविकांना महाप्रसाद वितरित करण्यात आला. या भव्य व्यवस्थेसाठी ४ हजार स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध सेवा दिली.यात्रा काळात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. भाविकांच्या सोयीसाठी उत्तम नियोजन करण्यात आले असून, संस्थानच्या विश्वस्तांनी यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Jan 25, 2026 14:17:52
Dharashiv, Maharashtra:ऑडियो क्लिप के जरिए शिवसेना के संपर्क प्रमुख राजन साळवी की बदनामी करने वाले शिवसेना के पदाधिकारी के खिलाफ ठोस कार्रवाई की जाएगी। शिवसेना के नेता और पालकमंत्री प्रताप सरनाईक ने इस मामले में सीधे भूमिका निभाई है। बदनामी करने वाले शिवसेना पदाधिकारी अविनाश खापे के खिलाफ कठोर कार्रवाई की बात प्रताप सरनाईक ने कही है। ऑडियो क्लिप के जरिये पक्ष के वरिष्ठ नेताओं की बदनामी बर्दाशन नहीं की जाएगी; श дисципंल की ठोस कार्रवाई होगी, उन्होंने स्पष्ट किया। इस प्रकरण से शिवसेना की राजनीति में हलचल मच गई है और अब अविनाश खापे पर कौन सी कार्रवाई होगी यह सबकी नजर है। शिवसेनती आंतरिक विवाद उफान पर है; बदनामी प्रकरण में प्रताप सरनाईक आक्रामक बने हुए हैं।
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Jan 25, 2026 13:34:10
Mumbai, Maharashtra:अँकर एलॉन मस्कशी लग्न करण्याचं तिचं स्वप्न होतं परंतु हे स्वप्न फार काळ टिकू शकले नाही चेंबूर मधील एका महिलेला एलोन मस्क सोबत लग्न करण्याच्या पाहण्याने तब्बल 16 लाखांना फसवण्याचा प्रकार समोर आलाय नेमकं काय घडलं या महिलेसोबत पाहूया हा रिपोर्ट विवो 1 चेंबूरमधील एका 40 वर्षीय महिलेला एलॉन मस्क या नावानं तयार केलेल्या आयडीवरून संपर्क साधण्यात आला. स्वतःला एलॉन मस्क असल्याचं भासवून या व्यक्तीनं पीडित महिलेला लग्नाचं आमिष दाखवलं होतं. तसेच अमेरिकेत आरामदायी जीवनशैली देण्याचं स्वप्नही दाखवलं. महिलेला वाटलं, तिचं तर नशीबच पालटलं. दोघांची चॅटिंग सुरू झाली, ऑनलाईन प्रेमसंबंध जुळले, पुढे हळूहळू तोतया एलॉन मस्कनं या महिलेकडून १६.३४ लाख लुबाडले. याप्रकरणी आता गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एलॉन मस्क नावाच्या आयडीवरून पीडित महिलेला एक्सवर संपर्क साधण्यात आला. मस्क नावाच्या इसमाने महिलेशी ओळख वाढवून तिला एक मेसेजिंग ॲप डाउनलोड करण्यास सांगितलं होतं. या ॲपलिकेशनवर ते अनेक दिवस गप्पा मारत होते. तोतया मस्कनं महिलेला लग्नाची मागणी घातली. तसंच तिला अमेरिकेला येण्यास सांगितलं. फसवणुकीचा भाग म्हणून, तोतया मस्कनं महिलेला जेम्स नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधण्यास सांगितलं. जेम्स पीडितेला व्हिसा मिळवून देणार होता. विमा कंपनीत काम करणाऱ्या या महिलेनं जेम्सशी संपर्क साधला. व्हिसाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शुल्क भरावं लागेल, असं जेम्सनं सांगितलं. कथित जेम्स नावाच्या व्यक्तीनं तिला ॲमेझॉन गिफ्ट कार्ड खरेदी करण्यास सांगितलं. या कार्डचा कोड पाठवण्यास सांगून त्यावरून पैसे वळते केले. या प्रक्रियेतून पैसे दिल्यास व्हिसा लवकर देता येईल, अशी बतावणी जेम्सनं केली. ऑक्टोबर २०२५ ते जानेवारी २०२६ पर्यंत पीडित महिलेनं ॲमेझॉन कार्डवर जवळपास १६.३४ लाख रुपये खर्च केले. आपली फसवणूक होत असल्याचं लक्षात येताच या महिलेने सायबर पोलिसांशी संपर्क साधून आपली रीतसर तक्रार दिली आणि यानंतर चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या सोशल मीडियावर आणि ऑनलाईन डेटिंग ॲप्सवर असे अनेक फेक प्रोफाइल तयार करून महिलांची फसवणूक केल्याचे प्रकार समोर येत आहेत बाईट मिहीर जोशी सायबर तज्ञ विओ 2 आपणला जीवनसाथी शोधताना आपल भेसावध पाऊल नाटका सायबर भामट्यांचं सावध कसं बनू शकतं याचं हे उदाहरण त्यामुळे सायबर जगताप वावरताना पुरेशी काळजी घेणं महत्त्वाचं आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Jan 25, 2026 13:02:07
