Back
Solapur Zilla Parishad election: BJP, Shinde Sena eye seats; contest heats up district-wide
AAABHISHEK ADEPPA
Jan 23, 2026 11:01:10
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत हवा कुणाची ? साडेतीन वर्षाहून अधिक काळ सोलापूर जिल्हा परिषदेत प्रशासकीय राज होते. सोलापूर जिल्हा परिषदेचे 68 गट आणि 11 पंचायत समितीमध्ये 136 गणासाठीची निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झालीय. त्यामुळे आता गाव गड्यातील कार्यकर्त्यांमधील नेतृत्वाची स्पर्धा रंगणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या जागांसाठी भाजप, सेना, राष्ट्रवादीत सामना रंगणार आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये भाजपा विरुद्ध शिंदेसेना असाच सामना पहायला मिळणार आहे.
*सोलापूर जिल्हा परिषद 2017 चे पक्षीय बलाबल*
*सोलापूर जिल्हा परिषदेत एकूण सदस्य - 68*
एकूण संख्या - 68
- राष्ट्रवादी - 23
- काँग्रेस - 7
- दीपक साळुंखे/गणपतराव देशमुख गट- 5
- भाजप - 14
- शिवसेना - 5
- परिचारक गट -3
- शहाजीबापू पाटील - 2
- महाडिक गट - 3
- समाधान आवताडे गट - 3
- संजय शिंदे यांचे - 2
- सिद्रामप्पा पाटील गट- 1
सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या आहेत. जिल्ह्यात एकूण 24 लाख 59 हजार 227 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी साठी राखीव असल्याने 18 गटात चुरस असणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील सहा मतदारसंघात महाविकास आघाडीचे तर पाच मतदार संघात भाजपचे आमदार आहेत. नगरपालिका निवडणुकीत बार्शी वगळता इतरत्र भाजपला नगराध्यक्ष निवडणुकीत यश मिळवता आले नाही मात्र पूर्वीपेक्षा नगरसेवकांची संख्या वाढली आहे हे मात्र नक्की. उर्वरित पाच मतदारसंघ पैकी तीन जागा सोलापुरातील तर अक्कलकोट आणि पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघ असे मिळून पाच जागांवर भाजपचे आमदार आहेत. यामध्ये अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, दक्षिण सोलापूरचे आ. सुभाष देशमुख, आ. समाधान आवताडे हे शहरी राजकारणासह ग्रामीण राजकारणावर वर्चस्व राखून आहेत.
भीमा नदीच्या प्रदूषणामुळे आरोग्यासह पाण्याचा आणि स्वच्छतेचा प्रश्न चिंतेचा आहे. जिल्हा परिषद शाळांच्या भौतिक सुविधा अभावी विद्यार्थी गळती, शाळा बंद पडण्याचा धोका, प्राथमिक आरोग्य सुविधांचा विकास, शेती कर्जमाफी, रखडलेल्या सिंचन योजना, अंतर्गत ग्रामीण रस्ते, बस सुविधा या प्रमुख समस्या असणार आहेत.
भाजप जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सर्व जागी उमेदवार दिलेले आहेत. सर्व ठिकाणी ताकतीने लढत आहे. महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत प्रत्येक तालुक्यामध्ये चिन्हावर लढत आहे. त्यामुळे भाजपचे रेकॉर्ड ब्रेक उमेदवार निवडून येण्याचा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केलाय.
बाईट -
शशिकांत चव्हाण ( भाजप, जिल्हाध्यक्ष ) (पांढरा शर्ट )
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सर्व विधानसभा मतदारसंघा नुसार पंचायत समिती गणामध्ये फॉर्म दाखल केले असल्याची माहिती ठाकरे सेनेच्या जिल्हाप्रमुखांनी दिली आहे.
सध्याच्या निवडणुका अस्सल ग्रामीण भागातील निवडणुका असून सर्वच पक्ष सावध भूमिका घेत आहेत. जिल्ह्यात युती आघाडी बाबत सर्वत्र भेळ मिसळ झाले असल्याची प्रतिक्रिया राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलीय.
प्रशांत माने ( राजकीय विश्लेषक तथा जेष्ठ पत्रकार ) ( ( मागे काच )
जयकुमार गोरे यांच्याकडे राज्याचे ग्रामविकास मंत्री पद असल्याने सोलपुर जिल्हा परिषद ही भाजपच्या ताब्यात असावी यासाठी सुरुवातीपासून रडण्याची आखण्यात येत आहे. तुल्यबळ नसलेल्या ठिकाणी भाजपा प्रस्थापित नेत्यांना सोबत घेत कमळ चिन्हावर निवडणुकीला सामोरे जात आहे.
प्रमोद बोडके ( राजकीय विश्लेषक ) ( काळा शर्ट )
जिल्हा परिषAerणुकीच्या निवडणुकीमध्ये गटातटाचे राजकारण दिसून येणार असून राजकीय सोयीसाठी प्रत्येक पक्षाने गटातटाची आरास मांडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गटातील निवडणूक ही अटीतटीची होणार असल्याच जेष्ठ पत्रकारांना वाटतं आहे.
शरीफ सय्यद ( जेष्ठ पत्रकार ) ( डार्क निळा शर्ट )
सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीवर कायम मोहिते पाटील यांचे वर्चस्व राहिलेले आहे. सध्या मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व करीत आहेत. जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक नऊ जागा आहेत. त्या पाठोपाठ पंढरपुरात 8, माढा व सांगोल्यातून 7 जागा आहेत. साधारण चार तालुक्यांमध्ये 31 जागा आहेत त्यावर झेडपी सत्ता वर्चस्वाचे गणित असेल. करमाळा बार्शी मोहोळ दक्षिण सोलापूर अक्कलकोट मधून सहा जागा तर उर्वरित मंगळवेढ्यातून 4, उत्तर तालुक्यातून 3 जागा असे अकरा तालुक्यात 68 गटातून प्रतिनिधी निवडले जाणार आहेत. नगरपालिका निवडणुकीत भाजपने ऑपरेशन लोटस राबवले त्याचा फायदा जिल्हा परिषद निवडणुकीत होतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापुरात ठिय्या मांडून आहेत त्यामुळे ग्रामीण भागातल्या या निवडणुकांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजप सज्ज असली तरी जिल्हा परिषदेत हवा कुणाची होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रतिनिधी - अभिषेक आदेप्पा, सोलापुर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowJan 23, 2026 13:36:530
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJan 23, 2026 13:36:250
Report
UPUmesh Parab
FollowJan 23, 2026 13:18:210
Report
UPUmesh Parab
FollowJan 23, 2026 13:08:460
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJan 23, 2026 12:38:100
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJan 23, 2026 12:36:570
Report
AKAMAR KANE
FollowJan 23, 2026 12:33:110
Report
ABATISH BHOIR
FollowJan 23, 2026 12:18:020
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJan 23, 2026 12:17:200
Report
JMJAVED MULANI
FollowJan 23, 2026 12:01:120
Report
GMGANESH MOHALE
FollowJan 23, 2026 12:00:580
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJan 23, 2026 11:49:500
Report
KJKunal Jamdade
FollowJan 23, 2026 11:36:340
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJan 23, 2026 11:35:480
Report
AAASHISH AMBADE
FollowJan 23, 2026 11:31:120
Report