Akola, Maharashtra:अकोला महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर कोण होणार याबाबत सध्या प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. निवडणूक आयोगाने आजपासून नामनिर्देशन अर्ज उचलण्याचे आदेश दिले असून, महापौर व उपमहापौर पदाचा अंतिम खुलासा ३० जानेवारी रोजी होणार आहे. महापौर पदासाठी भाजपकडून सर्वाधिक हालचाली दिसून येत आहेत. भाजपच्या चार इच्छुक उमेदवारांनी एकूण २० नामांकन अर्ज उचलले आहेत. यामध्ये कल्पना घोटफोडे, योगिता पावसाळे, शारदा खेडकर आणि वैशाली शेळके यांचा समावेश आहे. तर उबाठा गटाकडून सुरेखा काळे, आणि काँग्रेसकडून निखत शाहीन अफसर अहमद कुरेशी यांनी नामांकन अर्ज उचलले आहेत. उपमहापौर पदासाठीही मोठी चुरस पाहायला मिळत असून, एकूण ७ उमेदवारांनी २७ नामांकन अर्ज घेतले आहेत. भाजपकडून धनंजय धबाले, अमोल मोहोकार, अमोल गोगे आणि नितीन ताकवले, उबाठा गटाकडून विजय इंगळे आणि सागर भारूका, तर वंचित बहुजन आघाडीकडून पराग गवई यांनी अर्ज उचलले आहेत. मात्र उद्या कोणते उमेदवार प्रत्यक्षात नामनिर्देशन अर्ज दाखल करणार, यावरच महापौर आणि उपमहापौर पदाच्या शर्यतीतील अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Jan 25, 2026 13:01:20
Pandharpur, Maharashtra:Anchor भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व संपूर्ण मंदिर परिसरात आकर्षक व नयनरम্য विद्युत रोषणाई करण्यात आली . या निमित्ताने श्री विठ्ठल सभा मंडप, मंदिराचा आतील व बाहेरील परिसर तसेच श्री संत नामदेव पायरी येथे तिरंग्याच्या रंगसंगतीत विशेष विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. याशिवाय श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, श्री संत तुकाराम भवन, श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास, वेदांता - व्हिडिओकॉन भक्त निवास आदी ठिकाणीही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून परिसर देशभक्तीच्या वातावरणाने उजळून निघाला आहे. सदर रोषणाईसाठी सुमारे 100 एलईडी माळा, 25 फोकस लाईट्स तसेच 100 ट्यूब लाईट्सचा वापर करण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात आली असून ही संपूर्ण रोषणाई श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमार्फत करण्यात आली आहे. . दरम्यान, भारतीय प्रजासत्ताक दिन व सलग शासकीय सुट्ट्या आल्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. राज्याच्या विविध भागांतून तसेच परराज्यातूनही मोठ्या संख्येने भाविक श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दाखल झाले आहेत. भाविकांना सुरक्षित, सुलभ व सुव्यवस्थित दर्शन मिळावे, यासाठी मंदिर समितीमार्फत आवश्यक व पुरेशा प्रमाणात सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Jan 25, 2026 11:50:20
Dhule, Maharashtra:Anchor मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा तसेच शिवसेनेने एकत्रित महायुती म्हणून निवडणूक लढवली असून मुंबईकरांनी महायुतीला पसंती दिली आहे. त्यामुळे आम्ही अभेद्य आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस मधून मुंबईत आले असून लवकरच मुंबई महापालिकावर आमची बहीण महापौर म्हणून विराजमान झालेली दिसेल असं वक्तव्य भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी केल आहे. तर मुंबई महापालिकेचा महापौर हा महायुतीचाच असेल असंही आमदार चित्रा वाघ यांनी यावेळी स्पष्ट केल आहे. भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी महाराष्ट्र हिरवा करण्याच्या वक्तव्यावरून एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांचा समाचार घेतला. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असल्यामुळे इथे भल्याभल्यांना पाणी पाजण्याचं काम छत्रपतींनी केल आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या वल्गना कोणी करू नये. अशा वल्गना करून राज्याची सामाजिक शांतता बिघडवण्याच काम कोणी करू नाही असा इशारा यावेळी आमदार चित्रा वाघ यांनी इम्तियाज जलील यांना दिला आहे. आणि तसं जर कोणी केलं तर त्याला उत्तर द्यायला राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत असं सांगायला त्या विसरले नाहीत.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Jan 25, 2026 11:50:04
Chandrapur, Maharashtra:कांग्रेसने संवादाची लवचिकता न दाखवल्यास सर्व पर्याय खुले ,शिवसेना उबाठाचा महापौर बसवण्याची प्राथमिकता, शिवसेना उबाठा आणि वंचित सह दहा नगरसेवकांच्या गटाने घेतली मातोश्रीवर शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट, चंद्रपुरात भाजपलाही संधी असल्याचे झाले स्पष्ट चंद्रपूर महापालिकेत कुणालाही 34 हे बहुमताचे संख्याबळ गाठता आलेले नाही. काँग्रेसला 27 जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यांनी चार अधिकच्या नगरसेवकांचे समर्थन आहे. आता लक्ष उबाठा शिवसेना या पक्षाने तयार केलेल्या नव्या 10 नगरसेवकांच्या गटाकडे आहे. उबाठा शिवसेना 6, वंचित 2 आणि काँग्रेस बंडखोर अपक्ष 2 अशा दहा नगरसेवकांनी आज मुंबईत मातोश्रीवर शिवसेना उबाठा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत जिल्हाप्रमुख संदीप गि-हे यांनी ठाकरे यांना सत्ता समीकरणाची माहिती दिली. सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसने सत्ता स्थापनेबाबत संवादाची लवचिकता दाखवावी ,ती न दाखवल्यास भाजपसह सर्व पर्याय खुले आहेत असा सूर निघाल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद येत नसल्याने ठराविक वेळेत याबाबत निर्णय न झाल्यास उबाठा शिवसेनेचा महापौर जो करेल त्याच्यासोबत संवाद करत प्रसंगी तडजोड करत सत्ता स्थापन करू असेही ठरल्याचे सांगितले जात आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Jan 25, 2026 11:47:09
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - संगीतकार पलाश मुछलकडुन तक्रारदार विज्ञान माने याला 10 कोटींची अब्रूनुकसान नोटीस,तर मुच्छलकडून दबाव व अंडरवर्ल्डची धमकी देण्यात अल्याचा मानेचा आरोप.. अँकर - संगीतकार पलाश मुछल विरोधात स्मृती मानधनाचा बालमित्र विज्ञान माने याच्याकडून तक्रार केल्यानंतर,पलाश मुच्छल कडून विज्ञान माने याला अब्रू नुकसानीची नोटीस पाठवण्यात आली आहे,आपली बदनामी केल्याचा आरोप करत पलाश मुच्छल कडून 10 कोटींच्या मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे.दरम्यान आपल्या पाठवण्यात आलेले नोटीस म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असून नोटीसला उत्तर देणार असल्याचा विज्ञान मानेकडून स्पष्ट करण्यात आलय,त्याचबरोबर पलाश मुच्छल कडून तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात येत असून अंडरवर्ल्डची धमकी पलाश मुछलकडून देण्यात येत असल्याचा आरोप देखील विज्ञान माने याने केला असून चित्रपटातील आर्थिक फसवणूक प्रकरणी न्याय हक्कासाठी आपली लढाई सुरूच राहणार आहे,मात्र पलाश मुछल कडून जीवाला धोका असून आपल्याला संरक्षण मिळावं,अशी मागणी देखील माने यांनी केली आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Jan 25, 2026 11:40:13
Dhule, Maharashtra:धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मिळालेला दणदणीत विजय हा लाडक्या बहिणींचा विजय असल्याचे मत भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे. यावेळी धुळे दौरा आलेल्या आमदार चित्रा वाघ यांचा आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. धुळे महानगरपालिकेत भाजपाच्या तब्बल 28 नगरसेविका विजयी झाले असून यावेळी आमदार चित्रा वाघ यांच्या हस्ते नवनिर्वाचित महिला नगरसेविकांचा सत्कार करण्यात आला. महिला नगरसेविकांनी फक्त नगरसेवक पदापुरता मर्यादित न राहता आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. विजयाने हुरळून न जाता डाऊन टू अर्थ राहत शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी काम करा असं आव्हान यावेळी आमदार चित्रा वाघ यांनी उपस्थित नवनिर्वाचित नगरसेविकांना केलं.
0
comment0
Report
Advertisement
Back to top